Submitted by पुरंदरे शशांक on 27 March, 2012 - 06:10
हात घेउनी हातात
वाट चाललो कितीक
स्मरे आजही सुगंध
मेंदी खुललेला हात
उन्हातानात फिरलो
चांदण्यातही फिरलो
हात असाच हातात
नाही कधी दुरावलो
थोडे गोड थोडे कटू
किती आठवावे क्षण
खांद्यावर पाठीवर
हात निवाराया व्रण
हात गुंफले हातात
मन गुंतले मनात
दोन पायी एकवाट
सूर- ताल एकसाथ
एकटाच हालताना
हाता जाणवे पोकळी
सखे पुन्हा कधी भेटी
पुन्हा कधी हातमिठी.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
रचनेत सुधारणा आवश्यक. मात्र
रचनेत सुधारणा आवश्यक. मात्र कल्पना अप्रतिम
हातात हात गुंफून केलेला
हातात हात गुंफून केलेला प्रवास सहज उलगडलाय.... छान.
आणि अष्टाक्षरी वृत्त व्यवस्थित सांभाळलं गेलंय.
आवडली.........
आवडली.........
छान आहे. पैलू पाड अजून.
छान आहे. पैलू पाड अजून.
>>हात गुंफले हातात मन गुंतले
>>हात गुंफले हातात
मन गुंतले मनात
दोन पायी एकवाट
सूर- ताल एकसाथ >>>> व्वा.
आवडली.
मस्तं....
मस्तं....
छान आहे.
छान आहे.
थोडे गोड थोडे कटू किती
थोडे गोड थोडे कटू
किती आठवावे क्षण
खांद्यावर पाठीवर
हात निवाराया व्रण
श्ब्द चागले आहे
कवीताने मन हसते नाहि का
कवीताने मन हसते नाहि का
एकटाच हालताना हाता जाणवे
एकटाच हालताना
हाता जाणवे पोकळी
सखे पुन्हा कधी भेटी
पुन्हा कधी हातमिठी.......>>
वा वा
मस्तच