...मी डास आहे...

Submitted by लाजो on 28 May, 2012 - 19:57

ऋयामच्या डास आहे ला डासाचे हे उत्तर Proud

...मी डास आहे...

डास आहे...मी डास आहे..
चावणे हाच ध्यास आहे...

ओडोमॉसचा वास आहे
मच्छरदाणीचा फास आहे...

इलाज काही खास आहे....
बच्चु तयारी झक्कास आहे

आज रक्ताचा ना घास आहे..
झाला आता तास आहे....

शिकार नाही.. काय त्रास आहे
बंदोबस्त आता बास आहे ....

एका थेंबाची आस आहे
बाकी दुनिया बकवास आहे.... Proud

-----------------

Lol

शब्दखुणा: 

सुचना: खालिल शब्द वापरून आपल्या दोनोळ्या, तीनोळ्या, चारोळ्या बनवा...

तपास, कास, मास, फर्मास, थर्मास, टाईमपास, नापास, उपास, तापास, लंपास.....इ इ

एक काकाक. Lol
डासांचा तपास आहे,
हा एक टाईमपास आहे,
हातात थर्मास आहे,
त्यात चहा फर्मास आहे,
यात मी नापास आहे,
कारण डास लंपास आहे. Lol

शोभा Lol

रक्त नाही आज उपास आहे
झाली जणू बायपास आहे????

सांगा हा वनवास आहे
की श्रावण मास आहे?????

Proud

लाजो Rofl

Pages