सुशीला

Submitted by प्रीति on 17 May, 2012 - 14:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चुरमुरे
पंढरपुरी डाळ्यांचां कुट
कांदा उभा चिरुन
कडिपत्ता, लिंबु, कोथिंबीर
तेल, मीठ, साखर, हळद, तिखट

क्रमवार पाककृती: 

एक मोठ भांड घेऊन त्यात चुरमुरे घ्यावेत आणि सगळे चुरमुरे व्यवस्थित बुडतिल एवढे त्यात पाणी टाकुन भिजवायला ठेवावेत.
लगेच तेल कढई/पॅन मधे तापवत ठेववे. तेल तापल्यावर, मोहरी, जीरे, कडिपत्ता, हिंग, कांदा टाकुन परतुन घ्यावे. कांदा ब्राऊन झाल्यावर हळद, तिखट घालुन परतुन घ्यावे. त्यानंतर पाण्यातील चुरमुरे घट्ट पिळुन फोडणीत टाकावे. नंतर डाळ्याचा कुट, मीठ, सा़खर, लिंबु पिळुन एक बाफ काढावी.

वरतुन कोथिंबीर घालुन गरम गरम सुशीला गट्टम करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर
अधिक टिपा: 

जर थोडा जास्त वेळ गॅसवर ठेवला तर बुडाला लागलेला सुशीला खायला अजुन मजा येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की करणार ही रेसिपी. आता समरमध्ये मुलं खेळुन आली की दुपारी खायला द्यायला छान वाटतोय हा पदार्थ. थँक्स प्रीति !

अगदी शाळेत घेऊन गेलीस प्रीति तू. हा माझ्या शाळेच्या डब्यातील आवडीचा पदार्थ.
सोलापूरकडे याला सुशीलाच म्हणतात. Happy

सुशिला हा प्रकार खुपदा खाल्ला, आणि खुप आवडीचा. थोडा लसुण घातला तर आणखी मजा येईल.
बहुदा, कांदा-पोहे च्या कृतीत आई पोह्याएवजी मुरमुरे वापरायची, आणि डाळ्याच्या कुटा एवजी थोड दाण्याचं कुट.

एका खुप जुण्या पाकृच्या पुस्तकात वाचली होती. हेच नाव होते. एका मैत्रीनीने खिलवलि तेव्हा तिने डाळ्म न टाकता बारिक शेव टाकली होती.. मस्त अगदी Happy

प्रीति, मस्त पाकृ शेअर केली त्याबद्दल धन्यवाद! सुशीला चवीला अगदी मस्त ’होते’! Happy

सुशीलाबद्दल कै.माई देशपांडे यांच्या ’माईंचा स्वयंपाक’ या अप्रतिम पुस्तकात प्रथम वाचले तेव्हाच केला होता हा पदार्थ. ’माईंचा स्वयंपाक’ हे पुस्तक ख-या अर्थाने मराठवाड्याचे रुचि-वैभव आहे. प्रांतीय जवळीकीने मराठवाड्यात रुळलेले काही कर्नाटकी पदार्थ; त्यापैकीच एक म्हणजे सुशीला!

सुशीलाबद्दल लोकसत्तेत एकदा लिहून आले होते; ते इथे वाचा.

चोचले पुरवणार त्याला देव देणार! :-p

धन्यवाद!

नविनच आहे.
पण हे पोह्यांसारखे मोकळे होते की गोळा.. कळत नाहिये.
कोणी केल असेल तर फोटो टाका प्लिज म्हणजे अंदाज येईल.

मस्त आणि सोप्पी पाकृ...

अवांतर :
आता ट्रिप-ट्रेक्सना गाताना
'माझा लाडका माझा लाडका सुशीला'
असे गाणे म्हणायची सोय झाली Wink

छान आहे रेसिपी.

एवढा वेळ मी नाव वाचल पण मला वाटल सुशीला हा लेख असावा. आत्ता पाहील तर रेसिपी आहे. Lol

नंदे,सुशीलाच आहे ते, सोसला आपलं गावठी लाडकं नांव Happy

चिऊ, नीट जमलं तर आपल्या पोह्यांसारखं मोकळं होतं पण काही चुकलं की गिच्च गोळा. Happy

बित्तु ने दिलेल्या लिंकमधील

"पण चुरमुऱ्यांचं व्यवच्छेदक लक्षण असलेला चुरचुरीतपणाच पाण्यात बुडवून पहिल्या फटक्यात साफ घालवून टाकायचा आणि मग त्या मलूल पडलेल्या (बिचाऱ्या) अ-चुरमुऱ्यांचा एक मसालेदार पदार्थ करण्याची पद्धत कर्नाटकात आहे, त्याला म्हणतात ‘सुशिला’. (बिच्चारी सुशीला! एखाद्या लांबसडक केसांच्या नटीला तिच्या दाट, काळ्याभोर केसांसाठीच निवडायचं आणि पहिल्याच दृश्यात तिचं केशवपन करवायचं, अशासारखं वाटतं!) "

या वाक्याशी सहमत. त्यात सासरी हा पदार्थ इतके वेळा होतो नाश्त्याला की आता कंटाळा आलाय.
आमच्या गावात एक जोक आहे, '-हॉस्पिटलमध्ये एक बाळ जन्माला आलं, तेव्हा रडत नव्हतं. मग लगेच त्याने दोन सिस्टरांचं बोलण ऐकलं,'ए आज तू ब्रेकफास्टला काय केलं?-सुशिला' , ए, तू डब्यात काय आणलं-सुशीला' झालं ते बाळ जोरजोरात रडायला लागलं आणि म्हणालं, ''देवा, इतके ८४ लक्ष जन्म घेऊन परत मला याच गावात जन्माला घातलंस?" Happy

पण हे एक पूर्णान्न आहे कारण आपल्या नेहमीच्या पोह्यात जर मटार्,शेंगदाणे वैगेरे नसतील तर प्रोटिनचा अभाव असतो. इथे डाळ्यांचं पीठ भरभरून टाकत असल्याने कार्बो +प्रोटिन एकत्र मिळतातच पण तांदळात फार कमी असलेली काही महत्त्वाची अमिनो अ‍ॅसिड्स डाळीतून मिळतात(डाळ-भात काँबिसारखं).

धन्यवाद सगळ्यांना!!
हा सोलापूर आणि मराठ्वाड्यातला पदार्थ आहे. दोन्हीकडे चुरमुरे बर्‍याच प्रमणात खाल्ले जातात. वेगळं काहीतरी म्हणुन हि रेसिपी जन्माला आली असणार.
लहान पणापासुन "तो" सुशीला असंच ऐकलं आहे.
लाजो>>माहित नाही गं.
पोहे किंवा फोडणिच्या भातासारख लागत असेल का हे?>>सीमा बरीच वेगळी चव लागते.
बित्तुबंगा>>भारी माहिती.
मी_चिऊ >> पाण्यातुन घट्ट पिळल्याने आणि डाळ्याच्या कुटाने मोकळाच होतो.
नीधप>>लहान पणापासुन "तो" सुशीला असंच ऐकलं आहे.
साती>> Happy

अरे व्वा खरच शाळेत असतांना च्या आठवणी जाग्या झाल्या ..
आम्ही ह्याला 'सुशीला' च म्हणतो आणि फोडणीच्या पोळ्यांना 'मनोहर' Happy

त्यात सासरी हा पदार्थ इतके वेळा होतो नाश्त्याला की आता कंटाळा आलाय.>>>> सेम पिंच.. साती.. आमच्याकडेही कधी मिर्ची टाकून कधी मिर्चीचा ठेचा घालून..

Pages