अभिनंदन .... माननिय नवनियुक्त खासदार सचिन रमेश तेंडुलकर
.
.
काल सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी "१० जनपथ" वर गेले होते. तिथे गेल्यावर सोनिया गांधींनी सचिन यांना काँग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार पद देउ केले. ते सचिन ने स्विकारले. सचिन बरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांना सुध्दा खासदार पद देउ केले.
काही वेळेतच राष्ट्रपतींकडे यांची नावे खासदारकी साठी पाठवली गेली. आणि दिवस संपता संपता राष्ट्रपतींनी कडुन नावावर शिक्कामोर्तब केल्याचा पत्र प्रसिध्द झाले. सचिन याच अधिवेशनात खासदारकीची शपथ ग्रहन करणार आहे.
साहित्य, सिनेमा, समाजकारण, उद्योग आदी क्षेत्रातील नामांकित मंडळींची नियुक्ती राज्यसभेवर ' नामनियुक्त सदस्य ' म्हणून करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. त्या अधिकारा मार्फत क्रिकेट मधुन पहिला राज्यसभेचा खासदार होण्याचा मान सचिन ने पटकावला.. सर्वच पक्षांनी या महान खेळाडुचे स्वागत केले आहे.. जसे जगभराच्या खेळाडुंमधे सचिन बद्दल आदर आहे सचिन साठी सगळेच खेळाडु एकत्र येतात. तसेच काही चित्र काल राज्यसभेत आणि लोकसभेत दिसले... काँग्रेस, भाजपा, सपा, तृनमुल, जवळ जवळ सर्वच पक्षानी एकमताने सचिन च्या खासदार पदाला पाठिंबा दिला. सचिन ने राज्यसभेत पाउल टाकण्या आधीच सगळ्यांना एकत्र आणले..:)
.
सचिन ला राज्यसभेत किती वेळ देता येईल. राजकारणात काय उपयोग होईल, सचिनलाच कशाला, इत्यादी प्रश्न उपस्थित काही जणांनी केले..? यातले काही मुद्दे गौण आहेत तर काही नक्कीच महत्वाचे आहेत.
अंदाजे सचिन अजुन २-३ वर्ष तरी नक्कीच खेळणार आहे. त्यामुळे बहुदा त्याने निवृत्ती पत्करल्यावर "भारतरत्न" देण्याचा विचार सरकार चा आहे... तो पर्यंत त्याने केलेल्या कामगीरीचा सम्मान म्हणुन खासदार पद देण्यात आले आहे..
.
सचिन साठी TMC च्या एका खासदाराने अनोखी भेट देण्याचे आयोजले आहे....... हा खासदार राज्यसभेच्या १०० नंबर खुर्चीवर बसतो.. हाच नंबर सचिन साठी त्यांनी ठेवला आहे सचिन साठी त्यांनी या क्रमांक त्यागला आहे... सगळे सुरळीत झाल्यास सचिन राज्यसभेत आल्यावर १०० नंबर खुर्चीवर बसेल....(राजकारणात पहिल्यांदा होईल की एका नेत्याने दुसर्यासाठी खुर्ची सोडली.. ).
.
माननिय खासदार सचिन रमेश तेंडुलकर यांना पुढील वाटचाली साठी मनपुर्वक शुभेच्छा
माननिय खासदार सचिन र. तेंडुलकर
Submitted by उदयन. on 26 April, 2012 - 12:34
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सविस्तर.... उद्या..
सविस्तर.... उद्या..
ह्यामुळे सामान्य जनतेला काय
ह्यामुळे सामान्य जनतेला काय फायदा होणार?
अभिनंदन. सचिन आणि काँग्रेसचे
अभिनंदन. सचिन आणि काँग्रेसचे अभिनंदन.
राज्यसभेचा स्वीकृत सदस्य नेमक्या कोणत्या पक्षाचा मानला जातो? शिफारशी कोण करतं? सत्ताधारी पक्ष की सगळेच पक्ष आपल्याला हवी ती नावं सुचवतात?
काँग्रेस?????????????? का रे
काँग्रेस??????????????
का रे का सचिन
का हे अस केलस तू
कदाचित फुकट पद मिळतय म्हनून
कदाचित फुकट पद मिळतय म्हनून घेतले असेल.... तसे सचिनला राजकारणातले फार कळते असे नाही.
पदासाठी किती मेहनत लागते ते रामदास आठवलेसच माहित ???
सत्य साइ बाबा, अंबानी बाई आणि
सत्य साइ बाबा, अंबानी बाई आणि आता सोनीया...
सुयोग तुझा प्रोब्लेम काय
सुयोग तुझा प्रोब्लेम काय आहे.. ?
नको रे मना.......
नको रे मना.......
सचिनचे अभिनंदन... त्याच्या
सचिनचे अभिनंदन... त्याच्या हातुन अजुन काही चांगले काम होउ दे...
राहुल आणि सोनियाजींनी सचिनला
राहुल आणि सोनियाजींनी सचिनला संधी दिल्याबद्दल त्यांचे प्रथम अभिनंदन. राजकारणांत तरुणांना आणण्याचे भावी पंतप्रधान राहुलजींचे स्वप्न आहे.
सचिनचे देखिल अभिनंदन... सचिन-राहुल भाग २ साठी शुभेच्छा...
अभिनंदन सचिन ..... रन माहीत
अभिनंदन सचिन .....
रन माहीत आहेत पण
राज का रन .............. येईल का ?
सचीन जरा जपुन रे दादा हे लोक आधी डोक्यावर बसवतात नंतर बोटांवर नाचवतात तु साधा आहेस म्हणुन सांगतो कारण ( तुला फक्त ब॓ट्नेच उत्तर देता येते म्हणुन म्हटलं)
शुभेच्छा त्यासाठी !
"भारतरत्न"ला हलकेच "ग्लान्स"
"भारतरत्न"ला हलकेच "ग्लान्स" मारून सीमापार करायचा विचार दिसतोय यामागे !!!
(No subject)
पण सचिनने हे पद का स्वीकारले
पण सचिनने हे पद का स्वीकारले असेल? त्याची खरच ईच्छा असेल का?
<< पण सचिनने हे पद का
<< पण सचिनने हे पद का स्वीकारले असेल? >> सचिनची फलंदाजीची हौस मैदानावर भागत असली तरी त्याच्या "फिरकी"ला हवा तवढा वाव तिथें मिळत नसावा ,म्हणून !!!
नको रे सचिन राजकारणांत शिरु
नको रे सचिन राजकारणांत शिरु
विविध क्षेत्रांत लक्षणीय
विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणार्या व्यक्तींना राष्ट्रपती राज्यसभेवर खासदार म्हणून नेमू शकतात. राज्यसभेच्या २५० खासदारांपैकी १२ खासदार अशा प्रकारे नेमलेले असतात. असे करताना त्या व्यक्तींचा सन्मान करण्याबरोबरच त्यांचे ज्ञान व अनुभव यांचा लाभ संसदेला व्हावा असाही हेतू आहे. अर्थात नेमणुकीपासून सहा महिन्यांत असा सदस्य एखाद्या राजकीय पक्षा सामील होऊ शकतो.
यापूर्वी लता मंगेशकर १९९९-२००५ पर्यंत राज्यसभेच्या सदस्य होत्या.
सचिन तेंडुलकरपूर्वी दारासिंग हे एकमात्र खेळाडू राज्यसभेचे सदस्य होते.(अर्थात ते एक अभिनेतेही आहेत.)
सचिनबरोबरच यंदा अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनू आगा यांना राज्यसभेवर नेमले गेले आहे.
राज्यसभेवर नेमला गेला म्हणजे सचिन निवडणुकीच्या राजकारणात उतरला असे होत नाही.
यापूर्वी "मुंबईवर सगळ्या भारतीयांचा हक्क आहे" असे सार्वजनिकरित्या सांगण्याचे धैर्य दाखविणार्या सचिनचे या बहुमानाबद्दल अभिनंदन. राज्यसभेतही तो वेळ येताच आपली मते स्पष्ट करेल अशी आशा आहे.
लेखाचे नाव आधी बदला ! हे पद
लेखाचे नाव आधी बदला !
हे पद स्विकारून त्याची मान-हानी होण्याचीच जास्त शक्यता आहे ! कारण खासदाराच्या पुढे लावलेल्या मा. चा सामान्य जनतेतला अर्थ एक परिचित पाच अक्षरी शिवी आहे ! आणि तो योग्य असल्याचे सिद्ध करणे हे प्रथम कर्तव्य असल्यासारखे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून कामाला लागतात !
पण सचिनने हे पद का स्वीकारले
पण सचिनने हे पद का स्वीकारले असेल? त्याची खरच ईच्छा असेल का?
----- शंभरावे शतक करतांना झालेली दमछाक सर्वांनी बघितली आहेच. कोट्यावधी देशवासियांची त्याचे रेकॉर्ड व्हावे अशी तिव्र भावना इच्छा होती, काँग्रेसच्या राहुलजींना देशवासियांची तळमळ बघवली गेली नाही. त्यांनी बांग्लादेशाला ७१ च्या वेळी भारताने केलेल्या मदतीची आठवण करुन दिली... पुढे सर्व इतिहास घडला आणि दणदणीत शतकांचे शतक ठोकले. मग आधी ठरवल्या प्रमाणे भारत मॅच हरला. कोट्यावधी भारतीयांनी हर्षोल्हासांत शतकांचे शतक साजरे केले.
केलेल्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता १० जनपथाच्या आमंत्रणाचा स्विकार केला, तेथे अभिनंदनाचे सोपस्कार उरकल्यावर भारतरत्नचा विषय निघाला. ते लवकर मिळावे असे वाटत असल्यास तुला राज्यसभेत यावे लागेल... लताजींशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी तेथे दर अधिवेशाला, दर दिवशी हजर रहाणे बंधनकारक नसते हे सांगितले. लवकरात लवकर भारतरत्न मिळण्याच्या अटीवर मग सहेबांनी मंजुरी दिली. जवळच उभ्या असलेल्या राहुलच्या गालावरची खळी खुलली. सचिन गेल्यानंतर उभ्या आयुष्यात पहिल्यांदा कामांत यशस्वी झाल्याबद्दल मातोश्रींनी मुलाची पाठ थोपटली. रॉबर्टने खासगी विमानाने मिठाई मागवली. गेल्या दोन दिवसांपासुन सर्व वृत्तपत्रात पहिल्या पानावर क्वात्रोची मामांचे नाव झळकत होते ते मागच्या पानावर जाण्यास मदत झाली.
माननीय, नवनियुक्त (नवचर्चित
माननीय, नवनियुक्त (नवचर्चित नव्हे तर नवनिर्वाचित हे निवडून आलेल्या प्रतिनिधीसाठी)
बदल केलेला आहे..
बदल केलेला आहे..
अशा व्यक्तींची त्यांच्या
अशा व्यक्तींची त्यांच्या क्षेत्रातील समस्यांची/ भवितव्याची जाण लक्षात घेऊन त्या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करत राज्यसभेतील चर्चेत त्यांनी मौलिक सहभाग घ्यावा, असं अपेक्षित असावं. पण तसं होत नाही [ लता, रेखा यानी एकदाही चर्चेत भाग घेतल्याचं माझ्या तरी वाचनात/ऐकीवात नाही ]; मानाचं, प्रतिष्ठेचं पद यापलिकडे प्रत्यक्षांत 'प्रतिनिधी' म्हणून फार महत्व नसावं अशा नेमणूकीला.
<< सचिन तेंडुलकरपूर्वी दारासिंग हे एकमात्र खेळाडू राज्यसभेचे सदस्य होते. >> नक्की माहित नाही , पण हॉकीचे अस्लम शेर खान लोकसभेत निवडून व राज्यसभेवर अशा नेमणूकीमुळे आले होते, असं पुसटसं आठवतंय. अर्थात, तसं नसेलही.
तसं होत नाही [ लता, रेखा यानी
तसं होत नाही [ लता, रेखा यानी एकदाही चर्चेत भाग घेतल्याचं माझ्या तरी वाचनात/ऐकीवात नाही ];
---- लताजी केवळ दोन दिवसच हजर होत्या आणि मानधन पुर्ण घ्यायच्या (?) असा वादाचा मुद्दा त्या काळात चर्चेत होता.
शुभेच्छा आहेच पण राज्यसभेत
शुभेच्छा आहेच पण राज्यसभेत उपस्थिर राहुन काही प्रश्न मार्गी लावले तर फायद्याचे नाही तर फुकटचे ७०००० हजार वेतन त्यापेक्षा दुसरा नव्हता काय कोणी
अस्लम शेर खां लोकसभेत निवडून
अस्लम शेर खां लोकसभेत निवडून आले होते.मंत्रीही होते. पक्षांतर करून झाल्यावर आता त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
सचिनने लतापेक्षा शबाना आझमी आणि शकुंतला परांजपे यांचा आदर्श ठेवावा. राज्यसभेचे सदस्यत्व सहा वर्षांचे असते, त्यामुळे क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्याला राज्यसभेत उपस्थित राहून काम करता येईल.
सचीनचे अभीनंदन.. हायला!!!
सचीनचे अभीनंदन..:)
हायला!!! रेखा आणी जया राज्यसभेत एकत्र???
ती नीरमाची अॅड आता संसदेत एकत्र पोहोचणार हेमा, रेखा जया और सुशमा..:P
सिलसिला पार्ट २ .............
सिलसिला पार्ट २ .............
हेमा, रेखा जया और सुशमा.>>>
हेमा, रेखा जया और सुशमा.>>>
सचिनच्या निवडीबाबत काय लिहावे कळत नाही. जोपर्यंत चांगला खेळतोय तोपर्यंत क्रिकेट सोडू नये हे महत्त्वाचे.
आता सचिन च्या लोकप्रियते वर
आता सचिन च्या लोकप्रियते वर आरुढ होऊन २०१४ चे निकाल काय असतील ह्याचे उत्सुकता आहे.
नक्की काहीतरी शिजलंय, पुढ्यात काय वाढुन ठेवलंय हे फक्त तिलाच माहिती.
अमितवा ला २५ वर्षे लागली ह्या सर्वातुन सुटायला.
सच्चु, देव तुझं रक्षण करो ही सदिच्छा.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12892565.cms
भाजपाची पोटदुखी वर आली... लोकसभेला भाजपाचे जे लोक पडतात, त्याना मागच्या दाराने राज्यसभेत घ्यायचे, हे भाजपाच्या लोकांचे काम! आणि असल्या पक्षाच्या लोकानी सचिनच्या नेमणुकीला विरोध करायचा म्हणजे किती हास्यास्पद आहे... सचिनने सोनियांची भेट का घेतली म्हणे! मग काय हातात कारसेवेच्या विटा घेऊन आडवानीना भेटायला जायला हवे होते का? या भाजपाच्या भ्रमवृंदाला कोणाचं भलं झालेलं बघवतच नाही.
Pages