अनेक जिज्ञासू व चिकित्सक माबो करांच्या आक्षेप आणि आग्रहास्तव सदरची कथा लवकरच योग्य त्या पद्धतीने नवीन बदलून देत आहे, तोपर्यंत आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागत ,,,,,,,,,सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार !
ही कथा संपूर्ण पणे माझ्या मित्राच्या आयुष्यातील घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे ,सर्वाधिकार सुरक्षित
वर्तुळ
धाड धाड ...............चार वेळा आवाज झाला. तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.थंड डोक्याने तिचा खून करून “तो” निघून गेला होता .
कोण होता “तो”?
६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे .भावाच्या लग्नात “त्या”ने तिला प्रथम पहिले ,राजश्री ,तशी होती घरातलीच ,पण थोडी लांबच्या नात्यातली ,एमबीए करत होती त्यावेळी .
तो पहिल्या प्रेमभंगाच्या वेदनेने तळमळत होता .जखमी होता ,मानिनी ,”त्या”चे पहिले प्रेम ...पण ते सारं खूप कडू होतं.......तिच्या प्रियकराने ,राजेश ने “त्या”च्यावर करणी केली होती,ह्याची नोकरी गेली ,रात्र रात्र झोपेशिवाय बिछान्यावर “तो” तळमळत पडलेला असे , ६ वर्षे बरबाद, मानसोपचार ,गोळ्या ..................हिने आयुष्यातून उठवलं , संपलंच सगळं ...
पण आता “त्या”ला आशेचा किरण दिसू लागला होता.तो आस लावून विचार करू लागला . आता तरी काहीतरी चांगलं घडेल ,ही दुसरी तर घरातली आहे ,समजून घेईल...आपण ही एमबीए करू...................आणि हिच्याशीच लग्न करू...
दिवस जात राहिले ,बोलू बोलू म्हणून “त्या”ने खूप प्रयत्न करून पहिला पण धीर होईना ,शेवटी राजश्री चा मामा भेटला ,त्याच्याजवळ त्याने मन मोकळे केले ........आणि काही दिवसांनी महत्प्रयत्नांनी त्याला तिचा मोबाईल नंबर मिळाला ,”त्या”ने मेसेज पाठवून मनातलं सगळं तिला सांगितलं...त्याला फार मोठं ओझं उतरल्यासारखं झालं..................
दिवाळी आली ,”त्या”ने मोठ्या आशेने तिचा नंबर फिरवला ,पण पलीकडून उत्तर नाही.....संध्याकाळी एका भैय्याचा फोन आला , “मै अजय पांडे बोल राहा हू ,राज का बॉयफ्रेंड ,हमारे बीचमे मत टांग मत अडावो, कबाब में हड्डी मत बानो, अंजाम बुरा होगा “
“तो” कोसळला ,उष:काल होता होता काळरात्र व्हावी ,तसं काहीसं झालं .पण आता मागे न हटण्याचे त्याने ठरवलं,याचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे ...मग तशाच चपला पायात अडकवून “तो” नाक्यावरच्या बोळात शिरला .
“त्या”ने आत्तापर्यंत १०० वेळा तरी ती जाहिरात बघितली होती.....”तांत्रिक,प्यार ,वशीकरण,परदेशगमन ...सब केवल २४ घंटे में .......”पण तिकडे जावं असं कधी वाटलंच नव्हतं,पण आज नाईलाज झाला “तो” तसाच तिरमिरीत बाबा कलाम खान ला जावून भेटला ,बाबा ने सांगितले “बेटा ५० हजार रुपिया लगेगा ...” हा अवाक ,एवढे पैसे कुठून आणणार?
मग “त्या”ने ओळखीच्या एका ज्योतिषाचा रस्ता धरला ,पत्रिका दाखवली,उपाय केले ,उपयोग शून्य ...या सगळ्या गदारोळात “त्या”ची नोकरीही गेली ,मुंबईत राहण्याचे वांधे झाले ,आता काय करणार? चला गावाकडे.....गावी गेल्यावरही २-४ पत्रे त्याने राजश्रीच्या वडिलांना पाठवली ,पण प्रतिसाद शून्य
अशीच २ वर्षे गेली ,पुन्हा एकदा “त्या”ने फोन करून पहिले ,पण झाले भलतेच ! त्या रात्री त्याला जाणवले की कोणीतरी आपल्याला करकचून बांधतोय ,कोणीतरी मेंदूत तप्त तारा घुसवतोय ,कोणीतरी लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय ........आपल्या पौरुषा वरही हल्ला होतोय .......जाग येईपर्यंत “तो” पुरता घामाघूम झाला होतां ...पुढचे दोन दिवस जबरदस्त ताप..............
“त्या”ने घरच्यांना सांगून पहिले ,आपल्यावर BLACK MAGIC होतेय ,पण घरच्यांनी त्यालाच मुर्खात काढले ...दोन दिवसांनी त्याला जबरी अपघात झाला ,मोटार सायकल ला ट्रक ची धडक ...उजवा हात कायमचा अधू ....
पुढच्या वर्षी तिचे लग्न झाले ,पण हा तसाच ,पस्तीशी आलेली ...आता कसले लग्न आणि कसले काय? चारी बाजूनी नाडलेला ,फसवणूक आणि अन्याय यांच्याशी लढता लढता हतबल झालेला ......
काय करावे? आत्महत्या ? नाही सूड ........बदला ...REVENGE!!!!!!!!!!!!!!!!
बंगलोर गाठून त्याने तिचा पत्ता मिळवला ,आणि मित्राने दिलेल्या पिस्तुलाने राजश्रीला कायमचे संपवले ...........
बंगलोर हून मुंबईला परत येताना ट्रेन मध्ये एका आसुरी आनंदाने “तो” खुशीत आला .................एक वर्तुळ पूर्ण केल्याचे अनामिक समधान “त्या”च्या चेहऱ्या वर होते ............................................................................
नाही आवडली....
नाही आवडली....
एवढे क्रूर कृत्य केलेल्या
एवढे क्रूर कृत्य केलेल्या मित्राची कथा मा.बो. टाकण्याचे प्रयोजन ???????
कोणता अन्याय त्याच्यावर झाला
कोणता अन्याय त्याच्यावर झाला होता व कधी
मला तर तो मनोरुग्ण वाटतो
क्रूर /मनोरुग्ण इत्यादी
क्रूर /मनोरुग्ण इत्यादी विशेषणे लावली जाणे ,हेच त्या मित्राचे आणि कथेचे दुर्भाग्य, मि कोणत्याही हिंसेचे समर्थन करीत नाही, पण “तो” ही चांगलाच होतं नां आधी? प्रेयसीचा परप्रांतीय मित्र, त्याने करणी करून याला आयुष्यातून उठवले ,हा अन्यायाच नाही का एकप्रकारे?
जावे त्याच्या वंशा तेव्हा
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...............असो
अन्याय आहे. पण तिचा प्रियकर
अन्याय आहे. पण तिचा प्रियकर आहे हे समज्ल्यावर त्याने तिचा नाद सोडून द्यायला हवा होता.
तिने सांगितले होते का त्याला की ये आणि माझ्या प्रेमात पड.
बर गावी आल्यावर तरी तिचय वडीलांना पत्र वगैरे लिहिण्याचे प्रयोजन काही समजले नाही.
एखाद्या मुलीला नाही आवडला एखादा मुलगा तर लगेच अपमान होतो का?
यात त्या मुलीची काय चूक.
आणि तिच्या प्रियकराने करणि केली.. पण तुमचा मित्रही आधी त्या मार्गाला गेलाच होता. पैसे नव्हते जवळ म्हणून त्याला तो मार्ग अवलंबता आला नाही.. नाहीतर त्याने असलेच काही करणीचे प्रकार त्या पांडेवर केलेच असते.
उगाच 'बिचारा' असे अजिबात म्हणणार नाही मी. हे जे काही झाले त्यामध्ये ९० चूक तुमच्या मित्राची आहे. त्याच्या इगो मुळे सगळे बेतले आहे त्याच्यावर.
ही अशी त्रोटक कथा माबोवर टाकून तुम्ही काय मिळवले देव जाणे.
आणि "सर्वाधिकार सुरक्षित"... या वाक्याचा संदर्भ नाही लक्षात आला.
कारण तसंही चोरण्यालायक आहे काय या कथेमध्ये!
हाहा ...........सकाळी इथल्या
हाहा ...........सकाळी इथल्या काही अति-शोधक चिकित्सकानी सकाली माझ्यावर चोरीचा आरोप ठेव्ला होता ,म्हणुन तसे लिहले आहे
तसंही चोरण्यालायक आहे काय या
तसंही चोरण्यालायक आहे काय या कथेमध्ये!
किती बरोबर!
तात्यांचा लेख तुम्हीच चोरून
तात्यांचा लेख तुम्हीच चोरून इथे टाकला होतात ना?
प्रेम प्रकरणात नीतीमूल्ये
प्रेम प्रकरणात नीतीमूल्ये गहाण ठेवली जातात ,हे ऐकून होतो ,परंतु त्रयस्थ व्यक्तींचा पाहण्याचा दृष्टीकोन ही दूषित असतो हे मात्र आज समजले .
जारकर्म म्हणजे दुसऱ्यावर करणी करणारा मनुष्य हा पापी असून तो चांडाळ योणीस जातो, असे गुरुचरित्रात दिलेले आहे , मग असे अति-निंद्य कर्म करणाऱ्याच्या बाजूने इतकी सहानुभूती?
देवा देवा देवा .......घोर कलियुग......................!
असो , आपल्यापैकी बर्याच जणांना या कथेत काहीतरी कमी किंवा उणे जाणवते आहे , मग तुम्हीच सुचवा पाहू काय शेवट असू शकतो? आणि जे काही “अर्धवट” आहे तेही पूर्ण करून द्या पाहू ...............
प्राजुशी सहमत. पण ह्रुषिकेश,
प्राजुशी सहमत.
पण ह्रुषिकेश, ही कथा चांगली होऊ शकली असती. तुम्ही इतकी छोटी करण्याचा उद्देश Shock factor असावा असे समजतो पण तो इथे पूर्ण फसला. तुमच्या कथानायकासकट इतर कोणाहीबद्दल काहीच माहिती नसल्याने एक फसलेला लेख तयार झाला.
<<मग तुम्हीच सुचवा पाहू काय शेवट असू शकतो? >> अतिशय चुकीचा प्रश्न... राडा होईल इथे....
पुलेशु.
ता.क. इथल्या प्रतिक्रिया (तिखट वाटल्या तरी) सकारात्मक दृष्टिकोनाने स्वीकारा.......पुढच्या लेखनात तुम्हाला त्याचा फायदाच होईल.
निखिलला सगळ्या मुद्द्यांसाठी
निखिलला सगळ्या मुद्द्यांसाठी अनुमोदन
एक भाप्र : त्याने पहिल्या GF चा का नाही खून केला बर? बहुदा तिच्यावर कमी प्रेम असावं
अवांतर : करणी वैगेरेने खरच अस होत का काही?
करणी :कोपरापसून हात जोडणारी
करणी :कोपरापसून हात जोडणारी बाहुली:
तुमच्या मित्राचे सोडा, मला वाटतेय तुम्हालाच मदतीची गरज आहे
get well soon
"त्या" कथानायकाची 'येरवड्यात'
"त्या" कथानायकाची 'येरवड्यात' भरती करण्याशिवाय दुसरा शेवट मला तरी शक्य वाटत नाही.
तो पिस्तूल देणारा मित्र
तो पिस्तूल देणारा मित्र तुम्हीच तर नव्हे??
तसं असेल तर.. एकूणच आनंदी आनंद आहे मग!!
वि़कृत.... तुमच्या मित्राला
वि़कृत....
तुमच्या मित्राला मानसोपचाराची गरज आहे.
अपघातात उजवा हात अधू... मग
अपघातात उजवा हात अधू... मग डाव्या हाताने गोळ्या घातल्या काय? भारी नेमबाज दिसतोय!
सर्वाधिकार सुरक्षित... हे बरे केलेत... नाहीतर चुकुन तात्याना तुमची कथा आवडली असती आणि त्यानी ढापली असती तर वर्तुळ पूर्ण झाले असते..
तसंही चोरण्यालायक आहे काय या
तसंही चोरण्यालायक आहे काय या कथेमध्ये! >>>>>> अगदी अगदी!
कैच्याकै ... नाहीतर चुकुन
कैच्याकै ...
नाहीतर चुकुन तात्याना तुमची कथा आवडली असती आणि त्यानी ढापली असती तर वर्तुळ पूर्ण झाले असते.. >>>>
कथा खूप छोटी आहे, मोठी करा,
कथा खूप छोटी आहे, मोठी करा, काही सुचवू इच्छितो :-
१) मित्राचा इनोसंट स्वभाव सुरुवातीला दाखवा.
२) त्याचे एका मुलीवर मनापासून जडलेले प्रेम दाखवा.
३) प्रेमभंगानंतर त्याचे खचलेलेपण, आणि नैराश्य येऊ द्या.
४) करणीच्या अँगलची गरज मग सहानुभुती मिळवण्यासाठी भासणारही नाही, तरी दाखवायचे झाल्यास, त्याच्याशी दुर्दैवी अपघात होतात, पण आजवर नियतीने केलेल्या आघाताने त्याला हे कोनीतरी करनी करतेय असे वाटू लागलेय असे दाखवा. थोडक्यात, उगाच अंधश्रद्धा पसरवू नका.
५) नोकरीधंदा नसल्याने काही गुंड प्रव्रुतीच्या लोकांच्या संगती दाखवा, काही तसले मित्र, ओळखी ज्यातून पिस्तोल कुठू आले हे क्लीअर होईल, अन्यथा प्रेयसीला मारायचा काहीतरी दुसरा मार्ग दाखवा.
६) प्रेयसीचा प्रियकर आणि प्रेयसी दोघांचा राग असणे आणि दोघांचा काटा एकदम काढला हे दाखवणे तर्कसंगत राहील असे मला वाटते.
७) शेवटी त्याची स्वताची अत्महत्या किंवा लगेच आत्महत्या न करता पश्चाताप, तुरुंगात रवानगी, आणि मग तिथेच गळफास घेणे.. वर्तुळ इथे पुर्ण होईल असे मला वाटते.
असो, मला स्वताला आवडले हे कथानक, लिहायलाही आवडले असते, पण असे मित्र असणे हे माझे भाग्य कुठे म्हणून प्रसंग डीटेलमध्ये जास्त रंगवता येणार नाहीत, आणि तसेही आपण आधीच सर्वाधिकार सुरक्षित ठेवले आहेत तर आपल्याकडूनच आता एक दीर्घकथा अपेक्षित आहे.
धन्यवाद,
तुमचा अभिषेक
महेश भट्टकडे पाठवा...
महेश भट्टकडे पाठवा... मल्लिका आणि इम्रान हाश्मीना पोटापाण्याअला उद्योग मिळेल.
प्रेयसीचा परप्रांतीय मित्र,
प्रेयसीचा परप्रांतीय मित्र,
मनसेला कळवायचं... उगाच करणी बिरणी करत बसला.
जामोप्या
जामोप्या
अरेरे मायबोलीकर... काय काय
अरेरे मायबोलीकर...
काय काय वाचावं लागतंय सध्या त्यांना
अभिषेक जी आभारी आहे , पण मला
अभिषेक जी आभारी आहे , पण मला वाटते वर्तुळ आणखी कोणत्या तरी प्रकारे पूर्ण होऊ शकते ...
बाय द वे , मला मानसोपचार करून घ्यायला सांगणाऱ्या मंडळींचे आभार....तसेही मानसोपचार तज्ञांचा धंदा आजकाल जोरात सुरु आहे ...
मित्राला पिस्तुल मीच पुरवले . होय .अमेरिकेतून बंगलोर ला पार्सल ने सुरक्षित पिस्तुल पाठवता येते नाही का? अरेच्च्या मला माहितीच नव्हते ..................................
असो, या सगळ्या चर्चा- सत्रातून जो निष्कर्ष निघेल तो निघेल ............पण मी एक नवीन धागा सुरु करीत आहे,तिकडे सर्वांनी आवर्जून प्रतिसाद द्या मात्र ....
आणि हो, 'तो' माझ्या कॉलेज मधील मित्र , त्याच्याशी माझा गेल्या १० वर्षात कसलाच संबंध नाही , माझ्या एका क्लासमेट ने परवा आमच्या जुन्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या तेव्हा हा विषय निघाला ..........
आणि “तो” मित्र मनोरुग्ण नाही ,त्याने मेंदूच्या एमआरआय सहित अनेक चाचण्या केल्या ,त्यात कोणताही निष्कर्ष निघाला नाही ..............................................................................................
तो मित्र मनोरुग्ण नाही ???
तो मित्र मनोरुग्ण नाही ??? ऐतेन
वर कथेत लिहिलय की मानसोपचार घेत होता असं
मल्लिका आणि इम्रान हाश्मीना
मल्लिका आणि इम्रान हाश्मीना पोटापाण्याअला उद्योग मिळेल.>>>>>>>>>>>>>>
कथा खुप लवकर संपली..तुमच्या मित्राची तळमळ किंचितही पोहचली नाही...राजेश ने करणी केली,,मग अजय ने पण करणी केली ...उलटपक्षी त्याने राजश्रीला संपवले...दोघापैकी एका ला का गोळ्या नाही घातल्या त्याने ????
नीती नियती आणि न्याय या नविन
नीती नियती आणि न्याय
या नविन धाग्यावर क्रुपया आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत
अनेक जिज्ञासू व चिकित्सक माबो
अनेक जिज्ञासू व चिकित्सक माबो करांच्या आक्षेप आणि आग्रहास्तव सदरची कथा योग्य त्या पद्धतीने नवीन बदलून देत आहे, तोपर्यंत आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागत ,,,,,,,,,सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार !
अभिषेक तुसी ग्रेट हो
अभिषेक तुसी ग्रेट हो
जामोप्या
Pages