Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Mala Varshbharacha Malvani
Mala Varshbharacha Malvani masala banvayacha ahe koni recipe milele ka??
मालवणी मसाला :
मालवणी मसाला : http://www.maayboli.com/node/4210
धन्यवाद वेका.
धन्यवाद वेका.
माझ्या आईची मुगाच्या लाडवाची
माझ्या आईची मुगाच्या लाडवाची पद्धत : मूग चांगले भाजून घेऊन भरडून त्याची साले काढायची. मग मूग दळून पीठ करायचे. पुढची कृती तिळाच्या लाडवांसारखीच. पाक गुळाचा.
कालच एका मैत्रीणीकडे गरम
कालच एका मैत्रीणीकडे गरम मूगलाडू खाल्ले. मूगाच्या पीठात कडकडीत गरम तूप टाकायचे पीठीसाखर वेलची सुकामेवा टाकायचा व लाडू वळायचे. मी प्रथमच अश्या प्रकारचा ताजा गरम लाडू खाल्ला.
मूगडाळीच्या लाडु ची अजुन एक
मूगडाळीच्या लाडु ची अजुन एक पद्धत: तुप व पिठीसाखर परातीत घेवुन हे मिश्रण हलके होईपर्यंत फेटायचेंअंतर त्यात मुगडाळ एकदा धुवुन,सावलीत वाळवुन भाजुन केलेले पिठ मावेल तितके टाकुन लाडु बांधायचे.असे लाडु हलके होतात व चव अप्रतिम लागते. अगदी असेच तांदूळ पिठीचे ही लाडु करतात्.मैदा कोरडा/तुपाशिवाय भाजुन त्याचे ही असेच लाडु खुप छान होतात.मैदा व तांदूळ लाडवात फरक जाणवत नाही.
माहेश्वरी लोकांत असे लाडु चातुर्मासात करण्याची पद्धत आहे.
मंजू , तुमच्या गरम लाड्वाच्या
मंजू , तुमच्या गरम लाड्वाच्या कृतीत पीठ आधी भाजायचं का?
मंजू , तुमच्या गरम लाड्वाच्या
मंजू , तुमच्या गरम लाड्वाच्या कृतीत पीठ आधी भाजायचं का?
आई, भाजी/आमटी कमी पडणार असं
आई, भाजी/आमटी कमी पडणार असं वाटलं की डांगर कालवायची दह्यात. त्यात कच्चा कांदा आणि मस्त फोडणी. ते डांगर (पीठ) कसं करतात कोणाला माहित आहे का? बहुदा उडदाचं होतं.
मिनोतीच्या ब्लॉगवर आहे.
मिनोतीच्या ब्लॉगवर आहे.
शुम्पी , इथे लिहिली
शुम्पी , इथे लिहिली बघ.
http://www.maayboli.com/node/34849
आम्ही करतो वरचेवर. भेटलीस तर दळलेली डाळ घेवून येते.
मला एक प्रश्न आहे. फारच
मला एक प्रश्न आहे. फारच बेसिक.
डाळीची कोरडी चटणी करताना- कुठलीही जसे उडीद वा चण्याच्या डाळीची- त्यातली डाळ आधी स्वच्छ धुऊन, वाळवून मग भाजतात की तशीच न धुता भाजतात?
लवकर सा.न्गा प्लीज. पाहुणे यायच्या आत चार पाच चटण्या करून ठेवायचा विचार आहे.
मृ ने मधे चटणीपुडीची रेसिपी लिहिली होती तीपण सापडत नाहीये मला
इतरही काही रेसिपीज कोणाकडे असतील- टिकाऊ कोरड्या चटणीच्या- तर प्लीज लिहा. (तीळ नि दाणे सोडून)
पूड चटणीला मी तर धुवून वाळवत
पूड चटणीला मी तर धुवून वाळवत नाही. वेळ नसतो अन आजकाल धान्य सगळे मशीन क्लीन असत म्हणून चालवायच झाल. आईआजी धूत असतील कदाचित.
कालच सीमाने डांगराची रेसिपी
कालच सीमाने डांगराची रेसिपी लिहीली आहे मधुरिमा. त्यात उडदाची डाळ धुवून भाजायला लागते.
कोरडी चटणी जवस आणि कारळ्याचीही करू शकतेस. त्यात सुके खोबरे घालून.
हो ग पौर्णिमा, ती वाचूनच फार
हो ग पौर्णिमा, ती वाचूनच फार पूर्वीपासून डोक्यात असलेला हा प्रश्न पुन्हा उपटला:)
जवस मिळेल इथे सहज, कारळे मात्र बघितले नाहीत आजवर.
अनघा, भरपूर करून ठेवायचा विचार आहे फ्रीजमधे- म्हणून...
वेका, पीठ भाजायंच नाही अन
वेका, पीठ भाजायंच नाही अन मूगडाळही नाही खूप कडकडीत तूप पीठावर ओतायचं. झटपट, सोप्पे व चवीला अप्रतिम लाडू!
इथे अख्खा मसूर ची पाककृती आहे
इथे अख्खा मसूर ची पाककृती आहे का? सर्च मध्ये सापडत नाहीये.
नसेल तर कोणाला माहित आहे का?
लाडु च्या भरभरुन पाकृ साठी
लाडु च्या भरभरुन पाकृ साठी सर्वाना धन्यवाद
अनु ३ : मिनोतीची
अनु ३ :
मिनोतीची रेसेपी:
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/05/sprouted-lentil-amati.html
ही पण आणखीन एक रेसेपी:
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/619.html?1150716773
धन्स पल्लवी, पण बाहेर हॉटेल
धन्स पल्लवी, पण बाहेर हॉटेल मध्ये अख्खा मसूर मिळतो तो वेगळा असतोना? मसूराच्या आमटी पेक्षा?
अख्खा मसुरची
अख्खा मसुरची पाककृती:
http://www.maayboli.com/node/31908
धन्स मी_चिऊ
धन्स मी_चिऊ
धन्यवाद मंजु.. ंमाझ्याकडे
धन्यवाद मंजु..
ंमाझ्याकडे विकतचं पीठ आहे त्याचेकरून पाहीन ..
दिनेशदा, सातारा भागात
दिनेशदा,
सातारा भागात लग्नामध्ये वांग, बटाटा आणि बहुतेक चणे घालून भाजी करता थोडी पाणीदार अशी त्याची रेसिपी माहित आहे का?
इथे मुंबईत बाजारात रेडीमेड
इथे मुंबईत बाजारात रेडीमेड इडली/उत्तप्यांचं पीठ (बॅटर) मिळतं, ते नीट आंबत नाही.
म्हणजे रात्री नुकतंच वाटलेलं पीठ विकत घेतलं, तर रात्रभरात फुगून वर यायला हवे ना (इथे तर किती उष्ण आहे हवामान) तसं माझं फुगून येत नाही. याचं कारण काय असेल?
अमेरिकेत असताना घरीच वाटून पीठ करायचे ते छान फुगायचं.
हसरी, नाही खाल्ली कधी ती. इथे
हसरी, नाही खाल्ली कधी ती. इथे माझ्या घुटंचा बीबीवर सातारी लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी
काहि जणांना माहित असेल.
वर्षा, ते पिठ आधीच आंबलेले असते का ?
नाही नाही, ते लोक दुकानाच्या
नाही नाही, ते लोक दुकानाच्या बाहेर चक्की घेऊन बसलेले असतात, जसजसे पीठ दळून होते तश्या त्याच्या अर्ध्या/एक किलोच्या पिशव्या भरतात. तुम्ही त्याचे लगेच घरी जाऊन डोसे घालणे अपेक्षित नसते.
हं आता सकाळी दळून त्या पिशव्या संध्याकाळी विकत असतील तर माहित नाही. पण मी जिथून घेते ते ताजेच दळलेले असते.
घरात चुकुन तीन गुलकंदाचे
घरात चुकुन तीन गुलकंदाचे जार्स आणले गेले होते. (सगळ्यांनाच खरेदीचा उत्साह
) चांगले जंगी आहेत. काय करुन संपवु?
आइसक्रीम नको आहे. मिल्कशेक ट्राय केला, पण गुलाबाच्या पाकळ्या ( जार सिल्ड असुनही) कोरड्या झाल्यामुळे तोंडात चोथा येतो. एखाद वेळेस चालवुन घेतात, पण एकुणात सगळे कुरकुर करताहेत संपवायला. गुलकंदातली साखरही परत कोरडी आणि कण कण झाली आहे. त्यामुळे नुसता चमचा चमचा घेवुन खायलाही मजा येत नाहीए. तीन मोठे जार्स असल्यामुळे फेकायचं जीवावर आलं आहे.
काय करु? स्टीम कुक करुन पाकळ्या मऊ होतील का? साखर विरघळुन गुलकंद नुसता खायला छान लागेल का? आणि अजुन दुसरं काय करुन संपवता येइल. कारण गोड खाणारी मी एकटीच असल्यामुळे नुसता खावुन संपणार नाही.
माउ - अग गुलकंद घालून
माउ - अग गुलकंद घालून नारळाच्या वड्या कर...झटपट संपतिल.
गुलकंद आहे म्हणून साखरेचे प्रमाण कमी घे वड्या करताना..!!!!
मी एकटीच असल्यामुळे नुसता
मी एकटीच असल्यामुळे नुसता खावुन संपणार नाही.>>>>>पाठव इकडे..मी ही गोड्घाशीच आहे
Pages