आनंदवनातील ग्रंथालयासाठी पुस्तकं हवी आहेत

Submitted by चिनूक्स on 4 April, 2012 - 07:13

आनंदवनातल्या रहिवाशांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे.

आनंदवनात 'स्नेहसावली' हा कुष्ठरुग्णांचा वृद्धाश्रम आहे. इथे साधारण ६५० ज्येष्ठ कुष्ठरुग्ण राहतात. शिवाय आनंदवनात मुकबधिरांसाठी व सुदृढ मुलांसाठी शाळा आहेत. आनंदवनातल्या या रहिवाशांसाठी सुसज्ज ग्रंथालय असावं, अशी इच्छा आहे.

यासाठी घरातली जुनी किंवा नवीन पुस्तकं देणगी म्हणून मिळू शकतील का? पुस्तकांना विषयाचं, किंवा वयोगटाचं बंधन नाही. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल.

आनंदवनासाठी पुस्तकं देण्याची इच्छा असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधा, किंवा या बाफवर लिहा.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमधून आपण पुस्तकं नेण्याची व्यवस्था करू शकू.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, स्तुत्य उपक्रम. लवकरच तुम्हाला संपर्क करते. (विपुतून)

ठाण्यात ज्या परीसरात मी राहाते तेथे आम्ही वाचक कट्टा हा उपक्रम सुरु केला आहे, तेथे ही बरीच पुस्तके आहेत. माझ्या घरा व्यतीरिक्त तेथूनही काही मदत होते का ते बघते?

साधारण पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत माझ्या कडची पुस्त्के तयार असतील

तसेच मे महिन्यात एखाद्या आठवड्याच्या शेवटाला लहान मुलांना घेऊनच गेलो तर आनंदवनात? माझी एक कल्पना --- बघु कसे जमते ते?

संबधित ह्या विषयी काही माहिती देतील का?

डॉ.शीतल....

तुम्ही दिलेला या विषयावरील प्रतिसाद आत्ता वाचायला मिळाला. कोल्हापूरचे रविन्द्र ओबेरॉय यांच्या बिंदू चौकातील क्रिडा दुकानात वेळोवेळी जायला मिळतेच.

तुम्हाला याच संदर्भात स्वतंत्र मेल केला आहेच.

[तुमच्या बाबाना.....डॉ.विकास आमटे....याना मी त्यांचे जळगांवचे चित्रकार मित्र जयंत पाटील यांच्यामाध्यमातून ओळखतो. डॉ.विकास आमटे यानी लेखक जी.ए.कुलकर्णी यानी जी पत्रे लिहिली होती ती माझ्याकडेच त्यानी पाठविली, जी मी स्वतंत्ररित्या नंतर धारवाडला पाठविली.....असो.]

अतिशय छान उपक्रम.
पुण्यात कुठे पुस्तके पाठवायची? किंवा कोणाला द्यायची? आणि कधीपर्यंत?
मला पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक मिळेल का? आणि तो मी माझ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना दिला तर चालेल का?

गेले एक-दोन महिने जरा व्यक्तिगत अडचणींमुळे वर प्रतिसाद दिलेल्यांशी संपर्क साधू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. Sad

एकदोन दिवसांत सर्वांना मायबोली संपर्कातून माहिती कळवतो.
धन्यवाद.

नविन पुस्तके विकत घेऊन, देणगी म्हणून पाठवायची असतील तर मायबोलीवरची खरेदी सुविधा वापरून तुम्ही पोहोचवण्याचा पत्ता आनंदवन इथला देऊ शकता. काही मायबोलीकरांनी ही सुविधा वापरून पुस्तके पाठवली आहेत. त्यामुळे पुस्तके मिळवणे, ती पॅक करून पोहोचती करणे ही सगळी कामे खरेदीच्या सुविधेतर्फे होतात.
http://kharedi.maayboli.com

धन्यवाद वेमा Happy

नवीन पुस्त़कं वर वेबमास्तरांनी लिहिलं आहे, त्याप्रमाणे आनंदवनात लगेच पोहोचतील. शिपिंग मोफत आहे.
जुन्या पुस्तकांसाठी मी इमेल करतो.

धन्यवाद वेबमास्तर. Happy
एक शंका आहे.
मी काही पुस्तके पाठवली आणि ती जर आधीच उपलब्ध असतील ग्रंथालयात तर काय करायचे? म्हणजे आधीच ७/८ कॉपीज आहेत एका पुस्तकाच्या आणि परत एक मी पाठवले तर???? का तसे चालणार आहे?

तिथे असलेल्या पुस्तकांची यादी वगैरे देता येईल का इथे/मेलमध्ये? म्हणजे आम्हांला पाठवण्यासाठी पुस्तके निवडताना सोयीचे पडेल.

प्राची,
तशी यादी देणं आनंदवनाचा पसारा बघता शक्य नाही. शिवाय एका पुस्तकाच्या अनेक प्रती झाल्या तरी चालतील, कारण उपक्रम अनेक आहेत. हेमलकशाला जास्तीच्या प्रती पाठवता येतील.

चिन्मय मला दर वर्षी ऑफिसमधुन लघुलेखन आणि टंकलेखन च्या स्पर्धेत दोन हिंदी पुस्तके चांगल्या लेखकांची नंबर काढल्याने बक्षिस मिळतात. सध्या माझ्याकडे अशी चांगली चांगली १०-१५ तरी पुस्तके आहेत. ती हिंदी पुस्तके मी तिथे पाठवू का ?

हे आत्ता वाचलं. कसं सुटलं नजरेतून माहित नाही. माझ्याकडची सरप्लस पुस्तकं- इंग्रजी आणि मराठी/मासिके/दिवाळी अंक (सगळी उत्तम अवस्थेत) मी तीनचार दिवसांमधे काढून ठेवू शकते. पुढे काय, कसे पाठवायची प्रोसिजर आहे?

Pages