१५ वांगी
१ छोटा कांदा बारीक चिरुन
अर्धा छोटा कॅन टोमॅटो पेस्ट
२ मध्यम कांदे भाजुन पेस्ट करुन
१ टेबल स्पून आलं लसुण पेस्ट
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरुन
१/४ कप तेल
१ टेबल स्पून गरम मसाला
हळद, तिखट, मीठ आवडीप्रमाणे
मसाला पेस्ट साठी
६ लवंगा
३ मसाला वेलदोडा
१ टेबलस्पून धने
१ टि.स्पून जीरे
१/२ टि.स्पून मिरे
१ दालचिनी तुकडा
२ लाल मिरच्या
१/४ कप किसलेलं खोबरं
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
वांगे मधुन दोन काप करुन चिरुन घ्यावेत. देठ काढु नयेत.
मसाल्याचे पदार्थ थोडे तेल टाकुन भाजुन घ्यावेत. हे करताना प्रथम खोबरं सोडुन सगळे मसाले भाजुन घ्यावेत आणि शेवटी खोबरं टाकुन गॅस बंद करावा. गार झाल्यावर मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्यावे, लगल्यास थोडे पाणी घालावे.
आता पॅनमधे तेल गरम करुन जीरे, मोहरीची फोडणी करुन कांदा परतुन घ्यावा. कांदा ब्राऊन झाल्यावर कोथिंबीर टाकुन परतावे. फोडणीत कोथिंबीर टाकल्याने, तेलाच्या तंवंगात ती छान दिसते. त्यानंतर हळद, तिखट घालुन परतावे.
त्यानंतर मसाला पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटीची पेस्ट मीठ घालुन परतुन घ्यावे. ह्या नंतर वांगी घालुन झाकुन ठेवावे.
एका बाजुने वांगी झाल्यावर उलटुन दुसर्या बाजुनी शिजु द्यावीत.
दोन्ही बाजुनी शिजल्यावर गरम पाणी घालुन व्यवस्थित शिजु द्यावीत. शिजल्यावर गरम मसाला घालुन ५ मि. झाकुन गॅस बंद करावा.
गरम गरम फुलक्या सोबत वाढावीत.
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
मस्त! तोंपासु दिसतायत एकदम
मस्त! तोंपासु दिसतायत एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोबत दुसरं काय वाढलय?
धन्यवाद सायो आणि लाजो लाजो,
धन्यवाद सायो आणि लाजो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, सोबत दह्यात कालवलेलं मेतकूट आहे.
मस्तय प्रकार. वाढलेलं ताट
मस्तय प्रकार. वाढलेलं ताट एकदम भारी. भाकरीबरोबर जास्त छान लागेल असं वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
हम्म.. मला वाटलं दह्यातली
हम्म.. मला वाटलं दह्यातली चटणी वगैरे काहितरी... अगदीच अंदाज चुकला नाही म्हणायचा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
प्रीति मस्तच
प्रीति मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे हा प्रकार.
छान आहे हा प्रकार.
वाढलेलं ताट एकदम भारी.
वाढलेलं ताट एकदम भारी. भाकरीबरोबर जास्त छान लागेल असं वाटतं>>>>> +++१
भुक चाळवली फोटो पाहुन.. मस्त
भुक चाळवली फोटो पाहुन.. मस्त रेरिपी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्लर्रप!!
स्लर्रप!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी आहेत फोटो. तुला
जबरी आहेत फोटो. तुला शुभेच्छा, प्रीति![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास दिसत आहे भाजी.
झकास दिसत आहे भाजी.
वा!
वा!
छान ! मस्त! एक सजेशन देऊ
छान ! मस्त! एक सजेशन देऊ का?
वांग्याची देठं काढून न टाकता, आणि वांगी आधी थोड्या तेलावर परतून घेतली तर चव अजून वाढते! खान्देशात अश्या प्रकारे भाजी करतात.
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
masala welchi mhanje konti ?
masala welchi mhanje konti ? pls sanga mala hi bhaji banwaychi aahe.
मि करुन बघीतलि भाजि आनि छान
मि करुन बघीतलि भाजि आनि छान झालि. धअन्यवाद.