हँडी चॉपर

Submitted by लालू on 24 November, 2009 - 16:09

ही वस्तू घेऊन ठेवा. उपयोगी पडते.

हँडी चॉपर

दुकानात बहुतेक $९.९९ ला मिळेल. साल्सा, भरड चटण्या, बटाटेवड्यासाठी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटण चांगले होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी 6 वर्षापुर्वी विजय सेल्स मधून अगदी असाच मिनीफुप्रो ब्लेक अॅंड डेकरचा 1850 रुपयांना घेतला, आत्तापर्यंत विनातक्रार भरपूर वापरलाय.
आता त्याहीपेक्षा कमी किंमतीला मिळेल.

माझ्याकडे ब्राऊन चा हँड ब्लेंडर आहे

म्हणजे हा ब्राऊन मल्टी॑क्विक पायमर का? http://www.giftwala.com/finalitem_1.cfm?pID=287 इथे दाखवलाय तो??

मला घ्यायचाय पण इथे क्रोमा मध्ये वगैरे मिळत नाही. इतरत्र मिळतो (जिथे गिफ्ट आर्टिकल्स, इम्पोर्टेड वस्तु वगैरे असतात तिथे). हा सगळ्यात छान म्हणुन ऐकलेय. त्या तुलनेत फिलिप्स आणि इतर कंपनीचे कसे आहेत??

सगळे हँड ब्लेंडर्स बहुतेक एक सारखेच असतात. मला तरी कुणा दोन ब्रँड्स मधे खूप फरक आढ्ळला नाही. माझा फिलिप्स चा पण असेच फिचर्स असलेला आहे. त्या आधीचा ब्लेक अँड देकर चा ही तसाच होता. टिकाऊपणा बद्दल म्हणाल तर ते आपण कसे वापरतो ह्यावर जास्त अवलंबून आहे असं मला वाटतं.

ब्राउन चं माझ्याकडे आहे तसलं मॉडेल अलिकडे मिळत नाहीये. तुम्ही दिलेल्या लिंकमधे इमर्शन स्टिक आहे अन त्याला खाली एक भांडं बसवून त्यात कांदे टॉमेटॉ वगैरे चिरता येतात. माझ्याकडल्याची मेन बॉडी या चित्रातल्यासारखी आहे . त्यालाच एक चॉपर अटॅचमेंट आहे व खाली भांडे बसवून चिरणे, दाण्याचं कूट इत्यादी करता येते.

एक इमर्शन स्टीक बसवून मिल्कशेक, पालक प्युरे वगैरे करता येतं. चक्का व साखर सुद्धा त्यानेच मिळून येतं व्यवस्थित.

शिवाय व या चित्रात दाखवल्यासारख्या दोन वेगवेगळ्या अ‍ॅटचमेंट आहेत. एक जोडी केक, मफिन्स, ब्राउनी साठी व एक जोडी ब्रेड साठी आहे.
http://www.220v.com/smallDetail.asp?ID=1442 /
माझ्या मॉडेलची पावर त्यावेळी मिळणार्‍या मॉडेलमधे सगळ्यात जास्त होती. मी तरी त्याच्या क्वालिटी बद्दल एकदम खुष आहे.

पुढच्या आठवड्यात फोटो टाकेन - कदाचित २२० व्होल्टमधे तसलं मॉडेल मिळू शकेल.

आज टार्गेटमध्ये दिसला नाही. मी वर लिंक टाकली आहे तसा होता पण खूपच छोटा. बहुतेक माबोवरच्या सगळ्या बायांनी ऑर्डर टाकली असावी. Wink

अरे मी तो परवा thanksgiving sale मधे घेतला ४ डॉलर चा पण तो black n decker चा नाहीये आणि बेस लॉक-अनलॉक करायला खुप खुप घट्ट आहे, म्हणुन परत करणार आहे व B n D चा पाहणार आहे.

हो तो वॉलमार्ट ब्रँड चा आहे ४ डॉलर वाला. शर्मिलांनी सांगीतलेला black n decker चा ९.९९ ला मिळाला मला वॉलमार्टमध्येच.

black n decker चोपर चा बेस लॉक-अनलॉक करायला सूपा आहे का कि तो पण घट्ट आहे ह्या $ ४$ सारखा.

black n decker चा सोपा आहे. दुसरा वॉलमार्ट ब्रँड चा कसा आहे ते माहित नाही.

माझ्या कडे हे http://www.bedbathandbeyond.com/product.asp?order_num=-1&SKU=13485062&RN... आहे
मि त्याचा फक्त ज्युस करण्या साठी कढी करण्या साठी उप्योग करते आता त्यात कोबी चिरु शकतो का?
आणि त्या मोठ्या भांड्यात जर खाली ब्लेड असेल तर कणिक मळता ये ईल का?

प्रिती, त्या भांड्यात कांदा, टॉमेटो चिरणे, दाण्याचं कूट, वाटली डाळ, फ्लावर / कोबी / फरसबी बारीक चिरणे अगदी मस्त होईल. आले लसूण हिरवी मिरची चा भरड ठेचा करता येईल.

इमर्शन / स्टिक ब्लेंडर ने पालक, टॉमेटो प्युरे करणे, चक्का-साखर ढ्वळून श्रीखंड, पुरण हे करता येईल.

भारतातुन येताना boss genius plus blender आणला आहे. पण तो बॉक्स खुप मोठा होता त्यामुळे तो विदाऊट बॉक्स आणला गेला (आणी त्या बरोबर पुस्तक मिळत ते तिकडेच राहील आहे)
त्यामुळे त्या बरोबर मिळालेले ४ सुटे ब्लेड कशा-कशाला वापरायचे कळत नाहीये. कुणाला माहिती असेल तर सांगाल का?

खाली दिलेल्या लिंक मध्ये तोच ब्लेंडर आहे. कुणाला माहिती असेल तर सांगा.
http://www.emallindias.com/Products/Home--Kitchen-Appliances-Kitchen-App...

लोला, प्रतिसादाबद्दल धन्स गं,
मी बघितले पण ४ ब्लेड ह्या व्यतिरीक्त काही दिलेल नसत. (ते कशासाठी वापरायचे वैगरे)

अनु ३ , तुम्ही त्यांच्या कॉल/सपोर्ट सेंटर वर कॉल करा आणि सॉफ्ट कॉपी मागवा.
नाहीतर भारता मध्ल्या कुणाला तरी स्कॅन करुन पाठवायला सांगा

माझ्याकडे लालूने दिलेल्या लिंकमधला ब्लॅक अ‍ॅंड डेकर चा आहे ८ वर्षांपासून विनातक्रार चालुये. रंग थोडा वेगळा आहे, कदाचित जूने मॉडेल असावे. ताजे मसाला वाटण, ग्रेव्ही साठी इ. इ. खूप वापरला जातो. कांदा नाही आवडला मला यावरचा - पाणी सुटल्या सारखा होतो. पण थोडसंच काही वाटण्यासाठी बेश्ट. दाण्याचे कूट पण चांगले होते पण जास्त असेल तर बराच वेळ लागतो तेव्हा मोठा मिक्सर बरा.

अनु, माझ्याकडे माझ्या साबांनी दिलेला बॉसचा असा ब्लेंडर होता. त्याची आता मोटर खराब झाली....

या ४ ब्लेड्स... एका वेळेस एकच... त्या स्टीक च्या खाली बसतात आणि तो स्टिक ब्लेंडर म्हणून वापरता येतो. यातली गोल चकती - ताक, लस्सी, मिल्क्शेक घुसळ्ण्यासाठी, गोल चकती विथ भोक्स - टॉम / पालक, भाज्या प्युरे, ४ पात्यावाली ग्रेव्ही साठी वगैरे वापरायच्या. चटणी करायला, चॉपिंग इ साठी ते भांड वापरायचं. Happy

कॉस्कोला Magic Jack $30 ला अहे... त्यात ब्लेन्दर साऱख भांड पण त्यात आहे.. आपल्या देशी वाट्ण इ. साठी मी तरी वापरते

या ४ ब्लेड्स... एका वेळेस एकच >> Happy ते माहिती आहे गं
लाजो, धन्स गं. बर झाल सांगितलस ते नाहितर प्रयोग करावे लागले असते
अजुन १ एस आकाराच ब्लेड आहे ते कशासाठी वापरतात?

ते 'एस' आकाराचं मी पाभा साठी भाज्या ब्लेंड करायला वगैरे वापरल्याचं आठवतयं...
माझा ब्लेंडर खराब होऊन झाली असतिल ६-७ वर्ष... त्यामुळे नक्के आठवत नाहिये आता.
मला वाटतं मी एकदा पूरण घोटण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून मोटर खराब झाली असावी बहुदा Uhoh ... त्यामुळे पूरण घोटण्यासाठी याचा उपयोग... नो नो नो.... Happy

ह्म्म्म पुरणाच नक्की लक्षात ठेवेन.
आणलाय खर तो ब्लेंडर पण नक्की खूप उपयोगाचा असतो का स्वयंपाकघरात १ सामानाची अडगळ ते अजुन कळायच Happy

वरती बर्‍याच लिंक्स आहेत. त्यात फोटो बघायला मिळेल. तसच, लालूच्या पोस्टमध्ये निळ्या अक्षरांमध्ये हँडी चॉपर लिहिलयं त्यावर क्लिक केलं की फोटो दिसेल.

Pages