Submitted by इब्लिस on 6 March, 2012 - 13:36
कांदा कैरीचा कुस्करा असा एक चविष्ट प्रकार मी जस्ट खाऊन संपवला आहे.
तुम्हा सर्वांना जळवण्यासाठी खाली फोटू टाकीत आहे.
आज (म्हणजे १२ वाजून गेलेत म्हणून) होळी.
होळी पेटल्याशिवाय थंडी संपत नाही. पण तरीही मी 'कैरी' घालून केलेली पाकृ खाल्ली हे तुम्हा सग्ळ्यांना जळवण्यासाठी इब्लिसपणे पोस्ट करतो आहे:
वरील फोटू मधे कांदा, कैरी व कोथिंबीर चिरून ठेवलेली दिसत आहे.
सकाळच्या ४-५ पोळ्या घेऊन मिक्सरमधे फिरवून 'कुस्करा' तयार करून घेणे.
त्यात, कांदा, कैरी, कोथिंबीर, तिखट मीठ व तेल इ. चवी प्रमाणे टाकून यथाशक्ती मिक्स करणे.
वर हवे असल्यास एक लोणच्याची फोड ठेवून
चरण्यास सुरुवात करणे..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
जळलं लक्षणं मेल्याचं........
जळलं लक्षणं मेल्याचं........ झक्कास रेसेपी
आम्ही या प्रकाराला "चटका" म्हणतो
यात कैरी नसल्यास ट्माटा टाकुन पण छान लागते. & उडिद पापड टाकला तर फारच छान.
मस्तच. यात तळलेले शेंगदाणे
मस्तच. यात तळलेले शेंगदाणे आणि कुस्करलेला उडदाचा पापड टाकुन खाल्ला तर स्वर्गच जणू.
छान. माझ्याकडून आपल्या
छान.
माझ्याकडून आपल्या मायबोलीकराना....होळीच्या शुभेच्छा...
.......
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
ह्म्म... काय बाई इब्लिस
ह्म्म... काय बाई इब्लिस मनुष्य आहे..
इब्लिस, थोडे भाजलेले शेंगदाणे
इब्लिस, थोडे भाजलेले शेंगदाणे वा घरी असलेले फरसाण वा लसुण चिवडा टाकला की अज्जुनच जळ्ळाउ
या ला तडका मारल्यास चुरमा
या ला तडका मारल्यास चुरमा होतो ना?
इब्लिस छान मस्त उपाय.
इब्लिस छान मस्त उपाय.
छानच रेसीपी रे...
छानच रेसीपी रे...
प्रत्येकाच्या घरी होणारी
प्रत्येकाच्या घरी होणारी आवडीची आहेच !
पुढील जळाऊ एपिसोडः आमच्या
पुढील जळाऊ एपिसोडः
आमच्या झाडाचा पहिला आंबा- बदाम आहे. पण कलमांपैकी पहिला हाच आला.
(गावठी आंब्याच्या एका झाडावर ५ वेगवेगळी कलमे आमच्या बंधूराजांनी केली आहेत. And i am proud to say, he has a 'green thumb')
ID चे नाव सार्थक केले अगदी.
ID चे नाव सार्थक केले अगदी. बाकी फोटु,पा.कृती आवडली.
छान
छान
नमस्कार. @सखाराम
नमस्कार.
@सखाराम गटणे
तुम्हाला मायबोलीवर येऊन चारच तास झालेत. आणि आल्याआल्या पहीला प्रतिसाद द्यायला, मायबोलीच्या ऐवढ्या लेखनातून तुम्ही हाच धागा का बरे निवडलात.:फिदी: कदाचीत स्वत:चा धागा, वर काढण्याचा उद्देश तर नव्हता ना तुमचा.:हाहा:
माझी माबोवरची पहिली पाकृ या
माझी माबोवरची पहिली पाकृ
या जेवायला.
उद्घाटनाची पाकृ झालेली आहे. जळाऊ म्हणजे शब्दशः घेतले असल्याने या बाफवर टाकलेले आहे. नाहीतर विचाराल काय संबंध ?
फोटो शेजारच्या काका काकूंकडून ( खरपूस वासामुळे आलेले ) आले आहेत. मोबाईल आडवा तिडवा धरतांना अँगल चुकले असतील तर समजून घ्यावेत. मुलीने भरपूर मदत केली (लुडबूड हा शब्द बरा वाटत नाही ). बाबा स्वतः काहीतरी करतोय म्हटल्यावर तिलाही जोर आलाच.
या पाकृसाठी मदत करणा-या भरत मयेकर, अल्पनातै, नी तै, दीमा , निनाद आणि सर्वांचे मनापासून आभार.
खरंच जळाऊ आहे ही पाकृ! स्मोकी
खरंच जळाऊ आहे ही पाकृ!
स्मोकी फ्लेवर्ड!
इब्लीसदा! हा असा बाजरीच्या
इब्लीसदा! हा असा बाजरीच्या शिळ्या भाकरीचा काला करायचा. आणि त्यात कैरीच्या लोणच्याचा खार + नागलीचा पापड चुरुन.... अहाहा!