Submitted by प्रिया on 27 March, 2009 - 16:15
एखाद्या मराठी गाण्याचे शब्द हवे आहेत? प्रथम मराठी गाणी माहिती आगार (Database) इथे ते गाणे आहे का शोधा. तिथे नसेल तर इथे त्या गाण्याची जितकी माहिती तुमच्याजवळ असेल तेवढी लिहा, जेणेकरुन गाणे शोधून लिहीणार्याला थोडी मदत होईल. मात्र इथे कृपया गाणे ध्वनी स्वरुपात मागू नये. मिळतील तसे गाण्याचे शब्दच फक्त आगारात लिहीले जातील. लिहीणारे सगळेच हौशे/ नवशे असल्याने थोडा विलंब झाला तर समजून घ्यावे ही विनंती...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशा काळे यांचे "आली दिवाळी
आशा काळे यांचे "आली दिवाळी आली दिवाळी" हे गाणे कोणाकडे आहे का?
आशा काळे यांचे "आली दिवाळी आली दिवाळी" हे गाणे कोणाकडे आहे का?
असल्यास कृपया मला लिंक पाठवा.
'हे सुरांनो चंद्र व्हा' ह्या
'हे सुरांनो चंद्र व्हा' ह्या गाण्याचे शब्द आगारात सापडले नाहीत. कुणी देऊ शकेल काय? माझ्या विपूत डकवल्यास आभारी राहीन.
http://www.aathavanitli-gani.
http://www.aathavanitli-gani.com/Song/He_Surano_Chandra_Vha
धन्यवाद गजानन.
धन्यवाद गजानन.
हे सुरांनो चंद्र
हे सुरांनो चंद्र व्हा...(२)
चांदण्यांचे कोष माझ्या (२)
प्रियकराला पोचवा
हे सुरांनो चंद्र व्हा...(२)
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा...
हे सुरांनो चंद्र व्हा...(२)
(चुभूदेघे) ...निंबुडा इअतकच ठाउकेय
-सुप्रिया.
सुप्रिया, गजानन यांनी
सुप्रिया,
गजानन यांनी दिलेल्या लिंकवरही तितकेच बोल दिलेत. इतकेच आहेत वाटते!
निंबुडा, सारेगम च्या
निंबुडा, सारेगम च्या कुठ्ल्यातरी भागात बहुदा आण्खी एका कड्व्याचा उल्लेख होता.. मिळालं तर मलाही ते कडवं चालेल...:)
सायली, हे घ्या शब्द इथे
सायली,
हे घ्या शब्द इथे गाणेही ऐकता येईल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Daryavari_Ra_Tarali_Hori
काही वर्षांपूर्वी एक भजन ऐकले
काही वर्षांपूर्वी एक भजन ऐकले होते : 'सावळा विठ्ठल कॄपावंत झाला...'
एक कडवे आठवतेय.. दुसरं मात्र आठवत नाही म्हणून छळतंय.. कुणाला माहीत आहे का?
भरत मयेकर | 20 March, 2010 -
भरत मयेकर | 20 March, 2010 - 13:29
पुनवेचा चंद्रम आला वरी -चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुर्यात -खार्या खार्या वार्यात
तुझा माझा एकांत रे -साजणा
लाटांचे गीत निळे -काठाला ते गूज कळे
सागरलाटा भिडती काठा- ओठावरती ओठ जुळे
निळ्या निळ्या पाण्यात -एका खुळ्या गाण्यात- तुझा माझा एकांत रे साजणा
चंदेरी धुंद हवा -साथीला तूच हवा
थरथरणारा एक इषारा-या रात्रीचा रंग नवा
लाजर्या या गालात -हृदयाच्या तालात तुझा माझा एकांत रे साजणा
शांता शेळके- बाळ पार्टे -कृष्णा कल्ले
--------------------------------
अजुनही या गण्याच्या शब्दामधे अणि सुरन्मधे देहभान विसरवण्याचि जादू आहे
कुणी द्रुक श्राव्य लिन्क देऊ शकेल का?
'रात्र ही सरेल कधी, खंत नको
'रात्र ही सरेल कधी, खंत नको प्राणा'
हे गीत किंवा त्याचे शब्द किंवा इतर काहीही ह्या गीताबाबतची माहिती हवी आहे.. कुणी मदत करू शकेल का ?
जय गन्गे भागिरथी हर गन्गे
जय गन्गे भागिरथी
हर गन्गे भागिरथी
चिदानन्द शिव सुन्दरतेचे
पावनतेची तू मूर्ती ||
जगदाधारा तव जल धारा
अम्रुत मधुरा कान्तिमती
शन्कर शन्कर जय शिव शन्कर
लहरी लहरी त्या निनादती ||
चंदनाचे परिमळ आम्हा काय
चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे
तुझे नाव गोड किती घेऊ आम्ही वाचे ||
आम्हा काय त्याचे
चन्द्र सूर्य प्रकाशता
होई काया स्वच्ध शुध्ध
तुझे नाव घेता ||
कटेवरी ठेउनी कर
उभा तोची राहे
दास म्हणे जाता शरण
हरी वाट पाहे |||
गायक : रामदास कामत
लता मन्गेशकरानी गाइलेले
लता मन्गेशकरानी गाइलेले गाणे आहे. पहिली ओळ आठ वत नाही.
गाण्याची दुसरी ओळ आहे
"राघू मैना बोलू लागली गाऊ लागली गीत"
या गाण्याचे शब्द कोणी सन्गू शकेल काय ?
माझा अन्दाझ आहे हे "मोहित्यान्ची मन्जुळा" मधील गाणे आहे.
सोनसकाळी सर्जा सजला हसलं
सोनसकाळी सर्जा सजला हसलं हिरवं रान
राघू मैना रानपाखरं गाऊ लागली गान
इथे बघा - http://vishesh.maayboli.com/node/428
धन्यवाद गजानन. दिलेल्या
धन्यवाद गजानन. दिलेल्या दुव्यावर माहिती मिळाली. सन्गीत आनन्दघन यान्चे आहे.
आनन्दघन म्हणजे साक्शात लतादीदी . त्यन्चे सन्गीत अतिशय तरल ; चल ; आणी मराठी मातीशी जवळचे नाते सान्गणारे असते.
माझी रेणुका माउली ह्या
माझी रेणुका माउली ह्या गाण्याचे शब्द कुणी देऊ शकेल काय? विपूत डकवलेत तरि चालेल्...धन्यवाद
सचीन, तुम्हाला हवे असलेल्या
सचीन,
तुम्हाला हवे असलेल्या गाण्याचे शब्द. थोडे गुगलले की लगेच शब्द भेटतात.
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली ।
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय ॥१॥
हाकेसरशी घाई घाई वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥
खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥
मधुरीता धन्यवाद ... हे शब्द
मधुरीता धन्यवाद ... हे शब्द गुगलुन मिळाले...मला वाट्ले अजुन काहि कडवि असावित म्हणुन हा प्रपंच.तसेच office security policy मुळे सर्व साईट्स ओपन होत नाहित...
रिन्गण घाली श्याम
रिन्गण घाली श्याम सावळा
बाळ्कॄश्ण तो रन्गात आला
या गाण्याचे शब्द. / माहिती.
बापू.़करन्दीकर.
बापू करंदीकर,
बापू करंदीकर, http://www.aathavanitli-gani.com/Song/Nandaghari_Nandanvan हे पहा
माबोकरांना नमस्कार, मला एका
माबोकरांना नमस्कार,
मला एका जुन्या गाण्याचे शब्द हवे आहेत.
गाण्याची सुरुवात याप्रमाणे:
शेवटची बाळा माझ्या गाउदे अंगाई
एक कडवः
स्वस्थ नीज कोपर्यात आता मनुताई
बाळ तुझ्या शेपटीला ओढणार नाही
कुणाला याचे शब्द / एमपी३ चा ठावठिकाणा माहित असाल्यास कृपया
कळविणे
धन्यवाद
इथे कुणाला उषा मंगेश्करच
इथे कुणाला उषा मंगेश्करच कान्हु घेउन जाय रानी धेनु घेउन जाय गाण माहित आहे का? मला या गाण्याचे शब्द हवे आहेत आणि तिनेच गायलेल पाउस पहिला घनुसानुला/जणु कान्हुला (यामध्ये कन्फ्युजन आहे) या गाण्याचेही शब्द हवे आहेत.
मुग्धाताई,
मुग्धाताई, http://www.aathavanitli-gani.com/Song/Kanhu_Gheun_Jaay
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
संगे चाले श्रीदाम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
म्हणे माझ्या लेकरा रे माझ्या वासरा रे
उशीर नको लावू वेगे परत घरी ये रे
हाती राहे खीर लोणी कोण दुजे खाय ?
संगे चाले श्रीदाम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
डोळ्यांतली बाहुली तू राजा सोन्या रे
ओंजळीत आला जणू चैत चांदवा रे
सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय !
संगे चाले श्रीदाम सुदाम
मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
स्निग्धा, खरच खूप खूप धन्स
स्निग्धा, खरच खूप खूप धन्स
<इथे कुणाला उषा मंगेश्करच
<इथे कुणाला उषा मंगेश्करच कान्हु घेउन जाय रानी धेनु घेउन जाय गाण माहित आहे का? मला या गाण्याचे शब्द हवे आहेत आणि तिनेच गायलेल पाउस पहिला घनुसानुला/जणु कान्हुला (यामध्ये कन्फ्युजन आहे) या गाण्याचेही शब्द हवे आहेत<>
कवि- प्रविण दवणे
संगीतकार- मीना मंगेशकर
गायिका- उषा मंगेशकर
पाउस पहिला जणु कान्हुला, बरसुन गेला, बरसुन गेला २
पानावरती...३, देठावरती फुलती भिजती,
आठवणींना उसवुन गेला
बरसुन गेला.......२ ||१||
एव्हडेच मिळाले
एका मैत्रीणीला हे गीत हवे
एका मैत्रीणीला हे गीत हवे आहे, तिच्या आजीचे आवडते आहे म्हणुन, आजीसाठी
"बैस अशी माझ्यापाशी रूप तुझं छान गं,चंद्रावाणी मुखडा तुझा रंग गोरापान गं"
"महाराष्ट्राच्या
"महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी
मुशाफिरा चल माझ्यासाठी"
या सुधीर फडकेंच्या वा इतर कुणाच्या आवाजातील गाणे हवे आहे. कुणी माहिती देऊ शकेल काय..?
http://www.aathavanitli-gani.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Maharashtrachya_Krishne
कुणाला "सामंतांचे लोणी
कुणाला "सामंतांचे लोणी सामंतांचे तुप "हे विड्म्बन् मिळेल का? मला हवय ते, खुप शोधलं
पण नाही सापडलं. ( शोधलं कि सापडतं असं जरी अस्मिता म्हणते तरी नाहीच सापड्लं ,) मग शेवट्चा उपाय म्हणुन माबोच्या शरणी आले.
Pages