४-१० वर्षाच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आणि चांगली सवय कशी लावावी?

Submitted by लाजो on 2 May, 2012 - 18:59

लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्‍याच पालकांना खुप मदत होइल.

मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो टिव्हीचा उपाय मी पण केला होता. प्लेस्कुलमधून बर्‍याचदा डब्ब्यातला थोडासा फुलका परत यायचा. त्यावेळी असं केलंस तर कार्टून बघायला मिळणार नाहीत हे सांगितलं होतं.

आता तर कार्टून फक्त सुट्टीच्या दिवशी तास-दिड तासच बघायचे असं सांगितलंय. (खरं तर त्याच्या बाबानी अर्धा तासच वेळ दिलाय पण शनीवारी डिस्ने चॅनल वर लागणार्‍या अ‍ॅनिमेट मुव्हीज मलाच बघायच्या असतात म्हणून मी वेळ वाढवला. ) सध्यातरी हेसुद्धा ऐकतोय आमचं.

वेका, मृण्मयी बर्‍याच गोष्टी पटल्या.
ललिता Lol
आमच्याकडे वय चारला हा प्रश्न होता. फार वैतागलेले. मंजिरीशी सुद्धा बोलले होते. पण नंतर एक उपाय सापडला.
प्रश्न अजुन पुर्ण सुटलेला नाही. जेवणाचा रवंथ किमान एक तास चालतोच. पण जवळपास सर्व पदार्थ खाते. शिवाय कसे कोणास ठाऊक डबा लवकर संपवते. भारतात शाळेत डबा लवकर संपवावा लागतो असे किमान एक वर्ष तरी मी हॅमर केलं होतं Wink

तर तेव्हा मी एक उपाय केला होता. तो थोडाफार लागू झाला.
इथे असलेला चार्ट प्रिंट केला. यात प्रत्येक प्रकारच्या फुड साठी एक रंग आहे त्याला आम्ही टिम नावे दिली
ऑरेंज टिम - एनर्जी देणारी
ग्रीन टिम - मिनरल्स विटॅमीन्स
रेड टिम - विटॅमिन्स , सी - म्हणजे सर्दी होणार नाही.
यल्लो टिम - ऑइल, बटर
ब्ल्यू टिम - कॅल्शियम
पर्पल टिम - प्रोटिन्स.

या सगळ्याबद्दल नेहेमी बोलायचो.
तर हा चार्ट भिंतीवर लावला.
मग एक एक्सेल केली त्यात पहिला कॉलम तारखेचा मग वरच्या ६ टिम्चे सहा कॉलम्स आखले आणि एक जास्तीचा जंक टिमचा कॉलम आखला. शेवटचा आणखी एक स्पेशल कॉलम. हा चार्टही प्रिंट करुन चिकटवला.
रोजच्या जेवणानंतर कुठल्या टिम मधले पदार्थ खाल्ले त्यानुसार प्रत्य्के कॉलम मधे एक गोळा काढायचा. जंक खाल्ले कि तिथेही गोळा. १००% नसलेले ज्युस पण जंक मानायचो. रात्री झोपताना जर सर्व ६ टिम मधे गोळा असेल आणि जंक टिम मधे गोळा नसेल तर स्पेशल कॉलम मधे एक छान स्टिकर लावायचा.
किती स्पेशल स्टिकर मिळाले याबद्दल नेहेमी बोलायचो. मग काही दिवसातच स्वतःहुन एखादी टिम पुर्ण झाली नसेल तर तो पदार्थ मागुन घ्यायची जसे दुध सकाळपासुन प्यायले नसेल तर ते मागायचे वगरे. ज्युस विकत घेताना ती स्वतःच त्यावर १००% लिहिले आहे का ते बघते इ. नविन पदार्थ कुठली टिम याबद्दल चौकशी करुन खाते.
आता सध्या भारता आल्यावर हा कार्यक्रम बंद पडला आहे. पण पुन्हा सुरु करणार. हा कार्यक्रम लाईफ लॉंग जंक खाण्याची सवय न लागण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे असे वाटते.

( इतके करुन 'बरगड्याच काय एकुण एक हाडं मोजुन घ्या' असाच प्रकार आहे म्हणा. पण त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलेय मी Wink )

जगात कुठेही जा प्रोब्लेम्स सेमच असतात हे सिद्ध झालं. Happy
मला वाटल आमच्याकडेच नखरे आहेत.
असो मीच लहाणपणी पासुन ते १३-१४ वर्षाचा होइतो खुप नखरे केलेत खाण्याचे त्यामुळे मुलाला काहि बोलायच म्हणजे गिल्ट फिलिन्ग असतच.
माझा मुलगा आता ४.५ वर्षाचा आहे.
लहान होता तेव्हा चक्क नाचणी सत्व मागुन चवीने खात होता. आता एक एक फेज असते त्यानुसार सुरु आहे.
मध्ये वरण मध्ये चपाती चुरुन हा आयटम फेव्हरीट होता. आता दहि भात सुरु आहे.
कधी वरण भात असतं. दुध पितो नीट. पराठा वैगेरे खातो. पण भाज्या कशा खायला शिकवायचं हा प्रश्न आहेच.
स्वतःच्या हाताने खा अस बोल्लो तर हात पाठीमागे लपवुन माझे हात बिज्जी आहेत. तुच दे अशी फर्माइश असते रोज. त्यामुळे स्वतःच्या हाताने खायला शिकवणे हा ही एक टास्क आहे. खाताना त्याला कार्टुन सुरु हवच असत. Sad हे कसं टाळायच ते ही अजुन जमलेल नाहिये आम्हाला.
पनीर असेल तर स्वतःच्या हाताने खा अस सांगाव लागत नाही. खुप आवडीचा खाद्यपदार्थ असेल तर न सांगताही खातो स्वःच्या हाताने. एरवी स्वतःच्या हाताने खाताना मग जेवणाकडे लक्ष नसतं. थोडसं पोटात गेल की मग रोजचा पोर्शन देखील संपत नाही. आपल्यालाच भरवाव लागत.
स्वयंपाक सुरु असताना किंवा नवीन पदार्थ त्याला द्यायचा असेल तर त्याची एक्साईटमेन्ट वाढवण्यासाठी त्याला किचनमध्ये नेवुन पुर्ण प्रोसेस दाखवली तर काही वेळी फायदा होतो.
अजुन तरी त्याला फार चीज , फार वेळा मॅगी, पास्ता असे पदार्थ देत नाही. (फ्रेक्वेन्सी कमी आहे)
फळं खातो. पण आपल्यालाच लक्ष द्यावं लागत.
आता बघु इथे काही आयडीया मिळतात का?
(तरी नशीब लहान मुलांची वेगळी "बाळबोली" साईट नाहिये. नाहीतर त्यानी आईच्या / बाबाच्या हे का ते खा ह्या कटकटीपासुन सुटका कशी मिळवावी असा धागा उघडला असता. Proud )

तो नकार देण्याचा प्रयोग, या वयात होतच असतो. पण अनेक जणींनी लिहिले आहे तसे, मूलाच्या प्रत्येक अटीला आपली अट ठेवायची.
अधून मधून जंताचे औषध द्यावे लागते. तसेच मूल भरपूर खेळतेय का, याकडे पण लक्ष
द्यावे लागते. खेळल्यावर भूक लागतेच.

चॉकलेट्स वाईट नाही, पण ते बाकीचे पदार्थ खाल्ले तरच मिळेल, अशी अट ठेवायची.
आधी जास्त खाल्ले तर हे पदार्थ खायला फारशी भूक उरत नाही.
मॅगी, इंडोमी सारख्या गोल नूडल्स वनस्पती तूपात तळलेल्या असतात, त्यापेक्षा चौकोनी नूडल्स चांगल्या. त्यात भाज्या भरपूर पण बारीक कापून, मात्र टाकायच्या.
लहान मूलांना कॅल्शियम कमी पडले तर त्यांचे लक्ष एका जागी स्थिर रहात नाही, त्यांना लवकर कंटाळा येतो. त्यामूळे कुठल्यातरी स्वरुपात कॅल्शियम आणि तेसुद्धा एखाद्या आंबट पदार्थाबरोबर, पोटात जाईल हे बघावे लागते.

आमच्याकडे जेवणाचा कंटाळा असतो. वरण भात किंवा खिमट हे खुप आवडीने खाते पण आमटी, भाजी केली की नाक मुरडते आणि अजिबात खात नाही. लोणच आवडत. मासे फ्राय खाते. पण जर खेळात रमलेली असेल तर काहीच नको असत.

मी तिच्या आवडीचे पदार्थ मधुन मधुन बनवते ते म्हणजे इडली, मेदुवडा, सँडविच, थालिपिठ, अळूवडी हे आवडीने खाणार.

हे म्हणजे एकदम घरोघरी अस झाल आहे. मी लेकाला गोष्टी सांगत सांगत भरवते. एकदा एखादा सुपर हिरो झाला की त्याने असे केले / तसे केले करत घास तोंडात घालते. त्यांच्या नकळत / लक्ष नसताना भरवले तर ते तोंड उघडतात त्यांना कळतही नाही जेवण चालु आहे ते. हा घास मात्र तोंडात ठेवायची भयंकर घाणेरडी सवय आहे त्याला (ती सवय खानदानी आहे असे साबा म्हणतात, मग मी त्याच्या बापाला - हाच बरा गुण फॉरवर्ड केलास असे म्हणुन मानसीक समाधान मिळवते Sad )

यावर उपाय म्हणजे गोष्टीच्यावेळि त्याला मधे मधे बोलायला लावते व तोंडात घास असताना बोलले तर आईला ऐकुच येत नाही असे खुप आधीपासुन सांगीतलेय त्यामुळे तो गीळुन मग बोलतो आता.

बायांनो याचे फायदे पण पहा, लेकाला रामायण तोंडपाठ झालेय, महाभारत पण बर्‍यापैकी माहिती आहे. बेसीक सायन्सच्या थीम, थोडा थोडा भुगोल पण शिकवता येतो. मी सरळ त्याला पृथ्वीचे मॉडेल देते, मग त्यावर देश दाखव, राम कुठुन कसा गेला तो रस्ता दाखव, रावण कुठे रहायचा ते दाखव, त्यातच थोडी दिशांची ओळख, मग कधी बॉल घेउन सुर्य, चंद्र आहेत असे समजुन ते एकमेकांभोवती कसे फिरतात ते दाखव असे करत / सांगत रहायचे.

जेवण व थोडे ज्ञानदान (आपले) व मनोरंजन त्यांचे होते.

शिवाय वर दिनेशदांनी सांगीतले तसे बाजारात नेले की एखादी नवीन भाजी दाखवुन ओळखायाला द्यायची, त्याचे काही गाणे आधीच शिकला असेल तर आठवण करायची अशा प्रकारे लेक कचालु, रताळ, वाटाणे, कडधान्ये, दाणे, गाजर (सशाला आवडते म्हणुन) असे सगळे कच्चे वा उकडुन खातो.

अर्थात म्हणुन मी सुखी झाले असे अजुन तरी नाही, सगळ्या आयांसारखी मीही त्याच्या मागे असते खा खा म्हणुन. वर इतके करुन पण माझी पणजी जेव्हा जेव्हा त्याला पाहील तेव्हा तेव्हा डोळ्याला पदर लावते व मला सुनावते तुम्हाला त्याला खाउ घालता येत नाही तर इथे ठेवा त्याला. आम्ही जेवु घालु. कशा ग त्या पोराच्या बरगड्या मोजुन घेता येतील अशा आहेत. Sad (नशीब माझे की हे सर्व ती माझ्या साबांसमोर नाही म्हणत, नाहीतर .... समजुन घ्या .... पुढे काय लिहु?)

मी सरळ त्याला पृथ्वीचे मॉडेल देते, मग त्यावर देश दाखव, राम कुठुन कसा गेला तो रस्ता दाखव, रावण कुठे रहायचा ते दाखव, त्यातच थोडी दिशांची ओळख, मग कधी बॉल घेउन सुर्य, चंद्र आहेत असे समजुन ते एकमेकांभोवती कसे फिरतात ते दाखव असे करत / सांगत रहायचे.

>>> ही आयडिया भारी आहे. Happy

(मला सुचली असती, तर काही दिवस तरी कमी डोकेदुखीचे गेले असते :हळहळणारी बाहुली: :हाहा:)

मोनाली सही आयडीया.

श्रावणी १-२ वर्षांची असताना घरभर तिच्यामागे धावत जवळ जवळ १ तास तिला भरवण्याचा कार्यक्रम करावा लागे. अश्यावेळी माझ्या संयमाचे सगळ्या घरातल्यांना अप्रुप वाटे Lol २-३ वर्षांची होती तेंव्हा मी तिला तिच्या आवडीनुसार विषय घेउन गोष्टी बनवुन भरवायचे मग एका जागेवर बसायला शिकली. आता टिव्ही समोर बसुन जेवते बर्‍याचदा पण जर आम्ही घरातील दोन्ही कुटूंबे एकत्र बसलो किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या पंगतीत स्वतः अगदी आवडीने बसते.

बागुलबुवा,
कायम काय अशाच पोस्टी टाकता Uhoh

ललिता,
पोस्ट अतिशय आवडली. आपल्याही संयमाच्या मर्यादा आखुन घेण्याला पर्याय नाही असं वाटतय.

स्वप्नाली,
ग्रेट आहेस तू.

अगदी वरील प्रमाणेच कथा होती आमच्या कडे. (२ तास जेवत बसणे वैगरे) पण आता वय ६ झाल्यापासून जरा कमी आहे.
तरी डबा पुर्ण संपवतच नाही, पण घरी आल्यावर संपवते(सांगाव लागत नाही). आल्या आल्याच सांगते आई डबा राहीला आहे पण मी आत्ता खाते त्या शिवाय नाही बघणार टिव्ही.. Happy
रोज रोज आल्यावर तेच ऐकुन पाठ झालय तिला.

Your children are not your children. They are the sons and daughters of life's longing for itself. They come through you, but not from you.
And though they are with you, yet they belong not to you.
You may house their bodies, but not souls.
You may strive to be like them, but seek not to make them like you----Kahlil Gibran
.
.
.seek not to make them like you. !!

Don't try to discipline your kids ...as discipline is good for only dogs and donkeys ...Make your children FREE and let them explore their own choices Happy

अश्यावेळी माझ्या संयमाचे सगळ्या घरातल्यांना अप्रुप वाटे >>> आयांनी असा संयम नाही आणला तर कसे व्हायचे.

पण एक आहे मुले पंगतीमधे, इतर मुलांबरोबर स्पर्धेच्या इर्षेने जरा बरे जेवतात. बर्‍याचदा आपल्या आपल्या हाताने पण जेवतात. पण मग अशा वेळी क्वांटीटी मोजु नये त्यांनी जेवढे समाधानाने खाल्ले त्यावर आपण समाधान मानावे Happy

अजुन एक मुले पाण्यात असताना मस्त जेवतात. माझा लेक अजुनही ९०-९५% वेळा सकाळचा ब्रेकफास्ट बादलीत बसुन खातो. एकीकडे माझी गोष्ट सुरु असते व दुसरीकडे तो शब्दशः गीळत असतो. ती बादली / टब गॅलरीत ठेवली तर पक्षी बघत बघत खाणे कधी संपले त्यालाही नाही कळत.

मुले थोडी लहान असली तर खालील उपाय करुन पहा. अरुंद तोंडाच्या बाटलीत पाणी नाहीतर वाळु चमच्याने भरायला सांगायची, एकीकडे आपली टकळि (गोष्ट) चालु करायची व दुसरीकडे आपले हात व त्यांचे तोंड.

पण असे करुन आपण खाउ घालतो हे लक्षात आले की हा उपाय बंद करायचा (करावाच लागतो म्हणा :फिदी:)

फळांच्या बाबतीत म्हणाल तर मुलांना डेकोरेट करुन दिलीत की आवडीने खातात. मी फळांच्या लहान फोडी एका रंगीत बाऊल मध्ये करते आणि त्यात काटा टाकुन तो बाऊल तिच्यासमोर ठेवते. मग पुढच्यावेळी तशीच फर्माइश येते फळांच्या बाबतीत. आंब्याच्या अर्ध्या भागाचा अननसचा शेप करुन देते म्हणजे अजुन चविने खाते.

मोनाली तुझे उपाय चांगले आहेत गं.
पण तरीही मला असे वाटते कि आपण काय खातोय आणि किती खातोय ते मुलांना लहानपणापासुनच कळले पाहिजे. म्हणजे भुक असेल तितकेच खायची आणि सर्व पदार्थ ( चांगले दिसत असलेले / नसलेले) खायची सवय होईल.

रैना, ग्रेट काय. अगं फार वैताग आला होता तेव्हा त्यामुळे उपाय शोधत होते.
जेवण थोडे डेकोरेट करणे हा उपाय आहे. पण नेहेमीच नाही जमत ते.

लाजो, कडकच रहावे लागेल सग्ळ खायची सवय लागायला. जास्त पर्याय ठेवले नाही तरच ती सगळे खायला
शिकेल. Happy माझ्या लहानपणी (बहुतेक पूर्वी सर्व घरात असा नियम असेलच) पानात वाढलेले सगळे खावे लागायचेच. वाटल्यास नावडती भाजी पुन्हा नका घेऊ पण पहिली वाढलेली संपवावी लागायची. माझी बहिण डोळ्यातून गंगाजमूना वहाताहेत अश्या अवस्थेत वांगी खायची तरी आई बधायची नाही... आज तिची ती आवडती भाजी आहे. Happy
थोडी मोठी झाली की खायला लागेल ग सर्व काही. फर्मायशी सुध्दा करेल. Happy आमच्या मनी सारख्या. माझी मनी जेवायची व्यवस्थित लहानपणी - पण चांगली १२-१३ ची होईपर्यंत वरणभात भरवावा लागायचा. ( माझी आजी याकरिता मला भारी रागवायची - तुलाच भरवायची हौस आहे म्हणून.. Sad पण मी घरात नसेन तर स्वतः ही तेच करायची Happy ) भाजी-पोळी हाताने खायची. दुध प्यायचा अतिशय कंटाळा.. रोज भांडणे आत्ताआत्तापर्यंत .. एक उपाय शोधून काढला मग - आज दुध दिवसभर आश्वासने देऊनही प्यायली नाही की ते विरजायचे अन सकाळी मिठी लस्सी नाश्ट्याबरोबर द्यायची.. उ न्हाळा असल्याने चालतय सध्या..

आमचे कष्ट काही तसे अजुन संपत नाही... कन्येने पिछाडून सोडलेय खाण्याच्या सवयीने इतकी मोठी झाली तरी. १० च्या वर वय असले तरी... ;(
कितीही पौष्टीक आम्ही घालायचा लहानपणापासून प्रयत्न केला तरी.. आता पाणी सोडलेय. व सांगितलेय जे केलेय ते खा नाहीतर उपाशी रहा(आणि मनात मात्र चिंता).
सॉरी, इथे १० च्या आतले वयाच्या मुलांचे लिहायचे आहे पण हा विषयच जिव्हाळ्याचा करून सोडलाय मुलीने त्यामुळे असे काही विषय दिसले की वाचा फोडते दु:खला. नुसती नाक दम आणून हाडं पिचवतात. आमच्या काळी असले काही न्हवतं हो.. तिथे आईने डोळे वटारले की कुठलीही भाजी सुद्धा बकाबका गिळायचो हो. Proud

>>पण चांगली १२-१३ ची होईपर्यंत वरणभात भरवावा लागाय>><<
हे मी ही केलेय आणि लोकं म्हणायचे फुकटचे लाड आहेत मुलीचे. त्यांना काही कळायचे नाही की किती त्रासाने भरवावे लागते नाहीतर आहेच ताप, सर्दी सदान कदा. Sad

१५ पर्यंत कष्ट करा झंपी Happy आमच्याकडे १० नंतर शिंग फुटली आणि खायच्या फर्मायशी सुरू झाल्या.. वरणभात भाजीपोळी सोडून चवीढवीचेच खायला आवडायच. आ ता सोळाव्या वर्शी लठ्ठ होऊ नये म्हणून आपल्याच मनाने तिने च.ढ. चे खाने कमी केलेय.. Happy

तिला भरवून घ्यायला आवडतच म्हणून परिक्षेच्या दिवसात तर हमखास अधून्मधून भरवून घेतेच.. एरवी इकडे तिकडे करते. नंतर अभ्यासाला बसली की भरवा म्हणते.. :त्रासलेली भावली:

@मोनाली, तुझी जेवण विथ ज्ञानदान आणि मनोरंजनाची आयडिया आवडली Happy धन्स गं Happy

मध्यंतरी मी लेकीला पुस्तक वाचुन दाखवत असे. पण आता ते थांबलय कारण तिला ड्रॉइंग करायच असतं...

पण ते पृथ्वीचा गोल, चंद्र सुर्य वगैरेची आयड्या करुन बघतेच आता Happy

@बाब्या, नवर्‍याच्या सवयी बदलल्यात असं कधी म्हंटलं मी? त्यासाठी दुसरा बाफ काढावा लागेल Proud आणि त्यावर याहुनही भरभरुन प्रतिसाद येतिल Lol

@अल्पना, छान गं, तुझा लेक व्यवस्थित खातो Happy

@सावली, ती रिवॉर्ड चार्टची आयडिया झाली आमच्याकडे... पण थोडे दिवसच सक्सेसफुल झाली Sad

कोणीतरी सांगा ना की मुलांनी नवे पदार्थ ट्राय करावेत म्हणुन काय आयडिया करता येतिल? लेकीला पाभा, बवडा, भेळ, वगैरे पण आवडत नाही Sad

पानात वाढलेले सगळे संपवायचे आवडले नाही आवडले तरी हा माझा ही आग्रह असतोच.
ज्या भाज्या आवडत नाहीत त्याचे सरळ पराठे करून देते. अगदी भोपळा, दुधी, बीट, मुळा, पडवळ, अगदी बीन्स सुद्धा बरीच मोठी यादी आहे. Proud घरातल्या सगळ्या भाचे, पुतणे कं नी पराठे मावशी अस नामकरण केलय Proud

हो स्मिता मी पण भाज्यांना पर्याय पराठेच करते.

माझी लेक पावभाजी आवडीने खाते.

लाजो लेकीला कोणत्या प्रकारचे पदार्थ आवडतात ?

लाजो, जास्त व्हरायटी दिल्याने तिचा गोंधळ उडत असेल तुम्ही दोघे जे खाता तेच तिला दिले तर तिला सगळे खायची सवय लागेल. तुम्ही पण वेगवेगळी व्हरायटी करत असालच की. तिने ते नाही खाल्ले तर नंतर तिला विचारून मग देत जा काय हवे ते.. असे करून पहा असे मला वाटाते. Happy

ही मुलगी खूप हळूहळू जेवते अन मी रागीट आई असल्याने आमचे झाले की तिला एकटी ला स्वॅपाकघरात जेवत ठेवून बाहेर बसायचो टीव्ही पहात. गुमान १०-१२ मि. ताट संपऊन यायची टीव्ही पहायला.. Happy

माझ्या लहानपणी (बहुतेक पूर्वी सर्व घरात असा नियम असेलच) पानात वाढलेले सगळे खावे लागायचेच. वाटल्यास नावडती भाजी पुन्हा नका घेऊ पण पहिली वाढलेली संपवावी लागायची. << अगदी अगदी गं अ_मी... आणि आपण खायचो Happy

सावलीचं ही पटतय Happy

मुलांनी नवे पदार्थ ट्राय करावेत म्हणुन काय आयडिया करता येतिल? >>>

याला खरं म्हणजे ठामठोक आयडिया अशी नाही. चवी जसजश्या डेव्हलप होत जातात, तसतशी मुलं खायला लागतात. ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत आदित्य मिसळीला हातही लावायला नाही. एका ट्रेकला खाल्ली (किंवा खावी लागली). तेव्हा सपाटून भूक लागलेली असणार, त्यामुळे त्याला आवडली. तेव्हापासून मिसळ ही आता त्याची 'वन ऑफ द मोस्ट फेव्हरिट' डीश आहे. आता बोल Proud वय वर्षं १४ ला ही स्थिती होती, तर वय वर्ष ४-५ चं काय!!

अजून एक - इतरांच्या घरी / डब्यात एखादा पदार्थ खाल्ला की त्यांना आवडतो, मग साक्षात्कार होतो, की आईही घरी हे करतेच... मग ते पदार्थ मुलं खायला लागतात.

अजून एक - आपण केलेला एखादा पदार्थ त्यांना आवडत नसतो, पण तोच पदार्थ घरी आलेला त्यांचा एखादा मित्र / मैत्रीण आवडीने खातात आणि मग त्यांच्या डोक्यातही उजेड पडतो. Lol

थोडक्यात, सगळा मानसिकतेचा भाग आहे.

कुठल्याशा एका लेखात वाचलेले आणि तेव्हा स्वतःच्या लहानपणाशी पडताळून पाहून पटलेले :
आमचा बाब्या/बाळी अमुकतमुक /काहीही खात नाही, खायचे नखरे करतो/ते अशी टेप/दवंडी ति/त्याच्यासमोर अजिबात वाजवू नका. त्यामुळे मुलांचे वर्तन पक्के होत जाते (म्हणे).
त्या लेखातले उदाहरण : मुलगा विशिष्ट भाजी घरी खात नाही, मात्र दिवसभर सांभाळणार्‍या मावशींकडे खातो, असे सतत सांगितले जायचे. यावर एकदा त्या मुलाने 'तू नेहमी असेच म्हणतेस मग मी कशी खाऊ घरी भाजी.'
(अस्मादिक लहानपणी घरी जेवणासाठी नाटके करायचे, बाहेर कुणाकडे गेल्यावर मात्र समोर येईल ते गुपचूप गिळायचे. :))

स्मि Happy पराठा मावशी Lol

@अ_मी, लेकीला आम्ही जे डिनरला खातोय तेच देते.. पण तिने हल्ली असहकार पुकारलाय Sad

मी आठवड्यातुन २ दिवस भाजी+आमटी+कोशिंबीर्+पोळी+भात असा मेन्यु असतो, बाकीचे दिवस कधी पराठे आणि पुलाव, पास्ता - बेक्ड किंवा ग्रेव्ही असलेला, कधी इडली, डोसा किंवा फ्राईड राईस व नुडल्स असे काहितरी वेगळे वेगळे असते. आठवड्यातुन एक किंवा दोन वेळा चिकन. बटर चिकन आणि ब्रेड्/पोळी आवडीने खाते.

सुप्स वगैरे आवडत नाही... ट्राय देखिल करत नाही Sad

@लले Happy थोडक्यात, सगळा मानसिकतेचा भाग आहे<<, पटलं Happy

@भरत, हो वाचलय मी पण असं...

हे सगळं वाचून मला आत्ताच टेंन्शन आलंय. माझं पिल्लू अजून यायचं आहे या जगात. जुलै मधे अपेक्षित आहे. Happy
इतका पेशंन्स कसा ठेवायचा? :);)

@ सावली, अग असे कळाले असते तर काय हवे होते. मी व साबा सत्यनारायण बोललोये त्याच्या खाण्याच्या सवयीला वैतागुन. Wink जोक अपार्ट पण असे खरच कळते तर किती बरे झाले असते.

झाली आमच्याकडे... पण थोडे दिवसच सक्सेसफुल झा>>> अग म्हणुनच आपल्या सारख्या आई लोकांना बेस्ट क्रिएटिव्ह असे अ‍ॅवार्ड सुरु होणार आहेत लवकरच Happy सतत बदल करावे लागतात. हि मुल लै हुशार बघा आपल्या कोणत्या कृती नंतर काय होणार हे त्यांना बरोबर कळते मग आपणच काहीतरी नवा उपाय शोधायचा.

@ लाजो इतर मुलांबरोबर असताना असे नवीन पदार्थ देउन बघ.

Pages