जळ-निर्मळ

Submitted by अभिप्रा on 25 April, 2012 - 22:29

माध्यम : पेन्सिल ( H,4H,3B mechanical)
पिकासात थोडा contrast वाढवलाय

IMG_2947_0.JPGnOV 2011-001.jpg

गुलमोहर: 

तो दुसरा फोटो टाकुन तु सबकी बोलती बंद करुन टाकलिस Wink
पण ही आयडिया छान आहे. वर्क इन प्रोग्रेस्स चे फोटो टाकत जा.

जबरदस्त!!!!
कसलं हुबेहुब चित्र काढलयस....
तो वर्क इन प्रोग्रेस फोटो टाकला आहेस म्हणून चित्र आहे यावर विश्वास बसला... ग्लासची पारदर्शकता, पाण्याची नितळता, पाण्याचे थेंब, बुडबुडे... सगळंच खरखर दिसतय.....
तुझ्या हातात जादु आहे गं Happy

भ न्ना ट........... !!
खरंच अविश्वसनीय !! तुझ्या कलाकारीला कडक सॅल्यूट !!
खरंच......... खरंच........ नुसतं बघत रहावंसं वाटतंय....... पाणी भरेपर्यंत;:)

थोर! Happy

व्वा! Happy

काचेचा ग्लास, पाणी, बुडबुडे सगळेच पारदर्शक. डोळे जेंव्हा ते पहातात तेंव्हा कुठेतरी अत्यंत सूक्ष्म पातळीवर काहीतरी प्रोसेसिंग होते आणि आपल्याला ते तिन्ही स्वतंत्र दिसते. पण ते तसे स्वतंत्र का दिसते? प्रत्येकातून येणारा प्रकाश कसा दिसतो? त्यात कसा फरक असतो? असे अनेक प्रश्न मनातही येत नाहीत माझ्या सारख्याच्या. मी फक्त बघतो की समोर पाणी असलेला काचेचा ग्लास आहे आणि त्या पाण्यात बुडबुडे आहेत.

पण तुला असे अनेक प्रश्न पडतात, मन लाऊन निरीक्षण करून तू त्यांची उत्तरे मिळवतेस आणि मग बोटांमधल्या कलेने ते निरीक्षण तू कागदावर्/कॅनव्हासवर उतरवतेस. मग जे काही बनते ते इतके सुंदर असते की त्याचे वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. तेंव्हा अगदीच तोकडे शब्द वापरून सांगतो - अतिशय सुंदर आहे हेही चित्र.

अभिप्रा,
तू खरेच वर्क इन प्रोग्रेस ची छायाचित्रे टाकत जा. अशक्य आहे मला विश्वास ठेवणे की हे एक पेन्सिल स्केच आहे... हेच नाही तर तुझी सर्वच चित्रे अविश्वसनीय आहेत!!! निव्वळ अलौकिक आणि सुंदर चे सर्व समानार्थी शब्द+अप्रतीम चे सर्व समानार्थी शब्द+मस्त चे सर्व समानार्थी शब्द+ सुरेख चे सर्व समानार्थी शब्द +भारी, थोर, अफाट आणि सगळे कौतूक करणारे शब्द..... प्रत्येकानंतर उद्गारवाचक चिन्ह!!

Pages