एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<<कालचा 'पुढच पाऊल' कुणी पाहीले का? २ बायका एकमेकी चे केस धरून , गडाबडा लोळत, भानड्त होत्या.....>> दिपाली मला प्रवाहच्या सिरीयल्स बघणार्‍यांची फार फार कीव येते... बघावी लागणार्‍यांची तर त्याहून....

पु.पा मधल्या भांडणांपेक्षा लेडीज डब्बा कैक रित्या परवडला... काय अघोरी भांडणं त्या पुपा मध्ये अरारारारा....>>>>>>>>>> +१

स्वप्ना... एलदुगो वर आपली लेखवजा विशेष टिपणी कधी येतेय त्याची फार्र फार्र आतुरतेने वाट बघतेय... बरेच दिवस हल्कं फुल्कं चटपटीत खमंग काही चावायला आप्लं वाचायलाच मिळालेलं नाहीये... मालिका संपेपर्यंत थांबणारेस का बायो?

>>>

Lol आणि अनुमोदन

<<<कालचा 'पुढच पाऊल' कुणी पाहीले का? २ बायका एकमेकी चे केस धरून , गडाबडा लोळत, भानड्त होत्या.....>> एका भागात ह.खानविलकर बाई त्यांच्या सिरिअल मधल्या विहीणीला छडीने मारत होत्या. ___________/\___________

मंदार,

त्या नन्तर त्यानी विहीणीला shock treatment सुधा दिली. ती येवढी जबरा निघाली की अजुन ही विहीणी चे केस् सगळ्या angle मधे उभे आहेत..

एलदुगो त्यातल्यात्यात बरी वाटावी म्हणून की काय, पण झी वाले तिच्या ब्रेकमधे 'तू तिथे मी' चे भयाण ट्रेलर दाखवतात, त्या सिरेलचे नाव 'तुला ठार करेन मी' असे पायजे Proud

Rofl

तुला ठार करेन मी >> हे नाव तर बहुतेक मालिकांना चपखल बसेल. कुणाला तरी कुणी तरी मारायला टपलेलेच असते.

एलदुगो त्यातल्यात्यात बरी वाटावी म्हणून की काय, पण झी वाले तिच्या ब्रेकमधे 'तू तिथे मी' चे भयाण ट्रेलर दाखवतात, त्या सिरेलचे नाव 'तुला ठार करेन मी' असे पायजे

>>>

Rofl
Lol
Biggrin

उमेश कामत पेईंगगेस्ट म्हणून येणार.... चला, ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेऊ नये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं Wink
आणि तो असणार आहे राष्ट्रीय कीर्तीचा नेमबाज!!
काहीतरी वेगळं प्रोफेशन दाखवण्याची कल्पकता दाखवली म्हणायची का लेखकाने Uhoh

>> उका तर म्हणतायत की ते शेफ असणारेत.

>>उत्तम स्वैंपाक करता येणारा रा की नेमबाज.

आईआईगं angry_madbanginghead_2.gif

राधाने अमानवाला समज दिल्याने आज मला आनंद झाला.>> येस्स मला पण! Happy 'मी आत्ता तुला स्पष्ट शब्तात समजावलय. आय होप तुला कळलं असेल, नाहीतर मला इतर प्रकारे ही समजावता येतं. फक्त आत्ता मी थोडी माणुसकी दाखव्लीये..!! Lol जियो राधा!!

उत्तम स्वैंपाक करता येणारा >> मग सोपय की. तो राधाला एखादा पदार्थ शिकवेल आणि मग राधाला तिने घनाबरोबर बनवलेल्या पहिल्या जेवणाची आठवण येइल. या एकाच सिनकरता त्याला 'उत्तम स्वैंपाक करता येणारा' बनवले का?

आजच्या सकाळ की मटा कुठल्यातरी पेपरात आलेय की मराठी मालिकांकडे पाठ फिरवणा-या मराठी माणसांना परत मालिकांकडे खेचुन आणण्यात ह्या मालिकांमधला हिंसाचार यशस्वी झालाय. जे कोणालाही जमले नाही ते शेवटी हिंसाचाराने जमवले. लोक परत मराठी मालिका पाहायला लागले......

पण अजुन लोक हिंसाचार आवडीने पाहण्यासाठी मालिकांकडे वळले की 'अरे देवा, आता हेही इथे.......' हे म्हणुन कपाळ बडवण्यासाठी मालिकांकडे वळले हे नक्की कळलेले नाहीय. Happy

abeer म्हणजे सुवास/ fragrance ( गूगल प्रसन्न Happy )

मला अबीर शब्द "अबीर गुलाल उधळीत रंग " ह्या गाण्यावरूनच माहित होता Happy

अगं ड्रीमगर्ल मी कालचा भाग मिसलाय. तू मला परवाचा भाग का वर्णन करून सांगत्ये आहेस? Uhoh
तुला ठार करेन मी>>>>>>> अगागागागा Biggrin

इला-स्वजो संवाद, राधाचे अमानवास झापणे, विनय आपटेंचे हवालदिल होणे, घनाला झालेला राधाचा आभास हे सगळे मी पाहिले आहे. यापुढे काय झाले ते सांगा की कुणीतरी.

अबिर = बुक्का. पण त्याचे नाव मंजूडी म्हणते तसे अभिर आहे. त्याचा काय अर्थ? योग्य बाफवर विचारतो.

सकाळ की मटा कुठल्यातरी पेपरात आलेय की मराठी मालिकांकडे पाठ फिरवणा-या मराठी माणसांना परत मालिकांकडे खेचुन आणण्यात ह्या मालिकांमधला हिंसाचार यशस्वी झालाय. >>>>>
हो साधना मी पण वाचलं ते. आणि ते खाली एक स्ट्रिप पण टाकतात म्हणे की यात कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. असंही वाचलं.
आणि नचिकेत पंतवैद्य(स्टार टीव्हीचा सीईओ...की कायतरी) म्हणतो की हे जर लोकांना आवडत नसेल तर आम्ही विचार करू. हीही वाचलं. हा पंतवैद्य सोनालीकुलकर्णी(सिनियर) चा नवरा.
याला कुणी सांगितलं की हे लोकांना आवडतं?
जीभ कापणं, गरम इस्त्री फिरवणं, जमिनीवर तेल ओतून सुनेला/ पायात पाय घालून विहिणीला(चक्क!)पाडणं, करवत इ.इ.

अगं ड्रीमगर्ल मी कालचा भाग मिसलाय. तू मला परवाचा भाग का वर्णन करून सांगत्ये आहेस?>> तो पर्वाचा होता काय? मग मीपण मिसला/... मला वाटले मी सगळ्या भागांची भेळ करून तुला ष्टोरी सांगितली...

Pages