वाचला र वाचला!!!

Submitted by रावण on 3 May, 2012 - 06:54

धोतराचा सोगा हातात धरुन दारा समोरच मुतत असताना लक्ष्मण आणी विष्णु पैलवानची भितीने वाईट अवस्था झाली होती. दोघांनाही कळुन चुकले होते की आज आपण वाचत नाही कारण त्या झोपडीतून ती त्यांच्यावर नजर रोखुन होती. तरीपण लक्ष्मण पैलवान इशार्‍याने विष्णु पैलवानला धीर देत होता शेवटची हिंमत धाखवण्यासाठी कारण ते वाचले तर देवाचाच चमत्कार म्हणावा लागेल. अशक्य कोटीतली गोष्ट होती ती. लक्ष्मण आणी विष्णु पैलवाननी स्वप्नातही विचार केला नसेल अश्या भयानक वास्तवाला सामोरे गेले होते.
लक्ष्मणराव आबुटे आणी विष्णु जाधव जिवाला जीव देणारे दोस्त. दोघांना ही एकच नाद तालीम मारायचा आणी दाबून खायचा. साधारण १९ व्या शतकाचा काळ लक्ष्मण पैलवानची आई सटवा माय तिचा नवरा आठ वर्षा आधी पदरात दोन पोर असताना अचानक रानात साप चावुन गेला आणि मोठा मुलगा थोराजी थोड्या आजार पणाच निमीत्त होउन नवर्या पठोपाठ वर्षा भरात गेला. तेव्हा पासुन सटवा माय लोकांच्या शेतात काम करुन राहात होती पण बाई मोठी खमकी होती स्वतःच्या कतृत्वार आणि पै पै जोडुन खुप जमीन कमावली आणि भरभराटीचे दिवास आणले मोठा ऐसपैस वाडा बांधला. घरात आणी शेतात गडी माणसांचा सारखा राबता असायचा. सटवा माय स्वता मोठी कडक शिस्तीची आणी व्यावहारी होती. पण एकुलता एक लेक म्हणुन लक्ष्मणावर फार, जीव तालिम करतो म्हणुन खास त्याच्या साठी एक म्हैस राखुन ठेवली होती सटवा मायन. त्याच्या खुराक करण्या साठी दोन गडी माणस राबायची. लक्ष्मण पैलवानची स्वतः ची घोडागाडी होती. स्वतः लक्ष्मण पैलवान पण सहा फुट ऊंच तसाच दणकट शरीराचा होता. त्यात तालमीत राबुन अजुन बुरुजबंद शरीर कमावले होते त्याने. एका टायमाला एक आख्ख बोकड जागेला संपवायचा आणी त्याचा मीत्र विष्णु अंगकाठी थोडी कमी भासेल पण साधारण त्याच्या सारखाच तगडा होता. दोघही कुस्ती च्या जगात गाजलेले. लक्ष्मण पैलवानच्या तर कुस्तीला नुसती झुंबड उडायची. साधारण सावळ्या रंगाचा लक्ष्मण पैलवान मैदानात उतरला की त्याच लाल मातीत घोळलेल उभ आडव दणकट शरीर. रांगडा स्वभाव, शडु ठोकुन समोरच्या पैलवानाला आव्हान द्यायची पद्धत प्रतीस्पर्ध्याला लढती आधीच अर्धा गारद करी. त्याला पाहुन तर एक पैलवान लढती अधीच पळुन गेला होता. विष्णु पण काही कमी न्हवता पण स्वभावान थोडा लक्ष्मण पैलवान पेक्षा मवाळ होता.

पण आज नियतीन त्यांच्यावर ही वेळ आणली होती कि भितीन दोघांना नीट मुतता पण येईना. दोन आठवड्या पुर्वीचीच गोष्ट २३ वर्षाच्या लक्ष्मण पैलवानला सटवा माय न हाजीमलंग बाबाच्या उरसाला थिवरगावाला बरोबर यायला सांगीतल. उरसा बरोबर वर्ष भराचा शेतात पिकवलेला माल बाजारात वीकुन नवीन बैल, बकर्‍या, वाण सामान विकत घ्यायचा सटवामायचा विचार चालला होता. त्या काळात दळण वळनाच्या सुवीधा जास्त न्हवत्या त्या मुळे असा प्रवास बराच लांबचा असे परत विजेचे दिवे अजुन गावा गावात पोहचले न्हवते वरुन चोर दरोडेखोरंच भय यामुळ अशा प्रवासा साठी आजुबाजुचे शेतकरी ही स्वतःचा माल बैलगाडी मध्ये टाकुन सोबत येत. त्या मुळे एकमेकाला अधार देत व स्वंरक्षण मीळे. लक्ष्मण पैलवानला या मधे काही खास इंटरेस्ट न्हवता पण त्याची नुकतीच लग्नाची बायको सरस्वती ही सटवा माय सोबत नीघाली. लक्ष्मण पैलवान जेवढा सावळा होत तेवढीच सरस्वती गोरी आणी घारोळ्या डोळ्यांची होती. वरुन नव्या नवरीची नवलाई म्हणुन हा नाही करत करत लक्ष्मण पैलवान पन निघायला तयार झाला
सोबत जिवाशिवाची जोडी असल्या सरखा विष्णु पैलवान येणारच हे ओघान आलच. सटवामायच्या दहा आणी बाकिच्या शेतकर्याच्या पाच बैलगाड्या सोबत गडी बाया मानस असा लवजमा घेउन तिन दिवसाचा प्रवास संपवून ते थिवरगावाला पोहचले. पोहोचल्या बरोबर सटवामायन गडी बाया मानसांना सोबत घेउन बाजार हाटीला सुरवात केली. इकडे लक्ष्मण आणी विष्णु पैलवान कुस्ती च्या फडात दंग झाले. रत्रीच्याला बायका तीथल्या धर्मशाळेत आणी गडी मानस बैलगाड्यां जवळ उघड्यावरच झोपले

दुसर्‍या दीवशी हाजीमलंग बाबाला दोन बकरयांचा नैवेद्य दाखवुन नश्ता आटपुन सर्वजण परतीच्या प्रवासाला नीघाले. रात्र पडायच्या आधी पुढच्या गवाला रात्रीचा मुकाम पोहोचायच्या उद्देशान सर्वजण भरभर पावल उचलत होते दुपारी मोकळ्या माळरानात चुलीवरच्या भाकरी आणी हाजीमलंग बाबाला वहीलेल्या मटनाचा रस्सा बनवायचा बेत होता आणी रात्र पडायच्या आधी पुढच्या गवाला रात्रीचा मुकाम करुन भल्या पहाटे परत परतीचा प्रवास करायच ठरवल होत. पण नियतीच्या मनात काही वेगळच होत अचानक गार वारा सुटला आणी जोरात पावसाला सुरवात झाली गडी आणी बाया मानसांनी पटापट बैलगाड्या मधले सामान झाकुन ठेउन जवळच्याच लिंबाच्या झाडांचा आसरा घेतला. पाउस चांगला जोरात आणी खुप वेळ झाला सगळीकडे चीखल माती त्यातच संध्याकाळ उलटत चाललेली. पावसाचा जोर जरा ओसरल्यावर सटवामायन भराभर पुढे निघुन जवळच्या गवात मुक्काम करायच ठरवल पण पावसामुळे एवढा चिखल झाला होता की बैलगाड्या पुढे न्हेण शक्यच होइना. अखेर लक्षमण पैलवानने परीस्थीती हातात घेतली पुढ होउन आईला म्हणाला "सटवामाय तु बाया मानसा संगट म्होर हो आन पुढ्च्या गावात मुक्काम ठिव म्या गडी मान्सांन संगट जमीनच वल वाईच वाळस तवर थांबतो आन लगोलग तुम्हासला गाठतो." सटवामायला पोराला अन गड्यांना अस मोकळ्या माळरात सोडुन पुढ जाण पटेना. तसा वयान सर्वात जाणता आणि सटवामायच्या सर्व शेताचा एक प्रकारचा पुर्ण अधीकारी असलेला गडी बलभीम मामा पुढ झाला आणि सटवामायला धीर देत म्हणाला "तुम्हि बीन घोर व्हा म्होर म्या पोरांसंगट हाय मुकामाला" शेवटी तरुण सुन आणी बाया मानसांकडे बघुन सटवामाय तयार झाली आणी सर्व बायका आणी काही गडी घेऊन पुढे निघाली.
पावसाची रिपरीप कमी झाल्या वर अंधारात भिजलेल्या गडी मानसांना आता भुकेची जणीव होउ लागली सोबत आणलेल मट्ण आणी भाकरीचं पिठ होत. पण ओल एवढी होती कि चुल मांडण अश्यक्यच होत. लक्ष्मण आणी विष्णु पैलवान आधीच दिवास भराच्या फडाच्या कुस्त्या खेळुन दमलेले त्यात परत भुका लगलेल्या वरुन पावसात भिजलेले. काय कराव सुचत न्हवत. एक तर मोकळ माळरान दोन्ही बाजुला मिट्टअंधार चिखल माती. तेवढ्यात कोसभर दुर अंधारात काही चमकल्या सारख विष्णुला दिसल नीट पाहील्यावर ते एक मातीच छोट कौलारु घर असल्याच लक्षात आल. तसे त्याने लक्ष्मणला सुचवल" त्या घरामंदी बगु आन भाकर्‍या आन कालवन बनवुन घिउ आन शेर दो शेर जोधळ देउ की"
पण शेजारीच उभ्या असलेल्या बलभीम मामाला काही तरी चुकल्या सारख वाट्त होत. बारीक डोळे करुन त्या घरा कड पाहात असतानाच उगाच त्याच्या मनात भिती दाटुन येत होती. "मालक मला तर हे काय पटना एक हे असल माळरान आन ना हित शेत हाय ना मान्साची जात योकदम हंत येकच घर नगा जाऊ आपन थांबु रात भर" पण लक्ष्मण पैलवान एकदम खवळलाच उसळुन बलभीम मामाला बोलला "कोस भर लांब न्हाय आन काय्तर म्हनताव मामा तुमी म्या बगतो जाउन विष्ण्या येतुस संगट का जाऊ म्या एकलाच"
दोन क्षण विष्णु पैलवान थबकला कुठेन कुठे तरी बलभीम मामाच्या बोलण्यात अर्थ वाटत होता. पण लक्ष्मण एकदा बोलला कि करणारच हे माहित होत आणि सटवामायला सोडल तर कूणालाच जुमानायचा नाही वरुन दिवसभर उपाशी म्हणजे संपलच सगळ हे माहीत होत म्हणुन भाकरीच्या पिठाची पिशवी आणि मटणाच पातेल उचलुन चुपचाप निघाला
छ्पछ्प आवाज करत चिखल तुडवीत लक्ष्मण आणी विष्णु पैलवान त्या घराकडे माळरानातुन निघाले. सभोवताल पुर्ण अंधार. लक्ष्मण पैलवानच्या हातात कंदील आणी विष्णु पैलवान कड भाकरीच्या पिठाची पिशवी आणि मट्णाच पातेल. रातकिड्यांची अंधार चीरत जाणारी कीर्रकीर्र, मधेच एखाद्या घुबडाचा आवाज, पंखाची फड्फड त्या रत्रीच्या भयानकतेत भर घालत होती. त्यात भर म्हणुन लक्ष्मण आणी विष्णु पैलवानच्या पायताण कर्रकर्र आवाज करत होत्या. लक्ष्मण पैलवान हातातला कंदील सावरत पायाखालची वाट निट पाहात चालला होता पण विष्णु पैलवानच मन मात्र सतत दचकत होत अखेर ते कसेबसे घरा पर्यंत पोहोचले ते एक छोट घर विटा आणी माती लाउन बनवलेले होत आणी चीमणी च्या दारातुन पडणारया प्रकाशावरुन आत कोणी असेल हे कळत होत. एरवी कोनच्या लक्षात हि येउ नये इतक सामान्य अस्तित्व होत त्या घराच.
लक्ष्मण पैलवानने हाताने दरवाजा दोन वेळा ठोठावला पण आतुन काहीच उत्तर आल नाही तशी लक्ष्मण पैलवान जोरात आवाज दिला "कोन हाय का घरात" आतुन काहीच उत्तर आल नाही , परत लक्ष्मण पैलवान आवाज दिला "कोन हाय का घरात" क्षण भर शांततेत गेला मग आतुन बाईचा आवाजात प्रतीप्रश्न आला "काय पायजे"

लक्ष्मण आणी विष्णु पैलवान दोघ ही चमकले कारण त्यांना पुरुषाचा आवाज अपेक्षीत होता पण पुन्हा सावरुन घेत लक्ष्मण पैलवान बोलला "बाई आम्ही हाजीमलंग बाबाच्या उर्सा वरुन आलाव, पावसात आमच लोक अड्क्ल्याती वाइच पंध्रा इस भक्रर आन कालवन बनुन पाय्जे.तुमच काय असल ते दिउ आन शेर भर जोंधल भि दिउ सागुती आन पीठ समंद आनलया फकस्त बनुन द्या तेवड"
थोडा वेळ तसाच गेला परत आतुन आवज आला
"मालक घर्ला न्हाईत तुमी जावा"
लक्ष्मण पैलवान परत समजावणीच्या सुरात म्हनाला "बाई भायर लई ओल हाय, चुल न्हाय पेटाय्ची तुमाला आमी काय तरास न्हाय देत समान भाहैर ठेवतो आन आमी लांब उबे राहताव तुमी रांन्धुन जाल कि मंग आवज द्या आमी भाहैरुन घेउन जातो अन् तुम्च्या साठी पैक आन जोधल भि ठिउन जाताव"
आतून परत आवाज आला “न्हाय जमायच माज ल्हान पोर झोपलया”
आता मात्र लक्ष्मण पैलवानन निराशेन परत जायच ठरवल जाण्या आधी काही तर बोलायच म्हणुन बोलला
"माफी करा तुम्हास्नी तक्लिफ द्याची न्हवती आमी जातु परत"
लक्ष्मण आणी विष्णु जाण्यासाठी वळनार तोच दरवाजा उघड्ल्याचा आवाज आला
चमकुन लक्ष्मण आणी विष्णु वळुन पाहिले तर दारामध्ये साधारण तिशिच्या आसपास असणारी बाई उभी होती
कंदीलाच्या प्रकाशात लक्ष्मण आणी विष्णुनी नीट पाहिल तर बाई खुप देखणी होती अंगात लाल लुगड आणी हातात कथलाच्या बांगड्या, कपाळभर गोंदवलेल आणी त्यावर आसणार ठसठ्शीत कुंकु, रंग गोरापान आणी दोघांकडे रोखुन भघणारे पिंगट डोळे. साधारण पणे पुरुषाला पाहाताच जमिनी कडे पाहाणार्‍या बायका पेक्षा सरळ नजरेत नजर घालुन बघणार्या बाई सोबत काय बोलावे दोघांना पण सुचेना
तशी ति बाई स्वताच बोलली "म्या रांधुन दिन पर माज बाळ पाळन्यात झोपलया सयपाक होयीस्तवर तुम्हास्नी पाळन्याला झोका द्यावा लागल"
विष्णु पैलवानला त्या क्षणी पळून जावेस वाटलं पन लक्ष्मण पैलवानन "ठिक हाय म्हणत सरळ त्या बाई पाठोपाठ घरात प्रवेश केला
आता विष्णु पैलवानला पन लक्ष्मण पैलवान पाठोपाठ घरात जाण्या शिवाय गत्यंतर न्हवता
घर एका खोलीच होत मात्र साफसुफ लक्षात येण्या एवढी होती. एका बजुला फळकुट मारुन त्या वर एक दोन तांब्या पीतळाची भांडी होती पन तरीही त्या चिमणीच्या प्रकशात लख्ख चमकत होती. त्या शेजारीच एक चुल मांडली होती आणी हे छोट स्वयंपाक घर एक जुनाट लुगड पडद्या सारख लावुन वेगळ केल होत.
खोलीच्या दुसर्या कोपर्यात एक लाकडी पाळना होता आणी त्याला एक लांब दोरी लावलेली होती. त्या बाईने दोघांना हातानेच एका कोपर्यातल्या घोंगडीवर बसायला सांगीतल ते बसल्यावर तीन त्यांना पाणी दिल आनी म्हणाली "भायर कबुल केल्या परमान म्या रांधुनहुईस्तवर तुम्हास्नी पाळन्याला झोका द्यावा लागल माज काम व्ह्त नाई तवर आजीबात पाळना थांबु दीयाचा नाय" हे बोलत असताना मात्र तिच्या चेहेर्‍यावर अक विचित्र हलक अस स्मित आल पन
लक्ष्मण च्या लक्षात ते आल नाही तुमी काळजी करु नगा फक्त एढ्च म्हणाला आणी दोरी हातात घेउन झोका देउ लागला आणी ती बाई मध्ये पड्द्या सारख टांगलेल लुगड ओढुन भाकर्या बडवायला लागली पलिकडुन भांड्यांचा आवाज येउ लागला तसा लक्ष्मण पैलवान निश्चींत झाला
मात्र विष्णु पैलवानची मात्र चांगलीच तनतनली कारण त्याला सारखच काहीतरी खटकत होत नक्की काय हे माहीत न्हवत पन गडबड होती नक्की
लक्ष्मण पैलवानला वाटलं मगाशीच्या बलभीम मामाच्या बोलन्यान घाबरलाय त्याला त्याच हसुच आल.
लक्ष्मण पैलवान विष्णुला बोलला " आर मर्दा काय तु बी बलभीम मामाच्या बोलन्यावर जातुयास वय झालया त्यांच पर तु का अस हाय खाल्ल्यावानी करायला अर पैलवान गडी तु आन अस हापकुन जातस व्हय"
“न्हाय र पन कस पिश्शाच्च हाड्ळ अस काय बाय अस्त माळरानात अस म्हंतात” विष्णुन समर्थन केल पण त्याच क्षणी अगदी क्षण भर भकरी बडवल्याचा आवाज अचानक थांबला विष्णुन चमकुन पड्द्या सारख टांगलेल्या लुगड्याकडे पाहिल त्या क्षणी पुन्हा भाकरी बडवायचा आवाज पुन्हा सुरु झाला.
“आर बगुतर कशी आस्तीया हाड्ळ जमलतर कुस्ती खेळु कि तिच्याशी " लक्ष्मण पैलवानच्या या गावरान कमेंटवर विष्णुला हसुच आल पन आपण कुठ्ल्या जागेवर आहोत हे लक्षात आल्यावर दोघेही जरा वरमले
पण त्याच वेळेला एक हिडीस मंदहास्य त्या लुगड्या मागुन त्या बाईच्या चेहेर्‍यावर उमटल होत
ईकडे लक्ष्मण आणी विष्णु पैलवान दिवस भराच्या घडामोडींचा आढावा घेत चर्चा करत होते आज कोन कोनत्या तालमीचे पठ्ठे आले होते आज कोनी बाजी मारली कोन कुठ्ल्या डवाला पालथ पड्ल आपली तयारी कशी होती या वर चर्चा करुन झाल्यावर मग बाकीच्या गमती जमती अशा बर्याच गप्पा झाल्यावर हळुहळू दोघांना हि चांगलीच झोप यायला लागली एक तर दिवस भर कुस्ती खेळलेले वरुन पावसामुळ झालेली दमछाक त्या मुळ लवकरच विष्णु झोपी गेला ईकडे लक्ष्मण पैलवान डुलकी देत देत पाळ्न्याची दोरी ओढ्त होता. मधेच कधीतरी तो ही झोपला.
अचानक बाळाच्या रड्ण्याच्या आवाजाने दोघेही जागे झाले ते भींतीला टेकुन बसल्या जागीच झोपी गेले होते व पाळण्याची दोरी हातातुन सटुन हातभर लांब पड्ली होती पाळना हालायचा थांबल्यामुळे ते बाळ रडायला लागल होत लक्ष्मण पैलवान उठुन दोरी उचलनार ईतक्यात ती बाई जागची न हालता त्या बाईचा हात लांब होत त्या लुगड्या पलीकडून बाहेर आला आणी ती दोरी उचलून लक्ष्मण पैलवान समोर टाकली. लक्ष्मण आणी विष्णु पैलवान डोळे फाडुन त्या अमानवीय प्रकारा कडे पाहत राहिले त्या बाइचा हात परत लुगड्या वरुन आत गेला भयानक प्रकार झाला होता अचानक त्या बाईचा आवज आला "म्हंणल व्हत ना पाळन्याला झोका द्यावा लागल आजीबात पाळना थांबु दीयाचा नाय" पण तो आवाज घोगरा आनी पुरषी झाला होता आणी अचानक ती बाई विचित्र खदखदून हसु लागली. पाळन्यातल ते बाळ पन तसच हसायला लागल आता मात्र लक्ष्मण आणी विष्णु पैलवान समजुन चुकले की ते हाड्ळीच्या घेर्यात आलेत जिथुन सुटका शक्य नाही. विष्णु पैलवानच्या लक्षात आता हि गोष्ट आली की त्याला काय चूकल्या सारख वाटत होत या घरामध्ये. प्रत्येक घरात आढळनारी देवाची मुर्ती या घरात न्हवतीच.
घडी दोन घडी असाच गेला आतुन भाकरी बडवायचा आवाज येतच होता. पण आत काय जे ते आवाज करत होत ते मात्र हिडीस आणी अत्रुप्त होत आणी सकाळ व्हायच्या आधी दोघ ही मारले जाणार होते.
विष्णु पैलवानतर सुन्न झाला होता आणी मरणाच्या चाहुलीन अर्धमेला झाला होता पण लक्ष्मण पैलवान मात्र विचार करत होता कि यातुन सुटका कशी करता येयील अखेर त्यान निर्णय घेतला कि हिम्मत दाखवून वाचलो तर वाचू नाही तर जे व्हायचय ते होणारच आहे.
धीर करुन लक्ष्मण न विचारल
"बाई आमाला दोगांना मुतायला आलीया वाईच जाउन यीउ का?"
विष्णुने चमकून लक्ष्मण कडे पाहील दोघांची नजरा नजर झाली आणी विष्णुला समजल की लक्ष्मण काहीतरी डोक लाऊन बाहेर पडायच बघतोय तसा त्यालापण पण धिर आला
लक्ष्मणन पुन्हा विचारल
"बाई आमाला दोगांना मुतायला आलीया वाईच जाउन यीउ का?"
लुगड्याच्या पडद्या मागुन तोच हिडीस आवाज आला
"न्हाय जायाच गूमान बस"
"बाई आओ लई घाईची आलीया लगच येताव जाउन"लक्ष्मणन विनवल
"एक डाव सांगटलय नाय जायच तर नाय जायच"पडद्या मागुन ती बाई किंचाळली
खुप वेळ दोघांनी विनवल तेव्हा पडद्या मागुन ती बाई म्हनाली
"लयच घाई असल तर जागलाच मूत"
"नाय ह्ये लय वंगाळ दीसल परक्या बाई मान्सा समोर आस करनं ते पन घरामंदी ऐका आमच"दोघांनी समजवल
तसा लुगड्याच्या पडदा थोडा हलला परत पडद्या मागुन आवाज आला
"ठिक हाय दारा समुरच जा पर पळायचा ईचार केलास तर ली वंगाळ हुईल"
"नाय नाय आम्च्या ध्यानात अस्ल काय नाय लगच येताव" अस म्हनुन लक्ष्मण आणी विष्णु पैलवान चटकन उठुन बाहेर आले
बाहेर हवेत गारवा वाढ्ला होता पण त्या घरातून बाहेर आल्या बरोबर दोघांनची भिती थोडीशी कमी झाली पण धोका अजुन टळला न्हवता हे दोघांच्या हि लक्षात होत
लक्ष्मण आणी विष्णु पैलवानन थोड्स पूढे गेले तसा घरातून त्या बाईचा आवाज आला "ए तिथच थांब जागला"
दोघ थांबले पण खाली न बसता लक्ष्मण आणी विष्णु पैलवानन जागेवरच धोतराचा सोगा हातात धरुन उभे राहिले
लक्ष्मण पैलवानन खुप हळु आवाजात कुजबुजत विष्णुला सांगीतल
"गड्या मी पळ म्हणल कि सुसाट बैलगाड्या कड सुटायच काय बी झाल तरी ना थांबायच ना माग बघायच"
विष्णु पैलवानन मानेनच संमती दीली
दोघ ही घामागुम झाले होते त्या झोपडीतून ती त्यांच्यावर नजर रोखुन आहे याची त्यांना जाणीव होतीच
पण दोघही पैलवान गडी होते म्हणुन दम धरुन होते.थोडा वेळ आसाच गेला दोघांनी धोतार नीट आवळुन बांधल तसा लक्ष्मण पैलवानन जोरात आवाज दीला
"विष्ण्या पळ"
दोघ ही जिव खाऊन सुसाट सुटले ऐकल ते फक्त कानांनी मागुन त्या घरातून खच्चुन मारलेली किंचाळी
सावज हातातून सुट्ल्याचा तीव्र संताप, तिरस्कार भयानक सुडान पेटलेली किंचाळी
क्षणभर विष्णु पैलवान भांबावला आणी थोडा वेग कमी झाला तसा लक्ष्मण पैलवान धावता धावता ओरडुन म्हणाला
"विष्ण्या जिवाशी गाठ हाय गड्या थांबू नग आन माग बगू नगस जवर वावर पार व्हत नाय मौतीशी समना हाय आपला"
लक्ष्मणच्या बोलण्यानी विष्णु भानावर आला आणी परत वेग वाढवला त्या मोकळ्या रानातुन चीखल राडा तुडवत दगड धोंडा काटेकूटे कश्याची पर्वा न कर त्या अंधारातून बैलगाड्यांच्या दिशेन धावत होते
आणी मागुन त्या बाईची अमानवीय आवाजातली साद ऐकू येत होती
"थांब!!! पळून न्हाई जाउ देनार म्या ए थांब!!!"
जसा जसा आवज जवळ ऐकु यायला लागला दोघांनी ही धावायचा वेग वाढ्वला लांबुन त्यांना अंधुक प्रकशात थांबलेल्या त्यांच्या बैलगाड्या आणी माणस दिसायला लागली तस लक्ष्मण आणी विष्णु पैलवानन धावता धावता हाका मारायला सुरवात केली
ईकड पोर आजून का आली नाहीत म्हणून काळजीत पड्लेल्या बलभीम मामा ला आनी बरोबरच्या गडी माणसांना लक्ष्मण आणी विष्णु धावत येताना दिसले आनी त्यांच्या मागुन हिरवट लिबलीबीत काही तरी विचीत्र आकार वाहात येताना दिसला
क्षणात बलभीम मामाला लक्षात आल की हा काही तरी वरच्या हवेचा खेळ आहे
ताबड्तोब त्याने सार्र्या गड्यांना आवाज दीला
"संमदी मेंढर चारी बाजुला लावा आन सम्दे त्या रींगनाच्या आत राव्हा कोन बी भायर जायच नाही"
भराभर गडी माणसांनी मेंढर चारी बाजुला लाउन रींगण केल आणी मधे ऊभे राहीले बलभीम मामान सगळ्या मेंढरा वरुन हाजीमलंग बाबाची आणलेली विभुती टाकली आनी जवळ येणार्र्या लक्ष्मण आणी विष्णुला आवाज दीला
"रिंगनात उड्या मारा हो $$$$"
लक्ष्मण आणी विष्णुला लक्षात आल की बलभीम मामान काय म्हट्लय त्या बरोबर शेवट्ची दौड आणखी जोरात करत त्यांनी दनादन त्या मेंढरा वरुन आतल्या रींगणात उड्या घेतल्या त्या बरोबर बलभीम मामान दोन मुठी विभुती हवेत त्या मागून येणार्र्या अमानवीय आकारावर ऊधळली.
खच्चुन किंकाळी ऊमट्ली आणी तो हिरवट लिबलीबीत काही तरी विचीत्र आकार वाहात परत नीघाला जातान म्हण्त होता.
"वाचला र वाचला ! वाचला र वाचला ! वाचला र वाचला !"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त

लय भारी रावणा...

पण मला एक सांग.. धावताना त्या बाईने हात लांब करून का नाही पकडला त्यांना..

वाचली हो वाचली तुमची गोष्ट.
मस्त आहे. आवडली.

अभिषेक, प्रत्येक भूताला तिच्यातिच्या मर्यादा असतील हो. Happy म्हणून तर भूतांचे एवढे प्रकार आहेत.
या हडळीला फक्त तिच्या घरातच हात लांब करायची पॉवर असेल माळरानात नाही. म्हणून तर ती त्यांन घराबाहेर जाऊ देत नसते सुरूवातीला.

मी पण कथा वाचली रं वाचली........ वाचली रं वाचली..........वाचली रं वाचल.........वाचली रं वाचली
मस्त....

छान

आपल्या सर्वांचे धन्यवाद >>>
अहो सगळ्यांचे आभार तरी म्हणा नाहीतर सगळ्यांना धन्यवाद म्हणा पण सगळ्यांचे धन्यवाद नका म्हणू Happy

Pages

Back to top