Submitted by निंबुडा on 25 April, 2012 - 05:24
आकाशात आणि मनात
एकाच वेळी मळभ कसं दाटून येतं?
आकाशालाही कुणाची तरी आठवण छळते वाटतं!
------------------------------------------------
रोज तर तुझ्याशी बोलणं होतं
फक्त अमावस्या सोडून....
वेडा चंद्रच त्या रात्री उगवत नाही!
------------------------------------------------
स्वतःची तारीफ स्वतःच करते आता
पण आरशासमोर यायचं टाळते
मेला आरसा खोटं का बोलत नाही?
------------------------------------------------
जमतील तितके कढ रिचवले
पण एका नाजुक क्षणी बांध फुटलाच!
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!
------------------------------------------------
त्रिवेणी या काव्यप्रकाराचा परिचय या धाग्यामुळे झाला.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पहिली छान आहे
पहिली छान आहे
छान.. आरश्याची त्रिवेणी मस्त
छान.. आरश्याची त्रिवेणी मस्त जमलीय
पहिली आवडली..
पहिली आवडली..
पहिली आणि चंद्राची आवडली.
पहिली आणि चंद्राची आवडली.
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!...
हे आवडलं!!!!!
हे सुचलं:
काठोकाठ भरलेली कळशीच नेहमी थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!...
पहिली अन शेवटची छान आहे.
पहिली अन शेवटची छान आहे.
पहिली आवडली
पहिली आवडली
पहिली आवडलीच.... पण दुसरीही
पहिली आवडलीच.... पण दुसरीही छान आहे...
खुपच छान, आवडली
खुपच छान, आवडली
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे धन्यवाद
जमतील तितके कढ रिचवले पण एका
जमतील तितके कढ रिचवले
पण एका नाजुक क्षणी बांध फुटलाच!>> हे सुंदर गो
पहिली आवडली.
पहिली आवडली.
शेवटची आवडली
शेवटची आवडली
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे
प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे धन्यवाद
पहिली मस्त!! तारीफ हा शब्द
पहिली मस्त!!
तारीफ हा शब्द झाला का रूढ मराठीत?
-'कणखर'
मला पहीली, चौथी , तिसरी ,
मला पहीली, चौथी , तिसरी , शेवटची आणि दुसरी आवडली !
अरेच्या, येवढ्याच होत्या वाटतं !
मस्त
मस्त
मला त्रिवेणी या
मला त्रिवेणी या काव्यप्रकाराबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे तांत्रिक बाबींवर बोलणे संयुक्तिक वाटत नाही.
आशयाच्या दृष्टीने सर्वच त्रिवेण्या चांगल्या वाटल्या.
"स्वतःची तारीफ स्वतःच करते आता
पण आरशासमोर यायचं टाळते
मेला आरसा खोटं का बोलत नाही?" >>> ही सर्वाधिक आवाडली.
निंबे, पहिली आवडेश
निंबे, पहिली आवडेश
जमतील तितके कढ रिचवले पण एका
जमतील तितके कढ रिचवले
पण एका नाजुक क्षणी बांध फुटलाच!
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!
.............इथं वेगळा अर्थ जाणवतो............
सुंदर आहे.........
छान जमल्यात त्रिवेण्या.
छान जमल्यात त्रिवेण्या. शेवटच्या ओळीचा वापर परिणामकारक आहे.
( त्रिवेणीत पहिल्या आणि दुस-या ओळीत यमक साधणे आवश्यक आहे का ?)
त्रिवेणीत पहिल्या आणि दुस-या
त्रिवेणीत पहिल्या आणि दुस-या ओळीत यमक साधणे आवश्यक आहे का ?>>>
माझ्या मते नाही. हायकू मध्ये असे पहिल्या व दुसर्या किंवा दुसर्या व तिसर्या किंवा तिनही ओळींत यमक साधलेले पाहिले आहे. त्रिवेणीमध्ये आशयावर अधिक भर असावा असे वाटते. जाणकार अधिक सांगतीलच.