एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>असंभवमधले वसईचे घर

अहो, माणसंही जवळपास त्याच सिरियलमधली आहेत की - इला भाटे, वल्ली काकू वगैरे वगैरे.....मांजरांप्रमाणे माणसंही घराला धार्जिणी असतात काय? Happy

काल भाटेकाकू डोक्यात गेल्या. मी हापिसातून घरी आले तेव्हा त्यांचं दळण चालू होतं आणि मी फ्रेश होऊन आले तरी ह्यांचं आपलं चालूच. घनाही शांतपणे ऐकत होता. वर भाटेकाकू म्हणाल्या की तू एव्हढं कमावतोस की तुला स्वतःचं घर घेणं सहजशक्य आहे तरी तू आमच्याकडे राहिलास. मी मनात म्हटलं अहो बाहेर पडला आणि काकाकाकूंनी परत घुसू नाही दिलं तर? म्हणून राहिला असेल हो हक्क सांगायला. पण असा विचार आम्ही मर्त्य मानव करतो. काळे कुटुंबात सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ! त्यांचं नाव खरं तर 'गोरे' हवं होतं.

काळे कुटुंबात सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ! त्यांचं नाव खरं तर 'गोरे' हवं होतं. >>> Lol

स्वप्ना Rofl

मला त्या सिरिअल पेक्षा तुझी चिडचिड आणि त्यातुन निर्माण होणार्‍या कमेंट्स जास्त आवडायला लागल्यात Proud Wink

स्वप्ना Rofl

स्वप्ना_राज>> Lol सिरियस्ली..
आणि अजून एक प्रश्न म्हणजे 'एव्हढं कमावतोस की तुला स्वतःचं घर घेणं सहजशक्य आहे'.> कधी कमावतो तो एव्हढं???!!! तो वर्क-फ्रॉम-होम करताना सुद्धा दिसत नाही कधी..! Proud किमान त्याला रोविओ सारख्या कंपनीज गेमिंग सॉफ्ट्वेअर टेस्ट करायला प्रोजेक्ट्स देतात असं तरी दाखवा म्हणावं..

मी काल पाहिलं आणि मला तर आवडलं. इला भाटेचा गोड गोड आई/सासुचा रोल मला चांगलाच आवडला आहे. इतकं क्युट दिसणं आणि गोडमिच्च बोलणं कसं काय जमतं कोणास ठावुक? स्वजो भरभक्कम कमावतो हे ऐकुन मुक्ता माझीच बहिण असल्यासारखं हुश्श झालं. नाही तर असा निकम्मा तिच्याशी लग्न करुन काही कमवत नसणार्‍या मुलाच्या प्रेमात तिने पडणं जरा तिच्या प्रॅक्टिकल स्वभावाला शोभलं नसतं. Happy

काल भाटेकाकून्चे सन्वाद डोक्यात गेले. चान्गुलपणाची परिसीमा म्हणजे आपले पैसे आई-बाबान्च्या अकाउन्ट्मधे ठेवणे. आणि घना अमेरिकेला गेला तर येवढा काय पहाड कोसळ्णार आहे? grow up!! स्व. जो. मस्त.

अरेच्चा..वर पूर्वा ह्यांनी दिलेली झगमगची लिंक वाचून तर एलदुगोची पुढची गोष्ट सलमान-अक्षय-प्रियांका च्या 'मुझसे शादी करोगी' वर बेतल्यासारखी वाटत्येय..! Uhoh
मला हा टुकार सिनेमा माझ्या एका बहिणीच्या सलमान-प्रेमामुळे बघावा लागला होता..! त्यात सुद्धा सलमानला शिस्त लागावी इ. म्हणून अक्षय त्याचा मित्र बनून येतो आणि असं दर्शवतो की तो नायिकेच्या प्रेमात पडलाय. शेवटी सल्लुला प्रेमाचा साक्षात्कार होतो.. Lol

असं असेल तर माईआज्जी बरोबर महेशराव आणि घनाचे आत्तोबा सुद्धा सामील असणार असं वाटतंय.

हॅ राव सगळा इंट्रेस्ट घालवला....
असला टुकारपणा असेल तर मी अजिबात बघणार नाही ही मालिका...
एलदुगोच्या निर्मात्यांनी याची नोंद घ्यावी Happy

अमानव आणि पपा आनन्द लुटताहेत आणि राधा येते तो प्रसंग एवन !
मी तुला सायकलवरून सोडू का रे ?
चपला घातल्या का त्यानी ? इ.
या प्रसंगातले संवाद, अभिनय सर्व काही लाजवाब..

एक घोळ..
घना चिडून चादर फेकतो. मग राधाचा भास होतो त्याला. ती बोलता बोलता चादर आणून ठेवते त्याच्याशेजारी. घनाला कळतं भास आहे मग परत चिडून चादर फेकून देतो. ती तर आधीच फेकली होती.. राधा भास असेल तर चादर खरी कशी?? Happy

Kaal mi nuste Ila Bhatenche Sanvaad aikle, waitaag ter aalaach pan ek goshta observe keli.
Tyanche haav bhaav aani sanvaad baryaach wela khup animated astat, itake ke tya mala kadhi kadhi Lady Ashok Naigaonkar aslyacha bhaas hoto.

khushi kumari gupta sing raizada >> Lol

सिरीयलवाले मा.बो. चा हा धागा वाचतात वाटत. Happy कारण राधाने मस्त झापला त्या दाताडया मानव ला......:)
बाकी सिरीयल मस्त वळण घेणार अस वाटतय..फक्त राधा दुसरयाच्या प्रेमात, दुसर लग्न, पुन्हा घटस्फोट, परत पहील्याशी लग्न अस हिंदी सिरीयलप्रमाणे दाखवल नाही म्हणजे मिळवली... Sad

राधाने अमानवाला समज दिल्याने आज मला आनंद झाला.
बस्के, घनाजवळ ते ब्लँकेट परत आल्याच्या प्रसंगात अगदी हाच प्रश्न मनात आला.
प्रेक्षक किती लहानसान गोष्टींकडे लक्ष देतात हे एलदुगोवाल्यांना आता समजेल. Wink
नाहीतरी ते इथं येऊन आपली चर्चा वाचतात असा संशय आहेच. Wink
असे खरेच असेल तर घना त्याचे पैसे आईवडीलांच्या अकाऊंटला ठेवतो? आईवडील बरे असे खपवून घेतात? हे प्रश्नही त्यांनी लक्षात घ्यावेत. अजिबात पटले नाही. उलट आईवडीलांनी घनाला "अरे घोड्या तुझे पैसे तू सांभाळ." असे सांगणे अपेक्षित आहे.

कालची मुक्ताची सलवार मस्त होती. क्रीम कलरची. पण ओढ्णी सफेद व्हाइट्ट होती. ती क्रीम कलरची जास्त छान दिसली असती. त्यांचे बॉस फार विनोदी आहेत. त्यांचे कपडे किती इल फिटिंग आहेत. ते मानवास गोखरू म्हनले तर फार हसू आले मजला. किती वर्शांनी तो शब्द ऐकला. मानवचे तिच्यावर एक तर्फी प्रेम आहे का?

मानवचे तिच्यावर एक तर्फी प्रेम आहे का? >>> हो ! आणि फक्त तिला ते माहित आहे. तिचे पप्पा त्याला तिचा मानलेला भाऊ समजतात. म्हणून लग्नामधे त्याला घनाचा कान पिळायला सांगतात. तो जोरदार कान पिळून घनाचे प्राण कंठाशी आणतो. तेव्हा राधा घनाच्या कानात कुजबुजते की तो सूड घेतोय म्हणून. घना कशाचा म्हणून विचारतो. तेव्हा ती नंतर सांगते म्हणते. अजूनपर्यंत काही ते सांगितलं गेलेलं दाखवलं नाहीये.

साबा च्या 'देवयानी' प्रेमामुळे आता मा़झे सगळे एपिसोड मिसनार.... :(..

कालचा 'पुढच पाऊल' कुणी पाहीले का? २ बायका एकमेकी चे केस धरून , गडाबडा लोळत, भानड्त होत्या.....

:-o

मंदार Lol

फार काही मिसलं नाहीस टोके. आणखी दहा भाग नाही पाहिलेस तरी काही मिसणार नाही >> अगदी अगदी Happy

टोकू, मी पण अधून मधून पाह्यलाय.. त्यावरून व इथल्या चर्चेवरून असं समजलंय की तो अमानव रोज राधाच्या पपांना दुख:त (आणि एकाच प्यालात) साथ करतो. त्यावरून राधा त्याला मस्त झापते. पपा फार म्हणजे फारच हवालदिल झालेत (पपांचा अभिनय चटका लावणारा)

इथे घनाला राधाचे भास होतायंत वर इला माऊली त्याला लाडे लाडे राधाच्या प्रेमाची आणि तो त्यांचं कित्ती गुणी बाळ आहे त्याची जाणीव करून देताहेत.
घना(त्याच्या)आत्याच्या एक्स मिस्टरकडे कबूल करतो की त्यांचं (घना-राधाचं) कॉन्ट्रॅक्ट मॅरीज आहे म्ह्णून हे असं आवडणं वगैरे त्याची गोची करतंय.

तिथे राधाच्या घरी पिजी साठीची अ‍ॅड वाचून राधा व आत्यामध्ये हंशा उसळतो, पपा सांगतात मी फार पूर्वी म्हणजे घना-राधाचा अमेरिका गोंधळ चालू असताना ही अ‍ॅड दिलेली वगैरे...

काय मिसळ केलेय... वर्चे थर खाली नी खाल्चे वर.. पण काही फारसा फरक नाही पडायचा बहुतेक... मला वाटतेय मागच्या भागांतून पण फरसाण उस्न आणलंय मी Uhoh जाऊदे कळंलं ना तुला...

इला भाटेचा गोड गोड आई/सासुचा रोल मला चांगलाच आवडला आहे. इतकं क्युट दिसणं आणि गोडमिच्च बोलणं कसं काय जमतं कोणास ठावुक? >> मने Lol

स्वप्ना... एलदुगो वर आपली लेखवजा विशेष टिपणी कधी येतेय त्याची फार्र फार्र आतुरतेने वाट बघतेय... बरेच दिवस हल्कं फुल्कं चटपटीत खमंग काही चावायला आप्लं वाचायलाच मिळालेलं नाहीये... मालिका संपेपर्यंत थांबणारेस का बायो?

कालचा 'पुढच पाऊल' कुणी पाहीले का? २ बायका एकमेकी चे केस धरून , गडाबडा लोळत, भानड्त होत्या.....>> दिपाली मला प्रवाहच्या सिरीयल्स बघणार्‍यांची फार फार कीव येते... बघावी लागणार्‍यांची तर त्याहून....

पु.पा मधल्या भांडणांपेक्षा लेडीज डब्बा कैक रित्या परवडला... काय अघोरी भांडणं त्या पुपा मध्ये अरारारारा....

गोखरु Rofl

Pages