माननिय खासदार सचिन र. तेंडुलकर

Submitted by उदयन. on 26 April, 2012 - 12:34

अभिनंदन .... माननिय नवनियुक्त खासदार सचिन रमेश तेंडुलकर
.
sachin.jpg
.
काल सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी "१० जनपथ" वर गेले होते. तिथे गेल्यावर सोनिया गांधींनी सचिन यांना काँग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार पद देउ केले. ते सचिन ने स्विकारले. सचिन बरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांना सुध्दा खासदार पद देउ केले.
काही वेळेतच राष्ट्रपतींकडे यांची नावे खासदारकी साठी पाठवली गेली. आणि दिवस संपता संपता राष्ट्रपतींनी कडुन नावावर शिक्कामोर्तब केल्याचा पत्र प्रसिध्द झाले. सचिन याच अधिवेशनात खासदारकीची शपथ ग्रहन करणार आहे.
साहित्य, सिनेमा, समाजकारण, उद्योग आदी क्षेत्रातील नामांकित मंडळींची नियुक्ती राज्यसभेवर ' नामनियुक्त सदस्य ' म्हणून करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्या अधिकारा मार्फत क्रिकेट मधुन पहिला राज्यसभेचा खासदार होण्याचा मान सचिन ने पटकावला.. सर्वच पक्षांनी या महान खेळाडुचे स्वागत केले आहे.. जसे जगभराच्या खेळाडुंमधे सचिन बद्दल आदर आहे सचिन साठी सगळेच खेळाडु एकत्र येतात. तसेच काही चित्र काल राज्यसभेत आणि लोकसभेत दिसले... काँग्रेस, भाजपा, सपा, तृनमुल, जवळ जवळ सर्वच पक्षानी एकमताने सचिन च्या खासदार पदाला पाठिंबा दिला. सचिन ने राज्यसभेत पाउल टाकण्या आधीच सगळ्यांना एकत्र आणले..:)
.
सचिन ला राज्यसभेत किती वेळ देता येईल. राजकारणात काय उपयोग होईल, सचिनलाच कशाला, इत्यादी प्रश्न उपस्थित काही जणांनी केले..? यातले काही मुद्दे गौण आहेत तर काही नक्कीच महत्वाचे आहेत.
अंदाजे सचिन अजुन २-३ वर्ष तरी नक्कीच खेळणार आहे. त्यामुळे बहुदा त्याने निवृत्ती पत्करल्यावर "भारतरत्न" देण्याचा विचार सरकार चा आहे... तो पर्यंत त्याने केलेल्या कामगीरीचा सम्मान म्हणुन खासदार पद देण्यात आले आहे..
.
सचिन साठी TMC च्या एका खासदाराने अनोखी भेट देण्याचे आयोजले आहे....... हा खासदार राज्यसभेच्या १०० नंबर खुर्चीवर बसतो.. हाच नंबर सचिन साठी त्यांनी ठेवला आहे सचिन साठी त्यांनी या क्रमांक त्यागला आहे... सगळे सुरळीत झाल्यास सचिन राज्यसभेत आल्यावर १०० नंबर खुर्चीवर बसेल....(राजकारणात पहिल्यांदा होईल की एका नेत्याने दुसर्यासाठी खुर्ची सोडली.. Happy ).
.
माननिय खासदार सचिन रमेश तेंडुलकर यांना पुढील वाटचाली साठी मनपुर्वक शुभेच्छा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकारानाचा खेलवार प्रभाव पडू शकतो <<
माननिय "श्रीयुत शरदचंद्रजी पवार" यांच्या रुपात काय पडयचा तो प्रभाव आधीच खेळावर पडला आहे. Proud

हा पण राजकारणात गेल्यावर सचिनने आपला प्रभाव क्रिकेट प्रमाणेच तिथे ही पाडला तरच त्याच्या खासदारकीचा फायदा खेळाला झाला असे म्हणता येईल. अगदी भारतातील क्रीडा क्षेत्रातील सावळ्या गोंधळाबाबत तो बोलणार आहे का? खेळाडूंची भावी पिढी घडावी म्हणून तो काही करणार आहे का? केवळ पैशाअभावी अनेक खेळाडूंना पुढे जात येत नाही, त्यांना मदत देण्याचे धोरण आखण्यास तो सरकारला भाग पाडणार आहे का? क्रिकेटमध्ये मॅच फिक्सींग होत असेल तर त्याला तो वाचा फोडणार आहे का? असे कितीकतरी प्रश्न आहेत. ते त्याने या निमित्ताने सोडवावे ही अपेक्षा. Happy

त्याला गॉडफादर आहे म्हणुन टिकुन आहे.>>> काय मुर्खपणा आहे...?
त्याचा गॉड फादर ने १०० शतके काढलेलीत का,? की गॉड फादर गोलंदाजी करत होता त्याला ? . ५० ओवर्स खेळपट्टीवर उभे राहुन २०० धावा काढल्या तेव्हा काय गॉडफादर रनर होता का त्याचा..?
येडपट छाप बोलायची सवयच लागली अहे लोकांना.

तुम्ही सगळ्यांनी कोणते दिवे लावले आहेत.? जे दुसर्यांना शिकवत आहात.? स्वतःचे ठेवायचे झाकुन दुसर्‍यांचे बघायचे वाकुन. हीच परिस्थिती आहे तुमची सगळ्यांची. स्व्तः काही करायचे नाही. दुसर्याने केले तर त्याचा पाय कसा खेचायचा यातच वेळ घालवतात.
महाराष्ट्रातुन पहिला खेळाडु खासदार म्हणुन गेला तर अभिनंदन करायचे सोडुन बोंबलत काय बसलात.? हेच भाजपाने पाठवले असते तर बोलले असते का तुम्ही.तेव्हा शेपुट घालुन अभिनंदनाचे बोर्ड लावले असते नाक्या नाक्यावर. तेव्हा ह्या प्रश्नांची सुरळी करुन घेतली असती.!

त्याला गॉडफादर आहे म्हणुन टिकुन आहे.>>> काय मुर्खपणा आहे...?
१०० व्या शतकासाठी किती कसोट्या खेळाला हे का नाही विचारत त्या कांबळीला १ वर्डकपमध्ये चांगले खेळता आले नाही तर जे बाहेर केले ते कायमचेच. जितका खेळेल तितके विक्रम होणारच. युवराज कुठे वाईट खेळायचा, त्याला ही बाहेर केलेचना हाच न्याय सचिनसाठी का नाही लावला

त्या कांबळीला १ वर्डकपमध्ये चांगले खेळता आले नाही तर जे बाहेर केले ते कायमचेच. >>>>> कांबळीचे मैदानाबाहेर चे प्रताप त्याला अंगावर आले. जरा मास्तुरेंकडुन त्याच्या शेवटच्या १५-२० इनिंग चे स्कोर बघा कळेल मग सध्य परिस्थिती.
युवराज कुठे वाईट खेळायचा, त्याला ही बाहेर केलेचना हाच न्याय> त्याला ही तोच न्याय होता. मुळातच तो आला तेव्हा परिस्थिती बदललेली त्याची जागा घेनारे एक नाही तर ३ खेळाडु होते. सचिन ची जागा घेणारा खेळाडु अजुन पर्यंत आलाच नाही. आणि त्याला सुध्दा बाहेर बसवलेलेच ना. माहीती नसेल तर गूगल वापरुन बघा.

अरे इथे अभिनंदन करायचे सोडुन भलतेच काय करत बसला आहात...? Sad
मिळाली खासदारकी त्यात काय एवढे..... अभिनंदन करा महाराष्ट्रीयन आहे ना मग... त्याने काय करावे काय करु नये त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..

>>सचिन साठी TMC च्या एका खासदाराने अनोखी भेट देण्याचे आयोजले आहे....... हा खासदार राज्यसभेच्या १०० नंबर खुर्चीवर बसतो.. हाच नंबर सचिन साठी त्यांनी ठेवला आहे सचिन साठी त्यांनी या क्रमांक त्यागला आहे... सगळे सुरळीत झाल्यास सचिन राज्यसभेत आल्यावर १०० नंबर खुर्चीवर बसेल....(राजकारणात पहिल्यांदा होईल की एका नेत्याने दुसर्यासाठी खुर्ची सोडली<<

सचिन यास नम्र विनंति.
ही बातमी खरी असेल तर अशा प्रगल्भ (?) खासदाराच्या खुर्चीवर बसून तू आपली शान घालवू नकोस. तू जास्तीत जास्त रन्सचे (कसोटीतील) जे रेकॉर्ड केलेस त्या नंबरची खुर्ची मागून घे. ती मिळत नसेल तर तुला नियमाप्रमाणे मिळेल ती खुर्ची तू पवित्र कर. तुझ्यामुळे तू बसशील त्या खुर्चीला असामान्यत्व प्राप्त होणार असतांना कोणी तरी तुझ्यावर लट्टू होवून दिलेली खुर्ची तू साभार नाकारावीस.
तू बसशील त्या खुर्चीचे ( तू तेथे विराजमान नसलास तरी) दर्शन घेण्यासाठी प्रेक्षकांच्या गॅलरीत ही झुंबड उडेल. लोकसभा चालू नसतांना खुर्चीवर माथा टेकायची संधी उपलब्ध केली तर
दर्शन रांग निर्माण करून उत्पनाचे साधन निर्माण करायचे सरकारने ठरवल्यास सर्वपक्ष त्यास संम्मती देतील. तुलाही सरकारचे उत्पन्न वाढविल्याचे समाधान मिळेल.

१०० व्या शतकासाठी किती कसोट्या खेळाला हे का नाही विचारत त्या कांबळीला १ वर्डकपमध्ये चांगले खेळता आले नाही तर जे बाहेर केले ते कायमचेच. जितका खेळेल तितके विक्रम होणारच. युवराज कुठे वाईट खेळायचा, त्याला ही बाहेर केलेचना हाच न्याय सचिनसाठी का नाही लावला>>> ???

त्याच्या राज्यसभेच्या खासदारकीवर चर्चा होते आहे तोपर्यंत ठीक आहे. पण हे वरचे काय आहे मला तरी कळाले नाही. कांबळीला कोणत्या कप मधे खेळता आले नाही म्हणून काढले? तुम्हाला कदाचित १९९६ चा म्हणायचे आहे. तेव्हा बरा खेळला होता की तो. अ‍ॅम्ब्रोसला पुल करून दोन तीन वेळा फेकून दिलेला लक्षात आहे माझ्या. आणि मुळात तो २००० पर्यंत खेळत होताच की. दादाने बरेच दिवस त्याला ठेवले होते संघात. तो क्रिकेटबाह्य कारणाने उतरणीला लागला यात तथ्य आहे.

आणि युवराजला कधी बाहेर केले? मला तरी आठवत नाही.

जितका खेळेल तितके विक्रम होणारच. >>> जरा पुन्हा वाचून पाहा Happy स्टेनसारख्या बोलर्स ला हुक करून सिक्स मारायची म्हणजे किंवा वरती कोणीतरी (एकटाच बहुतेक) म्हंटल्याप्रमाणे मैदानावर ५० ओव्हर्स खेळून २०० मारायचे हे "एक गॉडफादर व इतरांपेक्षा जास्त दिवस खेळणे" या दोन कौशल्यावर फक्त होते काय? तसे असते तर आज फ्लेक्सवर दिसणारे अनेक चेहरे मैदानावर दिसले असते.

अशा प्रगल्भ ( कि सुमार?) खासदाराच्या खुर्चीवर बसून तू आपली शान घालवू नकोस >>>>>>>> तो खासदार कोण आहे माहीत आहे का ? उगाचच आपल्या फुशारक्या मारत बसु नका.

जाऊ द्या, तुम्ही त्याच्या चाहत्या आहात , मी ही आहेच,
तो क्रिकेटशी संबंधीत असल्याने एवढे बोललो.

१०० व्या शतकासाठी किती कसोट्या खेळाला हे का नाही विचारत
------ अत्यंत परखड मत व्यक्त केले आहे. धाडस दाखवल्या बद्दल अभिनंदन.

त्याचे ५० वे शतक आणि (द. अफ्रिके विरुद्ध) भारत सामना हरला होता, लोकांनी हर्षोल्हासांत रेकॉर्ड साजरे केले. १०० वे शतक करतांना किती दमछाक झाली... ऑस्ट्रेलिया मधे नाही जमले पण बांग्लादेशाविरुद्ध यशस्वी ठरले, परत भारत सामना हरला. देशवासिय देश हरला तेही बांग्लादेशाविरुद्ध या दु:खा पेक्षा झाली ना त्याची वैयक्तिक शंभरी यावर बेहद्द खुष. कारण काय असेल?

>>वैयक्तिक शंभरी यावर बेहद्द खुष. कारण काय असेल? <<
याचं कारण समजायला क्रिकेट समजणं आवश्यक आहे.
आतापर्यंतचा क्रिकेटचा ईतिहास जाणुन घेणं आवश्यक आहे..
सलग २३ वर्षं भारतीय संघात स्थान टिकवण्यासाठी लागणार्‍या तपश्चर्येचं आकलन होणं आवश्यक आहे...

सलग २३ वर्षं भारतीय संघात स्थान टिकवण्यासाठी लागणार्‍या तपश्चर्येचं आकलन होणं आवश्यक आहे...
---- संघ भारताचा आहे म्हणुन स्थान आहे.... ऑस्ट्रेलियाच्या संघात असता तर बाहेरचा रस्ता दाखवला केव्हाच बघायला मिळाला असता. कारण तेथे संघासाठी, संघ विजयासाठी खेळले जाते, वयक्तिक रेकॉर्डला दुय्यम स्थान आहे ते बनवण्यासाठी खेळत नाही.

किती वर्षे खेळला किती मॅचेस खेळला हे महत्वाचे नाहीच आहे, त्याची खेळी देशाला विजय मिळवुन देण्यासाठी नव्हतीच. ५० वे वैयक्तिक शतक भारत हरला, १०० वे वैयक्तिक शतक (तेही बांग्लादेशा विरुद्ध) पुन्हा भारत हरला हा नामुष्किचा इतिहास आहे. अरे देशाला जिंकुन देण्यासाठी खेळा... देश हरत असेल तर असली २०० वैयक्तिक शतके काय कामाची ?

देश हरत असेल तर असली २०० वैयक्तिक शतके काय कामाची >>> जबरी फॅक्ट ट्विस्टिंग आहे हे Happy

५० व्या शतकाच्या मॅच मधे भारत हरला. ठीक आहे. ५१ वे मारले तेव्हा आफ्रिकेच्या ३६२ ला तोंड देताना २८/२ असताना मारले होते. ते कामाचे होते का?

१०० वे वैयक्तिक शतक. भारत हरला. ठीक आहे. त्यापुढच्या डावात पाकविरूद्ध (हो. बांग्ला नव्हे पाक विरूद्ध) अर्धशतक मारले आणि जिंकण्यात अगदी तुम्ही म्हणाल तेवढे टक्के का होईना हातभार लावला, ते कामाचे होते का?

१०० व्या शतकाच्या आधीची पाच शतके बांग्लादेशविरूद्ध होती का? शतके सोडा पण ९९ व्या शतकानंतर मारलेली असंख्य अर्धशतके - वर्ल्ड कप सेमी फायनल मधले ८५, ज्याने भारताचा स्कोर २६० पर्यंत गेला व भारत जिंकला, ते कामाचे होते का? ऑस्ट्रेलियात मेलबोर्नला ७३ मारल्या व ऑस्ट्रेलियाच्या ३३० ला तोंड देताना २१४/२ वर तो आउट झाला. त्या ७३ धावा कामाच्या होत्या की नाही हे बाकी नगांनी नंतर कितीची भर घातली यावरून ठरवायचे का? विंडीज विरूद्ध दिल्लीला २७६ चेस करताना मारलेल्या ७६ धावा? तेव्हा भारत जिंकला होता.

सचिनच्या ५० व्या व १०० व्या शतकामुळे भारत जिंकला पाहिजे. नाहीतर त्याची सर्व शतके व्यर्थ आहेत?

>>किती वर्षे खेळला किती मॅचेस खेळला हे महत्वाचे नाहीच आहे, <<
धन्यवाद! या वाक्यावरुन तुमच्या क्रिकेट विषयीच्या ज्ञानाचा अंदाज बांधला. अमर्याद लोकसंख्या, तसंच रिजनल कोटा वर आधारीत सिलेक्शन सिस्ट्म असणार्‍या देशाच्या संघात स्थान मिळवणं आणि ते टिकवुन ठेवणं, म्हणजे काय असतं ते जुन्या काळातील रामनाथ पारकर, पॅडी शिवलकर पासुन आजच्या अमोल मुझुमदार, वासीम जाफरला विचारा. उत्तर मिळाल्यावर सचिनच्या कारकिर्दीचं महत्व कळेल.

>>त्याची खेळी देशाला विजय मिळवुन देण्यासाठी नव्हतीच. <<
फिर वोहि घिसा पिटा इल्जाम! जरा आकडेवारी डोळ्याखालुन घाला. http://sachinandcritics.com/sachin_is_a_match_winner.php
उगाच तुसडेपणाचा चष्मा लावुन, बेछुट विधानं करण्याआधी गृहपाठ करा. मोठ्या माणसाला मोठं म्हटल्यानं आपल्याकडे कमीपणा येत नाहि, आणि त्याला कमी लेखल्यानं आपल्याकडे मोठेपण येत नाहि. Happy

अभिनंदन.. Happy
पण लता दिदि अशाच खासदार झाल्यानंतर त्यानी निधीच कसा वापरला नाहिये वैगेरे वैगेरे चर्चा सुरु झाली होती.
सचिनच्या बाबतीतही असेच होणार ह्याची खात्री आहे. त्याला ह्या गोष्टी संभाळायला वेळ नाही मिळणार.
रिटायर झाल्यावर व्हायला हवा होता.

फक्त सचिनवरच मॅच जिंकुन देण्याची जबाबदारी का ढकलायची???? सांघिक खेळांमधे ही जबाबदारी सगळ्यांची मिळुन नसते का?

आणि राजकारणात चांगले लोक उतरत नाहीत म्हणुन आजपर्यंत राजकारण वाईट ठरत आलेलं आहे. त्यात उतरलं म्हणजे पैसे खाण्यासाठीच असं का समजायचं?

त्याने काय करावे काय करु नये त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..>>>>>>> +१

<<... सांघिक खेळांमधे ही जबाबदारी सगळ्यांची मिळुन नसते का? >> +१. सचिनचं शतक/अर्धशतक अथवा शून्यावर बाद होणं हा सामन्याचा अंतिम निकाल ज्या अगणित घटकांवर अवलंबून असतो त्यांतील फक्त एक घटक आहे; अगदीं नाणेफेंक , हवामान, खेळपट्टी या गोष्टीही कांही वेळ सामन्याचा निकाल ठरवण्यात अधिक महत्वाच्या असूं शकतात. मला तरी सचिनचं शतक /अर्धशतक व सामन्याचा निकाल असं समीकरण मांडणं किंवा त्यावरून सचिनच्या फलंदाजीचं मूल्यमापन करणं हास्यास्पद वाटत. नाही तर, विजय मर्चंट, विजय हजारे, विनू मांकड इ.इ. महान खेळाडूंचं तर नांवच घेणं बंद करावं लागेल !

सचिनला काँग्रेसने राज्यसभेवर घेतल्याने पोटशुळ उठायचे काही च कारण नाही.काँग्रेसचा जनाधार वाढेल अशी भीती वाटत असावी विरोधकांना. जनतेने अनेक वर्षे घरी बसवल्याने विरोधक भ्रमिष्ट झाले असावेत. Proud

भाऊ Happy

आणि गल्लीतलीच काय दिल्लीतली ही सेंचूरी आहेच की Happy राजधानीत कसलाही भ्रष्टाचार न करता झालेल्या ज्या काही थोड्याफार गोष्टी आहेत त्यात सचिनची सेंचुरी आहे Happy

छान

<< राजधानीत कसलाही भ्रष्टाचार न करता झालेल्या ज्या काही थोड्याफार गोष्टी आहेत त्यात सचिनची सेंचुरी आहे > > फारएन्डजी, तीच तर माझ्यासारख्या सचिनच्या लाखों चाहत्याना भिती आहे; आत्ताच भारतीय खासदार वि. ब्रिटीश एमपीज संघांचा सामना झाला त्यांत अझरुद्दीन भारताच्या खासदार संघाचा कर्णधार होता ! सचिन तेंव्हा खासदार असताच, तर बारावा किंवा राखीव गडी म्हणूनच पाणी घेऊन मैदानावर येताना दिसला असता !!!

भाऊ
अत्यंत मार्मिक व्यंगचित्र ! व्यंगचित्र अप्रतीमच.
आता स्थानिक पातळीवरील निवडणुकांत गावोगावी असलेल्या सेंचुरी बहाद्दरांचाही राजकीय पक्षांना विचार करावा लागणार ! इच्छुकांच्या गर्दीत आणखी भर !

>>त्यांत अझरुद्दीन भारताच्या खासदार संघाचा कर्णधार होता ! सचिन तेंव्हा खासदार असताच, तर बारावा गडी म्हणूनच पाणी घेऊन मैदानावर येताना दिसला असता ! <<

सहमत.
फार बोलकी टिप्पणी आहे ही.

भाउ........ परवाच एक सीपीएम चा नेता पेकाटलेला.." इतना शब किया तो हमार गांगुली को क्यु नही शांशद बनाया, ये ना चालबे" इतके गांगुली प्रेम उतु जात होते तर बंगालच्या विधान परिषदेत का नाही पाठवला आधी ? Lol बिचारा कधी कॉमेंट्रेतर बन , कधी आयपीएल खेळ , कधी रणजी खेळ, कधी टिव्ही वर क्विज कॉन्टेस्ट के सुत्रधार बन असे काही तरी करत आहे रिटायर केल्या पासुन... गांगुली ची इतकी मेहनत वाचली नसती का ? Lol

छान..

Pages