एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेंडीच्या भाजीत लसूण >> घालतात की. आपल्या प्र९ ची रेस्पी आहे ना इथे Proud
स्वप्नीलची मी पण फॅन Happy मुक्ता उलट त्याच्यापुढे कमी पडते कधीकधी असं वाटतं. कुहूचं पात्र इरिटेटींग आहे पण स्पृहा मस्त काम करते.

कोण म्हणतंय मुक्ता कमी पडतेय म्हणून?

कालच्या भागात प्रचंड राग येऊनही तो बाहेर काढता येत नाहिए या कात्रीत सापडल्याचा अभिनय मस्त केला तिने. पण असा प्रसंग आधीही एकदा आला होता : नाशिकला जाताना मोटार बंद पडली तेव्हा.
-----
कधी कधी देवकीबाईही कुहूसारख्याच वागत असतात
-----
राधा म्हणते मी वळकटीवर झोपले होते. वळकटी म्हणजे काय ते मनस्विनी, मुक्ता, इ. मंडळींना कोण सांगेल?
-----
खोट्या गोष्टी नायक-नायिकेच्या लग्नाशी थांबतात; तर खरी गोष्ट लग्नानंतर सुरू होते.

ए हो बिल्वा? करुन पाहिली पाहिजे एकदा तशी भाजी मग. Happy

भरत+१.
मुक्ताची जुल्फे बंद झाल्यापासून आपुन फॅन. मस्त करतेय ती.

मला हल्ली लीना भागवतचेही (सुप्रियाकाकु)कौतुक करावेसे वाटते. सहज असते ती. साध्या साध्या प्रसंगातून नेमकी. राधा बाहेर सगळ्यांबरोबर झोपली असते, घना येऊन तिला हाक मारतो आणि काकुला मारलीये असं दाखवतो त्यात तर सुप्रियाकाकु परफेक्ट झोपेतून उठल्यासारखी दिसते. केस,मंगळसूत्र एका बाजूला वगैरे. असे कितीतरी प्रसंग निघतील.

या मालिकेमुळे स्वप्नील सहन होऊ शकतो, आवडुही शकतो आटोक्यात राहिला तर हा इतका मोठा आश्च्यर्याचा धक्का आहे. Happy

रैना आख्ख्या पोस्टला अनुमोदन.
सुप्रियाकाकू मलाही खरी वाटते. बाकी घनाची आई आणि ती दुसरी काकू म्हणजे नगच आहेत!

घनाची आई कधी कधी जोकर वाटते. सुप्रियाकाकू खरंच मस्त. घना भयानक आळशी गोळा आहे. त्याला सतत झोपताना बघायला प्रेक्षकांनाही त्रास होऊ लागला आहे आता. तसंही त्यांच्या घरातले माऊली सोडला तर बाकी सगळेच पुरुष दिवसभर टीपीच करत असतात एकंदरीत.

या मालिकेमुळे स्वप्नील सहन होऊ शकतो, आवडुही शकतो आटोक्यात राहिला तर हा इतका मोठा आश्च्यर्याचा धक्का आहे. >>>>> रैना, किती नेमकं(नेहमीप्रमाणेच Happy ) अनुमोदनच Happy

हो हो सुप्रिया काकू बद्दल अनुमोदन. लीना भागवत आमची गाववाली Happy
सुप्रिया काकूचा नवरा मटार सोलायला बसतो, घनाचा व्हिडियो क्लिप पराक्रम कळतो तेव्हा भांडणाच्या खुमखुमीचा प्रसंग मस्त रंगवलेत. दुसर्‍या प्रसंगातले संवाद पण छान होते.

क्या स्वप्निल का स फटा हुआ है? शब्दारंभीच्या 'स'त 'श'चा भास होतो.

क्या स्वप्निल का स फटा हुआ है? शब्दारंभीच्या 'स'त 'श'चा भास होतो.>>>> प्रचंड अनुमोदन.

वो 'स' को 'श' बोलता है Proud

घना जेंव्हा राधाची माफी मागण्याचं नाटक करतो- तेंव्हाचे राधाचे वागणे, त्यालाच उलट धीर देणे, दिलासा देणे, तो प्रसंग आवडला. मुक्ताचा त्या दृश्यातला अभिनय छान होता. Happy

मलाही लीना भागवतचं काम आवडतंय Happy . मंजूषा दातार ( कुहूची आई ) मात्र कॉमेडीपेक्षा सिरीयस रोल्समध्येच मला आवडते असा साक्षात्कार झालाय Proud

मुक्ता मनापासून आवडत असली तरी ती काही ठिकाणी अवघडलेली / काही ठिकाणी कृत्रिम वाटतेय . तिचं टीव्ही वरचं हे पहिलंच काम का ? तसं असेल तर मी तिला अजून एक संधी देईन Proud

स्वप्निल रॉक्स !!! त्याच्या कामात अशक्य ईझ दिसतेय Happy . त्याची पंखा होण्याच्या मार्गावर आहे मी Wink .

मुक्ता मनापासून आवडत असली तरी ती काही ठिकाणी अवघडलेली / काही ठिकाणी कृत्रिम वाटतेय .>>

मयेकर हेच्च म्हणायचं होतं मला Happy मी कमी पडतेय असं म्हणलं न ते हे असं काहीसं सांगायचं होतं Happy
स्वप्नीलची सहजता पटकन जाणवते अनेक प्रसंगात.

थँक्स , संपदा Happy

मुक्ता अग्नोहोत्र मधे होती की ! मस्त काम केलं होतं त्यात. एक डाव धोबीपछाड पासून लै म्हणजे लैच आवडली.
आजच्या भागात कुहुचं दर्शन झालं नाही Proud
सुप्रियाकाकु चांगली रंगवलीये भागवत बाईंनी.

मुक्त बर्वेची टीव्हीवरची एन्ट्री मला वाटतंय पिंपळपान मधून झाली आहे. पिंपळपान मधल्या एका भागातील नायिकेच्या लहान बहिणीचा रोल होता तिला. खूप लहान (व जाड) होती तेव्हा ती. Happy

आजचा भाग मस्त होता... घना मस्त प्रत्येकवेळी सॉरी बोलत होता ते पण आरती सकट Happy

मुक्त बर्वेची टीव्हीवरची एन्ट्री मला वाटतंय पिंपळपान मधून झाली आहे. >> हो. पिंपळपान - आवर्तन

Rajawade Maabo vachtat ki kaay? >>> हो प्राची. मलाही असंच वाटतं...
१. अन्यथा राधाची ओढणी आणि सलवार यांचं मॅचिंग कसं काय झालं अचानक? किती सुखावह बदल... धन्यवाद हो राजवाडे! आता ती राधाची पर्स कम बॅग सुद्धा बदला हो!!!! उपकार होतील आमच्या डोळ्यांवर. Happy

२. घनाचं युएस प्रकरण म्हणजे बिरबलाच्या (राधा शेखचिल्लीच्या म्हणाली जे घनाने करेक्ट केलं) खिचडीसारखी कधीही न घडणारी गोष्ट आहे, हे राधा म्हणाली आणि त्याला एक कॉल आल्याचं त्याने तिला सांगितलं. (अर्थात हा मात्र स्क्रिप्ट्चा भाग असू शकतो.)

----------
घनाने आईच्या डोळ्यातले भाव वाचून तिची अपेक्षा राधाला सांगितली, तो प्रसंग गोड होता. ते संवाद आवडले.

मात्र मुलं, पुरुषमंडळींना आयतं जेवण, चहा, नाश्ता आपण देतो. आपल्याला त्यात काहीच गैर वाटत नाही. मात्र हीच गोष्ट मुलगी, सुन वगैरेंच्या बाबतीत आपल्याला लगेच खटकते. त्यामानाने घनाच्या घरची मंडळी अगदीच आधुनिक विचारांची आहेत. सासूसुद्धा खुपच समजूतदार आहे. Happy

<<मुक्ता मनापासून आवडत असली तरी ती काही ठिकाणी अवघडलेली / काही ठिकाणी कृत्रिम वाटतेय .
स्वप्निल रॉक्स !!! त्याच्या कामात अशक्य ईझ दिसतेय>>

मला वाटतं राधा आणि घना या दोन्ही पात्रांची(कॅरॅक्टर्स) स्थितीही अशीच आहे. नुकतेच लग्न ठरलेल्या/ लग्न करून नव्या घरी गेलेल्या मुलीची स्थिती अवघडलेली, त्यात खोट्या लग्नाचा कृत्रिमपणा.
घनाच्या परिस्थितीत तसा काही फरक पडला नव्हता अजून. आताच त्याला आपली गोची कळू लागलीय.

काल घनाने घरून आणलेला डबा सोबत्यांना देऊन नॉन-व्हेज पिझ्झा मागवला. राधाने घरी अंडा भुरजी करून आणण्यावरून गहजब झाला होता तेव्हा त्याने आपण बाहेर सर्रास नॉन-व्हेज खातो हे सांगितले होते का? तेव्हा तर भूकंप झाल्यासारखी प्रतिक्रिया दिली होती.

मुर्खपणा कसा करु नये याचे मुर्तिमंत उदा. म्हणजे कुहु........ मुर्ख इतकी असु शकते ....?>>>>>>>>>> का रे उद्य...मला तर कुहु आवडते बाबा...लाऊड पन तरीही चांगली करते ती वेडेपणा Happy
अस्ताता आनि काही काही मुली इतक्या निरागस (मुर्ख?) Happy

राधाने घरी अंडा भुरजी करून आणण्यावरून गहजब झाला होता तेव्हा त्याने आपण बाहेर सर्रास नॉन-व्हेज खातो हे सांगितले होते का? तेव्हा तर भूकंप झाल्यासारखी प्रतिक्रिया दिली होती.>>>>> सांगितले होते. सगळेजण खातात..पण घराबाहेर...घरात कोणीही नॉन्व्हेज आणत नाही असं सांगितलं होतं त्यानी.

<< नुकतेच लग्न ठरलेल्या/ लग्न करून नव्या घरी गेलेल्या मुलीची स्थिती अवघडलेली, त्यात खोट्या लग्नाचा कृत्रिमपणा.

भरतजी , तिचं काही ठिकाणी अवघडलेपण / कृत्रिमपण खरंतर सुरुवातीपासूनच जाणवतंय Happy . लग्न झाल्यावरचं असतं तर नक्कीच समजू शकले असते Happy

मुक्ता मला ह्या मालिकेपेक्षा चित्रपटांमध्येच जास्त आवडते. ही मालिका पाहत असतांना मुक्ता एक दिवस पूर्णपणे आवडेनाशी होईल की काय? असे वाटते.

अगदी अगदी अंजली... अगं तिचा आघात (http://www.umovietv.com/ShowDetails.aspx?MovieId=833) सिनेमा पण पहा. एका डॉक्टरची भूमिका निभावलीये तिने. कित्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्ती छान काम केलंय...
.... आणि इथे कुठल्या विश्वात असते ती, कुणास ठाऊक...

घनाने आईच्या डोळ्यातले भाव वाचून तिची अपेक्षा राधाला सांगितली, तो प्रसंग गोड होता. ते संवाद आव>> अगदी सानी!
राधा तयारी करते असं म्हणते आणि आत जाते तेव्हा इला भाटेंचे एक्स्प्रेशन्स, विवेक लागूंनी त्यांच्या मनातले ओळखणे.. तो सगळा प्रसंगच फार सुंदर झाला.

घनाने आईच्या डोळ्यातले भाव वाचून तिची अपेक्षा राधाला सांगितली, तो प्रसंग गोड होता. ते संवाद आव>> अगदी सानी! +१
बिल्वा +१

मुक्ता आवडायची ती आता नावडायला लागली आहे. राजवाडे आपल्या नेहमीच्या रस्त्यावरुन चालले आहेत.
>> + १०००००००

Pages