पंचवीस वर्षांपूर्वी उघडकीला आलेल्या बोफोर्स घोटाळ्याने आज पुन्हा डोके वर काढले. अमिताभ बच्चन निर्दोष असल्याचे उघडकीला आले तर माजी पंतप्रधान राजीव गांदी यांनी कशा प्रकारे सोनिया गांधींचे सुहृद असलेले क्वात्रोची यांना कसे वाचवले ते ही उघडकीला आले.
या घोटाळ्यात कुणाची पापे झाकण्यात आली तर कुणाला विनाकारण गोवलं ते इथे पहा:
http://timesofindia.indiatimes.com/videos/news/Bofors-investigator-alleg...
http://timesofindia.indiatimes.com/india/Bofors-scam-I-have-lived-with-s...
माजी स्वीडीश पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्टोर्म यांचा खुलासा:
http://www.indianexpress.com/news/swedish-former-top-cops-bofors-remarks...
हे सगळं असतानाही काँग्रेसने मात्र निर्लज्जपणे प्रतिपादन असे केले आहे:
ई-सकाळ:
नवी दिल्ली- बोफोर्स प्रकरण आता संपले असून, ते पुन्हा उघडण्याची गरज नाही, असे केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आज (बुधवार) येथे म्हटले आहे.
मला वाटते की, हे प्रकरण आता संपले आहे. नवीन विषय घेऊन हे प्रकरण पुन्हा-पुन्हा उघडू नये. जो काही निर्णय असेल, तो न्यायालय देईल, असे खुर्शिद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
भाजपकडे निदान नरेंद्र मोदीतरी
भाजपकडे निदान नरेंद्र मोदीतरी आहेत.>>>> दंगा करायला.
. ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पर्रीकर ही आहेत.>> यांनी अजुन किर्ती दाखवली नाही आहे. दाखवतीलच
.
त्याचबरोबर
येडुरप्पा ही आहेत, शिवराज चौहान देखिल आहेत, उमा भारती आहेत, बंगारु लक्ष्मन आहेत, राजनाथ सिंग ही आहेत. अरे पी एम इन वैटींग अडवाणी देखील आहेत. यांची नाव घ्यायला लाज वाटली ?
एकटाच १. >> उगाच ८ वर्षे
एकटाच
१. >> उगाच ८ वर्षे सत्ते वर आहे का ? भारतीय जनतेला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे.
मोदींसारखा दाखवा! गुजरातची जनता काय मूर्ख आहे?
२. >> लक्ष्मन ने भाजपाचेच पायताण भाजपाच्याच तोंडावर मारले आहे.
प्रश्नच नाही. पण म्हणून कलमाडी, सोनिया, सुखराम, चिदंबरम इत्यादिंनी खाल्लेल्या शेणाचे श्रीखंड होत नाही.
३. >> तुमचा रस काढला भंगारु लक्ष्मण ने
तेच तर हवं होतं आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांना! भंगारूच्या मागे कोणी लपायला नको. कोणी गेलाच तर भंगारूचा रस चिकटेल त्याच्या बुडाला!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
२. >> लक्ष्मन ने भाजपाचेच
२. >> लक्ष्मन ने भाजपाचेच पायताण भाजपाच्याच तोंडावर मारले आहे.
प्रश्नच नाही. पण म्हणून कलमाडी, सोनिया, सुखराम, चिदंबरम इत्यादिंनी खाल्लेल्या शेणाचे श्रीखंड होत नाही.
आहे घाबरू नका, रेडिफ वर या बद्दल लेख आहे) यांचे म्हणण्यानुसार, CBI तसेच IB च्या अनेक पथकांनी अनेक देशांना भेटी दिल्या, भारताच्या जनतेला वाटत होते चौकशी करायला, माहिती गोळा करायला गेले आहेत, प्रत्यक्षात अशी पथके प्रकरणातील सत्यता बाहेर कशी येणार नाही, सत्य कसे लपवले जाईल या उद्देशानेच गेलेली होती.
-------- या सर्वांचा बोफोर्स प्रकरणाशी व त्यावर वर्षानुवर्षे पडदा टाकण्याच्या पद्धतशिर प्रयत्नांचा संबंध कसा येतो? रॉ मधे कार्य केलेल्या श्री. रामन (केवळ नावांत राम
सत्य मेव जयते हे म्हणायला, आणि केवळ लोकांना सांगायला विधान आहे पण अनेक वेळा, अनेक वर्षे गांधींच्या अनुयायांनीच त्यांना खोटे ठरवले आहे आणि विचारांतील फोलपणा सिद्ध केला.
पण म्हणून कलमाडी, सोनिया,
पण म्हणून कलमाडी, सोनिया, सुखराम, चिदंबरम इत्यादिंनी खाल्लेल्या शेणाचे श्रीखंड होत नाह>>>>> तुम्ही भाजपाच्या पाठी मागे का लपत आहात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कलमाडी यांना शिक्षा झाली आहे. पण त्यात तुम्ही मुद्दामुन दुसर्यांची नावे का बरे घुसवलीत त्यांच्यावर अजुन फक्त आरोप आहे सिध्द काहीच झाले नाही मग तुम्ही कोण असे मोठे लागुन गेले त्यांना आरोपी ठरवणारे ? उगाच काही तरी गरळ ओकायची
.
अनेक वर्षे गांधींच्या अनुयायांनीच त्यांना खोटे ठरवले आहे आणि विचारांतील फोलपणा सिद्ध केला>> तुम्ही तर मानतच नाही ना गांधींना मग त्याच्या अनुयायांनी काय करायचे काय करु नये हे तुम्ही का पाहत बसला आहात.. जो रस्ताच तुमचा नाही त्या रस्त्यावर कशाला बघत आहात. ?
....................................................................................................
गामा.
मोदींसारखा दाखवा! गुजरातची जनता काय मूर्ख आहे?>>>> मोदींचे सरकार जात असताना दंगा केला त्याने. मग आपसुकच सहानभुती आली लोकांना निवडुन दिले. पुन्हा पुढच्यावेळी जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा स्वत:च्याच माणसाला पोलिसांपुढे जवाब द्यायला लावला की " दंगल मधे मोदींचा हात आहे" यामुळे गुजराती जनतेला सहानभुती परत आली. कोई तो मायबाप है. परत निवडुन दिले.. आता एक सांगा . भारतीय जनता मुर्ख आहे आणि फक्त गुजराती जनता शहाणी?
.
म्हणून कलमाडी, सोनिया, सुखराम, चिदंबरम इत्यादिंनी खाल्लेल्या शेणाचे श्रीखंड होत नाही.>>> त्यांनी श्रीखंड खाल्ले म्हणुन लक्ष्मण, अडवाणी, वाजपेयी, अरुन जेटली, रामनाथ सिंग, गोपिनाथ मुंडे, येडुरप्पा,यांनी शेण श्रीखंड म्हणुन का खात बसलेत मग ? खायचे तर श्रीखंड खावा ना शेण का खात आहेत..:हाहा:
अनेक वर्षे गांधींच्या
अनेक वर्षे गांधींच्या अनुयायांनीच त्यांना खोटे ठरवले आहे आणि विचारांतील फोलपणा सिद्ध केला>> तुम्ही तर मानतच नाही ना गांधींना मग त्याच्या अनुयायांनी काय करायचे काय करु नये हे तुम्ही का पाहत बसला आहात.. जो रस्ताच तुमचा नाही त्या रस्त्यावर कशाला बघत आहात. ?
------ मी गांधींना मानत नाही हा समज तुम्ही कसा करवुन घेतला? त्याच सोबत सावरकरांना, आंबेडकरांना, आणि सुभाषचंद्रांना सोबत हजारो स्वातंत्र्य सेनानींना मानतो. त्यांनी त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आणि म्हणुन स्वातंत्र्य भोगतो आहोत. होय, पण मी त्यांना मानतो असा डंका दरदिवशी पिटत बसत नाही त्यामुळे तुमचा गैरसमज होणे स्वाभाविक आहे.
माझे म्हणणे तुम्हाला समजावण्यात मी कमी पडतो आहे हे जाणावते. बोफोर्स प्रश्नी सत्य झाकायचा वर्षानुवर्षे पद्धतशिर, योजनाबद्ध रितीने प्रयत्न झालेत. भारताच्या जनतेला सत्यापासुन लपवुन ठेवण्याचा अत्यंत गलिच्छ खेळ २५ वर्षांहुनही अधिक काळ खेळला गेला. असेच सत्य भोपाळ वायुकांडात झाकले गेले (तो विषय वेगळा आहे पण स्वातंत्र्य भारतात सत्याची गळचेपी कशी सहजतेने होते यासाठी सर्वमान्य उदाहरण अँडरसन राष्ट्रपतींना भेटल्याच्या नोंदीच गायब झाल्यात सापडत नाहीत, खास मुख्यमंत्र्यांच्या विमानाने भोपाळ - दिल्ली प्रवास केलेली व्यक्ती २८ वर्षे फरार असते).
बापूंनी सत्य आणि अहिंसा हा संदेश दिला आहे हे आपणांस मान्य आहे का ? वरिल उदाहरणांवरुन ( अनेकांपैकी केवळ दोन) आपण सत्याचे पालन करत नाही हे सिद्ध होते हे आपण मान्य कराल ? ऑक्टोबर-८४ मधे राजधानी दिल्लीत ३५०० निष्पाप भारतिय नागरिकांचे शिरकाण होते आणि पुढील २८ वर्षात कुणालाही शिक्षा करण्याचे धाडस कुठल्याही सरकारांत नसते. वरताण म्हणजे हत्येत सामील असणार्यांना मंत्रीपदाची आणि खासदारकीची खिरापती वाटल्या जातात. देशांत अनेक शहरांत सातत्याने दंगली होतच असतांत, हकनाक लोकं मारले जातात. कधी गोध्रा होते, मग त्याचा बदला म्हणुन २००० निष्पाप जिव मारले जातात, त्या बदल्याचा बदला म्हणुन बाँब फुटतात. अनेक आयोग येतात आणि जातात, चार आयोग पण रिपोर्ट परस्पर विरुद्ध. म्हणजे आपल्याला अहिंसेचेही पालन करता येत नाही. गांधींना जे मानतच नाही (धर्माने वेडे झालेले, तालिबान) त्यांच्या कडुन मी अहिंसेची अपेक्षा आज करणार नाही पण ज्यांच्या तोंडी त्यांचे नांव दहा वेळा एकतो त्यांच्या कडुनच माझ्या आज जास्त अपेक्षा आहेत. त्यांच्यावर बापूंच्या सत्य, अहिंसा तत्वाचे रक्षण करण्याची आणि नंतर प्रसार करण्याची मोलाची जबाबदारी आहे.
अजुन एक ज्वलंत उदाहरण - ६२ च्या युद्धाचा अहवाल अजुनही गुपीत ठेवलेला आहे. त्या युद्धाची कारण मिमांसा करण्यासाठी हेंडरसन ब्रुक्स-भगत आयोग नेमला होता, आजपर्यंत तो अहवालच गुलदस्त्यात आहे. कारक काय? सत्य काय आहे ? जर चुका आपल्याला समजल्याच नाही, त्याची चिकित्सा झालीच नाही तर पुढे त्या पासुन काहीच शिकणार नाही काय? आता भाजपाने हा अहवाल का नाही आणला, किंवा त्यांनी का नाही ८४ च्या आरोपींवर कारवाई केली असे म्हटले म्हणजे जबाबदारी सहज झटकली जाते आणि तात्पुरती सुटका केल्याचे समाधान मिळते... पण सत्य बाहेर येत नाही आणि बापूंनी तयार केलेल्या सत्य आणि अहिंसा या वाटेपासुन आपण दुर दुर जातो याचे मला वैषम्य वाटते म्हणुन मग स्मरण करुन देण्याचे धाडस करवतो :स्मित:.
कुठल्याच प्रश्नावर भारताची जनता सत्य जाणुन घेण्याच्या पात्रतेची नाहीच आहे कां?
पुढील २८ वर्षात कुणालाही
पुढील २८ वर्षात कुणालाही शिक्षा करण्याचे धाडस कुठल्याही सरकारांत नसत>> या एका वाक्या मुळे संपुर्ण लेखा कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.. असे लिखान केले तर सगळेच अनुमोदन देतील आपल्याला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेख एकांगी असल्यास दुसर्या अंगाचे लोक बोलणारच. तोच लेख समतोल असल्यास बोलायला जागाच मिळणार नाही..
उदय तुमच्या पोष्टीशी पुर्णपणे
उदय तुमच्या पोष्टीशी पुर्णपणे सहमत.
आज भाजपच्या प्रतिक्रिया
आज भाजपच्या प्रतिक्रिया वाचल्या लक्ष्मण प्रकरणाबद्दल. "हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग" आहे वाचून हसू आले. न्यायालयाने पुढची तारीख देणे, एखादा अर्ज दाखल करणे यासारखीच ही गोष्ट आहे की काय? आलेल्या पुराव्यांवरून शिक्षा सुनावणे किंवा निर्दोष सोडणे हे दोन व यामधील इतर काही पर्याय असताना शिक्षा दिली जाते त्याला "प्रक्रियेचा एक भाग" इतके अॅब्स्ट्रॅक्ट नाव कसे देता येइल?
कॉन्ग्रेस आणि भाजप एकसारखे दिसायला लागून आता बराच जमाना झाला. आजकाल या दोन्ही (आणि इतर अनेक) पक्षांतील लोकांची एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्द्ल प्रतिक्रिया खालील मुद्द्यांवरून ठरत असावी:
१. अडकलेला माणूस आपला आहे की विरोधी पक्षाचा
२. जेथे घडला तेथे सत्ता आपली आहे की आपण विरोधक आहोत.
राहुल गांधींची महाराष्ट्रातील दुष्काळाबद्दलची आणि सोनिया गांधींची कर्नाटकातील दुष्काळाबद्दलची वक्तव्ये पाहा, तीही याच फॉर्म्युल्यातून आलेली.
लक्ष्मण प्रकरणात भाजपने तेव्हापासून आत्तापर्यंत नि:संधिग्द भूमिका घेतलेली आहे का (मला नीट माहीत नाही), की "जेवढे निष्पन्न/सिद्ध होईल तेवढ्याची कबुली द्यायची व बाकी आरोप नाकारायचे" हा राजा प्रकरणात मनमोहन सिंग/काँग्रेस ने घेतलेला पवित्राच घेतलेला आहे? आणि पूर्वी कधी "ती टेप खरी नाहीच" वगैरे झालेले आहे काय परवाच्या त्या काँन्ग्रेसवाल्या सारखे?
एकटाच, १. >> मोदींचे सरकार
एकटाच,
१.
>> मोदींचे सरकार जात असताना दंगा केला त्याने.
हे धडधडीत खोटे आहे. त्याने कुठलाही दंग केला नाही. गेले १० वर्षे जंगजंग पछाडूनही मोदींविरुद्ध साधा खटलाही दाखल करून घेण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे.
२.
>> जो रस्ताच तुमचा नाही त्या रस्त्यावर कशाला बघत आहात. ?
हाच प्रश्न आपण काँग्रेसवाल्यांना का बरं विचारत नाही? गांधींचा कोणता आदर्श त्यांनी आचरणात आणला आहे? गांधींवर काँग्रेसचा मालकी हक्क आहे का? असो.
आता आमचं उत्तर सांगतो. मो.क.गांधी हे दहशतवाद्यांचे पतराखे (टेररिस्ट फायनान्सर) होते. आतंकवादी शत्रूराष्ट्राला ५५ कोटी देण्यासाठी ते उपासाला बसले. त्या रस्त्यावर घारीची नजर ठेऊन बसलेच पाहिजे.
नुकताच मनमोहनसिंगाने टेररिस्ट फायनान्सिंगचा हाच आचरटपणा पुन्हा एकदा केला आहे. इथे पहा : भारतात पाकिस्तानी पैशाची गुंतवणूक शक्य!
यावर इथे एक चिठ्ठी आहे.
टेररिस्ट फायनान्सिंग भारताच्या मुळावर येणार हे सांगायला नको!
३.
>> त्यांनी श्रीखंड खाल्ले म्हणुन लक्ष्मण, अडवाणी, वाजपेयी, अरुन जेटली, रामनाथ सिंग,
>> गोपिनाथ मुंडे, येडुरप्पा,यांनी शेण श्रीखंड म्हणुन का खात बसलेत मग ?
आपल्याला अनुमोदन! हलकटाला हलकट म्हटल्याबद्दल अभिनंदन.
४.
>> या एका वाक्या मुळे संपुर्ण लेखा कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.. असे लिखान केले तर सगळेच
>> अनुमोदन देतील आपल्याला.
अस्मादिक केव्हापासून हेच बोंबलत आहेत. काँग्रेस देशाचा उघड शत्रू आहे तर भाजप छुपा, दुतोंडी साप आहे.
आ.न.,
-गा.पै.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12929050.cms
जामोप्या, आपण दिलेला सुरेश
जामोप्या,
आपण दिलेला सुरेश भटेवरा यांचा मटा मधला लेख वाचला.
सुरेश भटेवरा कोणाची तळी उचलून धरतात हे सगळ्यांना माहिती आहे. बोफोर्स उघड करणार्या चित्रा सुब्रमण्यम यांना बघा काय वाटतेय ते : India needs to make just one phone call to get the answer. The world is watching.
आ.न:,
-गा.पै.
http://zeenews.india.com/news
http://zeenews.india.com/news/nation/bofors-case-rss-targets-nda-govt-to...
व इतर...
वाजपेयींच्या काळात क्वात्रोची
वाजपेयींच्या काळात क्वात्रोची पळाला. स्वदेश पॉलला जामीन मंजूर झाला.
आता तर पाशवी बहुमत आहे. बघू काय करतात ते....
की काँग्रेसच्या राज्यात कोळसा घोटाळ्यात यांचेही हात काळे झाल्याने "सामोपचार" केला जाईल ?
Pages