खगोल(प्रकाश)चित्रण
अनेक वर्षांपुर्वी स्टेट-ऑफ-द-आर्ट कॅमेरा होता. त्यामुळे, आणि खूप लोकांकडे तसा नसल्याने फोटोग्राफी करायला मजा यायची. आजकाल चांगल्या कॅमेर्यांचा सुळसुळाट झाल्याने त्यांच्या किमती कमी झाल्या व अनेकांनी प्रकाशचित्रणात प्राविण्य मिळवले असल्याने फोटोग्राफीचे तितके अप्रुप राहिले नाही.
तेंव्हा अॅस्ट्रोफोटोग्राफी मात्र करायचा प्रयत्न केला नाही कारण त्यामानाने कॅमेरा साधा होता, मोठे एक्स्पोजर वापरले तर पृथ्विच्या फिरण्याला कांऊंटर करायला ट्रॅकीग लागते तेही नव्हते.
आता मात्र अनेक कॅमेरे ग्रह-तारे टिपु शकतील असे असतात. जगातील मोठ्या दुर्बिणी वापरत असल्याने घरच्या कॅमेर्याने फोटो काढायचा प्रयत्न केला नाही. जवळजवळ १० हजार फोटो झाल्यावर मात्र काल एक घेतला - मृग नक्षत्राचा. ती प्रक्रीया खूपच सोपी असल्याने येथे देतो आहे. फोटोसकट. वेगवेगळ्या ठिकाणांहुन घेतलेले मृगाचे फोटो अपलोड करुन जगभर किती प्रदुषण (प्रकाशामुळे) आहे याची माहिती गोळा करणार्यांनापण तुमची मदत होईल. तपशील येथे पहा: http://www.hep.physics.mcgill.ca/ASTRO/darkskies.php मी त्यांच्याचकरता काल केप टाऊन ला हा फोटो घेतला.
माझा कॅमेरा Olympus E-PL1 आहे. भिंग १४-४२ mm चे होते
अपेरचर जास्तीत जास्त उघडे ठेवा: मी f3.5 वापरले (ट्रेल्स कमी दिसतील)
ISO जास्त ठेवा: मी ८०० वापरला
फोकल लेंग्थ कमित कमी ठेवा : मी १४ ठेवले (३५ mm equivalent is 28 mm)
एक्स्पोजर जास्त ठेवा : मी १० सेकंद ठेवले (३० पेक्षा जास्त ठेवले तर ट्रेल्स दिसु शकतात)
मॅन्युअल फोकस वापरला (म्हणजे कॅमेरा फोकस अॅडजस्ट करायचा प्रयत्न करत नाही) - आधि अनंताला ( infinity) फोकस करुन घेतला होता.
अर्थातच ट्रायपॉड वापरा, आणि १०-१२ सेकंदांचा टायमर वापरा (हादरे घालवण्याकरता). प्रकाश व वारा नसलेल्या ठिकाणाहुन फोटो घ्या.
मजा करा.
Full-res file चा दुवा खाली देतो आहे. ८००० पाहु न शकणार्यांना सॉरी.
http://avyakta.caltech.edu:8080/astrophotography
झबरी रे ! फुल रेझोल्युशन
झबरी रे !
फुल रेझोल्युशन बघितला.
अहाहा! काय सुंदर!!! फुल
अहाहा! काय सुंदर!!! फुल रेझोल्यूशनमधे बघायला मजा आली.
मस्त. मोठे चित्र बघायला मजा
मस्त. मोठे चित्र बघायला मजा आली.
दिवसाच्या साधारण काय वेळेला
दिवसाच्या साधारण काय वेळेला हा फोटो काढला आहे?
१. संधीप्रकाश अर्थातच त्रास देतो.
२. आसपासच्या लोकांची झोपण्याची वेळ होऊन गेल्यानंतर लाईट पोल्यूशन/प्रकाश प्रदूषण थोडं कमी दिसतं.
१० सेकंदातही अंधूक तार्यांच्या शेपट्या/ट्रेल्स दिसत आहेत.
दक्षिण गोलार्धाचं आकाश पाहून थोडी गडबड झाली. मृगाच्या पोटातल्या तीन तार्यांच्या रेषेतला, वरचा तारा व्याध आहे असं समजते. राजन्य आणि काक्षीही दिसत नाहीत. थोडी मदत कराल का?
अस्चिग मस्त फोटो ! तो फोटो
अस्चिग मस्त फोटो !
तो फोटो झुम इन केल्यावर बॅकग्राऊंडला काही ठिपके दिसतात ( जस मातीत एखादी चमकती काच ठेवल्यावर जसं वाटेल तसं वाटतयं.) नक्की काय आहे ते ?
लोकहो, धन्यवाद. तुम्हीही फोटो
लोकहो, धन्यवाद. तुम्हीही फोटो घ्या आणि पोस्ट करा.
अदिती, काक्षी उजवीकडे आहे, व्याध वरती आणि राजन्य डावीकडे. M42 (Orion's Nebula) in Orion's sword should make that clear.
24 hours = 360 degrees
1 hour = 15 degrees = 15*3600 arcsec
10 sec = 10*15*1 arcsec = 150 arcsec
त्यामुळे, हो, थोडे ट्रेलींग दिसणार, पण थोडे एक्सटेंशन ऑफ-फोकस पी.एस.एफ. मुळे ही असु शकेल.
उशीरा घेतला फोटो तर नक्कीच जास्त चांगले होईल.
मस्तच.
मस्तच.
सुंदर फ़ोटो. आमच्याकडे चांगले
सुंदर फ़ोटो. आमच्याकडे चांगले दिसतात पण शहरातील दिव्यांमूळे
फ़ोटो नीट येत नाहीत.
मस्त फोटो. फुल सिझोल्युशन चा
मस्त फोटो. फुल सिझोल्युशन चा मस्त वाटला बघायला.
अप्रतिम !! मोठे चित्र बघायला
अप्रतिम !!
मोठे चित्र बघायला मजा आली.+१
मस्त.
मस्त.
मस्तच..
मस्तच..
खूपच छान!
खूपच छान!
मी पण ट्राक करतो. सध्या
मी पण ट्राक करतो. सध्या चंद्राचा फोटो काढायचा आहे, पोर्णिमेची वाट बघतोय.
शेवटी राजन्य, काक्षी आणि
शेवटी राजन्य, काक्षी आणि बेलाट्रीक्स सापडले.
>>थोडे एक्सटेंशन ऑफ-फोकस पी.एस.एफ. मुळे ही असु शकेल.<<
या बाबतीतच मला थोडी शंका आहे. उदाहरणार्थ व्याधाची ट्रेल दिसत नाहीये, व्याधाची चकती बर्यापैकी वर्तुळाकार आकाराची दिसते आहे. त्यामुळेच कॅमेरा ऑफ फोकस असेल असं वाटत नाही.
काही प्रमाणात लेन्स डिस्टॉर्शन वाटतं आहे. उजव्या बाजूला वरच्या शेपट्या डावीकडून खाली-उजवीकडे वर अशा आहेत. उजव्या बाजूला खाली शेपट्या आडव्या/हॉरिझॉंटल आहेत. व्याधाची चकती बर्यापैकी अनुभवी स्वयंपाक्याच्या साधारण पोळीचा आकार असावा इतपत वर्तुळाकार आहे, पण राजन्य आणि त्या भागातल्या सगळ्याच तार्यांची चकती वरच्या बाजूने टोपी उडवल्यासारखी दिसते आहे.
एवढा छिद्रान्वेष अशा कॅमेर्याबाबत करू नये, पण रहावलं नाही. आणि अशा कॅमेर्यातून एवढा चांगला फोटो येतो आहे, एम ४२ च्या बाजूला 'ढगाळ' दिसतं आहे हे याचं आश्चर्य वाटलं. Is good.
शटर रिलीज रिमोटने केलात का?
आमच्याकडे संध्याकाळी ढग नसल्यास जमल्यास आकाशाच्या याच भागाचा फोटो काढून पहाते. अशा फोटोंतून कॅमेर्याच्या लेन्स आणि पीएसएफबद्दल थोडं समजू शकेल.
माझा कॅमेरात मॅन्युअल फोकस का
माझा कॅमेरात मॅन्युअल फोकस का नाही

> शटर रिलीज रिमोटने केलात
> शटर रिलीज रिमोटने केलात का?
नाही, १२ सेकंदांचा डिले वापरला.
नेब्युलॉसिटी दिसेल असे मलाही वाटले नव्हते.
वा सुरेखच - चांगलाच प्रयोगशील
वा सुरेखच - चांगलाच प्रयोगशील आहेस की रे..........
आस्चिगः काल मी शुक्राचा फोटो
आस्चिगः काल मी शुक्राचा फोटो काढला, उद्या इथे टाकेन. पण तो चक्क ग्रहण लागल्यासारखा आलाय.
शुक्र हा पृथ्वि आणि
शुक्र हा पृथ्वि आणि सुर्याच्या मधे असल्याने त्याची कोर दिसणार व ते ग्रहण लागल्या सारखे भासु शकते. तारे त्यांच्या आपल्यापासूनच्या अंतरामुळे बिंदुंसारखे भासतात, तर ग्रह मात्र एक्सटेंडेड. त्यामुळे एक्सपोजर मोठे असेल तर डिस्टॉर्शन्स जास्त वाटु शकतात.
फोटो पहायला आवडेल. मृगाचा पण जरुर काढा फोटो.
ट्राय्पॉड नसल्यामुळे थोडा )?)
ट्राय्पॉड नसल्यामुळे थोडा )?) हलला आहे
आणि हो ती शुक्राची कोरच आहे. पण इतर ग्रहांनादेखिल कला असु शकतात हे कधी लक्शात आले नव्हते. 
आस्चिगः अजुन एक मदत हवीय. मला शनीची कडी दिसु शकतील असा टेलीस्कोप घ्यायचा आहे. तुम्ही अगोदर दिलेल्या लिंक वर बर्याच आहेत १३००० ते ३७००० रु. पर्यंत (९०००० + ची पण रेंज आहे त्यात). पण त्यातली कोणती योग्य होइल ते जरा प्लिज समजावुन सांगा (कमीत कमी बजेट मध्ये). धन्यवाद.
आज हे पूर्ण रिझोल्यूशनला
आज हे पूर्ण रिझोल्यूशनला पाहिले. सही आहे!