सुशीला

Submitted by प्रीति on 17 May, 2012 - 14:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चुरमुरे
पंढरपुरी डाळ्यांचां कुट
कांदा उभा चिरुन
कडिपत्ता, लिंबु, कोथिंबीर
तेल, मीठ, साखर, हळद, तिखट

क्रमवार पाककृती: 

एक मोठ भांड घेऊन त्यात चुरमुरे घ्यावेत आणि सगळे चुरमुरे व्यवस्थित बुडतिल एवढे त्यात पाणी टाकुन भिजवायला ठेवावेत.
लगेच तेल कढई/पॅन मधे तापवत ठेववे. तेल तापल्यावर, मोहरी, जीरे, कडिपत्ता, हिंग, कांदा टाकुन परतुन घ्यावे. कांदा ब्राऊन झाल्यावर हळद, तिखट घालुन परतुन घ्यावे. त्यानंतर पाण्यातील चुरमुरे घट्ट पिळुन फोडणीत टाकावे. नंतर डाळ्याचा कुट, मीठ, सा़खर, लिंबु पिळुन एक बाफ काढावी.

वरतुन कोथिंबीर घालुन गरम गरम सुशीला गट्टम करावा.

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर
अधिक टिपा: 

जर थोडा जास्त वेळ गॅसवर ठेवला तर बुडाला लागलेला सुशीला खायला अजुन मजा येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या लहानपणी खूप खाल्ला आहे. माझे बाबा करु शकत असा हा एकच पदार्थ होता. :).. यम्मी लागायचा. मी कधीच नाही केला इतक्या वर्षात. तुझ्यामुळे आठवलं. Happy

लहान असताना मला ते नाव म्हणजे कोणी गावकडची सुशीला नावाची आज्जी आठवायची. आणि त्यामुळेच कि काय पण मी आजिबात तयार नसे खायला Happy

पोह्यासारखा जरा कोरडा वाटणाराच असतो हा पदार्थ. गिच्चगोळा नाही होत कधी.
माझी आई यामधे भिजवलेली/अर्धवट शिजलेली कडधान्ये पण घालत असे. त्यामुळे पौष्टिक व्हायचा. आणि कधी कधी घाईत करायचा असेल तर भरपूर दाणे-डाळं, उडीदाची डाळ कुरकुरीत करून. Happy
बरोबर दही आणि लोणचे घ्यायचे. अहाहा!!

नीधप>>लहान पणापासुन "तो" सुशीला असंच ऐकलं आहे.<<<

अगं तुझ्या चुका काढण्यासाठी नव्हतं म्हणलं. विनोद करायचा क्षीण प्रयत्न होता. नाही जमला.. जौद्या! Happy

आवडला सुशीला-
sushila1.jpg

>>चुरमुरे व्यवस्थित बुडतिल

ही फसवणूक आहे. Wink ते तरंगतात मग जरा हाताने बुडवले की पाणी प्यायला लागतात मग भिजतात. अजिबात लगदा झाला नाही.

मी पण केला सुशिला , आवडला मला Happy थँक्स प्रीति !

नीधप , भारी आठवण काढली गाण्याची Happy जोरजोरात कानठळ्या बसेपर्यंत म्हणायचो आम्ही हे गाणं Happy

हे आमचं गाणं, नीधप तिचं गाणं लिहील -

एक होता म्हातारा, त्याला होती एक मुलगी, तिचं नाव होतं सुशीला
गोरी होती, उंच होती, पाणी घाली कुंड्यांना
रोज जायची नदीवर नदीवर डुंबायला
एके दिवशी गेली होती नदीवर डुंबायला
पाय घसरून आत पडली आणि मेली सुशीला
म्हातार्‍याला धक्का बसला तोही गेला स्वर्गाला
माझी लाडकी माझी लाडकी माझी लाडकी सुशीला

Proud

पाकृ मस्त आहे. नक्कीच करून बघणेत येईल.

Pages