एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतोबांचे रहस्य भरपुरच ताणलेय. आता थेट अक्षता टाकायला येणार की बिदाईच्या वेळेस????

काल नौवारीत बायका कसल्या गोड दिसत होत्या... फक्त घनाची आई दिसली नाही त्या गर्दीत.

घनाचे वडील दिसले नाहीत साधना. आई होती. Happy

उखाणा नामी होता. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता नंतरचा एकदम ओरिजिनल Happy

आई ग्ग.... किती किस पाडताय तो Happy
डोकं न वापरता बघायच्या असल्या फार्सिकल सिरियल्स. तिथेही डोक्याला ताण दिलात तर कसं व्हायचं? Happy

झालं का लग्न? चला, इंटरमिशन झालं. आता पुढचा पिक्चर इन्टरेस्टिंग.....बाकी त्या श्यामलन आणि घईसारखं राजवाडे ह्या सिरियलमध्ये चंचुप्रवेश करणार नाहीत ना?

कीस नाही, तेच तेच चालू आहे. लोकही तेच, एक्स्प्रेशनही तेच, संवादही तेच. पण लोक सासू-सून-द्वेष-सूड ह्याला इतके कंटाळलेत, की ही काहीच विशेष नसलेली मालिकाही चालतेय!

लोकही तेच, एक्स्प्रेशनही तेच, संवादही तेच. पण लोक सासू-सून-द्वेष-सूड ह्याला इतके कंटाळलेत, की ही काहीच विशेष नसलेली मालिकाही चालतेय!>> हे मान्य.
पण लग्नघरात माणसंच का नाहीत, आत्याचा नवराच का नाही, हातभर मेंदी कशी नाही. मित्र मैत्रिणीच का नाहीत....या चर्चेला 'कीस पाडताय' म्हणाले मी. Happy एक गोष्ट म्हणून का नाही बघू शकत आपण. लग्नाला ५०० माणूस बोलावलं असेल तर काय ५००जणांचे क्लोजअप टाकणार का? काहीही... बडजात्यांचं बजेट वेगळं, मराठी निर्मात्याचं वेगळं Happy

एका लग्नाची गोष्ट आहे आणि लग्न अशा अशाच पद्धतीने करायचं यावर मालिकेत कीस पाडला गेला त्याचं काय?

मंडळी लग्न छान लागलं हो. आज होम, सप्तपदी व. व. विधी झाले. थोडक्यात पण अगदी काळजाला हात घालणारे प्रसंग होते. राधा-घना जबरदस्त काम. डोळ्यांनी बोलका अभिनय. विनय आपटेंच्या संवादांनी तर टडोपा!! आणि सगळी मंडळी काय सुंदर दिसत होती. एकाहून एक सरस.

ढिंग चिका ढिंग चिका ढिंगा!!! Happy

कालचा पाठवणीचा प्रसंग फारच गोड होता. राधा आणि पपा दोघेही एकमेकांना रडू येऊ नये असा प्रयत्न करीत होते. ओटीत घातली ऐवजी वधुपित्याने मुलीला, मला दिलास तसा त्रास नवर्‍याला देऊ नको असे सांगणे अंमळ(!) क्रांतिकारक होते. अर्थात राधा कधी त्रास देणार्‍यातली वाटली नाही.
हार घालताना दोघा काकांनी उचलल्यावरचा आणि कानपिळीच्या वेळचा घनाचा आरडाओरडा Lol

आता लग्न संपन्न तर झाले, लग्नाची पहिली गोष्ट फिनीश!
पाहू या, ह्या लग्नाची 'दुसरी' गोष्ट म्हणजे कॉय्य? Happy

कानपिळीच्या वेळचा घनाचा आरडाओरडा

त्यावेळचा मानवचा अभिनय पाहुन मी हसुन हसुन मेले. राधाला बहुतेक माहित आहे मानवचे गुपित, ती घनाला म्हणते, त्याने राग काढला असणार म्हणुन, घनाला कसला राग ते समजत नाही, त्यावर ती नंतर सांगते असे म्हणते.

मी काल लग्न मिसले. Sad

आजीबाईंची बालमैत्रीण की कोणी बहीण आली होती लग्नाला आणि तिला चक्क संवाद पण होता : तुझ्या नातवाचं लग्न आणि मी येणार नाही?
बजेटमध्ये बसली बरी Wink
स्वागत समारंभ व्हायचाय का अजून? जेवणाचा कार्यक्रम झालेला दिसला नाही.

बजेटमध्ये बसली बरी>> अगदी Lol

काल घना त्या ग्रे कुर्त्यात मस्त दिसला आहे, कालचा त्याचा अभिनय फारच मॅच्युर्ड वाटला!

शनिवारी जे दाखवले त्यात मंगळसुत्र बांधताना दाखवले, होम झाला, सप्तपदी झाली.. आणि मग सोमवारी माळ घातली?? ज्ञानप्रबोधिनीच्या लग्नात असे उलटे असते काय??

पहिल्यांदाच मला कुहु आवडली.........तसा मेकअपच केलेला म्हणा...... मुक्ताच्या मैत्रिणीचा मेकअप सुध्दा मस्त होता.......

साधना, वैदिक पद्धत होती ती लग्नाची. वैदिक पद्धतीत आधी सगळे विधी होतात आणी मग माळ घालतात.

ज्ञानप्रबोधिनीच्या लग्नात असे उलटे असते काय? >> साधना, ज्ञानप्रबोधिनी पद्धतीच्या लग्नाला कधी गेलो नाहीये पण हल्ली कुठच्याही पद्धतीत उशीराचा मुहुर्त असला तर सर्रासपणे सगळे विधी मुहुर्ताच्या आधी करून घेतात. मुहुर्ताला फक्त अक्षता टाकतात.

पण त्या ज्ञानप्रबोधिनीवाल्या लग्नात खरोखरीच सुभगे इ.इ. विशेषणे वापरतात का? कसले कृतिम वाटत होते ते!

कसले कृतिम वाटत होते ते!


भटजी खुपच प्रेमाने वाचत होते. Happy

पुस्तकातुन वाचुन दाखवत होते म्हणजे खरेच असणार.... ते पुस्तकही ऑथेंटिक होते. त्याचे वरचे जे कवर दिसत होते ते ज्ञानप्रबोधिनीच्या मुंजीच्या पुस्तकावरही तसेच आहे, म्हणजे ते पुस्तक खरेच ज्ञानप्रबोधिनीचेच आहे हा तर्क मुलीने लावला. Happy

मी वैदिक पद्धतीचे लग्न अजुन पाहिले नाहीय. हेच पहिले Happy

कुठच्याही पद्धतीत उशीराचा मुहुर्त असला तर सर्रासपणे सगळे विधी मुहुर्ताच्या आधी करून घेतात. मुहुर्ताला फक्त अक्षता टाकतात.>> येस्स! माझे लग्न असेच झाले आहे, मुहूर्त उशीराचा होता आणि परतीचा प्रवास लांबचा होता, मुहूर्तानंतर विधी केले असते तर वरातीची त्रेधा-तिरपीट झाली असती, असा सारासार विचार करून उभय पक्षाकडील वडील मंडळी आणि गुरूजींनी आधी विधी करुयात असे सुचवले- (तरीही ह्यांत मात्र- आम्ही घरच्या उपस्थित मंडळींसमोर आधी वरमाला घातलेल्या आठवतंय) पण मंगलाष्टके मात्र मुहुर्तावरच- अर्थात विधी संपल्यानंतर Happy

पण त्या ज्ञानप्रबोधिनीवाल्या लग्नात खरोखरीच सुभगे इ.इ. विशेषणे वापरतात का? कसले कृतिम वाटत होते ते!

नटी आणि सूत्रधाराचा प्रवेश एकट्यानेच केल्यासारखे !

बजेटमध्ये बसली बरी>>>> Biggrin

पण लग्न मात्र मस्त लागलं... फ्रेश वाटलं वातावरण. आत्याला बिचारीला रडूच येत नव्हतं, तरी राधा सांगत होती, रडू नकोस. Lol

राधाचं नव्या घरातलं स्वागत खुप आवडलं. काय मस्त सासर आहे राधाचं.... Happy

Pages