Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 April, 2012 - 02:19
पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे तिसरं छायाचित्र...
चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!
स्पर्धेचं स्वरूप आणि नियम http://www.maayboli.com/node/33622 इथे दिले आहेत.
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
***
वरील छायाचित्र प्रताधिकारमुक्त.
***
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाल मिरची हळद तिखट तेज पान
लाल मिरची हळद तिखट
तेज पान लवंग
जिर मिर घालुन
तर्रीला दिसतो तेलाचा तवंग
अरे वा!! तिसरं चित्र आलं
अरे वा!! तिसरं चित्र आलं एकदचं!!
तुझ्या वाटीत काळं मिरं दिसतय गं
माझ्या वाटीतलं लवंग कसं हसतय गं...
थोडं हळदी मधुन, थोडं जिर्यामधुन
मिरची, मस्साल्यातुन बेलिफ कसं डुलतय गं.........
चाल??? ओळखा बरं
हळद, मिरची, जिरं, नि लवंग-
हळद, मिरची, जिरं, नि लवंग- मिरे
वाटीभर लाल तिखट आणि तेजपत्ता
कांडा, कुटा, नैतर मिक्सरमधे वाटा
स्वादिष्ट होई चिकन हंडी वा करी कोफ्ता
हळद ,तिखट जोडीला शाही
हळद ,तिखट जोडीला शाही जिरे
मिरी, लवंगा आणि फोडणीला तमाल पत्र बरे
मसाल्याचा स्वाद सोबत स्वयंपाकाचे तंत्र
खमंग जेवणासाठी हाच खरा मंत्र
हळद आणि लवंग जंतुनाशक
हळद आणि लवंग जंतुनाशक खरी
स्वयंपाकाला आणी वेगळीच खुमारी
मिरची- मिरे तिखट पण पाचक तरी
मसाले आपले गुणी, जेवण खमंग करी
हळद तिखटाच्या रंगाने खुलविले
हळद तिखटाच्या रंगाने खुलविले रुपडे
खमंग चवीसाठी जिरे, लवंग आणि मिरी ....
तमाल पत्राचा सुगंध दरवळे चोहीकडे
मसालेदार जेवण तृप्त करी...
हळद मिरची लवंग मिरी इत्यादी
हळद मिरची लवंग मिरी
इत्यादी मसाल्याची तयारी पुरी
प्रमाणात पडता येतो स्वाद
नाहीतर पदार्थ होई बर्बाद
नका नका हो असं सांडू
नका नका हो असं सांडू घळाळा
डोळ्यातून तुमच्या आधीच पाणी
खड्या मसाल्याशी त्या मिलनाला
नटलीय बघा ना, आतुर लाल राणी
तेज तर्रार मिरची संगे झणझणते
तेज तर्रार मिरची संगे झणझणते ही काळी मिरी
तिखट, हळद, जिर्यांना बिलगुनी लगटून बसली शेजारी
सुरस लवंगी नखरा, तोरा काय वर्णू मी कसा अहा!
तमालपत्रासवे नांदते जिव्हेवरी चटकेल पहा!
बोटभर मिरची सोबत फोडणीला
बोटभर मिरची सोबत फोडणीला जिरे
चिमुटभर हळद तर सुगंधाला तेजपान
दोन तीन लवंगा आणि चवीला मिरे
लज्जतदार जेवणाचा तुमचाच पहिला मान
लवंग आनी मिरीसंगट बसलं
लवंग आनी मिरीसंगट बसलं शहाजिरंssssss
तमालपत्रामागून आली मिरची झनझनीत की रंsssssss
काय वर्नू चव ह्यांची??
हळदी-तिखटाचं रूप लई न्ह्यारं ssssssss
हे जी जी रं जी जी रं जी जी!
सप्त-सुरांच्या मीलनातुनी उमले
सप्त-सुरांच्या मीलनातुनी उमले सुमधूर गाणे
सप्त-मसाले मेळ घालूनी खुलविती आपुले खाणे
रोजचीच ती भाजी-आमटी, रोजचाच तो रस्सा
चिमटीभरूनी मसाल्यामुळे खाणे होई गाणे
हळद,
हळद, मिरी,लवंगा
मिरची,तिखट,जीरे,
तमालपत्रे घातली फोडणीत
मोहरी राहिली ना रे?
चाल??? ओळखा
चाल??? ओळखा बरं
>>>>
लाजो...... तू महान आहेस.
तुझ्या हातात सिनेमाचं तिकिट दिसते......य
तुझ्या बाजुला कोण बरं येऊन बसत...य हीच ती तुझी चाल
आता म्हण बघू
टेबलावर वाट्या ठेवल्या
टेबलावर वाट्या ठेवल्या सात
तिखट, हळद, शाही जिरे बसले आत
लवंग-मिरी अन तमालपत्र वाढवी स्वाद
खमंग जेवणाला सर्वांचीच दाद
-------------------------------------
तापले तेल... चर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र फोडणी
फोडणी ला मिरी, लवंग आणि जिरे.....
चीमूट भर हळद अन स्वादासाठी तिखट
तमाल पत्राचा सुगंध घरभर फिरे .....
भुंग्या धन्स रे
भुंग्या
धन्स रे