स्लो कुकरमधे करण्याच्या पाककृती

Submitted by webmaster on 11 July, 2008 - 21:17

स्लो कुकरमधे करण्याच्या पाककृती

या अगोदरचे हितगुज इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा तू रेसिपी दिल्यास की हा कुकर घ्यावा हा विचार करत होतो..:)
पण एक मस्त कुपन आलं होतं त्याचा लाभ घेऊन आणला आहे घरी स्लो कुकरपण...६.५ QT. .:P
वरती ते चिकन लिहिलंय ते आधी करेन...मासा केला की नक्की सांगेन...पण त्ये रेसिपी बिसीपी असं लिहिणं होत नाही गं....मी वाचन मात्र असते समस्त रेसिपीजगतात..बघते निदान कृती सांगेन....
आणखी कुणी स्लो कुकर वापरत असाल तर लिहा पटापटा....तुम्हाला अनेक दुवा मिळतील... Happy

मस्त साईट आहे लोला....विकांताला अभ्यास करता येईल Wink आणि ठरलं तर नवी डिश....:P

आभार्स.....:)

स्लो कुकरात राजमा, छोले करायचे असल्यास आधी भिजवुन प्रेशर कुकरला शिजवुन घ्यायचे का?
की फक्त भिजवुन फोडणी घालुन त्यात शिजवायला ठेवायचे?

शिजवायची गरज नाही..मी कधी कधी रात्रभर भिजवते आणि फोडणी घालून स्लो कुकर मधे घालते..कधी फक्त धुवून फोडणी घालून्..फक्त याला शिजायला जास्त वेळ लागतो..

राजमा भिजवुन घेतला होता. प्रेशर न काढताच स्लो कुकरला रात्रभर ठेवला. मस्त शिजला होता!

परवाच्या विकएण्डला स्लो कुकरात बासुंदी केली होती. खमंग झाली होती पण लच्छेदार झाली नाही! पब्लिक्सला (यात काही कायदेशीर नातेवाईक पण आहेत) नाही आवडली! Sad आमच्याकडच पब्लिक फार बासुंदी/रबडी (देवी नव्हे!) प्रेमी आहे. त्यांच्यामते उकळलेल्या बासुंदीला पर्याय नाही!

माझी स्लो कुकरमधली बिर्याणी थोडी (किंवा बरीच) फसली...कुणी केलीय का? काही टीप्स??

बाकी उसळी, ग्रेव्हीचं चिकन्/मटण इ.इ. मस्त होतं.
मासा पण केला होता पण थोडं यमी होत नाही पाणी घालायला लागल्यामुळे जरा bland चव येते. शिवाय स्टॉक जरा जास्तच होतो. त्याचं काय करावं कळत नाही. मी अख्खा तलापिया वापरला होता हेड ऑन. मग हेड फेकुन दिलं.

परवा एका मैत्रीणीने स्लो कुकरात पालकाचे वरण केले होते. पाच तास लागले. आधी डाळ शिजायला लावली. ती शिजत आल्यावर त्यात फोडणी + चिरलेला पालक टाकला. पालक खुप वेळ शिजवावा न लागल्याने पालकाची चव / पोषणमूल्य तसेच होते. ३०-३५ लोकांसाठी एक चांगला आणि फारसा वेळखाऊ नसलेला पदार्थ झाला.

<<<पाच तास लागले>>> आणि <<<फारसा वेळखाऊ नसलेला पदार्थ झाला>>> Uhoh

हा स्लो कूकर कश्यावर चालतो? गॅस? इलेक्ट्रिसिटी?
पंधरा मिनीटात होणार्‍या पाकृसाठी पाच तास हा ऊर्जेचा अपव्यय नाही का?

मंजुडी, स्लो कुकरचे इलेक्ट्रीसीटी कंझमशन नक्की किती हे युनिटसमध्ये सांगता येणार नाही पण फारसे नसावे! मी एखाद्या महिन्यात स्लो कुकर ७-८ तास वापरला तरी बिलात मोठा फरक पडल्याचे लक्षात आले नाही.
माझ्यासाठी स्लोकु ही मोठी सोय आहे कारण एकदा त्यात पदार्थ करायला ठेवला की पुन्हा बघावे लागत लागत नाही आणि सर्व्ह करण्यासाठी दुसर्‍या भांड्यात काढुन पुन्हा पुन्हा गरम करावा लागत नाही. मोठ्या स्वयंपाकाचे आणि सर्विंगचे काम एकाच भांड्यात होते! मोठ्या प्रमाणावर (२५+ लोकं) स्वयंपाक करताना गॅसची शेगडी अडत नाही.
माझ्या काही मैत्रीणी छोट्या स्लो कुकरमध्ये (३ लिटर) कामाला जाताना चिकन्/कडधान्याची उसळ्/भाजी शिजायला लावुन जातात. संध्याकाळपर्यंत एक ताजा गरमागरम पदार्थ तयार असतो!
माझ्याकडे असलेला स्लोकु खुप मोठा (६ लिटर) असल्याने रोज वापरत नाही.

स्लो कुकर वीजेवर चालतो. परदेशात तर उड्या मारत चालतो, पण भारतात किती बील येईल बाब्बो!.

स्लो कुकरमध्ये भात मस्त होतो. पण आधीच लोडशेडींगवाल्या आपल्या देशात पाच तास ? ( इंधन वाचवा बाफ शोधावा लागेल )

एक अबोली, दुध गरम करुन स्लो कुकरमध्ये ठेवले हाय सेटिंगवर. मधुन-मधुन हलवले. नंतर त्यात साखर+बदाम्+वेलची पावडर वगैरे टाकुन उकळू दिले. पण मी वर लिहीले आहे तशी खास झाली नव्हती!

मी लंडन ला slow cooker पहिले त्या मध्ये low, medium & high temperature settings आहे.
with timer settings slow cooker कोणत्या ब्रांड मध्ये मिळेल ?? कृपया लिंक पाठवावे.

फक्त temp settings slow cooker ने जेवण बनवणे कसे manage करता ..बाहेर जाऊन ४-8 तासाने परत येणे etc.....please guide करावे.
slow cooker मध्ये कोरड्या भाज्या करता येतात का नीट ?? जसे भेंडी, बटाटा office tiffin भाज्या. धन्यवाद

आतले भांडे स्टोव्ह्वरही ठेवता येते अशा प्रकारचे स्लो कुकर बाजारात बघितले आहेत. त्यांची किंमत जास्त असली तरी आपल्या पद्धतीचे पदार्थ करताना फोडण्या करणे, मसाला/ कांदा / कडधान्ये/ तांदूळ / मांस आधी परतून मग शिजवणे यासाठी ते उपयुक्त ठरेल असे वाटते.
कोणी वापरले आहेत का? कितपत उपयोग होतो?

वेका, लोला, वत्सला -
slow cooker घ्यायाच्या विचारात आहे मी.. कुठला ब्रान्ड चांगला?

पिन्कु,
http://www.amazon.com/Proctor-Silex-33116Y-Portable-1-5-Quart/dp/B0028D7...
हा मी घेतला आहे मागच्या महिन्यात. २-४ जणांच्या भाज्या,उसळी व्यवस्थित होतात.
फ्राईज मध्ये $९ ला मिळाला. वरचे अ‍ॅमेझॉन वरचे रिव्ह्यु पण चांगले दिसले म्हणून घेतला. माझा अनुभव छान आहे ह्या कुकर बाबतीत. कंपनी खूप नावाजलेली आहे का नाही माहिती नाही.

अजुन काही brands? एक मैत्रिणिकडे Aroma brand चे rice cooker + slow cooker + steamer असे all in one आहे. तिने त्यातले slow cooker option ट्राय केलेले नाही अजुन.

just FYI, आमची कौन्टी मध्येच कधीतरी माहितीची कागदपत्रे (informational docs) पाठवते. त्यात त्यांनी तुलनात्मक चार्ट पाठवला होता. माझ्याकडे त्याची कॉपी नाहीये. बरेच महिने झाले.

त्यांच्यामते स्लो कुकरमुळे सगळ्यात जास्त एनर्जी खर्च होते. त्यामुळे energy efficiency च्या दृष्टीने या कुकरकडे पाहू नये असं एक मत झालंय. I think we should use it when we are so busy and need food options that we do not need to baby sit. Hope this is taken in great spirit Happy

वेका -- स्लो कुकर मधे ग्रेव्हीच चिकन\भाज्या करतेस असं वर लिहिलं आहेस ते कसं जरा सांगतेस का प्लीज?

अगं मी काहीच वेगळं करत नाही. म्हणजे उदा. मसुराची खिचडी नेहमीची कांदा टोमाटो वगैरे जी का तुमची फेवरीट फोडणी स्टेप असेल तिथपर्यंत नेहमीच्या गॅसवर्/भांड्यात करायचं. मग ते सग्ळं स्लो कुकरमध्ये घालायचं आणि बुडेस्तो किंवा जास्त पाणी टाकून स्लोवर मला वाटतं चारेक तास ठेवायचं. मध्ये बाहेरची ग्रोसरी बिसरी कामं असतील ती करता येतात Wink आणि अजूनतरी वेळेबाबत असा काही प्रश्न आला नाहीये. मी मध्ये एकदा चेक करते कारण क्वांटीटी नेहमी बदलत असते.

सेम चिकनचं पण शिजवायच्या स्टेपला स्लो कुकरच्या भांड्यात घालायचं. एखाद्या ग्रेव्हीत नंतर वाटण/नारळाचं दूध वगैरे घालायचं असेल तर ते पण दोन-तीन तासानंतर घातलं आणि शिजू दिल की मिळून येतं.

रच्याकने, हाच धागा पूर्ण वाचून पहा. कुठेतरी सिमिलर कमेंट्स आहेत. Happy

धन्यवाद.......अगं वाचून पाहिलाय पूर्ण धागा.....पण एकही ठोस म्ह्णावी अशी पाकृ आढळली नाही, म्हणून विचारलं.

Pages