Submitted by प्रिया on 27 March, 2009 - 16:15
एखाद्या मराठी गाण्याचे शब्द हवे आहेत? प्रथम मराठी गाणी माहिती आगार (Database) इथे ते गाणे आहे का शोधा. तिथे नसेल तर इथे त्या गाण्याची जितकी माहिती तुमच्याजवळ असेल तेवढी लिहा, जेणेकरुन गाणे शोधून लिहीणार्याला थोडी मदत होईल. मात्र इथे कृपया गाणे ध्वनी स्वरुपात मागू नये. मिळतील तसे गाण्याचे शब्दच फक्त आगारात लिहीले जातील. लिहीणारे सगळेच हौशे/ नवशे असल्याने थोडा विलंब झाला तर समजून घ्यावे ही विनंती...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिहीणारे
लिहीणारे सगळेच हौशे/ नवशे असल्याने
>>>> म्हणजे काय? तू लिहिणार नाहीयेस की काय! (आणि किती दिवसांनी दिसलीस मायबोलीवर?!)
मीही
मीही लिहीते आहे म्हणून तर हौशे म्हटलं ना? श्या - गाणं कोणी टाकलं तेही दाखवलं असतं तर कळलं असतं आज दिवसभर मी काय करते आहे ते. आणि 'नवीन' चा झेंडा पाहून आले, लगेच कुणीतरी मागणी केली की काय म्हणून तर तू माझेच पाय...
मस्तच
मस्तच प्रिया.. कोणी गाणं टाकलं हे ही दाखवता आलं तर बरं होईल ना?
प्रिया वा
प्रिया वा बाकी कोणीही, श्रीधर फडकेंनी एका कार्यक्रमात गायलेलं एका गाण्याचे शब्द मला हवे आहेत. हे गाणं मी ब-याच दिवसांपासून शोधत्ये. हे गाण कोणाच्या आवाजात रेकॉर्डेड आहे हे माहीत नाही. पण संगीत श्रीधर फडके यांचच आहे. चित्रपटाच नाव लक्ष्मिबाई भरतार , आणि सुरवातिच्या ओळीचे शब्द -- भरून भरून आभाळ आल्ंय भरून भरून.
भरून भरून
भरून भरून आभाळ आलंय
भरल्या वटीनं जड जड झालंय
शकुनाचा आला वारा
माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला मातीचा सोयरा
(तुला चिंचा बोरं देऊ का ही देऊ का ही गं?
काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं)
पान पानाला सांगून जाई
कळी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता फळ आलं मोहरा
भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाही गं
(सई साजणी साजणी )
कशी इकडचं घेऊ नावं
माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा
(बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं
तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं)
तट तटाला झोका देई
पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई? जाई की मोगरा?
(टपटप टपटप..)
टपटप टपटप..
लप पोरी लप पोरी घरात लप
जप पोरी जप जीवाला जप
राहू आत जाऊ, कुणी बाई सावरा
श्यामली, मला वाटतं हे अनुराधा पौडवाल यांनी गायलंय. चूभूद्याघ्या. कंसातल्या ओळी सहकार्यांच्या आवाजात आहेत. चित्रपट - लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव. यातच नायिकेचा पती गेल्यानंतर तिनं म्हटलेलं 'माझ्या मातीचे गायन' हे सुंदर गाणंही आहे ना?
अर्रेवा!
अर्रेवा! जीडी खुपच धन्यवाद रे!
मला बाकी डिटेल्स नाही माहित पण यातली सगळीच गाणी छान आहे म्हणे.
गजानन,
गजानन, यो.जा. टा.का?:)
हे गाणं
हे गाणं (भरून भरून) सुकन्या कुलकर्णीवर चित्रीत झाले आहे ना? तोच हा पिक्चर का लक्ष्मीबाई भ्रतार? मला भरून भरून आणि माझ्या मातीचे गायनही खूप आवडते.. सही गाणी!
मिलिंदा,
मिलिंदा, टाकले.
भाग्यश्री होय. माझ्या माहितीप्रमाणे तिचा हा पहिलाच चित्रपट. बरोबर का?
श्रीकान्त
श्रीकान्त पारगावकरान्चे ' मनी जे दातले तुला पाहुनी सान्गु कसे , ह्रिदय शब्दात ग आनावे कसे ' या गान्याचे शब्द कोनाला माहित आहेत का? सन्गीत मीन खदीकर (मन्गेशकर) यान्चे आहे.हे गाने पुर्वी रेदिओ वर लागायचे.सध्या कुथे उपलब्ध आहे का?
Mala Jumbo Jet ani Sion aaya
Mala Jumbo Jet ani Sion aaya hya picnic chya gaanyachya ooli havya aahet.
Please mala te koni deu shakel kai??
धन्यवाद
मनी जे
मनी जे दाटले..
तुला पाहुनी, सांगु कसे,
हृदय शब्दात हे
आणावे कसे..
सांगु कसे..
सुंदर गाणे आहे हे. मी सुद्दा ब-याच दिवसात ऐकले नाही. संगित मीना खडीकर यांचे आहे हे माहित नव्हते. अगदी याच सुरावटीवर येशुदास याने हिंदीत एक गाणे गायले आहे. (आता शब्द आठवत नाहीत )
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मनी जे
मनी जे दाटले..
तुला पाहुनी, सांगु कसे,
हृदय शब्दात हे
आणावे कसे..
सांगु कसे..
क्षणी एकाच ओझरत्या
जराशी दिसुनी गेलीस तू
तरि मी का उभा वळणावरी ते
सांगू कसे...
तुझ्या नजरेतली जादू
तुझ्या चालीतला डौल
कशी उतरेल ही भुल कधी ते
सांगू कसे...
सुखाची गोड कळ दुखरी
कशाला देउन गेलीस तू
अनामीक त्या क्षणाचे गुढ नाते
सांगू कसे...
गणेश,
गणेश, सुंदर... गाणे परत आठवले.. इतके सुंदर आहे. आज शोधते नेटवर..
येशुदासचे पण आठवले.. (नक्की त्याचेच का? कित्येक वर्षे झाली ऐकुन)
ये आंखोमे खुमार
आने लगा है, तेरे आनेसे,
उम्मिदोंपे निखार,
छाने लगा है,
तेरे आनेसे....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
खुप खुप
खुप खुप धन्यवाद गणेश भुते ...
मी हे गाणे खुप दिवसांपासुन शोधते आहे.
तुम्ही हे गाणे दिल्याबद्दल खुप खुप आभार.
हे गाणे ऐकायला कुठे मिळेल ?
----- माशा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनन्दघन क्षणान्चा रावा फुलुन यावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढ मेघ व्हावा
मी खुप
मी खुप दिवसान्पासुन एक गान शोधते आहे .
आशा भोन्सले नी गायलेल आहे, चित्रपतच नाव नाहि आथवत,
मी रागिनि अनुराग तु सख्या सजना प्रीती तुझ्यावरी ...
खुप मस्त आहे.
please let me know if i can download it from any site.
neha...
मला कोणी आशा काळेवर चित्रीत
मला कोणी आशा काळेवर चित्रीत झालेल "आदीमाया अंबाबाई" या गाण्याचे बोल देईल का? मला चित्रपटाच नाव आठवत नाही.
http://www.scribd.com/doc/908
http://www.scribd.com/doc/908542/Marathi-Songs-20-21-ADIMAYA-AMBABAI
थोरली जाउ
'मी इथे तू तिथे ढाळितो
'मी इथे तू तिथे ढाळितो आसवे...' या गाण्याचे शब्द काय आहेत ? कोणत्या चित्रपटातील आहे ?
सुधीर दळवी व एका अभिनेत्रीवर हे गाणे चित्रीत झाले आहे. ती अभिनेत्री कोण ?
माझ्याकडे एका गाण्याचे शब्द
माझ्याकडे एका गाण्याचे शब्द आहेत ....
"हसलीस एकदा भिजल्या शारदं राती
बहरली फुलांनी निशीगंधा........"
हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे. आणि या गाण्याची चाल मला कुठं मिळेल...
पन्नासाव्या वाढदिवसाचि एकादि
पन्नासाव्या वाढदिवसाचि एकादि कविता आहे का? कोणि सांगू शकेल प्लिज?
जय गंगे भागीरथी नाट्यगीताचे
जय गंगे भागीरथी नाट्यगीताचे बोल हवे आहेत.
http://vishesh.maayboli.com/n
http://vishesh.maayboli.com/node/703
धन्यवाद.
धन्यवाद.
"पुनवेचा चंद्र आला .....
"पुनवेचा चंद्र आला ..... किरणं दर्यावरी.... '
असंच काहीतरी गाणं आहे कोणी या गाण्याचे बोल देईल का?
अरे वा मज्जा आहे या बोर्डावर
अरे वा मज्जा आहे या बोर्डावर
काही गाणी खुप काळानंतर मनात जागी झाली.
वैभव, ते गाणे "पुनवेचा चंद्रम आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी ..." असे आहे,
अर्थात पुर्ण मला पण सांगता येणार नाही.
>>मनी जे दाटले, तुला पाहुनी, सांगु कसे
>>मी रागिनि अनुराग तु सख्या सजना प्रीती तुझ्यावरी ...
वाह, ही गाणी मला पण हवी आहेत.
एका मराठी चित्रपटातील सवाल/जवाब (लावणी स्टाईल नव्हे, कव्वाली स्टाईल) गाणे हवे आहे.
प्रितीपुढे कशाचे मोल, प्रितीविण जगणे फोल...
या गाण्यात ऐकणारे मधेच वा मिलिंद, बहोत अच्छे (किंवा बक अप) रेखा असे म्हणतात.
कोणी मला या गाण्या विषयी अधिक
कोणी मला या गाण्या विषयी अधिक माहिती देऊ शकाल का?
आषाढ घन सुन्दरा | आषाढ घन सुन्दरा |
अन्बरा .. मी प्रणयीनी अधिरा धरा |
आषाढ घन सुन्दरा |
नित्य फुलांची गावी गाणी |
मन कमलांची करुन खेळणी |
व्हावी राधा धरा |
आषाढ घन सुन्दरा |
(चु.भू.दे.घे.)
धन्यवाद.
____चम्बु
प्लीज हे खालचं गाणं पुर्ण
प्लीज हे खालचं गाणं पुर्ण माहितिये का?
दर्यावरी रं तरली होडी रं तुझी माझी प्रित अशी
साजणा..
होडीतुन जाउ घरी...
पुनवेचा चंद्रम आला वरी
पुनवेचा चंद्रम आला वरी -चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुर्यात -खार्या खार्या वार्यात
तुझा माझा एकांत रे -साजणा
लाटांचे गीत निळे -काठाला ते गूज कळे
सागरलाटा भिडती काठा- ओठावरती ओठ जुळे
निळ्या निळ्या पाण्यात -एका खुळ्या गाण्यात- तुझा माझा एकांत रे साजणा
चंदेरी धुंद हवा -साथीला तूच हवा
थरथरणारा एक इषारा-या रात्रीचा रंग नवा
लाजर्या या गालात -हृदयाच्या तालात तुझा माझा एकांत रे साजणा
शांता शेळके- बाळ पार्टे -कृष्णा कल्ले
'मी इथे तू तिथे ढाळितो
'मी इथे तू तिथे ढाळितो आसवे...' या गाण्याचे शब्द काय आहेत ? कोणत्या चित्रपटातील आहे ?
सुधीर दळवी व एका अभिनेत्रीवर हे गाणे चित्रीत झाले आहे. ती अभिनेत्री कोण ?
ती लक्ष्मीछाया...मेरा गाँव मेरा देश वाली...मार दिया जाए या छोड दिया जाय आणि अपनी प्रेमकहानिया ऐसे कैसे मै सुनाऊ वाली.
Pages