Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्याबाईंचा नवरा इंदूराहून
आत्याबाईंचा नवरा इंदूराहून येत नाहिए. फ्लाइट कॅन्सल झाली म्हणे. बस १६ तासात घेऊन येईल.
आतोबांचे रहस्य भरपुरच ताणलेय.
आतोबांचे रहस्य भरपुरच ताणलेय. आता थेट अक्षता टाकायला येणार की बिदाईच्या वेळेस????
काल नौवारीत बायका कसल्या गोड दिसत होत्या... फक्त घनाची आई दिसली नाही त्या गर्दीत.
घनाचे वडील दिसले नाहीत साधना.
घनाचे वडील दिसले नाहीत साधना. आई होती.
उखाणा नामी होता. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता नंतरचा एकदम ओरिजिनल
आई ग्ग.... किती किस पाडताय तो
आई ग्ग.... किती किस पाडताय तो
डोकं न वापरता बघायच्या असल्या फार्सिकल सिरियल्स. तिथेही डोक्याला ताण दिलात तर कसं व्हायचं?
झालं का लग्न? चला, इंटरमिशन
झालं का लग्न? चला, इंटरमिशन झालं. आता पुढचा पिक्चर इन्टरेस्टिंग.....बाकी त्या श्यामलन आणि घईसारखं राजवाडे ह्या सिरियलमध्ये चंचुप्रवेश करणार नाहीत ना?
कीस नाही, तेच तेच चालू आहे.
कीस नाही, तेच तेच चालू आहे. लोकही तेच, एक्स्प्रेशनही तेच, संवादही तेच. पण लोक सासू-सून-द्वेष-सूड ह्याला इतके कंटाळलेत, की ही काहीच विशेष नसलेली मालिकाही चालतेय!
लोकही तेच, एक्स्प्रेशनही तेच,
लोकही तेच, एक्स्प्रेशनही तेच, संवादही तेच. पण लोक सासू-सून-द्वेष-सूड ह्याला इतके कंटाळलेत, की ही काहीच विशेष नसलेली मालिकाही चालतेय!>> हे मान्य.
पण लग्नघरात माणसंच का नाहीत, आत्याचा नवराच का नाही, हातभर मेंदी कशी नाही. मित्र मैत्रिणीच का नाहीत....या चर्चेला 'कीस पाडताय' म्हणाले मी. एक गोष्ट म्हणून का नाही बघू शकत आपण. लग्नाला ५०० माणूस बोलावलं असेल तर काय ५००जणांचे क्लोजअप टाकणार का? काहीही... बडजात्यांचं बजेट वेगळं, मराठी निर्मात्याचं वेगळं
एका लग्नाची गोष्ट आहे आणि
एका लग्नाची गोष्ट आहे आणि लग्न अशा अशाच पद्धतीने करायचं यावर मालिकेत कीस पाडला गेला त्याचं काय?
आवडत नाही आवडत नाही म्हणता
आवडत नाही आवडत नाही म्हणता म्हणता किती बारकाईने बघताहेत लोकं ही मालिका....
काय करणार उज्जड गामे एरंडो
काय करणार उज्जड गामे एरंडो प्रधान
मोहन जोशींनी सिरेलला टांग
मोहन जोशींनी सिरेलला टांग मारलेली दिसते, पोराच्या लग्नात बाप गायब?
प्रोमोमध्ये मंगलाष्टक
प्रोमोमध्ये मंगलाष्टक म्हणताना दाखवलेत की...
मंडळी लग्न छान लागलं हो. आज
मंडळी लग्न छान लागलं हो. आज होम, सप्तपदी व. व. विधी झाले. थोडक्यात पण अगदी काळजाला हात घालणारे प्रसंग होते. राधा-घना जबरदस्त काम. डोळ्यांनी बोलका अभिनय. विनय आपटेंच्या संवादांनी तर टडोपा!! आणि सगळी मंडळी काय सुंदर दिसत होती. एकाहून एक सरस.
ढिंग चिका ढिंग चिका ढिंगा!!!
सोमवारी अक्षता पडतील.
सोमवारी अक्षता पडतील.
राधाच्या पायातले अँकलेट्स
राधाच्या पायातले अँकलेट्स (तोरड्या का काय म्हणतात ते) काय सुंदर होते.
कालच्या एपिसोडमध्ये मुक्ताचा
कालच्या एपिसोडमध्ये मुक्ताचा अभिनय नाही आवडला. अगदी शाळकरी गॅदरिंग सारखा वाटला.
कालचा पाठवणीचा प्रसंग फारच
कालचा पाठवणीचा प्रसंग फारच गोड होता. राधा आणि पपा दोघेही एकमेकांना रडू येऊ नये असा प्रयत्न करीत होते. ओटीत घातली ऐवजी वधुपित्याने मुलीला, मला दिलास तसा त्रास नवर्याला देऊ नको असे सांगणे अंमळ(!) क्रांतिकारक होते. अर्थात राधा कधी त्रास देणार्यातली वाटली नाही.
हार घालताना दोघा काकांनी उचलल्यावरचा आणि कानपिळीच्या वेळचा घनाचा आरडाओरडा
अगदी रैना. मलाही आवडले. काल
अगदी रैना. मलाही आवडले. काल मुक्ता दिसलीही सुरेख. छान होता कालचा एपिसोड.
आता लग्न संपन्न तर झाले,
आता लग्न संपन्न तर झाले, लग्नाची पहिली गोष्ट फिनीश!
पाहू या, ह्या लग्नाची 'दुसरी' गोष्ट म्हणजे कॉय्य?
कानपिळीच्या वेळचा घनाचा
कानपिळीच्या वेळचा घनाचा आरडाओरडा
त्यावेळचा मानवचा अभिनय पाहुन मी हसुन हसुन मेले. राधाला बहुतेक माहित आहे मानवचे गुपित, ती घनाला म्हणते, त्याने राग काढला असणार म्हणुन, घनाला कसला राग ते समजत नाही, त्यावर ती नंतर सांगते असे म्हणते.
मी काल लग्न मिसले.
आजीबाईंची बालमैत्रीण की कोणी
आजीबाईंची बालमैत्रीण की कोणी बहीण आली होती लग्नाला आणि तिला चक्क संवाद पण होता : तुझ्या नातवाचं लग्न आणि मी येणार नाही?
बजेटमध्ये बसली बरी
स्वागत समारंभ व्हायचाय का अजून? जेवणाचा कार्यक्रम झालेला दिसला नाही.
बजेटमध्ये बसली बरी>> अगदी
बजेटमध्ये बसली बरी>> अगदी
काल घना त्या ग्रे कुर्त्यात मस्त दिसला आहे, कालचा त्याचा अभिनय फारच मॅच्युर्ड वाटला!
शनिवारी जे दाखवले त्यात
शनिवारी जे दाखवले त्यात मंगळसुत्र बांधताना दाखवले, होम झाला, सप्तपदी झाली.. आणि मग सोमवारी माळ घातली?? ज्ञानप्रबोधिनीच्या लग्नात असे उलटे असते काय??
पहिल्यांदाच मला कुहु
पहिल्यांदाच मला कुहु आवडली.........तसा मेकअपच केलेला म्हणा...... मुक्ताच्या मैत्रिणीचा मेकअप सुध्दा मस्त होता.......
साधना, वैदिक पद्धत होती ती
साधना, वैदिक पद्धत होती ती लग्नाची. वैदिक पद्धतीत आधी सगळे विधी होतात आणी मग माळ घालतात.
ज्ञानप्रबोधिनीच्या लग्नात असे
ज्ञानप्रबोधिनीच्या लग्नात असे उलटे असते काय? >> साधना, ज्ञानप्रबोधिनी पद्धतीच्या लग्नाला कधी गेलो नाहीये पण हल्ली कुठच्याही पद्धतीत उशीराचा मुहुर्त असला तर सर्रासपणे सगळे विधी मुहुर्ताच्या आधी करून घेतात. मुहुर्ताला फक्त अक्षता टाकतात.
पण त्या ज्ञानप्रबोधिनीवाल्या लग्नात खरोखरीच सुभगे इ.इ. विशेषणे वापरतात का? कसले कृतिम वाटत होते ते!
कसले कृतिम वाटत होते
कसले कृतिम वाटत होते ते!
भटजी खुपच प्रेमाने वाचत होते.
पुस्तकातुन वाचुन दाखवत होते म्हणजे खरेच असणार.... ते पुस्तकही ऑथेंटिक होते. त्याचे वरचे जे कवर दिसत होते ते ज्ञानप्रबोधिनीच्या मुंजीच्या पुस्तकावरही तसेच आहे, म्हणजे ते पुस्तक खरेच ज्ञानप्रबोधिनीचेच आहे हा तर्क मुलीने लावला.
मी वैदिक पद्धतीचे लग्न अजुन पाहिले नाहीय. हेच पहिले
कुठच्याही पद्धतीत उशीराचा
कुठच्याही पद्धतीत उशीराचा मुहुर्त असला तर सर्रासपणे सगळे विधी मुहुर्ताच्या आधी करून घेतात. मुहुर्ताला फक्त अक्षता टाकतात.>> येस्स! माझे लग्न असेच झाले आहे, मुहूर्त उशीराचा होता आणि परतीचा प्रवास लांबचा होता, मुहूर्तानंतर विधी केले असते तर वरातीची त्रेधा-तिरपीट झाली असती, असा सारासार विचार करून उभय पक्षाकडील वडील मंडळी आणि गुरूजींनी आधी विधी करुयात असे सुचवले- (तरीही ह्यांत मात्र- आम्ही घरच्या उपस्थित मंडळींसमोर आधी वरमाला घातलेल्या आठवतंय) पण मंगलाष्टके मात्र मुहुर्तावरच- अर्थात विधी संपल्यानंतर
पण त्या ज्ञानप्रबोधिनीवाल्या
पण त्या ज्ञानप्रबोधिनीवाल्या लग्नात खरोखरीच सुभगे इ.इ. विशेषणे वापरतात का? कसले कृतिम वाटत होते ते!
नटी आणि सूत्रधाराचा प्रवेश एकट्यानेच केल्यासारखे !
बजेटमध्ये बसली बरी>>>> पण
बजेटमध्ये बसली बरी>>>>
पण लग्न मात्र मस्त लागलं... फ्रेश वाटलं वातावरण. आत्याला बिचारीला रडूच येत नव्हतं, तरी राधा सांगत होती, रडू नकोस.
राधाचं नव्या घरातलं स्वागत खुप आवडलं. काय मस्त सासर आहे राधाचं....
Pages