Submitted by चिनूक्स on 4 April, 2012 - 07:13
आनंदवनातल्या रहिवाशांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे.
आनंदवनात 'स्नेहसावली' हा कुष्ठरुग्णांचा वृद्धाश्रम आहे. इथे साधारण ६५० ज्येष्ठ कुष्ठरुग्ण राहतात. शिवाय आनंदवनात मुकबधिरांसाठी व सुदृढ मुलांसाठी शाळा आहेत. आनंदवनातल्या या रहिवाशांसाठी सुसज्ज ग्रंथालय असावं, अशी इच्छा आहे.
यासाठी घरातली जुनी किंवा नवीन पुस्तकं देणगी म्हणून मिळू शकतील का? पुस्तकांना विषयाचं, किंवा वयोगटाचं बंधन नाही. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल.
आनंदवनासाठी पुस्तकं देण्याची इच्छा असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधा, किंवा या बाफवर लिहा.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमधून आपण पुस्तकं नेण्याची व्यवस्था करू शकू.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिनुक्स तुला मी कॉन्टॅक्ट
चिनुक्स तुला मी कॉन्टॅक्ट करते दोन दिवसांत.
माझ्या कडे पण आहेत पुस्तक .
माझ्या कडे पण आहेत पुस्तक . मेल करते.
कुठे पाठवू. कार्टन पण आहे.
कुठे पाठवू. कार्टन पण आहे. पत्ता इथे दिल्यास कुरीअर करेन. स्तुत्य उपक्रम.
इंग्रजी पुस्तके चालतील का? जुने काही दिवाळी अंक पण आहेत.
जागू, इन्ना, धन्यवाद
जागू, इन्ना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
अश्विनी,
इंग्रजी पुस्तकंही चालतील. आनंदवनाचे हितचिंतक मुंबईत आहेत. त्यांच्यामार्फत पुस्तकं आनंदवनात आपण पाठवू शकू. मी तुला उद्या फोन नंबर कळवतो. धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिनूक्स, माझ्या
चिनूक्स, माझ्या आजे-सासर्यांची व आजे-सासूबाईंची काही पुस्तके आहेत बहुदा घरात. आज विचारून उद्या सांगते.
माझ्या कडे पण दोन एक
माझ्या कडे पण दोन एक आहेत..... पत्ता सांगितल्यास पाठवेन.......
.
.
चिनुक्स..... एकाकडेच सगळ्यांनी पाठवुन त्या व्यक्तिच्याच मार्फत मायबोली तर्फे अश्या नावाने आनंद्वनाला पाठवलीत तर........?
कधीपर्यंत कळवायचे आहे??? काही
कधीपर्यंत कळवायचे आहे??? काही शेवटची तारीख आहे का? मी सध्या देशाबाहेर आहे म्हणून विचारतोय. आल्यावर माझ्याकडची काही पुस्तके देऊ शकीन.
सेनापती, शेवटची तारीख वगैरे
सेनापती,
शेवटची तारीख वगैरे काही नाही. तू परत आल्यावर मला कळव, मी फोन करतो तुला.
मलाही आवडेल मदत करायला.
मलाही आवडेल मदत करायला. संपर्क करते तुला लवकरच.
उत्तम... हे बरे झाले.. मी
उत्तम... हे बरे झाले.. मी तिथे आल्यावर बोलूच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिनुक्स तुम्हाला मासिके
चिनुक्स तुम्हाला मासिके वर्गणी संदर्भात विपु केली आहे..
>>. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ',
>>. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल.>>
याबद्दल अधिक माहिती मिळेल का? लहान मुलांसाठी अशी काही मासिके असल्यास त्याचीही माहिती द्यावी. मी लहान होते तेव्हा आमच्याकडे किशोर मासिक यायचे.
स्वाती२ +१
स्वाती२ +१
व्वा छान उपक्रम! मदत करायला
व्वा छान उपक्रम!
मदत करायला आवडेल. माझ्याकडे गड-किल्ल्यांची माहीतीपर पुस्तके आहेत ती दिली तर चालतील का?
स्वाती२, प्राची, लहान
स्वाती२, प्राची,
लहान मुलांच्या पुस्तकांबद्दल १ - २ दिवसांत सविस्तर लिहितो.
विजय आंग्रे,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नक्की चालतील. धन्यवाद.
चिनुक्स, तुझा नंबर हरवला मी.
चिनुक्स, तुझा नंबर हरवला मी. माझ्याकडे लहान मुलांची बरीच पुस्तकं आहे. अगदी चांगल्या अवस्थेत. मोठ्यांची परत परत वाचायला लागतात, त्यामुळे त्याच्या फोटो कॉपीज करुन देते मी. मला तुझा नंबर कळव किंवा कुठे पाठवायची तो पत्ता दे. एप्रिल मध्यापर्यंत मी ती पोचवु शकते.
चिनुक्स..... लागलीच कळवा की
चिनुक्स.....
लागलीच कळवा की पुस्तके कुठे आणि कशी पाठवायची. मी कोल्हापुरात असतो. तुमच्या धाग्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांची नावे आहेत. कोल्हापूर तशा कामासाठी यादीत असेल तर इथला पत्ता द्यावा. नसल्यास मार्ग सुचवावा.
अशोक पाटील
चिनूक्स, माहितीतील लोकांना या
चिनूक्स, माहितीतील लोकांना या धाग्याची लिंक देत आहे.
चिनुक्स... मस्त रे..
चिनुक्स... मस्त रे.. आनंदवनासाठी माझाही सहभाग..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याना कुठल्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतील ते कळव.. मासीकांच्या बाबतीत वरती एक दोघानी लिहले आहेच म्हणुन पुस्तके..माझ्या कडे असतीलच असे नाही पण नवीन पुस्तके घेउन देईन मी..
एक सुचना.. एकच पुस्तक दोघा तीघां मायबोलीकरांकडुन जायची शक्यता आहे.. तेंव्हा तु जर पुढाकार घेउन पुस्तके गोळा केलीस तर वेगवेगळी पुस्तके देता येतील..:)
मस्त उपक्रम, मदत करायची आहे..
मस्त उपक्रम, मदत करायची आहे.. मी भारतात नाहिये पण जर पुणे/मुंबई हुन पुस्तक न्यायची व्यवस्था होत असेल तर उत्तमच आहे.. नातेवाईंकां पैकी कुणाला तरी तुम्हाला संपर्क कयायला सांगते..
तुम्हाला मेल करुन डिटेल माहिती विचारते.
..अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल>> ह्या साठी पण मदत करायला आवडेल पण कशी करायची याबाबत जरा सविस्तर लिहाल का?
रत्नागिरीत कुणी येणारं असेल
रत्नागिरीत कुणी येणारं असेल तर त्याच्याकडे माझ्याजवळची पुस्तके देऊ शकेन. साधारण कुठल्या वयोगटासाठी पुस्तके हवी आहेत तेही सांगितलेस तर बरे होइल. माझ्याकडे सध्या लहान मुलांची पुस्तके खूप आहेत.
अजून एक सूचना: आनंदवनाचा पोस्टल पत्ता दिलास तर फ्लिप्कार्ट् अथवा मायबोली खरेदीमधून डायरेक्ट तिथे पुस्तके पाठवता येतील.
अशोक., कोल्हापुरातून पुस्तकं
अशोक.,
कोल्हापुरातून पुस्तकं कशी नेता येतील, याबद्दल तुम्हांला एकदोन दिवसांत सांगतो.
राम,
अगदी पाच वर्षांच्या विद्यार्थ्यापासून ते आजीआजोबांना आवडतील अशी कुठलीही पुस्तकं चालतील. विषयाचं बंधन नाही. एकाच पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रती झाल्या तरी हरकत नाही. ही पुस्तकं आपण हेमलकसा, सोमनाथ, झरीधामणी इथल्या प्रकल्पांवर पाठवू शकू.
माधुरी१०१,
आनंदवन
महारोगी सेवा समिती,
वरोरा
मु. पो. आनंदवन
व्हाया वरोरा - ४४२ ९०७
जि. चंद्रपूर
महाराष्ट्र
मोबाइल - 9822465834, 9922550006
फोन : +91 - 7176-282034, 282425
हा आनंदवनाचा पत्ता आहे. हल्ली बहुतेक सगळ्या मासिकांची वर्गणी ऒनलाइन पैसे भरून घेता येते. तसे पैसे भरून तुम्ही मासिके पाठवण्यासाठी आनंदवनाचा पत्ता देऊ शकता.
नंदिनी,
पत्ता वर दिला आहे. आणि अगदी लहान मुलांची पुस्तकंही चालतील. रत्नागिरीतून पुस्तकं कशी नेता येतील, हे तुला कळवतो.
अरुंधती,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.
ओक्के धन्यवाद
ओक्के धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार.पुस्तके पुण्यात
नमस्कार.पुस्तके पुण्यात कुठेपाठवायची?२४ अप्रिल नंतर चालतिल का?कारण त्या वेळेस पुण्यात येणार आहे.. पत्ता कळला तर पाठवण्या ची व्यवस्था करता येईल(पुण्यात).
चिनुक्स, मुंबईतून कुणी पुस्तक
चिनुक्स, मुंबईतून कुणी पुस्तक एकत्र नेणार आहेत का? नाहीतर वरच्या पत्त्यावर पाठवायला सांगेन तिथुन कुणाला....आणि तिथे कुठल्या वयोगटातली मुले आहेत याची पण माहिती देणार का म्हणजे त्या हिशेबाने नवी पुस्तके घ्यायला सांगता येईल.....आभार.
अभ्यासाची - सॉफ्ट्वेअरशी
अभ्यासाची - सॉफ्ट्वेअरशी रिलेटेड चालतील का ? पुण्यात कुठे पोचवावीत ?
चिन्मय खूप धन्यवाद. वा, या
चिन्मय खूप धन्यवाद. वा, या अभियानास फार छान उस्फुर्त प्रतिसाद आहे. याला आम्ही 'बाबा आमटे बाल सक्षमीकरण सहयोग' नाव दिले आहे. आम्हाला असे वाटते की आई बाबांना अपंगत्व किंवा कुष्ठरोग असल्या कारणाने या मुलांच्या संधी हिरावून जाऊ नये. आमची मुकबधीर मुले फार सुंदर चित्रे काढतात. त्याची एक झलक या लिन्क वर मिळू शकेल .
हा मुकबधीर व सामान्य मुले यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेत मुकबधीर व जिल्हा परिषद शाळेची मुले होती. यात मूक बधीर जवळपास सर्व पारितोषिके जिंकली आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास फार वाढला. आता जिल्हा पातळीवर हा उपक्रम राबवायचा आहे. तशीच पुढे अंध व सामान्य मुलांच्या गाण्याच्या स्पर्धा घेऊ. अंधांसाठी ब्रेल पुस्तके , गाणी व audio cds चालतील. मूक बधीराना चित्रे खूप आवडतात व समजतात. तसेच क्राफ्ट ची पुस्तके, मुख्यत: शिवणकाम, भरतकाम आणि विणकाम ही शाळेत फार उपयोगी पडताअ यांच्याकडून अतिशय सुंदर पुस्तके आली आहेत. वाचू आनंदे -४ भाग, संपूर्ण फास्टर फेणे , बोक्या सातबंडे व शेरलोक होम्स. मस्त पुस्तके आहेत ही. त्यांना खूप खूप धन्यवाद.
अजून आम्हाला वय सहा व त्याखालील पुस्तके , खेळ व Intellectually stimulating मटेरीअल, चित्रकला साहित्य हवे आहे. त्या वयातील सुमारे ६० मुले आम्ही नव्याने सुरु केलेय पाळणाघरात आहेत. हा उपक्रम मुलांना फारच आवडला आहे आणि त्यामुळे त्यांच्या mile stones मध्ये बराच फरक दिसतो आहे . अधिक माहितीसाठी पाळणाघराची मुख्य सारिका (९०११०९४६०४) हिच्याशी संपर्क करावा. ती सविस्तर या उपक्रमाबद्दल सांगेल. तुमच्या घरातील मुलांची खूप अशी जुनी पुस्तके निघू शकतात.
माझे वडील डॉ. विकास (vikasamte@gmail.com) बऱ्याचदा पुण्यात आणि ठाण्यात येतात तेव्हा हे साहित्य इकडे आणल्या जाऊ शकते. चिन्मय पुण्यात आणि सुयोग मराठे (suyog9525@yahoo.co.in) मुंबईत हे काम छान बघू शकतील.
आमच्याकडे मुलांसाठी अश्या बऱ्याच छान छान योजना आहेत. त्याबद्दल सविस्तर लिहीन कधीतरी. मी महिन्यातील Reader's Digest , OPEN magazine , Heritage India MTDC अंक आणि बहुतेक The Economist मध्ये आनंदवनातील नव्या उपक्रमांची माहिती असेल. ज्यांना अजून जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी माझाशी संपर्क करावा. माझा इमेल sheetalamte@gmail.com.
अशोक जी, तुमचा नंबर कळवावा.
अशोक जी,
तुमचा नंबर कळवावा. कोल्हापुरात आमचे काही मित्र आहेत. डॉ रवींद्र ओबेरॉय जे नेहमी कपडे पाठवतात.
चिनुक्स संपर्कातुन ईमेल केले
चिनुक्स संपर्कातुन ईमेल केले आहे. कृपया 'junk' पण पहा.
चिनूक्स अत्यंत स्तुत्य
चिनूक्स
अत्यंत स्तुत्य उपक्रम!
अभिनंदन
नाशिकहून कशी पाठवायची?
Pages