बंगलोरमध्ये रक्ताची आवश्यकता आहे

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बंगलोरमध्ये माझ्या वृद्ध नातेवाईकांसाठी रक्तदात्यांची नितांत आवश्यकता आहे. दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागत असल्याने पर्यायी डोनर द्यावा लागतो आणि असे कोणी रक्तदान करु शकत असल्यास कृपया मला नाव व नंबर कळवाल का? आम्ही डेटाबेस बनवत आहोत व जशी गरज लागेल तसे फोन करुन तुमची उपलब्धता वगैरे पाहून तुम्हांला फोन करु शकू.

कुठे लिहायचे कळाले नाही म्हणून इथे रंगीबेरंगीवरच लिहिले. काही माहिती असेल, कोणी मित्र मैत्रिणी बंगलोरमध्ये असतील, रक्तदान करु शकत असतील, इच्छु़क असतील, तर कळवू शकलात तर बरे होईल.
विपूमध्ये कळवू शकता.

धन्यवाद.

प्रकार: 

.

शैलजा, रक्तगट कोणता आहे? माझ्या बंगलोरच्या मित्रमैत्रिणींना सांगू शकते. दुर्मिळ रक्तगट असेल तर बहुतेक आयत्या वेळीच रक्त घेतले जाते असे मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते. अगोदर रक्तदान करून उपयोग होत नाही म्हणे! बरं, इच्छुकांना रक्तदानासाठी बंगलोरमध्ये कोठे संपर्क करायला सांगायचे?

अरु, अमूक एक रक्तगट हवा असे नाही गं. माझ्या नातेवाईकांना ठराविक एक दिवसांनी रक्त बदलावे लागते, ते मिळते पण पर्यायी डोनर द्यावा लागतो - म्हणजे आम्हांला रक्त दिले जाते, तर आम्ही कोणी रक्तदाता द्यायचा.

आम्ही देऊन झालेलं आहे. तुझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणी असेल रक्त देऊ शकणारं तर मला नाव आणि नंबर कळवशील का? मी पुढे कळवेन. लगेच प्रतिसाद दिल्याबद्दल आणि मदतीची तयारी दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद अरु.

ईनमीन तीन - धन्यवाद.

मृण्मयी - धन्यवाद. हे सुचलेच नाही सगळ्या धावपळीत.

Tajinder Pal S Bagga यांजकडून मिळालेली माहिती:

रक्ताची गरजः

Urgent B + Ve Platlests Required @ Columbia Asia Hospital, Yeshvantapur, Bengaluru.Contact : 9964082820

30-10-2015; 8:00 AM