Submitted by सायो on 28 March, 2012 - 16:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दुधी, फेटलेलं दही, भाजून कुटलेलं जिरं, हिरव्या मिरच्या, फोडणीकरता तूप, जिरं, हिंग, वरुन कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट.
क्रमवार पाककृती:
दुधीची सालं काढून चौकोनी फोडी करुन घ्याव्यात. कुकरला अगदी कमी पाण्यात घालून १ शिट्टी करुन घ्यावी. (मायक्रोवेवला शिजवल्यास १० मिनिटं). शिट्टी पडली की फोडी चाळणीत घालून निथळून घ्याव्यात.
कुकरचं काम सुरु असताना एकीकडे चमच्याने दही फेटून घ्यावं. जिरं भाजून घेऊन कुटून ताजी जिरपूड दह्यात घालावी. वरुन फोडणी घालावी. हिरव्या मिरच्या हव्यात तर दह्यात घालाव्यात किंवा फोडणीत घालाव्यात. चवीप्रमाणे मीठ, साखर, हवं असल्यास किंचित लाल तिखटही घालावं. निथळलेल्या दुधीच्या फोडी घालून मिक्स करुन घ्यावं. वरुन कोथिंबीर घालावी व फ्रिजमध्ये गार होण्याकरता ठेवावं.
वाढणी/प्रमाण:
हवं असेल तसं. नुसता खायलाही छान लागतो.
माहितीचा स्रोत:
मैत्रीण
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो?????????????
फोटो?????????????
अरे देवा, फोटो काढेपर्यंत धीर
अरे देवा, फोटो काढेपर्यंत धीर कुणा ला? आम्ही तर नुसतंच ओरपलं.
दुधीत पाणी न घालता शिजवते मी.
दुधीत पाणी न घालता शिजवते मी. आणि झाल्यावर फोडी किंचित कुस्करुन घेते, पूर्ण मॅश नाही पण जस्ट एकजीव झाल्यासारखं करते.
फोटो असला की लगेच करुन खावसं
फोटो असला की लगेच करुन खावसं वाटतं ग


म्हणजे माझ्या केस मध्ये लगेच आईला करुन दे अस सांगावस वाटतं गं
प्रिया, 'आईला करुन दे' असं
प्रिया, 'आईला करुन दे' असं सांगण्याची सवय पुढे बरेचदा 'टडोपा' आणते हे लक्षात असु दे!

सायो, अशाच प्रकारे मी भोपळ्याचं रायतं करते आता दुधीचं करुन बघते!
मी पण लाल भोपळ्याचेच करत
मी पण लाल भोपळ्याचेच करत असतो.
आता दुधीचे करुन बघीन.
मी पण दुधीचे जवळपास असंच
मी पण दुधीचे जवळपास असंच रायतं करते. भाजून कुटलेलं जिरं घालत नाही, मात्र थोडं मेतकूट घालते. छान लागतो तो फ्लेवर.
अरेवा. हे वेगळे आहे जरा. मी
अरेवा. हे वेगळे आहे जरा. मी मागे तुला सांगितले होते तसे केलेस का रायते?
आई करते असंच दुधीचं आणि लाल
आई करते असंच दुधीचं आणि लाल भोपळ्याचं भरीत. खूप मस्त लागतं. भाज्यांपेक्षा हेच जास्त आवडतं.
सासरी लाल भोपळ्याचं मोहरी फेटून रायतं करतात, ओरिया का कायतरी म्हणतात त्याला. दुधीचं मात्र टिपिकल पंजाबी पद्धतीचं रायत करतात. ते मात्र कंटाळवाणं लागतं.
केल व खाल्ल पण. मवा म्हणते
केल व खाल्ल पण.
मवा म्हणते तस पाणी न घालता शिजवल्या फोडी आणि एकदा चॉपर मधून काढल्या.
मस्त लागत होत एकदम चपातीबरोबर.
बस्के, तुझी रेसिपी काय होती?
बस्के, तुझी रेसिपी काय होती? तू आणि प्रॅडी बहुतेक दाण्याचं कूट घालून म्हणाला होतात का? तर ते न घालता केलं. खाल्ल्यावर त्याची गरज होती असं वाटलंच नाही.
मस्त आहे.. मी लाल भोपळ्याचे
मस्त आहे.. मी लाल भोपळ्याचे करते... आता हे करुन बघीन.:)
प्रिति१+१. सायो दुधीचे नव्हते
प्रिति१+१.
सायो दुधीचे नव्हते केले कधी. पाहते इथे मिळाला तर. धन्यवाद.
माझ्या साबा कोहाळाच असा रायता
माझ्या साबा कोहाळाच असा रायता करतात.
सायो, मी भाजलेलं जिरं आणि लाल
सायो, मी भाजलेलं जिरं आणि लाल तिखट न घालता अशाच पद्धतीने बनवते दुधीचा रायता. आता हे ही घालून बनवून बघेन. भाजलेल्या जिर्याची खरपूस चव येत असेल ना रायत्याला?
फोटो मात्र टाकायला हवा होता...
होय सानी. भाजून कुटलेल्या
होय सानी. भाजून कुटलेल्या जिर्याची मस्त खमंग चव येते रायत्याला. मी मैत्रिणीकडे खाल्ला तेव्हा पहिल्यांदा दुधी आहे हे ही लक्षात आलं नाही. फक्त जिर्याची चव लक्षात मात्र राहिली. लाल तिखट ऑप्शनल समजलं तरी चालेल. ज्यांना मिरच्यांचा तिखटपणा नको असेल त्यांनी तिखट घालावं थोडं.
फोटो पुढच्या वेळी नक्की काढेन. दिसायला दह्यातल्या काकडीच्या कोशिंबीरीसारखंच दिसतं.
सायो, माझा आवडता पदार्थ आहे
सायो, माझा आवडता पदार्थ आहे हा! पोळी / फुलक्यासोबत किंवा नुस्तंही ओरपायला छान लागतं. पुण्यातल्या कृष्णा डायनिंग हॉल मध्ये ह्यात दह्याऐवजी चक्का असतो. तो प्रकारही यम्मी लागतो. फेटलेला चक्का + मोहरी पूड + मिरपूड + चवीप्रमाणे मीठ, साखर + वाफवलेला दुधी. (हव्या असल्यास इतर वाफवलेल्या भाज्या : फ्लॉवर, घेवडा, मटार, बटाटा, लाल भोपळा इ. इ.) चक्क्याऐवजी दही वापरू शकतो.
मी पण पाणी न घालता वाफवते आणि
मी पण पाणी न घालता वाफवते आणि दही अगदी अर्धा चमचा किंवा नाहीच घालत. मृण/मेधाने ढबु मिरची रायत्याची कृती दिली होती साधारण तसच करते.
ते जास्तीचं पाणी पराठ्याची कणिक** भिजवताना वापरावं किंवा वरणात/आमटीत ढकलावं अशा टिप्स आल्या नाहीत का अजून ?
** नॉट टु मेन्शन, बोटभर गाजराचा तुकडा किसुन....इ
झकास! भाजकं जिरं घातलं नाही
झकास! भाजकं जिरं घातलं नाही कधी. आता घालून बघते.
दुधीच्या मोठ्या फोडी मिर्चीचा ठेचा लावून मुरवायच्या, ग्रिलवर भाजायच्या आणि मग दही घालून सायोच्या रेस्पिचं रायतं करायचं. मस्तं लागतं.
सिंडी, मृ, ग्रील करुन मस्तच
सिंडी,
मृ, ग्रील करुन मस्तच लागत असणार.
सायो , माझ्या रेसीपीत मी
सायो , माझ्या रेसीपीत मी दाण्याचा कूट घालते व भाजून जिरेपूड वगैरे नाही. फक्त फोडणीत जिरे,मिरच्या हिंग घालते.
सायो, दुधीच्या फोडी तशाच
सायो, दुधीच्या फोडी तशाच घालायच्या का गं.. की किसून? आज करणारे. जमलं तर फोटो टाकेन.
दुधीच्या फोडी चौकोनी चिरुन.
दुधीच्या फोडी चौकोनी चिरुन. किसू नकोस. जिरं अगदी छोटा चमचाभरचा भाजून कुटून घे. दह्याला वास लागण्याइतपतच. पुन्हा तुपाच्या फोडणीत हवं आहेच.
ओक्के... आज करेगा.
ओक्के... आज करेगा.
मस्त..हे दुधीसाठीपण करता येतं
मस्त..हे दुधीसाठीपण करता येतं हे मला माहीत नव्हतं..साधारण असंच मी लाल भोपळ्याचं केलंय..पण लाल भोपळा बहुतेक मला आवडतच नाही.....आता दुधीचं रायतं करून पाहीन...फ़ोटो असला असता तर आणखी मजा आली असती...
माझा आवडता पदार्थ. पण
माझा आवडता पदार्थ. पण भाजलेल्या जिर्याची पूड ही नवीन अॅडिशन. विचारानेच तोंपासु
सायो, मसस्त झाला होता रायता.
सायो, मसस्त झाला होता रायता. फोटो राहिलाच.. कारण लेगच चेपला.
दुभो ची भाजी इतकी बोअर होते, की हा छान ऑप्शन मिळाला.. ठंकू.
मी ही काल योगायोगाने केला
मी ही काल योगायोगाने केला होता. फोटोही काढलाय पण नंतर टाकेन इथे.
ह्या वेळेपेक्षा गेल्या वेळचा जास्त छान होता असं साबांचं मत पडलं
मस्त आहे पाककृती,सायो. नक्की
मस्त आहे पाककृती,सायो. नक्की करुन बघणार.
भाजलेली जिरेपूड केळाच्या कोशिंबीरीतपण छानच लागते. केळ मात्र पुर्ण पिकलेले घ्यावे.
मी पण असंच करते पण फोडी ऐवजी
मी पण असंच करते पण फोडी ऐवजी जाड किसणीवर किसून मावेत ३ मि. ठेवते. दुधी ज्यांना आवडत नाही त्यांनी पण खाल्लं. नुसत खायलाही छान लागतं.
Pages