Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सुप्रियाकाकूचे
मला सुप्रियाकाकूचे भुर्र्र(जी)... भयानक आवडले आहे! ४-५ वेळा बघितले मी!
डोसे करताना कांदा तव्यावर
डोसे करताना कांदा तव्यावर तसाच ठेवून राधा डोसे घालते! इतकी कशी मठ्ठ असू शकते राधा !
पण प्रसंग भारी होता.
कालच्या भागाची हिरो देवकी.
कालच्या भागाची हिरो देवकी. "इतक्या सगळ्या गोष्टीत तू हुशार आहेस मग स्वैपाकात ढ असलीस तर काय बिघडलं?" "आम्ही घनाची परीक्षा घेत नाही, मग तुझी तरी कशाला?" या दोन वाक्यांसाठी उभे राहून जोरदार टाळ्या.
कालचा भाग लिंगनिरपेक्ष वर्तनाचे उत्तम उदाहरण होता. राधाचे पपा तिच्या वडिलांपेक्षा आईच वाटतात.
इकडे राधा आणि रमाच्या सासूचा
इकडे राधा आणि रमाच्या सासूचा अतीव समजूतदारपणा आणि तिकडे वृंदा आणि अरुंधतीकडे डोळे गरागरा फिरवत पाताळयंत्री कारवाया....
कालचा भाग लिंगनिरपेक्ष
कालचा भाग लिंगनिरपेक्ष वर्तनाचे उत्तम उदाहरण होता >> कालचा भाग बघितला नाही पण या मालिकेत त्यामानाने(म्हणजे इतर मालिकांपेक्षा) बरेचदा लिंगनिरपेक्षच वर्तनाची योग्य उदाहरणे बघायला मिळतात.
पण राधाला खोटं वागणं खपत नाहि
पण राधाला खोटं वागणं खपत नाहि तर काल तीने सगळ्यांना सांगायला हवे होते कि मी नाहि केले डोसे आणि चटणी . पण काल मला पहिल्यांदा मुग्धाचा अभिनय आवडला.काय भारी रडत होती ती
राधा चे कॅरॅक्टर पार गंडत
राधा चे कॅरॅक्टर पार गंडत चालले आहे. तिच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागताना दिसत नाहीये. तिचा शिस्तीचा आणि स्पष्टवक्ता स्वभाव नाहीसा होत चाल्लाय. उलटपक्षी अगदी आदर्श भारतीय 'गृहीणी'/नारी/ सून/ बायको ई कडे तीची गाडी चाललेली दिसतेय. अता काही मजा नाही ही सीरियल पहाण्यात. तेच तेच एकत्र कुटुम्बाचे आणि भारतीय आदर्श संस्कृती चे गोडवे आणि वरून चवीला 'नविन' विचारांची फोडणी
अगदी डेलिया, राधाचं कॅरेक्टर
अगदी डेलिया, राधाचं कॅरेक्टर पटत नाहीये हल्ली. जेवण येत नाही तर सरळ सांगाव ना येत नाही म्हणुन. शिवाय तिचं जेवायला बाहेर येण्यासाठी साडी नेसणं तर फार खटकलं.
डेलिया + १, अमृता + १ आणि तो
डेलिया + १, अमृता + १
आणि तो डोसे प्रसंगही अजिबात पटला नाही. त्यापेक्षा घरातले सगळेच तिला गुपचूप समजून घेतात असं दाखवलं असतं तर आवडलं असतं. तिच्या चेहेर्यावरचे भाव, आईचं सावरुन घेणं ह्यावरुन सहज समजायला हवं होतं ( स्वयंपाकात मुरलेल्या बाईचे डोसे एवढे कसे बिघडले असंही वाटलं पण तेवढा संशयाचा फायदा देऊ )
अगो +१ आणि , राधा जेमतेम ४-५
अगो +१
आणि , राधा जेमतेम ४-५ डोसे करते,तेपण एवल्लुसे. मग देवकिकाकू उरलेल्या पीठाचे डोसे का नाहि करत? चटणी आणि चपाती
( तरीहि मी सध्या रीकामटेकडी असल्याने हि मालिका नेमाने बघते )
>>जेवण येत नाही तर सरळ सांगाव
>>जेवण येत नाही तर सरळ सांगाव ना येत नाही म्हणुन.
अगदी अगदी. प्रचंड अनुमोदन.
कालच्या भागात ती राधाची मैत्रिण - ऑफिसमध्ये हनिमूनबद्दल सांगत असते ती - फार डोक्यात गेली. अगदी इन्फॉर्मल ऑफिस आहे म्हटलं तरी हे असं वागणं अतीच वाटलं. राधाची हसू दाबण्याची अॅक्टींग मस्त होती. घनाच्या आत्याचं 'माणूस निसर्गाच्या सानिध्यात स्वत्त्व विसरतो' हे वाक्य पटलं तरी ह्या नियमाचे अपवाद पाहिलेत. पण हे हनिमूनला जायचं कारण होऊ शकत नाही. तीच पुढे म्हणते ना की 'माझ्या लग्नाच्या सगळ्या गोड आठवणी हनिमूनच्या आहेत'. नव्याची नवलाई चार दिवसात संपली की ती शिदोरी लग्न टिकवायला उपयोगी पडेलच असं नाही. मग हनिमूनला जायचं की नाही हा त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न कौटुंबिक पात़ळीवरून का सोडवला जातोय? पुढेही त्यांच्या विवाहित जीवनातली प्रत्येक खासगी बाब अशीच सार्वजनिक होणार का?
एखादी न्युक्लिअर फॅमिलीमध्ये वाढलेली मुलगी संयुक्त कुटुंबात लग्न करून जायला तयार असेल तरी ही सिरियल पाहून ती आपला निर्णय बदलेल. थोडक्यात 'नांदत असेल तर पळ' असं तर राजवाडे सांगत नाहियेत?
>> राधा चे कॅरॅक्टर पार गंडत
>> राधा चे कॅरॅक्टर पार गंडत चालले आहे<< +१ अनुमोदन!
तरीदेखील बाकी मालिकांपेक्षा ही मालिका उजवीच वाटते आहे अजूनही.
आणि शेवटी ही कथा आहे. तेव्हा काही सुसंगती/विसंगती असायच्याच. जोपर्यंत "सुसंगती > विसंगती" पाळले जातेय पटकथेत आणि अभिनयात, तोपर्यंत चिंता नोहे!
मला अजून एक जाणवलेले - काही प्रसंगांमधून राधा ला जितकी आपली चूक ( थोडक्यात खोटे लग्न्)जाणवतेय तितकी घना ला जाणवतीय असं वाटत नाहीये.. कथानकाचा भाग असेल कदाचित !
>>त्या जोडप्याचा वैयक्तिक
>>त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न कौटुंबिक पात़ळीवरून का सोडवला जातोय? पुढेही त्यांच्या विवाहित जीवनातली प्रत्येक खासगी बाब अशीच सार्वजनिक होणार क>>>>>
तोच तर TRP आहे ना. पण मी अनेक घर अशी पाहिली आहेत जिथे नव्या जोडीमधे लुडबुड केली जाते.
एकंदरीत बरी मालिका आहे. सुसह्य आहे अजुन तरी.
काल पाहिली आणि परत एकदा वाटलं
काल पाहिली आणि परत एकदा वाटलं कि ही सिरियल बघण्यात वेळ वाया घालवायला नको. कोण तो घनाचा टकला काका त्यांचा पाठलाग करत असतो. नवरा-बायकोंचे संवाद ऐकण्याचा चोरुन प्रयत्न करतो, विना संवाद ऐकता नुसतेच गेसेस करुन जग बुडाल्याचा अभिनय करतो. कैच्याकैच. अतिशय मुर्खपणा चालला आहे. एवढ्या मोठ्या लग्न झालेल्या मुलाच्या आयुष्यात किती ते interfere करायचं.
एखादी न्युक्लिअर फॅमिलीमध्ये वाढलेली मुलगी संयुक्त कुटुंबात लग्न करून जायला तयार असेल तरी ही सिरियल पाहून ती आपला निर्णय बदलेल. थोडक्यात 'नांदत असेल तर पळ' असं तर राजवाडे सांगत नाहियेत? >>>> स्वप्ना अगदी खरं गं. ते आख्खं कुटुंब जगायला दुसरं काहीही काम आणि कारण नसल्यासारखं या दोघांच्या मागे लागलं आहे.
कालचे दोघांचे कपडे काय भन्नाट होते. मुक्ताचे जोकरसारखे आणि घनाने खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट एकदम जुन्या काळातल्या शाळेचा ड्रेस घातला होता. खिशावर काही प्रिंटपण केलं होतं. शाळेचं नाव असेल बहुतेक.
>>मुक्ता बर्वे आणि स्वप्नील
>>मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलू>><<<
हे घ्या,
बोर वाटली मालिका.
मुंबई-पुणे-मुंबई पार्ट २ बघतेय वाटले मुक्ता बर्वे व स्वप्नील जोशी ह्यांना बघून.
स्वप्नील जोशी एकदम बोर........ मुक्ता बर्वेने का वजन वाढवलय? सतत कॉन्शश असल्यासारखी वावरतेय असे वाटते कपड्यांमध्ये.
वजन वाढल्याने सतत पत्रकारीतेसारखे कपडे घालून फिरते...
आता लग्न झालेले दकहवलेय त्यामुळे गंमतीचा प्रश्न नाहीच वाटतो.
>>>>>>>>>>तिच्या मूळ
>>>>>>>>>>तिच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागताना दिसत नाहीये. तिचा शिस्तीचा आणि स्पष्टवक्ता स्वभाव नाहीसा हो>>>>>>>>>><
+१
बहुधा त्यांना दाखवायचे असेल की बाया लग्न झाले की 'कम्डीशनिंग मुळे' असे वागायला लागतात.
कालचा घनाची आई राधाला
कालचा घनाची आई राधाला स्वयंपाक शिकवते तो भाग छान होता. संवाद एकदम सहज होते. पण किती केलं तरी एक सासू सुनेशी एव्हढं चांगलं वागतेय हे पटतच नाहिये.
धन्यवाद, स्वप्ना बिंगो. भाग
धन्यवाद, स्वप्ना बिंगो.
भाग पाहिला नाही, पण एवढी चांगली सासु पाहायला मिळणे म्हणजे ..
कालचा घनाची आई राधाला
कालचा घनाची आई राधाला स्वयंपाक शिकवते तो भाग छान होता. संवाद एकदम सहज होते >>>> अगदी अगदी. तरी राधाला स्वयंपाक येत नाही हे सासुला दोघी जावांपासून लपवायचं का असतं ते कळलं नाही. एकत्र कुटुंबात दोन कर्त्या बायांपासून, त्यातली एक कूक बूक लिहीणारी, हे लपणं शक्य आहे का ? असो. चिमां त्यांच्या नव्या सेरिअल मध्ये फारच गुंतलेले दिसतात.
एकत्र कुटुंबात एखादीला
एकत्र कुटुंबात एखादीला स्वयंपाक येत नाही हे लपवून ठेवणे कसे शक्य आहे ? ह्या दोघी स्वयंपाकघरात असताना घरातल्या इतर ( भोचक ) बायका तिथे फिरकणार नाहीत का ? ते ही राधासारखी ( स्वयंपाकात ) ठोठ मुलगी जिला तिखटपणासाठी काही भाज्यांना तिखट घालतात आणि काहींना मिरच्या हे ही माहीत नाही. राधाचं कॅरॅक्टर जामच गंडत चाललंय. काही दिवसांपूर्वी हिनेच वडिलांना दाण्याचं कूट, दही घातलेली कोशिंबीर आणि लसूण घातलेली भेंडी करा सांगितलं होतं
शुगोल, माझी पोस्ट पडेपर्यंत तुमची ही आली
पंधरा माणसांच्या कुटुंबासाठी
पंधरा माणसांच्या कुटुंबासाठी कांदा-बटाट्याची भाजी करायची तर किती कांदे, किती बटाटे लागतील?
भरत मयेकर, तुमच्या कमेंटसमुळे
भरत मयेकर, तुमच्या कमेंटसमुळे एपिसोड बघण्याची उत्सुकता वाढते फारच
किती केलं तरी एक सासू सुनेशी
किती केलं तरी एक सासू सुनेशी एव्हढं चांगलं वागतेय हे पटतच नाहिये.>>> यासाठी हवे तेवढे मोदक स्वप्ना
घरातलं वातावरण अगदीच बाळबोध
घरातलं वातावरण अगदीच बाळबोध आणि दुसरा उद्योग नसल्या सारखं दाखवलं आहे.
राधाचं कॅरॅक्टर गंडत चाललं आहे. पहिले तिने जो भुर्जी च्या वेळेस बाणेदार पणा दाखवला, तो स्वयंपाक येत नाही असे सांगताना दाखवायला हवा होता. ( मी दाखवला होता ) आर्थात विनोद निर्मीती साठी हा डोश्यांचा अट्टाहास हस्यास्पद वाटतो.
आता मालिका सरळ आहे. राधा आणि घना एकमेकांच्या प्रेमात पडतिल ( साधारण पणे एका वर्षा ने) तो पर्यंत त्याच्या विभक्त होण्याच्या किंवा प्लॅन च्या कशा धज्ज्या उडाल्या ते दाखवतिल.... मग जेंव्हा ते प्रेमात पडतिल, तेंव्हा त्याला अमेरीकेला नोकरी मिळेल. मग त्यांची एकमेकां बरोबर रहायची धडपड दाखवतिल. ( पुढलं एक वर्ष)
हे सगळ होई पर्यंत घरातले सगळे गुडी गुडी वागत रहातिल.... मग शेवटी आजी त्यांना सांगेल की तुमचा प्लॅन आम्हाला आधीच माहिती होता. कसं गंडवलं.... हा हा हा हा.....
मोकीमी, अगदी माझ्या मनातलं
मोकीमी, अगदी माझ्या मनातलं
मुळात लिव्ह ईन हा कायदेशीर
मुळात लिव्ह ईन हा कायदेशीर पर्याय असताना हा घाट का घातला गेला असेल?
पुर्वि ठिक होते..पण आता सरकारने सोय केली आहे..
पंधरा माणसांच्या कुटुंबासाठी
पंधरा माणसांच्या कुटुंबासाठी कांदा-बटाट्याची भाजी करायची तर किती कांदे, किती बटाटे लागतील?
> +१
आज हा धागा बघितला. अजून
आज हा धागा बघितला.
अजून प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. यावर काही बोललायत का आधी?
१. मुक्ता बर्वेची अॅक्टिंग बिघडलिये हे मलाच वाटतंय की खरंच आहे ते?
२. स्वप्निल जोशी जरा चांगलं मॅच्युअर्ड काम करतोय का? की पुन्हा मलाच...
३. तो मुक्ताच्या खरोखरीच प्रेमाबिमात पडलाय का? की....
४. वल्ली काकू ओव्हरअॅक्टिंग करतेय.
५. कितीही आचरट्ट असली तरी कुहू फार गोड वाटली.
प्रज्ञा९, पुष्कळ जणांना असंच
प्रज्ञा९, पुष्कळ जणांना असंच वाटत आहे. ये तूही ह्या जहाजात
आता जुनं झालं हे, तरीपण डोशांचा रहस्यभेद करा ना कोणीतरी कृपया. कोणी केले ते डोसे? सासूबाईंनी, की बाबा आले धावत? त्यांचा तो 'देव डोशाच्या पीठात बुडवून ठेवतो' संवाद मस्त होता
आले आले मीपण! डोसे राधाने
आले आले मीपण!
डोसे राधाने बिघडवले. सासुबाईंनी चटणी करून "राधाने केली" म्हणून सांगितलं. डोसे बिघडल्यावर पोळ्या सासुबाईंनीच केल्या. (हे सगळं पुन्हा ऐकीव आहे बहुतेक )
Pages