वर्तुळ

Submitted by RISHIKESH BARVE on 9 April, 2012 - 05:36

अनेक जिज्ञासू व चिकित्सक माबो करांच्या आक्षेप आणि आग्रहास्तव सदरची कथा लवकरच योग्य त्या पद्धतीने नवीन बदलून देत आहे, तोपर्यंत आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागत ,,,,,,,,,सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल आभार !

ही कथा संपूर्ण पणे माझ्या मित्राच्या आयुष्यातील घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे ,सर्वाधिकार सुरक्षित

वर्तुळ

धाड धाड ...............चार वेळा आवाज झाला. तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.थंड डोक्याने तिचा खून करून “तो” निघून गेला होता .

कोण होता “तो”?

६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे .भावाच्या लग्नात “त्या”ने तिला प्रथम पहिले ,राजश्री ,तशी होती घरातलीच ,पण थोडी लांबच्या नात्यातली ,एमबीए करत होती त्यावेळी .

तो पहिल्या प्रेमभंगाच्या वेदनेने तळमळत होता .जखमी होता ,मानिनी ,”त्या”चे पहिले प्रेम ...पण ते सारं खूप कडू होतं.......तिच्या प्रियकराने ,राजेश ने “त्या”च्यावर करणी केली होती,ह्याची नोकरी गेली ,रात्र रात्र झोपेशिवाय बिछान्यावर “तो” तळमळत पडलेला असे , ६ वर्षे बरबाद, मानसोपचार ,गोळ्या ..................हिने आयुष्यातून उठवलं , संपलंच सगळं ...

पण आता “त्या”ला आशेचा किरण दिसू लागला होता.तो आस लावून विचार करू लागला . आता तरी काहीतरी चांगलं घडेल ,ही दुसरी तर घरातली आहे ,समजून घेईल...आपण ही एमबीए करू...................आणि हिच्याशीच लग्न करू...

दिवस जात राहिले ,बोलू बोलू म्हणून “त्या”ने खूप प्रयत्न करून पहिला पण धीर होईना ,शेवटी राजश्री चा मामा भेटला ,त्याच्याजवळ त्याने मन मोकळे केले ........आणि काही दिवसांनी महत्प्रयत्नांनी त्याला तिचा मोबाईल नंबर मिळाला ,”त्या”ने मेसेज पाठवून मनातलं सगळं तिला सांगितलं...त्याला फार मोठं ओझं उतरल्यासारखं झालं..................

दिवाळी आली ,”त्या”ने मोठ्या आशेने तिचा नंबर फिरवला ,पण पलीकडून उत्तर नाही.....संध्याकाळी एका भैय्याचा फोन आला , “मै अजय पांडे बोल राहा हू ,राज का बॉयफ्रेंड ,हमारे बीचमे मत टांग मत अडावो, कबाब में हड्डी मत बानो, अंजाम बुरा होगा “

“तो” कोसळला ,उष:काल होता होता काळरात्र व्हावी ,तसं काहीसं झालं .पण आता मागे न हटण्याचे त्याने ठरवलं,याचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे ...मग तशाच चपला पायात अडकवून “तो” नाक्यावरच्या बोळात शिरला .
“त्या”ने आत्तापर्यंत १०० वेळा तरी ती जाहिरात बघितली होती.....”तांत्रिक,प्यार ,वशीकरण,परदेशगमन ...सब केवल २४ घंटे में .......”पण तिकडे जावं असं कधी वाटलंच नव्हतं,पण आज नाईलाज झाला “तो” तसाच तिरमिरीत बाबा कलाम खान ला जावून भेटला ,बाबा ने सांगितले “बेटा ५० हजार रुपिया लगेगा ...” हा अवाक ,एवढे पैसे कुठून आणणार?

मग “त्या”ने ओळखीच्या एका ज्योतिषाचा रस्ता धरला ,पत्रिका दाखवली,उपाय केले ,उपयोग शून्य ...या सगळ्या गदारोळात “त्या”ची नोकरीही गेली ,मुंबईत राहण्याचे वांधे झाले ,आता काय करणार? चला गावाकडे.....गावी गेल्यावरही २-४ पत्रे त्याने राजश्रीच्या वडिलांना पाठवली ,पण प्रतिसाद शून्य

अशीच २ वर्षे गेली ,पुन्हा एकदा “त्या”ने फोन करून पहिले ,पण झाले भलतेच ! त्या रात्री त्याला जाणवले की कोणीतरी आपल्याला करकचून बांधतोय ,कोणीतरी मेंदूत तप्त तारा घुसवतोय ,कोणीतरी लाथा-बुक्क्यांनी तुडवतोय ........आपल्या पौरुषा वरही हल्ला होतोय .......जाग येईपर्यंत “तो” पुरता घामाघूम झाला होतां ...पुढचे दोन दिवस जबरदस्त ताप..............

“त्या”ने घरच्यांना सांगून पहिले ,आपल्यावर BLACK MAGIC होतेय ,पण घरच्यांनी त्यालाच मुर्खात काढले ...दोन दिवसांनी त्याला जबरी अपघात झाला ,मोटार सायकल ला ट्रक ची धडक ...उजवा हात कायमचा अधू ....

पुढच्या वर्षी तिचे लग्न झाले ,पण हा तसाच ,पस्तीशी आलेली ...आता कसले लग्न आणि कसले काय? चारी बाजूनी नाडलेला ,फसवणूक आणि अन्याय यांच्याशी लढता लढता हतबल झालेला ......

काय करावे? आत्महत्या ? नाही सूड ........बदला ...REVENGE!!!!!!!!!!!!!!!!

बंगलोर गाठून त्याने तिचा पत्ता मिळवला ,आणि मित्राने दिलेल्या पिस्तुलाने राजश्रीला कायमचे संपवले ...........

बंगलोर हून मुंबईला परत येताना ट्रेन मध्ये एका आसुरी आनंदाने “तो” खुशीत आला .................एक वर्तुळ पूर्ण केल्याचे अनामिक समधान “त्या”च्या चेहऱ्या वर होते ............................................................................

गुलमोहर: 

Pages