अरे मित्रांनो, हाऊसफुल २ बघू नका.
खरंच सांगतोय.
बाकी मर्जी तुमची.
एक कथानक लिहायचा प्रयत्न फक्त करतो.
===========================
श्रेयस तळपदेला आपण श्रे म्हणू. पण त्या श्रे पर्यंत पोचण्यापूर्वी बरेच काही घडते.
प्राण्यांना टॉर्चर केल्यावरून दोन तरुणी एका निर्मात्याला झापताना अचानक एकमेकींशी भांडू लागतात. कोणीतरी विचारते की या कोण आहेत आणि कोणीतरी म्हणते की या चुलत बहिणी आहेत. मग कोणीतरी म्हणजे की 'याच अशा असल्या तर यांच्या आया कशा असतील'. त्यावरून कॅमेरा आयांकडे फिरतो व आया एकमेकींशी कचाकचा भांडताना दिसतात. पुन्हा कोणीतरी 'या कोण' मग कोणीतरी 'या जावा जावा' व कोणीतरी 'मग याच अशा तर नवरे कसे असतील' अशा क्रमाने कॅमेरा रणधीर कपूर (याला आपण डब्बू म्हणू, कारण चित्रपटात तेच म्हंटले गेले आहे व प्रत्यक्षातही तेच म्हणतात) व ऋषी कपूर (याला चिंटू, कारणे तीच) यांच्यावर येतो.
यातील डब्बू नाजायझ औलाद असतो व चिंटू जायझ असे काहीतरी आहे. खरा 'कपूर' कोण यावर त्यांची जी भांडणे होतात तेथे आपल्यातील उरला सुरला जीव संपतो. त्यानंतर खुर्चीवर राहतो एक निर्जीव मात्र डोळ्यांतर्फे मेंदूला संदेश पोचवू शकण्याची क्षमता असलेला देह व चित्रपटाचा पडदा.
अगं आई गं!
हा चित्रपट हॉरर, गंभीर , यातील काहीही म्हणूनही चालू शकतो.
चुकून जरी तुम्हाला हसू आले तर माझ्याकडून तिकिटाचे पैसे घेऊन जा.
श्रे चे आई वडील चिंटूची मुलगी पाहायला जातात. येथे हे स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे की डब्बू व चिंटू शेजारी शेजारी राहात असून त्यातील चिंटूच्या गेटवर नावाच्या पाटीमध्ये ' द रिअल कपूर' असे असते तर डब्बूच्या पाटीवर नुसतेच कपूर असते. यांचे खानदान एकमेकांशी सतत भांडत असते व दोघांच्याही मुली सुस्वरूप, लग्नाच्या व जनावरांच्या बाबतीत सौहार्दपूर्ण दृष्टिकोन ठेवणार्या असून त्यांचा विवाह नामांकीत व अती श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाशीच व्हावा यासाठी डब्बू व चिंटू आपापल्या जीवाचे रान करत असतात.
त्यातच चंकी पांडे उगवतो. मुळातच यडचाप दिसणार्या चंकीला माकडासारखे वागायला लावलेले असल्यान आपण खुर्चीत संतापाने थरथर कापू लागतो.
हा चंकी दोघांच्याही घरात प्रवेश करताना मेन डोअरमधून न येता खिडक्यांमधून येऊन दोन्ही भावांना दचकवतो.
एका भयंकर क्षणी तो श्रेयस तळपदेच्या आई वडिलांना ऋषी कपूरसमोर सादर करतो. ऋषीला तो श्रे चा बाप मोठा उद्योगपती वाटतो. तो जो बाप असतो त्याला 'उंची आवाजमे' काही ऐकले की हार्ट अॅटॅक येत असतो. अचानक त्याचे भांडे फुटल्यावर (किंवा बिंग फुटल्यावर म्हणा) ऋषी कपूर इतका ओरडतो की तो बाप हॉस्पीटलमध्ये अॅडमीट होतो व याचा सूड म्हणून श्रे असे ठरवतो की विलासराव देशमुखांचा मुलगा, जो या चित्रपटात 'जे डी' या इंग्लंडस्थित अफाट गर्भश्रीमंताचा चिरंजीव आहे त्याला ऋषी कपूरच्या मुलीला प्रपोझ करायला लावून ऐन बोहल्यावरून समर्थांप्रमाणे बलोपासना करण्यास बाहेर धाडायचे आणि ऋषी कपूर व त्याच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे करायचे.
इकडे (एक म्हणण्याची प्रथा, इकडे) रितेशचा बाप असतो मिथुन. तो कडक असतो व कायम एक घोडा धुवत असतो. या घोड्याचे काम मिथुनपेक्षा चांगले झालेले आहे. बहुधा त्याला सर्वोत्कृष्ट सहकलाकार असा किताब मिळेल. मिथुन उर्फ जेडी जेव्हा घोडा धुवत नसेल तेव्हा बंदूक घेऊन कोणालातरी घाबरवत असतो. का ते नंतर कळते. सर्व उलगडा नंतर होतो.
सगळे नंतर होणार असल्याने सध्या रितेश श्रे ला म्हणतो की त्याला जे डी चा मुलगा म्हणून पेश करण्यात येऊ नये कारण जर ते जे डी ला समजले तर जे डी घोडा सोडेल आणि मला खलास करेल. आय सी यू च्या बाहेर श्रे ला त्याचे म्हणणे पटते व त्यांचे असे ठरते की ( मै जानता हूं के जेडी का बेटा कौन है, तुम जानते हो के जेडी का बेटा कौन है, लेकिन चिंटु नही जानता के जेडी का... इत्यादी) की एका तिसर्याच 'कमिन्या' माणसाला जेडी का बेटा म्हणून चिंटूच्या घरात पेश करायचे.
या सुमार कल्पनेवर पुढील कथानक अवलंबून असल्याने वरचा उतारा पुन्हा नीट वाचा.
तर आता इतका 'कमिना' कोण असेल्याचा विचार करताना त्यांना जॉन अब्राहम किंवा इब्राहिम चे नांव सुचते व तो कसाही त्यांच्या संपर्कात येतोच. तो पाकीटे, घड्याळे, चेन्स असे सगळे चोरत असतो व व्यायाम करत असतो.
तर त्याला चिंटूच्या घरात इन्स्टॉल करायच्या वेळी नेमका तो डब्बूच्या घरात पोचतो आणि तेथे डब्बूला सांगतो की तो जे डी चा मुलगा आहे.
हा घोळ झाल्याचे समजल्यावर जॉनपेक्षाही कमिना असा एक माणूस शोधून तो चिंटूच्या घरात पोझ करावा म्हणून सगळे जण अक्की (अक्षयकुमार) याला शोधून काढतात. तो सारखा 'ऐ' असे काहीतरी म्हणत असतो. असे नीट म्हणता यावे म्हणून 'अंदरके जानवर को जगाना पडता है' असे त्याचे म्हणणे असते. तो एका डगमगणार्या बसमध्ये निवासास असतो.
त्याचे आणि जॉनचे जुने भांडण असते व ते का ते नंतर फ्लॅशबॅकच्या माध्यमातून दाखवण्यात यश मिळवले आहे.
यानंतर अक्कीला चिंटूच्या घरात पेश केले जाते.
यानंतर खरा जे डी कोण आणि त्याचा मुलगा कोण, आपल्या घरात नांदणारा माणूस नेमका कोण आहे आणि जे डी ने बोमन इराणी नावाच्या एका इन्स्पेक्टरला दिलेला शब्द पाळला की नाही (की त्याच्या मुलीला जे डी आपली सून करून घेईल व डाकूत्व सोडून शरण येईल) (जे डी पूर्वाश्रमिचा डाकू असून तो शरण येऊन आता इंग्लंडमध्ये जाऊन स्वकष्टाने इंग्लंडचा सर्वात धनाढ्य माणूस झालेला असतो).
यात चित्रपटात 'का आहेत' असे विचारावेसे वाटावे अशी काही पात्रे, नटः
जॉनी लीव्हर
बोमन इराणी
श्रेयस तळपदे
घोडा
डब्बू आणि चिंटूंच्या बायका
चार प्रेयस्या
असो!
आपल्याला शेवटी आपलेच हसू यायला लागते.
आपण कसे काय आलो या चित्रपटाला याचे.
बहुतेक सर्वच प्रसंग अनावश्यक आहेत. गाणी असायला हवीत म्हणून आहेत. एकाही गाण्याचे शब्द नीट समजत नाहीत. पापा तो बॅन्ड बजाये असेच आहे का असे मी बायकोला अजूनही विचारत आहे. दोन रात्रीच्या झोपा नीट झाल्यानंतरही तो पिक्चर मला नीटसा उलगडलेला नाही.
असो, काही मते:
१. हा चित्रपट निर्माण व्हायला नको होता.
२. याला कथानक नाही
३. यात असलेली पात्रे , प्रसंग व विनोद भयाण आहेत.
४. मिथुन व घोडा यातील फरक नीटसा समजला नाही तर बंदूक ज्याच्या हातात तो मिथुन असे लक्षात ठेवा.
५. खरेखुरे हसायचे असल्यास चित्रपट गृहाबाहेर उभे राहून हाऊसफुल २ ची पोस्टर्स पाहा व पोट धरून हसा.
काही प्रश्नः
१. रणधीर कपूर कोण असतो?
२. चंकी पांडे का असतो?
३. उत्तान कपडे घातलेल्या असंख्य जलतरणपटू कुठे असतात?
४. मिथुनला चित्रपटात का घेतात?
५. चित्रपटात काम मिळाले नसते तर जॉन इब्राहीमने काय केले असते?
या चित्रपटाचे वेगळेपण दिसते ते अनेक गोष्टींमध्ये, त्या दृष्टिकोनातून हा चित्रपट अमर ठरेल. त्या गोष्टी:
१. यात आयटेम सॉन्ग नाही. (कारण अख्खा चित्रपटच अनावश्यक असल्याने आयटेम सॉन्ग घालता आले नाही)
२. यात विद्या बालन नाही आहे.
३. निखळ विनोद निर्मीती हा हेतू ठेवून निखळ भयाण निर्मीती होणे हे प्रथमच घडले आहे.
४. या चित्रपटाला कथानक नाही. या दृष्टिने हा चित्रपट फारच वेगळा आहे.
५. रणधीर, ऋषी व मिथुन हे जुन्या काळातील नट एकदम एकाच चित्रपटात प्रथमच आले असावेत.
६. दिग्दर्शनच केलेले नाही असा हा पहिला बोलपट आहे.
७. काय चाललेले आहे हे समजू नये याची पूर्ण दक्षता घेणारा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे.
सर्वांना शुभेच्छा
-'बेफिकीर'!
हाऊसफुल २ बघू नका >>>> लेख
हाऊसफुल २ बघू नका >>>> लेख वाचला तर चालेल ना?
वाचतोच, लेख.
छान............... कालच मी
छान............... कालच मी पाहीला..........गोंधळ गोंधळ........निव्वळ गोंधळ......पटकथेच्या नावाने ठो ठो बोंब आहे ( साजिदचा चित्रपट आहे त्यामुळे काही अपेक्षा ठेवणेच हेच चुक आहे )
मी तर हाऊसफुल १ सुद्धा बघितला
मी तर हाऊसफुल १ सुद्धा बघितला नाही २ तर म्ग नकोच.....
मी हाऊसफुल १ पाहीला आहे,
मी हाऊसफुल १ पाहीला आहे, त्यामुळे पुन्हा हाऊसफुल २ पाहण्याइतका फुल नाही
सिनेमा पहायचा नाही हे प्रोमो
सिनेमा पहायचा नाही हे प्रोमो पाहून आणि साजिद खानचे नाव पाहून ठरलेच होते.
शिक्कामोर्तब.
मी पाहिला नाही...... पाहणारही
मी पाहिला नाही...... पाहणारही नाही. कालच एका मित्राला स्पष्ट नाही येणार सांगितलं हा चित्रपट बघायला....
हा चित्रपट त्यावर लेख लिहायच्या पण लायकीचा नाही..... टुकार प्रोमोज.....
त्यापेक्षा कुणाल देशमुखच्या "जन्नत २" आणि विवेक अग्निहोत्रीच्या "हेट स्टोरी" साठी पैसे आणि वेळ राखून ठेवा....
>>> मी तर हाऊसफुल १ सुद्धा
>>> मी तर हाऊसफुल १ सुद्धा बघितला नाही २ तर म्ग नकोच.....
मी पण
>> मी तर हाऊसफुल १ सुद्धा
>> मी तर हाऊसफुल १ सुद्धा बघितला नाही २ तर म्ग नकोच.....
मी पण, मी पण
>>मिथुन व घोडा यातील फरक नीटसा समजला नाही तर बंदूक ज्याच्या हातात तो मिथुन असे लक्षात ठेवा.
>>६. दिग्दर्शनच केलेले नाही असा हा पहिला बोलपट आहे.
चीप कॉमेडी दिसतेय.. आपण
चीप कॉमेडी दिसतेय.. आपण तर नवे सिनेमे पहाण्याची रिस्क घेतच नसतो.. खूपच नावाजलेला एखादा बघतो म्हणा. परिक्षण छान लिहीलय. आता फारेन्ड, श्रध्दा यान्च्याबरोबर बेफी यान्चे परिक्षण वाचले पाहिजे.. स्वप्ना राज यान्चे सुध्दा परिक्षण खतरा असतया..
>>आपण तर नवे सिनेमे पहाण्याची
>>आपण तर नवे सिनेमे पहाण्याची रिस्क घेतच नसतो
अनुमोदन. ह्याच्यापेक्षा डॉन-२ बरा :काडी:
अगागा. काय ती सहनशक्ती. मानलं
अगागा. काय ती सहनशक्ती. मानलं तुम्हाला बेफी.
तसही हाउसफुल पहिला पाहिल्यावर हाउसफुल्ल २ बघणं दुरच.
धमाल लिहीले आहे आवडले
धमाल लिहीले आहे आवडले परीक्षण! आजकाल पेपर्समधल्या किंवा रीडिफसारख्या साईट्सवरच्या रिव्यूज चा काही भरवसा वाटत नाही. त्यामुळे चित्रपट नक्की कसा आहे हे कोणी असे स्वतः बघून लिहील्याशिवाय कळत नाही. मिपा की कोठेतरी आणि हा एक रिव्यू बघून बंडल आहे असेच वाटते.
असीन, झरीन आणि त्या कोण कोण महिला यांच्यात स्टार व्हॅल्यू नाही. जॉन अ. व अक्षय कुमार यांची आता किती शिल्लक आहे शंकाच आहे. साजिद खान पूर्वी वन मॅन टॉक शो करायचा तेव्हा धमाल करायचा. पण त्याचीही प्रतिभा संपलेली दिसते. श्रेयस तळपदे पूर्वी बरा होता.
परीक्षण मात्र खतरनाक
तो कडक असतो व कायम एक घोडा धुवत असतो. >>
ऐन बोहल्यावरून समर्थांप्रमाणे बलोपासना करण्यास>>>
दिग्दर्शनच केलेले नाही असा हा पहिला बोलपट आहे. >>> हे सगळे जबरी. विशेषतः तिसरी कॉमेंट मी आत्तापर्यंत कोणत्याही परीक्षणात वाचलेली नाही
दिग्दर्शनच केलेले नाही...
दिग्दर्शनच केलेले नाही... जबरा !
संवाद, तरी लिहिले होते का ?
धन्यवाद्,आमचे पैसे व वेळ
धन्यवाद्,आमचे पैसे व वेळ वाचवल्याबद्दल्.परिक्षण वाचून मात्र खरे मनोरंजन झाले.
पैसा आणी वेळ वाचवल्या बद्दल
पैसा आणी वेळ वाचवल्या बद्दल आभारी.... मनोरंजन झाले.
चुकून जरी तुम्हाला हसू आले तर
चुकून जरी तुम्हाला हसू आले तर माझ्याकडून तिकिटाचे पैसे घेऊन जा >>>>>>>>>>>>> मी हसलो इंटर्वल ची पाटी आल्यावर हसलो.........द्या पैसे.......
बेफी छान लिहीले आहे तुम्ही.
बेफी छान लिहीले आहे तुम्ही. चित्रपटाच्या वाटेस जाणारच नाही. टायटाणिक बघायला सोबत मिळत नाहिये म्हणून शनिवारी एकट्यानेच बघण्याचा प्लॅन आहे. आपली रोझ व लिओ केव्हाही बरे. अक्की, जॉन वगैरे फारच बेकार आहेत. पण अनारकली गाणे प्रोमो मध्ये आवडले होते. बरे आहे का ते? ते झालंस्तर प्यारकी पुंगी वगैरे एफेम वरच ऐकायच्या लायकीची गाणी वाट्तात.
प्यारकी पुंगी - हे शब्द
प्यारकी पुंगी - हे शब्द असलेलं गाणं आहे?
ते एजण्ट विनोद मधलं गाण
ते एजण्ट विनोद मधलं गाण आहे
कस रे कस
आधीच बेफींचा रिव्ह्यु वाचुन तो साजीद जीव द्यायचा विचार करत असेल
आणि अजुन हे गाण हाऊसफुल मध्ये आहे म्हणताय म्हणल्यावर सैफ पुंगी वाजवत वाजवत जीव देईल बिचारा
पहिला हॉउसफुल्ल म्हणे थेटर
पहिला हॉउसफुल्ल म्हणे थेटर खाली होते... तरी साजिद ने हॉउसफुल २ काढायचे धाडस केले? कमाल आहे.
आपण दोन्ही बघितले नाही, ते ट्रेलर काफी होते धडकी भरायला..
नव्हतोच बघणार. तरी पण सावध
नव्हतोच बघणार. तरी पण सावध केल्याबद्दल आभार..
यात विद्या बालन नाही आहे..
यात विद्या बालन नाही आहे..
जुन्या शेजारी शेजारीची फ़सलेली
जुन्या शेजारी शेजारीची फ़सलेली आवृत्ती दिसते. (म्हणजे एका फ़सलेल्या चित्रपटाची फ़सवलेली आणि फ़सवणारी आवृत्ती)
(एक म्हणण्याची प्रथा, इकडे)
या सिनेमाला बाप मल्टिस्टार
या सिनेमाला बाप मल्टिस्टार सिनेमा अस म्हटलय म्हणे.. तरी ही पडला
मिथुन व घोडा यातील फरक नीटसा
मिथुन व घोडा यातील फरक नीटसा समजला नाही तर बंदूक ज्याच्या हातात तो मिथुन
बघितला मी हा सिनेमा. अगदी हाऊसफुल नसला तरी बरी गर्दी होती. डझनभर स्टार असल्यामुळे असेल बहुतेक. इतक्या गर्दीत कुणीनाकुणी आवडता स्टार कास्टमध्ये सापडतोच, त्यामुळे लोक बघायला जातात. माझा आवडता / आवडती कुणीच नाही यात, पण तरी मी गेलो. कारण साजिद खान.
साजिद खानचा सिनेमा आहे- हे एकदा का पक्के लक्षात ठेवले तर त्रास होत नाही. मुर्खपणा एन्जॉय करणे ही सहजसाध्य कला आहे. (मात्र फराहखानच्या 'तीस मार खान' किंवा साजिदच्याच 'हे बेबी' सारख्या अशक्य सिनेम्यांत ही कला इतकी सहजसाध्य राहत नाही, त्याला मोठी साधना लागते). ते जमलं, की पुढचं सोपं.
श्रेयस तळपदे पूर्वी बरा होता >> अगदी बरोबर. आता त्याच्यापेक्षा रितेश बरा म्हणावंसं वाटतं. जॉन आणि अक्षय यांना ज्यासाठी घेतलंय, ते ते बरोबर करतात. ते आपल्याला अधुनमधून अगदीच सहन होत नाही, इतकंच. अक्षय तर भयाण निबर आणि वाईट दिसतो, वागतो. बोमण आणि चंकीपेक्षा जॉनी लीवर फारफार बरा आहे. चारही हिरवीणींपेक्षा मलाईका अरोरा बरी आहे. रणधीर-ऋषीपेक्षा तो घोडा आणि लक्झरी गाड्या आणि राजवाडे बरे आहेत. हे सगळे मिळून आपल्याला हसवण्याचा सतत प्रयत्न करत राहतात, ते बघून हसू येतंच. या सार्यांपेक्षा मिथुन खूप खूप बरा आहे.
आयटम साँग नाही, असं कसं? 'अनारकली डिस्को चली' आहे की. त्यावर रीतसर वादही झाला आहे, त्यामुळे फक्त ते गाणं बघायला येणाराही वर्ग आहेच.
आपल्याला तर आवडला बुवा.
चांगलं लिहीलंय. बहुतेक सर्वच
चांगलं लिहीलंय.
बहुतेक सर्वच प्रसंग अनावश्यक आहेत. >>
व्वा मस्त, मी काही पाहिलेला
व्वा मस्त, मी काही पाहिलेला नाही
पण हे वाचायला मजा आली
टिव्हीवर "झकास" लागला होता तो पाहून असेच काहिसे वाटले.
हे सगळे मिळून आपल्याला
हे सगळे मिळून आपल्याला हसवण्याचा सतत प्रयत्न करत राहतात, ते बघून हसू येतंच.>>>
बोमण>>> इतर बीबींच्या हँगओव्हरमुळे हे भलतेच वाचले
फारेंडा
फारेंडा
ते ट्रेलर काफी होते धडकी
ते ट्रेलर काफी होते धडकी भरायला.. >>
Pages