Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला मंगलाष्टकांचा प्रसंग खूप
मला मंगलाष्टकांचा प्रसंग खूप आवडला
सगळे जण गाऊन स्वत:ची हौस भागवून घेत होते.
राधाच्या पायातले अँकलेट्स
राधाच्या पायातले अँकलेट्स (तोरड्या का काय म्हणतात ते) काय सुंदर होते. >> +१
6 महिन्यांसाठीच केल लग्न...
6 महिन्यांसाठीच केल लग्न... ..
उदय, आगे आगे देखो, होता है
उदय, आगे आगे देखो, होता है क्या! ६ महिन्यांमध्ये राधा रमेल त्या घरात आणि सुखाने नांदेल, ही प्रक्रिया बघायची आता.
घना घरच्यांच्या प्रॅन्क्सचे सगळे बेत उधळवून लावतो, ते पहायला मजा आली.
राधाचे गिफ्ट आणि त्यावेळेचे तिचे हावभाव, संवाद असलेला प्रसंग खुपच हृदयस्पर्शी होता.
राधाच्या पायातले अँकलेट्स
राधाच्या पायातले अँकलेट्स (तोरड्या का काय म्हणतात ते) काय सुंदर होते. >> >+१
राधाच्या पायातले पैंजण
राधाच्या पायातले पैंजण मस्तच... खूप खूप आवडले
उशीतून आवाज... त्यावर राधाची कमेंट .. अशा उशा मिळतात का रेडिमेड ? आईग्ग हहपुवा...:)
कालचा एपिसोड बघायला मजा
कालचा एपिसोड बघायला मजा आली.
ते अंगठी काढण्याच्या विधीला घनाचे बाबा का गायब होते?? त्या वेळची घनाच्या आत्याची साडी लाजवाब होती. (मोरपंखी रंग)
एक कळत नाही. राधा आणि घनाला लग्नाशी रीलेटेड विधींची जराही माहिती कशी नाही? राधाचं एक वेळ ठिक आहे. पण घना तर इतक्या मोठ्या कुटुंबात राहत आहे ना. मग प्रत्येक वेळी हे काय असतं, ते कशासाठी?, याचं काय करायचं? इतके कसे निर्बुद्ध राधा आणि घना? लहानपणीपासून आतापर्यंत कधीच कुणाचेच लग्न पाहिलेच नाहीये का?
घना घरच्यांच्या प्रॅन्क्सचे
घना घरच्यांच्या प्रॅन्क्सचे सगळे बेत उधळवून लावतो, ते पहायला मजा आली. >> अगदी.. सही शॉट होता तो
६ महिन्यासाठी लग्न??
आता एकमेकांशी भांडण्याची वगैरे अॅक्टींग की कै, वेगळे होण्यासाठी?
घरचांनी एवढे प्रेमाने असं सुंदर लग्न लावून दिलं, ते पाण्यात?
काय राव..मी तर हे सगळे एपिसोड
काय राव..मी तर हे सगळे एपिसोड मिसले
बाकी कुहु ला मधे मधे पाहील..गोड दिसत होती..पन सग्ळ्यांत कळ्स होती घनाची आत्या..लई भारी ..:)
६ महिन्यानंतर चांगला टिव्स्ट दाखवला पाहीजे पन
लहानपणीपासून आतापर्यंत कधीच
लहानपणीपासून आतापर्यंत कधीच कुणाचेच लग्न पाहिलेच नाहीये का?
त्या दोघांनाही लहानपणापासूनच लग्न या गोष्टीचा तिटकारा आहे
.
.
सुरुवातीला कुहू अजिबात
सुरुवातीला कुहू अजिबात आवडायची नाही पण हल्ली चक्क आवडायला लागलीय. कुहूची निरागसता,भाबडेपणा,पोरकटपणा सगळंच फार छान दाखवलंय स्पॄहाने.
कालच मुंबई पुणे मुंबई पाहिला. त्यातलं स्वप्नीलचं पात्रं किती डोक्यात जातं. ह्या मालिकेत चांगली आहे त्याची व्यक्तिरेखा
कालच मुंबई पुणे मुंबई पाहिला.
कालच मुंबई पुणे मुंबई पाहिला. त्यातलं स्वप्नीलचं पात्रं किती डोक्यात जातं. ह्या मालिकेत चांगली आहे त्याची व्यक्तिरेखा स्मित<<<<< +१
मोहन जोशी आऊट आणि विवेक लागू
मोहन जोशी आऊट आणि विवेक लागू इन
>>६ महिन्यासाठी लग्न?? जरा
>>६ महिन्यासाठी लग्न??
जरा अतिच वाटतय. घनाच्या घरातली साधी माणस आहेत, तसेच राधाचे वडिलतर किती तीचा फटकळपणा सहन करायचे मुलीवरल्या प्रेमामुळे. आणि एवढ भावनीकपणे लग्नाला तयार होउन आणि या दोघांवर एवढे चांगले संस्कार असताना हे ६ महिन्यांच्या लग्नाच नाटक जरा अतिच वाटतय. थोडक्यात काय डोक बाजुला ठेवुन फक्त टाईमपास सारखी बघण सुरु ठेवायच ही मालीका....फक्त पुढे अति बोरींग नाही झाल म्हणजे मिळवल.
इथले वाचून वाचून १२/१३
इथले वाचून वाचून १२/१३ लेटेस्ट भाग पाहिले युट्युबवर या मालिकेचे.आवडली मला तरी.म्हणजे मी गुण-दोषांसकट पत्करलंय या मालिकेला इतर अतिभयानक मालिकांपेक्षा जरा वेगळी एव्हढंच.त्यामुळं कसलाही शेवट माफच राजवाडेंना पुन्हा एकदा शिवाय रोज रोज न बघता कधीतरी १/२ आठवड्यातून एकदम सगळे भाग बघितले(खरंतर चाळले ) की त्रास कमी होतो असा मला साक्षात्कार झालाय स्वप्नील आवडतोय चक्क या मालिकेत!
काल घनाच्या तोंडचे सॉफ्टवेअर
काल घनाच्या तोंडचे सॉफ्टवेअर इंजिनीयर, हाय आय क्यू, यूएस ऑफ ए ला जाईनच हे शब्द ऐकून हसू आलं. यापेक्षा भारतातच काहीतरी समाजोपयोगी कामाला वाहून घ्यायचंय म्हणून लग्न करत नाही असं म्हटलं असतं तर पटलं असतं कदाचित.
राधाचं कारण त्यातल्यात्यात पटलं.
मोहन जोशींचा आवाज आता ऐकायला मिळणार नाही
ते सॉफ्ट्वेअर.. वगैरे ऐकुन
ते सॉफ्ट्वेअर.. वगैरे ऐकुन मीही हसले. त्या पात्राचा एकुण प्रवास लक्षात घेता संवाद अगदी विसंगत वाटले आणि त्या संवादाशी सुसंगत असे काही करताना, जसे विसा, पासपोर्ट, तिथे नोकरी/धंदा इ.इ. काही करतानाही तो दाखवला नाहीय.
त्यामानाने राधा आधी जे म्हणत होती की मी प्रचंड शिस्तप्रिय असल्याने मला तसाच मुलगा मिळणे कठिण आणि त्यामुळे लग्न कठिण व्.व. त्यापेक्षा तिने काल जे कारण दिले ते योग्य नसले तरी पटण्यासारखे आहे (योग्य यासाठी नाही की सगळ्या एकुलत्या एक मुलींनी असा विचार करावा का? आणि त्या करत असल्या तर त्यांना असे एकुलते एक ठेवणे ही त्यांना आईबाबांची चुक नाही का?????? )
आदल्या एपिसोड मधले दोघा
आदल्या एपिसोड मधले दोघा काकांनी घनाला रूम मध्ये जाण्यापूर्वी अडवून केलेला संवाद जालीम होता. आणि त्यावर कहर म्हणजे ज्ञानाने घनाला वेचायला देऊ घातलेले ज्ञानकण हास्यस्फोटक होते ते सर्व सीन्स!
मोहन जोशीच छान वाटत होता या
मोहन जोशीच छान वाटत होता या रोलमधे. इला भाटे आणि त्यांचे संवाद अगदी घरगुती, नॅचरल वाटत.
विवेक लागू ला पाहिल्यावर परत गुंतता ची आठवण येते
मोहन जोशीच छान वाटत होता या
मोहन जोशीच छान वाटत होता या रोलमधे. इला भाटे आणि त्यांचे संवाद अगदी घरगुती, नॅचरल वाटत.
विवेक लागू ला पाहिल्यावर परत गुंतता ची आठवण येते
>>भटजी खुपच प्रेमाने वाचत
>>भटजी खुपच प्रेमाने वाचत होते.
अगदी अगदी. मी २ मिनिटं पाहिलं आणि जाम बोअर झालं. घना आणि राधानं बरं शांतपणे ऐकून घेतलं.
सहा महिन्यांसाठीच लग्न करायचं होतं तर एकत्र कुटुंबातला मुलगा निवडून राधाने आयुष्यातली घोडचूक केली आहे. त्यासाठी न्युक्लिअर फॅमिलीतला आणि त्यातही आईवडिलांपासून दूर, शक्यतो दुसर्या शहरात राहणारा, मुलगा पहायला हवा होता. हे लग्न कसलं तुटतंय? सहा महिन्यानंतर राधाला सकाळी सुक्या ओकार्या काढताना पहायला लागणार आणि बारश्याच्या प्रसंगाने मालिका संपणार. मग पुढला सिझन - एका लग्नाची तिसरी गोष्ट अर्थात घना बीबीबच्चो समेत
>>आदल्या एपिसोड मधले दोघा
>>आदल्या एपिसोड मधले दोघा काकांनी घनाला रूम मध्ये जाण्यापूर्वी अडवून केलेला संवाद जालीम होता. आणि त्यावर कहर म्हणजे ज्ञानाने घनाला वेचायला देऊ घातलेले ज्ञानकण हास्यस्फोटक होते ते सर्व सीन्स>>>> अगदी अगदी. मला त्या ज्ञानाला चांगल ५ मि ज्ञानकण पसरताना पहायचयं. दर वेळी त्याला सगळे गप्प करत आहेत किंवा कुठेतरी पिटाळत आहेत. त्याने काम छान केलय. कधीतरी या विद्यावाचस्पतीला थोडं फुटेज दिलं पाहिजे.
विवेक लागूंच्या प्रवेशाबाबत १००% अनुमोदन. काम अजिबात आवडले नाही. मोहन जोशी-इला भाटे जोडी छान रंग भरत होती. मोहन जोशी घनाचे वडील म्हणून पण शोभत होते. हे त्यामानाने विसंगत वाटतात. कुणाच्या ओळखीत असतील तर क्षमस्व.
दोन्ही काकू घनाला किती छान चिडवतात ना!!
राधाने घातलेला ओल्ड नेव्ही चा
राधाने घातलेला ओल्ड नेव्ही चा गुलाबी टी शर्ट गुंतता मधे पसु ने घातलेला होता बहुतेक
लग्न झाल्यावरही राधा नी घना
लग्न झाल्यावरही राधा नी घना तेच आधीचे जुने नाईटड्रेस वापरताहेत..............
अगदी अगदी साधना! एकवेळ
अगदी अगदी साधना! एकवेळ स्वप्नीलचे समजू शकते, जरा तरी वैविध्य आहे त्याच्या कपड्यांमध्ये. पण मुक्ता? तिला तोच तो एकच एक नाईट ड्रेस घालून कंटाळा नाही येत का? बघून बघून आपल्यालाच कंटाळा आलाय.
तिच्या आयुष्यात लग्नामुळे
तिच्या आयुष्यात लग्नामुळे काही बदल झाला नाहीये .....तिचं वाचन, तिचं जॉगिंग, तिचे कपडे वगैरे....
हेच तर दाखवायचय त्यांना..........त्यामुळे तिचा लखनवी आपल्याला पाठ होणं आवश्यक होतं ना...
ते साध्य झालं...
एसी आहे की घनाच्या
एसी आहे की घनाच्या खोलीत्....मग परत गिफ्ट म्हणून का बरं?
डब्याचे काय एवढे मोठेसे? विनयबाबा येईल ना सायकलवरून...
आणि रॉधॉ मारे जाईल हापिसात पण तो तिचा बॉस बरा येऊ देईल तिला? मानव खूष होणार असे दिसते आहे एकंदरीत्...आता क्.क्..किरन चालू करणार की काय?
एसी आहे की घनाच्या
एसी आहे की घनाच्या खोलीत्....मग परत गिफ्ट म्हणून का बरं?+१
मानवकडून घनाचा कान पिळून घेतला ना? राधाचा भाऊ आहे तो आता
(No subject)
Pages