Submitted by prafull shiledar on 6 April, 2012 - 07:10
बुद्ध होण्याचा आवाज
इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
जराजर्जर म्हातारपण काठी टेकवत
चालत जात आहे
त्याच्या काठीची ठकठक
हृदयाला जाणवते
इथल्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला
महारोगी बसले आहेत
त्यांचा कण्हत असण्याचा आवाज
सतत ऐकू येतो आहे
इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
एक प्रेतयात्रा जाते
गेलेल्याला दिलेल्या निरोपाचे आवाज
आसमंतात भरून रहातात
या नगरात
मोठमोठे प्रासाद उभे झाले आहेत
विलासाची नवनवी दालने उघडत आहेत
या नगरात संगीत नृत्य गायन अविरत सुरु आहे
या साऱ्या आवाजांची
दुखरी गाज
आणि या भूमीवर
अश्वत्थ सळसळतो आहे
पण कुठलाच माणूस
बुद्ध झाल्याचा आवाज
दूरवरूनही ऐकू येत नाही
-प्रफुल्ल शिलेदार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कारण सगळेच हतबुध्द (हतबध्द)
कारण सगळेच हतबुध्द (हतबध्द) आहेत
पण कुठलाच माणूस बुद्ध
पण कुठलाच माणूस
बुद्ध झाल्याचा आवाज
दूरवरूनही ऐकू येत नाही>>> हम्म, चांगली मांडलेय कविता
छान आहे कविता.
छान आहे कविता.
बुद्ध होऊन तरी काय उपयोग
बुद्ध होऊन तरी काय उपयोग झाला...त्याच्या काळात जे प्रश्न होते ते आजही आहेत....त्याने कुणाचे प्रश्न सोडवले?
त्याऐवजी निर्बुद्ध होणं चांगलं...म्हणजे प्रश्न हे प्रश्न वाटणारच नाहीत.
आवडली नाही.
आवडली नाही.
आवडली
आवडली
छान
छान
प्रफुल्ल , अंतरीची वेदना
प्रफुल्ल ,
अंतरीची वेदना काव्यातून छान मांडली. पुढील काव्य प्रवासास शुभेच्छा!