Submitted by ऋयाम on 26 May, 2012 - 12:44
अंतरीच्या गूढ गर्भी, रोज एकच त्रास आहे
सुज अंगी दाटलेली, मूळ त्याचे डास आहे.
व्यर्थ चकल्या, व्यर्थ पेस्टा, व्यर्थ सारे रे फवारे,
लोशनाचे करुन प्राशन, झिंगलेला डास आहे.
बंद खिडक्या बंद दारे, पाचवरती फॅन आहे,
मनमनीच्या कोपर्याती, फक्त त्याचा वास आहे.
रानटी अन पाळलेला क्रॉस देखील डास आहे
रंक अथवा राव कोणी, सात होता डास आहे.
सर्व थकले मार्ग आता, फार झाला त्रास आहे,
तोचि रजनी कांत अपुला, फक्त त्याचीच आस आहे ...
* रोबॉट फेम रजनीकांताची माफी मागून..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
हा हा हा ऋयामा .. मला
हा हा हा ऋयामा ..:)
मला वाट्लं डास म्हण्जे तू नानाची आठवण काढ्शील ...तुझा तर डायरेक्ट रजनीदेवाकडेच वशिला दिसतोय ...;)
(No subject)
:फिदी::खोखो:
झिंगलेला डास!
झिंगलेला डास!
(No subject)
(No subject)
(No subject)
सह्हिए
सह्हिए
लय भारी.......
लय भारी.......
अवांतर पण महत्वाचे: अरे पण
अवांतर पण महत्वाचे:
अरे पण तुला 'इतर' विषय आहेत सध्या कविता करायला ते सोडुन डासांवर कविता?
वत्सला +१ असल्या कविता
वत्सला +१

असल्या कविता करायचे का दिवस आहेत तुझे?
(No subject)
भारीच्चे
भारीच्चे
कृपया अवांतर चर्चा टाळा.
कृपया अवांतर चर्चा टाळा.
आणि अवांतर गोष्टींबद्दल काळजी नसावी...
(No subject)
ऋयामा, डासपुराण छान आहे. कुठे
ऋयामा,
डासपुराण छान आहे. कुठे इतका त्रास सोसलास बाबा?
(No subject)
वा ऋयाम! जबरीच रे! काय हे?
वा ऋयाम! जबरीच रे!
काय हे? गझल की हझल की काय ते करे पर्यंत तुझी मजल गेली?
गझल की हझल की काय ते करे
गझल की हझल की काय ते करे पर्यंत तुझी मजल गेली?>>> छे छे ह्याला फार तर 'खुजल' म्हणता येईल

एक पावशेर ऐक-
'मच्छर ने आपको काटा, आपने खुजाया,
चाहकर भी आप उसे मार न सके,
क्यों की उसकी रगों मे आपका ही खून था'
आणि अवांतर गोष्टींबद्दल काळजी नसावी>>> हे मात्र एकदम मान्य!!!
> काय हे? गझल की हझल की काय
> काय हे? गझल की हझल की काय ते करे पर्यंत तुझी मजल गेली?
आवरा!
डासांचं काय करायचं? हे पझल सोडवत मजल दरमजल करतो आहे
>रगो मे खून
आणि खुजल
बाकी.. आगावा दे ट्टाळी!
>> डासांचं काय करायचं? हे पझल
>> डासांचं काय करायचं? हे पझल सोडवत मजल दरमजल करतो आहे
तू डासांची भजनं/आरत्या म्हणून त्यांना प्रसन्न कर..
(मूळ - नको देवराया, अंत असा पाहू)
नको डासराया, डंख असे मारू
झोप ही सर्वथा जाऊ पाहे
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले
मजलागि चावियले तैसे डासा
तुजसम दंश ना करी त्रिभुवनी
धाव गे जननी कासवाई
चिमण>>>>
चिमण>>>>
ऋयाम चिमण
ऋयाम
चिमण 
हे राम !
हे राम !
कासवाई
कासवाई
(No subject)
(No subject)
डास आहे...मी डास आहे...
डास आहे...मी डास आहे...
धमाल चाललीये...
धमाल चाललीये...
तुझं असं कशाने झालं रे ?
तुझं असं कशाने झालं रे ?
Pages