अरे मित्रांनो, हाऊसफुल २ बघू नका.
खरंच सांगतोय.
बाकी मर्जी तुमची.
एक कथानक लिहायचा प्रयत्न फक्त करतो.
===========================
श्रेयस तळपदेला आपण श्रे म्हणू. पण त्या श्रे पर्यंत पोचण्यापूर्वी बरेच काही घडते.
प्राण्यांना टॉर्चर केल्यावरून दोन तरुणी एका निर्मात्याला झापताना अचानक एकमेकींशी भांडू लागतात. कोणीतरी विचारते की या कोण आहेत आणि कोणीतरी म्हणते की या चुलत बहिणी आहेत. मग कोणीतरी म्हणजे की 'याच अशा असल्या तर यांच्या आया कशा असतील'. त्यावरून कॅमेरा आयांकडे फिरतो व आया एकमेकींशी कचाकचा भांडताना दिसतात. पुन्हा कोणीतरी 'या कोण' मग कोणीतरी 'या जावा जावा' व कोणीतरी 'मग याच अशा तर नवरे कसे असतील' अशा क्रमाने कॅमेरा रणधीर कपूर (याला आपण डब्बू म्हणू, कारण चित्रपटात तेच म्हंटले गेले आहे व प्रत्यक्षातही तेच म्हणतात) व ऋषी कपूर (याला चिंटू, कारणे तीच) यांच्यावर येतो.
यातील डब्बू नाजायझ औलाद असतो व चिंटू जायझ असे काहीतरी आहे. खरा 'कपूर' कोण यावर त्यांची जी भांडणे होतात तेथे आपल्यातील उरला सुरला जीव संपतो. त्यानंतर खुर्चीवर राहतो एक निर्जीव मात्र डोळ्यांतर्फे मेंदूला संदेश पोचवू शकण्याची क्षमता असलेला देह व चित्रपटाचा पडदा.
अगं आई गं!
हा चित्रपट हॉरर, गंभीर , यातील काहीही म्हणूनही चालू शकतो.
चुकून जरी तुम्हाला हसू आले तर माझ्याकडून तिकिटाचे पैसे घेऊन जा.
श्रे चे आई वडील चिंटूची मुलगी पाहायला जातात. येथे हे स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे की डब्बू व चिंटू शेजारी शेजारी राहात असून त्यातील चिंटूच्या गेटवर नावाच्या पाटीमध्ये ' द रिअल कपूर' असे असते तर डब्बूच्या पाटीवर नुसतेच कपूर असते. यांचे खानदान एकमेकांशी सतत भांडत असते व दोघांच्याही मुली सुस्वरूप, लग्नाच्या व जनावरांच्या बाबतीत सौहार्दपूर्ण दृष्टिकोन ठेवणार्या असून त्यांचा विवाह नामांकीत व अती श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाशीच व्हावा यासाठी डब्बू व चिंटू आपापल्या जीवाचे रान करत असतात.
त्यातच चंकी पांडे उगवतो. मुळातच यडचाप दिसणार्या चंकीला माकडासारखे वागायला लावलेले असल्यान आपण खुर्चीत संतापाने थरथर कापू लागतो.
हा चंकी दोघांच्याही घरात प्रवेश करताना मेन डोअरमधून न येता खिडक्यांमधून येऊन दोन्ही भावांना दचकवतो.
एका भयंकर क्षणी तो श्रेयस तळपदेच्या आई वडिलांना ऋषी कपूरसमोर सादर करतो. ऋषीला तो श्रे चा बाप मोठा उद्योगपती वाटतो. तो जो बाप असतो त्याला 'उंची आवाजमे' काही ऐकले की हार्ट अॅटॅक येत असतो. अचानक त्याचे भांडे फुटल्यावर (किंवा बिंग फुटल्यावर म्हणा) ऋषी कपूर इतका ओरडतो की तो बाप हॉस्पीटलमध्ये अॅडमीट होतो व याचा सूड म्हणून श्रे असे ठरवतो की विलासराव देशमुखांचा मुलगा, जो या चित्रपटात 'जे डी' या इंग्लंडस्थित अफाट गर्भश्रीमंताचा चिरंजीव आहे त्याला ऋषी कपूरच्या मुलीला प्रपोझ करायला लावून ऐन बोहल्यावरून समर्थांप्रमाणे बलोपासना करण्यास बाहेर धाडायचे आणि ऋषी कपूर व त्याच्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे करायचे.
इकडे (एक म्हणण्याची प्रथा, इकडे) रितेशचा बाप असतो मिथुन. तो कडक असतो व कायम एक घोडा धुवत असतो. या घोड्याचे काम मिथुनपेक्षा चांगले झालेले आहे. बहुधा त्याला सर्वोत्कृष्ट सहकलाकार असा किताब मिळेल. मिथुन उर्फ जेडी जेव्हा घोडा धुवत नसेल तेव्हा बंदूक घेऊन कोणालातरी घाबरवत असतो. का ते नंतर कळते. सर्व उलगडा नंतर होतो.
सगळे नंतर होणार असल्याने सध्या रितेश श्रे ला म्हणतो की त्याला जे डी चा मुलगा म्हणून पेश करण्यात येऊ नये कारण जर ते जे डी ला समजले तर जे डी घोडा सोडेल आणि मला खलास करेल. आय सी यू च्या बाहेर श्रे ला त्याचे म्हणणे पटते व त्यांचे असे ठरते की ( मै जानता हूं के जेडी का बेटा कौन है, तुम जानते हो के जेडी का बेटा कौन है, लेकिन चिंटु नही जानता के जेडी का... इत्यादी) की एका तिसर्याच 'कमिन्या' माणसाला जेडी का बेटा म्हणून चिंटूच्या घरात पेश करायचे.
या सुमार कल्पनेवर पुढील कथानक अवलंबून असल्याने वरचा उतारा पुन्हा नीट वाचा.
तर आता इतका 'कमिना' कोण असेल्याचा विचार करताना त्यांना जॉन अब्राहम किंवा इब्राहिम चे नांव सुचते व तो कसाही त्यांच्या संपर्कात येतोच. तो पाकीटे, घड्याळे, चेन्स असे सगळे चोरत असतो व व्यायाम करत असतो.
तर त्याला चिंटूच्या घरात इन्स्टॉल करायच्या वेळी नेमका तो डब्बूच्या घरात पोचतो आणि तेथे डब्बूला सांगतो की तो जे डी चा मुलगा आहे.
हा घोळ झाल्याचे समजल्यावर जॉनपेक्षाही कमिना असा एक माणूस शोधून तो चिंटूच्या घरात पोझ करावा म्हणून सगळे जण अक्की (अक्षयकुमार) याला शोधून काढतात. तो सारखा 'ऐ' असे काहीतरी म्हणत असतो. असे नीट म्हणता यावे म्हणून 'अंदरके जानवर को जगाना पडता है' असे त्याचे म्हणणे असते. तो एका डगमगणार्या बसमध्ये निवासास असतो.
त्याचे आणि जॉनचे जुने भांडण असते व ते का ते नंतर फ्लॅशबॅकच्या माध्यमातून दाखवण्यात यश मिळवले आहे.
यानंतर अक्कीला चिंटूच्या घरात पेश केले जाते.
यानंतर खरा जे डी कोण आणि त्याचा मुलगा कोण, आपल्या घरात नांदणारा माणूस नेमका कोण आहे आणि जे डी ने बोमन इराणी नावाच्या एका इन्स्पेक्टरला दिलेला शब्द पाळला की नाही (की त्याच्या मुलीला जे डी आपली सून करून घेईल व डाकूत्व सोडून शरण येईल) (जे डी पूर्वाश्रमिचा डाकू असून तो शरण येऊन आता इंग्लंडमध्ये जाऊन स्वकष्टाने इंग्लंडचा सर्वात धनाढ्य माणूस झालेला असतो).
यात चित्रपटात 'का आहेत' असे विचारावेसे वाटावे अशी काही पात्रे, नटः
जॉनी लीव्हर
बोमन इराणी
श्रेयस तळपदे
घोडा
डब्बू आणि चिंटूंच्या बायका
चार प्रेयस्या
असो!
आपल्याला शेवटी आपलेच हसू यायला लागते.
आपण कसे काय आलो या चित्रपटाला याचे.
बहुतेक सर्वच प्रसंग अनावश्यक आहेत. गाणी असायला हवीत म्हणून आहेत. एकाही गाण्याचे शब्द नीट समजत नाहीत. पापा तो बॅन्ड बजाये असेच आहे का असे मी बायकोला अजूनही विचारत आहे. दोन रात्रीच्या झोपा नीट झाल्यानंतरही तो पिक्चर मला नीटसा उलगडलेला नाही.
असो, काही मते:
१. हा चित्रपट निर्माण व्हायला नको होता.
२. याला कथानक नाही
३. यात असलेली पात्रे , प्रसंग व विनोद भयाण आहेत.
४. मिथुन व घोडा यातील फरक नीटसा समजला नाही तर बंदूक ज्याच्या हातात तो मिथुन असे लक्षात ठेवा.
५. खरेखुरे हसायचे असल्यास चित्रपट गृहाबाहेर उभे राहून हाऊसफुल २ ची पोस्टर्स पाहा व पोट धरून हसा.
काही प्रश्नः
१. रणधीर कपूर कोण असतो?
२. चंकी पांडे का असतो?
३. उत्तान कपडे घातलेल्या असंख्य जलतरणपटू कुठे असतात?
४. मिथुनला चित्रपटात का घेतात?
५. चित्रपटात काम मिळाले नसते तर जॉन इब्राहीमने काय केले असते?
या चित्रपटाचे वेगळेपण दिसते ते अनेक गोष्टींमध्ये, त्या दृष्टिकोनातून हा चित्रपट अमर ठरेल. त्या गोष्टी:
१. यात आयटेम सॉन्ग नाही. (कारण अख्खा चित्रपटच अनावश्यक असल्याने आयटेम सॉन्ग घालता आले नाही)
२. यात विद्या बालन नाही आहे.
३. निखळ विनोद निर्मीती हा हेतू ठेवून निखळ भयाण निर्मीती होणे हे प्रथमच घडले आहे.
४. या चित्रपटाला कथानक नाही. या दृष्टिने हा चित्रपट फारच वेगळा आहे.
५. रणधीर, ऋषी व मिथुन हे जुन्या काळातील नट एकदम एकाच चित्रपटात प्रथमच आले असावेत.
६. दिग्दर्शनच केलेले नाही असा हा पहिला बोलपट आहे.
७. काय चाललेले आहे हे समजू नये याची पूर्ण दक्षता घेणारा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे.
सर्वांना शुभेच्छा
-'बेफिकीर'!
धन्यवाद्,आमचे पैसे व वेळ
धन्यवाद्,आमचे पैसे व वेळ वाचवल्याबद्दल्
परीक्षण जबरी!! दिग्दर्शनच
परीक्षण जबरी!!
दिग्दर्शनच केलेले नाही असा हा पहिला बोलपट आहे.>>

फराह खान आणि साजिद खान मध्ये
फराह खान आणि साजिद खान मध्ये पैज लागली आहे कोण वाइट फिल्म बनवेल ह्याची.
त्यामुळे फराहने पहिला पत्ता टाकला तीसमारखां तर साजिदने हाउसफुल २ ह्या दोघाच्या खेळात मध्येच शारुख त्याचा जोकर (रा वन) टाकुन गेलाय.
अर्र्र्र्र... एक लिहायच राहुनच गेल की.
परिक्षण जबरी हो बेफी. त्याहुन जबरी तुमची असल्या चित्रपटास जाण्याची मानसिक आणि आर्थिक तयारी.
भुक्कड द्याSSss लवकरSSss.....
भुक्कड द्याSSss लवकरSSss.....
खरंच की, आयटेम सॉन्ग आहे
खरंच की, आयटेम सॉन्ग आहे खरे
आणि ती मलाईका त्यात चांगलीही दिसते
साजिरा धन्यवाद त्या गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल, बाकी प्रसंग इतके भोवळ आणणारे होते की ते 'सॉन्ग' लक्षात राहिले नाही.
(हे वेगळेच की ते गाणे ज्या निमित्तावर आधारीत होते ते निमित्त चित्रपटाइतकेच भयाण होते. बोमन व मिथुनमध्ये 'त्या' वयात त्या नाचणारीवरून भांडणे लावणे हे ते निमित्त)
सर्वांचा आभारी आहे
येथिल लेख कुठे गेला? खलचे
येथिल लेख कुठे गेला? खलचे प्रतिसाद वाचुन लेख वाचायची इछ्छा आहे. क्रुपया (हा शब्द बरोबर कसा लिहायचा म्हणजे टायपायचा ?
) परत अपलोड करावा.
आर्चना, कृपया लिहिताना,
आर्चना,
कृपया लिहिताना, kRupayA असे टाईप करा
लेखक बेफिकिरजी यांना अजीजीपूर्वक विनंती केल्यास ते तुम्हाला लेख देतील असे वाटते.
अजीजीपूर्वक देतो देतो, मारू
अजीजीपूर्वक
देतो देतो, मारू नका
मी पाहिलेत दोन्ही सिनेमे.
मी पाहिलेत दोन्ही सिनेमे. आवडले. सगळी बावळट्ट कॉमेडी येंजॉय केली. एंड फक्त नै आवडला.
बेफिकीर, परिक्षणाबद्दल
बेफिकीर, परिक्षणाबद्दल धन्यवाद. माझ्या बघायच्या लिस्ट मधे होता याचा नम्बर. वेळ वाचवलात तुम्ही मझा.
असे मी अनेक चित्रपट बघितले आहेत; जसे चुप चुप्के, टोम डिक हेरी वगैरे. पण इतक्या अचुक व कमी शब्दात मला भावना मान्डता आल्या नाहीत कधी 
बहुतेक सर्वच प्रसंग अनावश्यक आहेत. >>>>
बेफिकीर , चित्रपट बघुन नाही
बेफिकीर , चित्रपट बघुन नाही आल हसु १ वर्षान्नतर पन Review वाचुन जाम हसले.......
साजिद च्या मुवी कडुन दुसरे
साजिद च्या मुवी कडुन दुसरे काही अपेक्शित नाही...\
kshala nave thevta...comedy
kshala nave thevta...comedy movie ahe to......tumhi swatala itke shahane samjta tr swatah movie tayar Kara...Kahipn bolta...befikir mala tumcha ha lekh nhi aawdla sorry...
खुपच मस्त. इतका जुना लेख
खुपच मस्त. इतका जुना लेख आत्ता वर आल्याने वाचला...पण मनसोक्त हसले. मी काही हाउसफुल १ पाहीला नाही आणि टूही नाही...पण धमाल लिहीलंय!
घ्या, हा लेख मी आत्ता म्हणजेच
घ्या, हा लेख मी आत्ता म्हणजेच हाऊसफुल्ल ३ आल्यावर पाहीला. हाऊसफुल्ल ३ मला फुकट मिळालेला... ऑफ्फीसमध्ये लॅपटॉप वर बघाव म्हट्लं नक्की काय आहे ते पण पहील्या ५ मिनिटांत बंद केला... कोण ते अत्याचार सहन करणार....
अरेच्चा.. मी हाऊसफुल १ पाहिला
अरेच्चा.. मी हाऊसफुल १ पाहिला नाही पण हाऊसफुल २ व ३ थेटरमध्ये जाऊन पाहिले.
मला तरी आवडले. डोक्यात खूप टेन्शन्स असतील तर सरळ मेंदू बाहेर काढून ठेवुन हा सिनेमा पाहावा (२ व ३).
मग आवडतो. साजिर्याने म्हटल्याप्रमाणे सहजसाध्य कला.
तो सारखा 'ऐ' असे काहीतरी
तो सारखा 'ऐ' असे काहीतरी म्हणत असतो. असे नीट म्हणता यावे म्हणून 'अंदरके जानवर को जगाना पडता है' असे त्याचे म्हणणे असते. तो एका डगमगणार्या बसमध्ये निवासास असतो...हे वाचून अशक्य हसू येतंय.
तसेच डाकूत्व सोडून शरण येईल ...याही वाक्याला हसून हसून पडले.
फारच छान!!
तो सारखा 'ऐ' असे काहीतरी
तो सारखा 'ऐ' असे काहीतरी म्हणत असतो. असे नीट म्हणता यावे म्हणून 'अंदरके जानवर को जगाना पडता है' असे त्याचे म्हणणे असते. >>>> तो ७० च्या दशकातला खलनायक होता ना रणजीत त्याची लकब अक्षय कुमार वापरतो चित्रपटात. रणजीत स्वत: आहे त्यात, अ़क्षय कुमार त्याचा मुलगा दाखवलाय.
Pages