'मसाला' - स्पर्धांचे निकाल

Submitted by माध्यम_प्रायोजक on 16 April, 2012 - 01:01

आनंदानं जगायला शिकणार्‍या, आणि जगण्यातला आनंद शोधणार्‍या रेवणची आणि सारिकाची भन्नाट गोष्ट म्हणजे ’मसाला’.

kalingad_hording_20x10_as_umesh.jpg

२० एप्रिल, २०१२ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार्‍या या निखळ करमणूक करणार्‍या चित्रपटाच्या निमित्तानं आपण मायबोलीवर काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अनेक मायबोलीकरांनी या स्पर्धांमध्ये उत्साहानं भाग घेतला. या स्पर्धांचे निकाल जाहीर करत आहोत.

***

चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(१) - ललिता - प्रीति
चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(२) - टोकुरिका
चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(३) - सामी

तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन Happy

या स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम बघितल्याबद्दल वेबमास्तर व प्रशासक यांचे मन:पूर्वक आभार Happy

***

'मस्साल्याचा टच' - पाककृती स्पर्धा

प्रथम पारितोषिक - लाजो (मस्साला च्या मारी)
द्वितीय पारितोषिक - जागू (हिरव्या-गोड्या मसाल्यातील पौष्टीक पराठे)
तृतीय पारितोषिक - सुलेखा (तिरंगा पनीर कोफ्ता आणि लच्छा पराठा)

तिन्ही बक्षीसविजेत्यांचं हार्दिक अभिनंदन Happy

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शेफ आणि फूड स्टायलिस्ट श्री. भूषण इनामदार यांनी काम पाहिले. या स्पर्धेबद्दल त्यांचं मनोगत -

’मायबोली.कॉमने मला या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी आभारी आहे. तसंच या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं मी अभिनंदन करतो. मात्र या स्पर्धेसाठी अजून प्रवेशिका यायला हव्या होत्या, असं वाटतं. हल्ली टीव्हीवर, मासिकांमध्ये किंवा ब्लॉगांवर अनेक नवीन पाककृती वाचायला मिळतात. पूर्वी आपल्याकडे मिळत नसलेले अनेक पदार्थही आता सहज उपलब्ध झाले आहेत, आणि म्हणून नवे प्रयोग करून बघणं सहज शक्य झालं आहे. त्यामुळे स्पर्धेत सादर झालेल्या पाककृतींमध्ये नावीन्य, कल्पकता यांचा थोडा अभाव दिसला, याचं आश्चर्य वाटलं.

मसाल्याचे पदार्थ आपण रोज स्वयंपाकात वापरतो. त्यांच्या चवी आपल्याला माहीत असतात. या खास चवींमुळे आपण नेहमीच्या पदार्थांमध्येही रंगत आणू शकतो. एक सोपं उदाहरण देतो. श्रीखंड घरी नेहमी केलं जातं, किंवा विकत आणलं जातं. या श्रीखंडात केशर आणि वेलची असे दोन मसाल्याचे पदार्थ असतात. हल्ली फ्रूटखंड, म्हणजे फळांचे तुकडे घातलेलं श्रीखंड लोकप्रिय झालं आहे. हे फ्रूटखंड आपण घरी जरा वेगळ्या प्रकारे बनवू शकतो. एका बोलमध्ये वेगवेगळ्या फळांचे थर द्यायचे, आणि सगळ्यांत वर श्रीखंड ठेवायचं. चवीला किंचित दालचिनी घालायची. एरवीच्या फ्रूटखंडापेक्षा हा प्रकार वेगळा आणि चवीला जास्त चांगला लागतो. किंवा श्रीखंडात सफरचंदाचे तुकडे घालून दालचिनीचं पाणी घालायचं. अशा प्रकारे अनेक पदार्थांचं रूप, चव आपण सहज बदलू शकतो.

स्पर्धेतल्या तीन विजेत्यांनी सादर केलेल्या पाककृतींमध्ये अशी कल्पकता मला आढळली.

’मस्साला च्या मारी’ या पदार्थात वापरलेल्या मसाल्यांची निवड मला आवडली. शिवाय पदार्थाला येणारी चव ही खास मसाल्यांची होती. इतर पदार्थांचा त्या चवीवर फार प्रभाव नव्हता. हिरव्या-गोड्या मसाल्यातील पौष्टीक पराठ्यांबद्दल आणि तिरंगी कोफ्त्यांबद्दलही हेच म्हणता येईल.

मी पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो.’

***

बक्षिसांसंदर्भात सर्व विजेत्यांशी आम्ही लवकरच संपर्क साधू.

या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्वांचे आभारी आहोत.

***
विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललीला बक्षिस मिळालं? चला आता २० तारखेला ललीकडे जाऊन रहायला हरकत नाही म्हणजे दोन तिकिटांपैकी एकावर नाव लावता येईल Proud Wink

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन Happy

हायला मी हे पाहिलच नै Happy
गुब्बी( शुभांगी कुलकर्णी) ला मनापासून धन्यवाद Happy
धन्यवाद माप्रा व परीक्षक Happy

उदय Happy

धन्यवाद माध्यम प्रायोजक व परीक्षक...
हार्दीक अभिनंदन लाजो ,जागू , सुलेखा , ललिता - प्रीति,टोकुरिका

आभारी आहे....
सामी

Pages