४-१० वर्षाच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आणि चांगली सवय कशी लावावी?

Submitted by लाजो on 2 May, 2012 - 18:59

लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्‍याच पालकांना खुप मदत होइल.

मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्रे रात्रभरात शतकाच्या जवळपास खेळी....आता सगळं संपूर्ण वाचते..
माझी ताई तिच्या मुलीला शिशु वर्गातल्या बाईंना तू हे घरी खात नाहीस, आईला त्रास देते म्हणून सांगेन असं शांतपणे सांगायची आणि मग ती आपलं तिथलं इंप्रेशन बिघडू नये म्हणून हाताने खायची..
माझ्या घरी ही मात्रा चालली नाही कदाचीत मुलगे सुरुवातीपासून आय डोन्ट केअर मेंटेलिटीचे असतात का आणि मुली जात्याच संवेदनशील असं असू शकेल...पण इथल्या पाळणाघरात तसंही खाण्याची सक्ती केली जात नाहीच खा नाहीतर टाकून द्या...
तिथे मी मुलाला टेबल खुर्चीशी अर्धातास बसू शकतो हीच मला मोठी बातमी वाटते..घरी त्याला मध्येच उठायचं असतं...अर्थात त्याला मी बसूनच रहा म्हणून सांगत नाही कारण आता मी हात टेकले आहेत पण हे संपव हे मात्र करायला थांबावं लागतं........

जाहिरातींचा परिणाम होतोच. माझा पोरगा पूर्वी साखर आणि बोर्नव्हिटा घालूनच दुध प्यायचा. साधं दुध पिणं कसं चांगलं असतं हे समजावल्यावर साधं दुध काहीही न घालता प्यायला लागला. पण हल्ली टिव्हीवरच्या बोर्नव्हिटा /हॉर्लिक्स यांच्या जाहिराती बघून म्हणतोच कि त्यात तर व्हिटॅमिन्स आहेत म्हणून सांगतात मग आपण का नाही खायचं?

याला माझं सध्याचं उत्तर बोर्नव्हिटामधून व्हिटॅमिन्स पोटात जाण्यापेक्षा भाजीतून पोटात गेले की पोट जास्त खुश होतं. जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी बोर्नव्हिटा वैगरे असतं. तू तर इतका शहाणा मुलगा आहेस, भाजी, डाळ, पोळी सगळ्म खातोस त्यामूळे तुझ्या पोटात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आपोआप जातात. मग स्वारी खुश होते. Happy

माझ्या लेकी बाबत ही बर्‍याचदा हेच होत.खाण्याच्या नखर्‍यापेक्षा जेवणाच्या सुट्टी च्या वेळी इतका टाईम पास करते , गप्पा मारते,इथे तिथे बघत बसते की डबा खाण्याकडे लक्षच नसते.मग वेळ संपला म्हणून डबे बंद.पाण्या चीही आठवण केली नाही तर तेही संपत नाही.रात्री जेवतानाही तसेच.
२०-२० मिनिटं घास तोंडात घोळवायची हातोटी थक्क करते<<< अगदी.तिला आधी वाटायचं की जितका वेळ जास्त जेवण चालेल तितका वेळ टीव्ही किवा इतर टाईम्पास करायला मिळेल.
हल्ली संध्याकाळी ५ सडेपाच ला भात कालवू,,पराठा,डोसा किवा सरळ पोळी भाजीच दिली तर लवकर संपते रात्रीच्या जेवणापेक्षा म्हणून मी बर्‍याचदा असच करते. डब्यात सॅन्ड्विच आवडते.
गेल्या आठवड्यात २/३ वेळा डबा परत आला तर तिला सांगीतले की तू दुपारी जेवली नाहीस ना तर तुझं वजन कमी होईल आणि मग खूप वजन कमी झालं तर हवे सारख 'डिसॅपिअर ' होशील. मग या आठवड्यात जरा परीणाम झाल्यागत वाटतयं!

स्नॅक टाईम ला फळ असली तर ती नक्की संपतात.

भान माझा मुलगा पण पाळणाघरात जे असेल ते स्वताच्या हाताने मुकाट्याने खायचा कारण एक गोष्ट नक्की समजली होती की हे आत्ता खाल्लं नाही तर उपाशी रहावं लागतं पुढची दुधाची वेळ होईपर्यन्त. पण घरी नाटक चालतं. आई आहे ना घरी, ती भरवेल, हे नाही तर ते देईल, टीवी समोर बसवून जेवायला घालेल, बुक्स वाचेल, गाणी म्हणेल, मी म्हणेन ते करेल मी जेवावं म्हणून. Happy हे लक्षात यायला वेळ लागला पण जेव्हा लक्षात आले तेव्हा हळू हळू माझी स्ट्रॅटर्जी बदलली. मग दिसायला लागला जरा जरा फरक.

माझ्या मुलाने ३-५ या वयात खाण्यात आणि इतर गोष्टींमधे खुप त्रास दिला. खुप चिडचिड, वैताग व्हायचा.
आजुबाजुच्या लोकांची/इंटरनेट वरची मते ऐकुन खुप गोंधळ व्हायचा. आपण जगातली सर्वात वाईट आई आहोत असे वाटायचे.

आता तो ५.५ वर्षाचा आहे. आता बरीच सुधारणा आहे. त्याला सतत हे खाण्याने हे चांगले होते असे बिंबवणे चालु असते. गाजर डोळ्यांसाठी, फरसबी/डाळी शक्तिसाठी वगेरे वगेरे.. food puramid/food plates विषयी पुस्तके वाचणे चालु असते.. घरात हे सगळे printouts लावले आहेत, म्हणजे ते सारखे डोळ्यासमोर राहते.. शाळेतला डबा पण बर्यापैकी संपवायला लागलाय. त्याला डब्यात पास्ता, तुप-साखर पोळी, पराठा, पोळी-भाजी (ज्या दिवशी थोडी कोरडी भाजी केली असेल, त्या दिवशी, पोळी तव्यावर असताना त्याच्यावर भाजी घालते आणि त्यावर cheese घालुन quesadilla सारखे करुन देते, ते तो आवडीने खातो) देते.

माझा दुसरा मुलगा नुकताच ३ वर्षाचा झालाय. आता त्याची जेवतानाची नाटके सुरु झाली आहेत. पण पहिल्या मुलाच्या वेळच्या अनुभवातुन आणि सगळ्या चिडचिडितुन गेल्यावर काही गोष्टि शिकलेय. अर्थात एका मुलाचे उपाय दुसर्याला लागु पडत नाहीत..

१. आपण थोडे relaxed रहावे. जेवतानाचा वेळ हसत खेळत असावा. अगदी भरवावे लागले तरी. किंवा भाजी खाल्ली नाही तरी. त्याना हवे ते आणि हवे तसे खाऊ द्यावे. पण सांगत रहावे की हे खाणे चांगले, आपल्या हाताने पोळी खा, मग मी तुला भात भरवते वगैरे वगैरे.. त्याला असे वाटले पाहिजे कि तो आवडीने हे करतोय, आपण सांगतोय म्हणुन नाही.
२. मुलाच्या समोर त्याला हे आवडत नाही, तो हे खात नाही असे म्हणु नये.. मुलांचे आपल्या बोलण्याकडे बारीक लक्श असते, जरी ते खेळण्यात गर्क असले तरी.
३. तो जर काही खात नसेल तर जास्त चर्चा करु नये.

या सगळ्यामुळे मी आता लहान मुलाशी जास्त झगडत बसत नाही. तो भरव म्हणाला कि भरवते. आणि दादा बघ कसा आपल्या हाताने खातो, असे सांगत असते, म्हणजे मोठ्या मुलाला पण बरे वाटते. दोघांनाही भाज्या, आमटी खायला लावते, पण हसत खेळत, त्याचा जास्त मोठा बाऊ न करता.

अपर्णा माझा मुलगा खरं म्हणजे सेम असाच आहे. मी इथे तिखटाचं वाचून जरा विचारातच पडले. कारण नील(१.५ वर्षे) खातो सगळं आमच्यासारखे. तिखट, काळा मसाला असलेलं. पण हल्ली हल्लीच खेळण्याकडे फार लक्ष व मूडी वागणं सुरू झालंय. जे तोंडात देऊ ते लग्गेच बाहेर. Sad काही कळतच नाही, आवडतं याला सगळं, खात आलाय व्यवस्थित, मग आता खायचे का नाहीये! :|

४ ते ६ वर्षासाठी - त्यांना एक कार्टून रोल मॉडेल द्या... मुलगी असेल तर बार्बी/ डोरा... मुलगा असेल तर हनुमान/ डिगो... आणि त्याचा एक एपिसोड दररोज दाखवा...

या सगळ्यामुळे मी आता लहान मुलाशी जास्त झगडत बसत नाही. तो भरव म्हणाला कि भरवते. आणि दादा बघ कसा आपल्या हाताने खातो, असे सांगत असते, म्हणजे मोठ्या मुलाला पण बरे वाटते. दोघांनाही भाज्या, आमटी खायला लावते, पण हसत खेळत, त्याचा जास्त मोठा बाऊ न करता.>> हा खात्रीचा उपाय...

>>>आणि दादा बघ कसा आपल्या हाताने खातो, असे सांगत असते, म्हणजे मोठ्या मुलाला पण बरे वा>>><<

चना, सहज सुचवतेय,, पटले तर घ्या...
कुठल्याच मुलाला कधीही कुठल्याही बाबतीत लहान असताना तरी दुसर्‍या भावंडाशी कधी तुलना करु नये.
मुले मोठी झाल्यावर आपण कुठल्या चांगल्या अर्थाने म्हणतोय हे कळेल तरी पण आता ह्या वयात उगाच भावंडाविषयी उगाच गैसमज/ असुया/राग वाटू शकतो....

२४ तासांच्या आत १०० गाठली ह्या बाफ ने .... मुलांचे खाणे/सवयी हा फारच कॉमन इश्यु आहे हे दिसतय यावरुन...

@भान आणि फुपा, माझी लेकही डेकेअर मधे सगळ्यांबरोबर व्यवस्थित खायची सगळं.... नाटकं सगळी घरी आणि आता शाळेत तर डब्बाच न्यायला लगतो किंवा मग लंच ऑर्डर पण मी अजुन स्ट्रिक्टली 'लंच ऑर्डर नाही' म्हणुनच सांगितलय तिला.

@चना, टीप्स आवडल्या Happy

आज तिची नेहमीची डब्बा बॅग न देता लंच ऑर्डरसारखं ब्राऊन पेपर बॅग मधे घालुन दिलय... बघुन तरी खुष झाल्या बाईसाहेब... आता सगळं संपतय का ते पहायचं Happy

लाजो, लंचऑर्डरमध्यही चांगले पर्याय असतात. त्यामुळे एखाद्यावेळी बदल म्हणुन द्यायला काय हरकत आहे? गार्गीला एका टर्ममध्ये एकदा/दोनदा लंच ऑर्डर देतो आम्ही. मेन्यु आपणच मुलांशी 'डिसकस' करुन ठरवायचा. कधी-कधी मीही लंचऑर्डरच्या बॅगमध्ये डबा देते. कधीतरी सरप्राईज पण ठेवते डब्यात.

माझ्या मुलांनी लहानपणी खायला खूप त्रास दिला. माझ्या मैत्रीणीची मुलं जे काही समोर दिलं असेल ते निमूट्पणे खायची. तिला अजिबात स्वयंपाक करता यायचा नाही. त्यावरून मी निष्कर्ष काढला आहे. सुगरण आईची मुलं खायला त्रास देतात. Happy

अरे देवा. एवढ्या प्रतिक्रिया. Uhoh आता मी परत सगळ्यांनी लिहिलेल लिहित नाही.
भाज्या , चोरुन, स्नीक करणे , पराठे ,थालीपीठ,पास्ता सॉस इत्यादी मध्ये उपाय घरात थोडाफार यशस्वी झालाय. मुलगी इतकी एनर्जेटीक आणि उद्योगी आहे कि खायचे लक्षात रहात नाही.

Deceptively Delicious किंवा The Sneaky Chef पुस्तकं वाचलीयेत का? यात काही ठिकाणी भाज्या पेस्ट करुन दिल्यात. मला ते पटल नाही. कारण भाज्यांच स्ट्रक्चर कळणार नाही मुलांना. पण स्ट्रॅटेजी मला वाटत देसी लोक करतात तीच आहे.

हा ब्लॉग पण आहे Ms Jessica चा deceptively ....... वरुन काढलेला. रेसीपी आहेत इथे.
http://www.doitdelicious.com/blog

सीमा Happy

यात काही ठिकाणी भाज्या पेस्ट करुन दिल्यात. मला ते पटल नाही. कारण भाज्यांच स्ट्रक्चर कळणार नाही मुलांना<<< बरोबर आणि प्रत्येकवेळी भाजी प्युरे केली की त्यापासुन मिळणारे फायबर सुद्धा नष्ट होते असं म्हणतात.

भाज्या पेस्ट करण्याचा ऑप्शन अगदी जेव्हा सॉलिड्स सुरु करतो तेव्हा ठीक आहे पण मुलांना दात आल्यावर भाज्या चिरुन वगैरे द्याव्यात. मी पराठे, फ्राईड राईस वगैरे मधे भाज्या बारिक चिरुनच घालते.

नाही गं लाजो. फायबरचा प्रश्न नाही आहे. चोथा टाकला जात नाही. तर तोही तसाच वापरला जातो वरच्या पुस्तकातील रेसीपीजमध्ये. रंग,रुप्,वास कळत नाही भाज्या पेस्ट केल्यामुळ हा मुद्दा आहे.

आर्च Happy

आमच्याकडेही "बरगड्या मोजून घ्या'च आहे. आवडीनिवडी सतत बदलताहेत. आजचा उपाय उद्या लागू पडत नाही. सध्या एक गनिमी कावा वापरते आहे. ज्या काही मोजक्या भाज्या सध्या आवडतात, त्या अजिबात डब्यात देत नाही. खरं तर कोणतीच भाजी. कारण एकदा का एखादी भाजी शाळेतले टोमणे खाऊन आली की ती घरीसुध्दा नकोशी होते हा अनुभव. डब्यात फक्त सॅन्ड्विच किंवा केसाडिया. नाहीतरी शाळेत जेवायच्या वेळी बडबडत बसल्यामुळे डबा संपणार नसतोच तसाही!

आणखी एक, सध्या मसाले वापरून केलेलं आवडत नाही. खरं तर मी मसाले नुसते वासापुरतेच वापरते, तरीही. मग शत्रू भाजी नसून, मसाला असावा असं समजून तेही प्रयत्न करते. हल्ली भाजी घेताना, जी मसाल्याशिवाय खाता येईल अशीच घेतली जाते. कधी नुसते उकडलेले छोले + मीठ, कधी उकडलेलं मक्याचं कणीस, कधी काकडी, किसलेला गाजर असं चालतं. पण एखाद्या दिवशी अळुवडीला "इंडियन सुशी" म्हणून खुषीने खाऊन चकितही करते! पराठे सध्या चालताहेत. भाज्या नकळत ढकलायला सूप मध्ये क्रॅकर्स आणि पास्ताचे वेगवेगळे आकार अ़जून तरी मदतीला धावून येताहेत.

काही फळं अजूनतरी टोमण्यांना बळी पडली नाहीयेत, स्नॅक ला खाल्ली जाताहेत.

जेवणाला / डब्याला जंक पर्याय शक्यतो देत नाही. उलट, जेवण संपवल्यावर त्यातलं काही मिळेल अशी आशा दाखवते, आठवड्यातून एखाद्याच वेळी.

कारण एकदा का एखादी भाजी शाळेतले टोमणे खाऊन आली की ती घरीसुध्दा नकोशी होते हा अनुभव.
काही फळं अजूनतरी टोमण्यांना बळी पडली नाहीयेत >>> स्मिताके, शाळेतील इतर मुलं डब्याला नावं ठेवतात असं म्हणायचं आहे का ? तसं असेल तर टीचरशी बोलून बघा. डबा देताना इंडियन फूड शक्यतो वेगळं उठून दिसणार नाही अशा पद्धतीने दिलेलं चांगलं उदा. भाजीपोळीचा रोल्स किंवा केसडिया करुन देणे, सँडविचमध्ये आपली भाजी भरुन देणे इत्यादी.( तुम्ही ते करत असल्याचं लिहिलं आहेच Happy ) पण तसंच देणं बंधनकारक आहे असंही नाही. शाळेत वेगळी संस्कृती, त्यानुसार बदलणारं, वेगवेगळं दिसणारं अन्न ह्यांची आवर्जून ओळख करुन देतात. त्यामुळे वेगळ्या पदार्थाची टर उडवण्यापेक्षा मुलं कुतूहलाने प्रश्न विचारायला शिकतात Happy

हा बाफ आज पहिल्यांदा उघडला.

सध्याचा माझ्या एका भाचीचा अनुभव :

तिचे वय ५ वर्षे. गेली ४ वर्षे खाण्यापिण्याच्या बाबतीत आईबाबाआजीआजोबांचा पुरेपूर पेशन्स पाहिलाय तिने. गेली २ वर्षे पाळणाघरात व शाळेत व्यवस्थित ताटलीत / डब्यात दिलेले खायची. पण तेच घरी आली की नखरे सुरू. अर्धे केळे खायला अर्धा - पाऊण तास! वरणभात खायला एक ते दीड तास. तोही कोणीतरी भरवायचा. भरपूर नखरे. रडारडी.

मध्यंतरी ३ महिन्यांपूर्वी तिला घराजवळच्या ग्राऊंडवर सायंकाळी खेळ/ कवायतीच्या ग्रूपमध्ये सोडण्यास घरच्यांनी सुरुवात केली. तिथे मुलांकडून तासभर पळापळी, खेळ, व्यायाम इत्यादी होतात / करवून घेतले जातात. तिथून घरी आल्यावर तिला कडकडून भूक लागलेली असते. त्या वेळी ताटलीत पोळीचे तुकडे व भाजी दिली की मटामटा स्वतःच्या हाताने खाते. तेच ज्या दिवशी ग्राऊंड बंद असेल त्या दिवशी परत नखरे चालतात. थोडक्यात, तिच्या बाबतीत कडकडून भूक लागल्यावर ती स्वतःचे स्वतः व पानात वाढलेले जेवायला शिकली.

दुसरे म्हणजे ज्या वेळी ती नखरे करते त्या वेळी तिचे पालक तिच्यासमोर तिचे ताट तसेच ठेवून देतात. जेवल्याशिवाय / पानातले संपवल्याशिवाय जागेवरून उठायचे नाही असा नवा नियम आहे. मग तिने अर्ध्या तासात जेवावे/ तास - दीड तास कितीही वेळात जेवावे. तोवर टीव्ही लावला जात नाही. ताटली साफ झाली की मगच टीव्ही. सध्या तरी ही मात्रा लागू पडत आहे. पुढचे माहीत नाही.

मी देखिल हा बाफ आज पहिल्यांदा उघडला.
सगळ्या आया समदुख्खि असल्यने सगळ्यांचिच मत पटलि:-)
काही वेगळे प्रकार माझ्या घरी छान wprkout झाला म्हणून लिहिते.

लहान मूलांना जनरली complex चवी जमायला वेळ लागतो. आणि आपल्या पाकक्रुती पाहिल्या तर लक्शात येइल कि एक ग्रीन बीन ची भाजि ४ लोक ४ तर्हेनी करतात. त्यात जीरे, मोहरी, खोबर, कढिपत्ता एक न दोन गोष्टी जातात. पुन्हा जेवयला नुसता पास्ता वै असेल तर अशि भाजि कोणी खात नाही.
मी trader Joe मधल्या frozen ग्रीन बीन्स सरळ pan मधे पाणि+ मीठ घालून उकळते( ३ मि) आनि मग पाणि टाकून देउन थोड (अगदी थोड पुरत) बटर घलून लसणी बरोबर परतते. भाजी न खाणारी मूल ह्या fries मारामारी करून खातात.
हाच प्रकार asparagus/Brocoli ला पण छान चलतो.
Brocoli bake केलि ४००फ ला थोड ऑऑ +मीठ्+मीरपूड घालून तरी मस्त लागते.

दूसरी गोष्टः मूलांना खायला सांगताना आपल्या अवाजात conviction पाहिजे. आइकेल का नाही असा doubt आपल्या मनात असला कि मूलं हटकून ऐकत नाहित.

आणि तिसरी: मी पिठ्ल पोळी खायचि सवय लवायचा प्रयत्न करत होते. पहिल्यान्दा काहि वेळा yuk yuk ची कौतुक झाली पन चमचा भर खयला लावल दर वेळी. करायच बन्द नाही केल. हळू हळू मूली त्या चविल रुळल्या.आता पिठ्ल पोळी नीट खातात.तसच दूधि भोपळा घातलेल रसम.

आणि घरात एक रूल केला नविन काहि समोर आलं तर एक घास खायचाच.
शेवटी हे सगळ खात असुन मोठ्या मुलिला सिमला मिरची अजिबातच आवडत नाही अस लक्शात आल तेव्हा तिच्या मागे सिमला मिरची साठि लागण बन्द केल.

-शिरीन

ह्या टोमण्यांचं काही सांगता येत नाही..कधी लेक म्हणते कोणितरी यकी म्हणालं वगैरे..पण असं आहे म्हणावं तर कधी कधी दिलेला पास्ता सगळा परत येतो, आणि पनीर पुलाव पूर्णपणे चाटुनपुसुन साफ होतो Happy

अजून एक आहे. सध्या आई/. बाबा नोकरी करत असतील तर ते मुलांच्या वाट्याला कमी येतात. मग आईचा / बाबांचा जास्त सहवास मिळावा म्हणून मुले जास्त वेळ लावतात. पटकन जेवण उरकले तर आई ते काम संपवून आणि दुसर्‍या कामाला जाईल म्हणून जेवण लांबवायचे. असे. माझी मुलगी लहान असताना नेहमी ऑफिसला जायच्या आधी पाच मिनिटे काहीतरी प्रॉजेक्ट काढायची. जसे चित्र काढून दे मी रंगविते, गाणे ऐक, नाच बघ. इत्यादी. माझी चिडचिड व्हायची मग लक्षात आले हिला मी अजून घरी राहायला हवी आहे म्हणून तिचा हा प्रयत्न आहे. मग तिचा प्रॉजेक्ट तयार करवून देऊनच निघायला लागले.

शिवाय बाहेर पाळ्णा घरात किंवा घरी मावशीच्या हाती नीट खावेच लागते मग हटट, मनमानी कुठे करणार तर आईजवळ. म्हणूनही ह्या जेवण अस्त्राचा वापर होतो. इट इज रेअर्ली जस्ट अबाउट फूड.

बादवे काल नूडल्स बरोबर कुकुंबर खाल्ली. धन्य झाले मी. आता ते बीन्स फ्राय करून बघते. Happy

वरती रोल मॉडेलचा उल्लेख आला. मूलांनी भाज्या खाव्यात, दूध प्यावे यासाठी लहान मूलांमधे लोकप्रिय
असलेला एखादा कलाकार, टिव्हीवर असे मिनिटभराचे निवेदन देऊ शकेल का ?
उद्या जर ह्रुतिक म्हणाला, मी लहानपणी दूध प्यायचो म्हणून असा सुदृढ झालो !

स्वप्नरंजनच आहे माझे. कलाकार तयार होतीलही पण प्रायोजक मिळणार नाहीत !!

नको, शाहिद कपूर सांगेल, मी बोर्नव्हिटाच्या जाहिरातीत होतो ( प्यायचो पण).. पण त्याची उंची तेव्हापासून तेव्हढीच असल्याने बच्चेकंपनी बोर्न्व्हिटा पिणे सोडून देइल.
Proud Proud

हा अगदी जिव्हाळ्याचाच विषय सगळ्या पालकांचा!!
मी माझ्या भाचीला पहातच होते, मुलांना खाउ घालणे किती कठिण काम आहे म्हणून.
पण मग प्रथमला (माझा लेक : वय : २.५ वर्षे) हल्ली अशीच सवय लावलीय कि भुक असेल तर खा नाहीतर ठेऊन दे!!
तो पण असा लबाड आहे... दिवसभर त्याच्या आजीकडे सगळा हट्ट!! पण मी घरी असेन किंवा नुसती जवळ असले तरी स्वतःच्या हाताने खातो. कारण त्याला माहित आहे, हि बया नको म्हटले तर खाऊच देणार नाही!
गपगुमान खातो!! Happy
मी तर त्याला पर्याय पण देत नाही. हे नको तर ते खा म्हणुन. खायचे तर खा नाहीतर नको!
पण सगळ्याच मुलांना हा उपाय लागु पडेलच असे नाही. Sad

स्वाती

हा प्रयोग बहुदा यशस्वी ठरतोच.

मला एका शिक्षिकेने सांगितले होते. मुले जाणती झाल्यावर आपल्याकडच्या अस्त्रांचा उपयोग करुन बघत
असतात. आजी आजोबांची शिकार अगदी सहज करता येते.

आई बाबा मात्र जरा जड जातात,

शिक्षिका जास्त महत्वाची का ठरते तर तिची तूलना आईशी होते. आपण एकटे आईच्या नाकी नऊ आणतो,
पण ही बाई तर आपल्यासारख्या १०/२० नगांना संभाळते. शिवाय तिला कितीतरी माहिती असते, म्हणून ती
ग्रेट. आणि तिचे ऐकले पाहिजे.

माझा पुतण्या दादरला राजा शिवाजी विद्यालयात शिकला. तिथे मुलांना समोरा समोर बसून डबे
खावे लागत. आणि रिकामा डबा बाईंना दाखवावा लागे.

एका बहिणीने मुलीला सांगितले (मुलीचे वय ५ वर्षे +) की शाळेत जर डबा संपवला नाही तर घरी आल्यावर वेगळे खायला मिळणार नाही. तोच डबा संपवावा लागेल. जर वेगळे खायला हवे असेल तर घरी यायच्या अगोदर डबा संपवायचा! तर मग काही दिवसांनी हे कॉमन दृश्य दिसायचे त्यांच्या घरी.... तिची मुलगी शाळेतून आली की घरात न शिरता घराच्या पायरीवरच बसायची, डबा खायची आणि मग घरात शिरायची! Happy

Pages