Submitted by प्रितीभुषण on 27 March, 2012 - 05:59
लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१)खिसलेला कोबी पाव किलो [किंवा १ वाटी
२)खिसलेले गाजर १ वाटी
३) मिर्ची +लसुन+ आले +कोथिंबिर =पेस्ट
४) तेल, हिंग, हळद, जिरं +धने पावडर
५) चवीसाठी मीठ
६) गव्हाचे पिठ
७) दही किवा आवडी प्रमाणे एखादी चटणी
क्रमवार पाककृती:
१) १ ते ६ सगळे एकत्र मळुन घ्यावे ५ १० मिनिटे झाकुन ठेउन द्यावे
२)चपाती /पराठे लाटतो त्या प्रमाणे लाटुन तव्या वर दोन्ही बाजुने छान भजुन घ्यावे
३) दही किवा आवडी प्रमाणे एखादी चटणी बरोबर खावे
माहितीचा स्रोत:
आई + सासुबाई
अधिक टिपः कोबी , गाजर ई भाज्या available नसतिल तेव्हा नुसता कादां खिसुन कोथिंबिर कापुन पण परठे करता येतील,{जेवण म्हणुन पण पोट भर असे पराठे खाता येतिल . }
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान! मी कोबी + कोथिंबीर
छान!
मी कोबी + कोथिंबीर किंवा गाजर + पालक असे पराठे नेहमी करते.
आता कोबी + गाजर करुन बघेन
छान आनि सोप्पी पाकृ
छान आनि सोप्पी पाकृ
काय मस्त आहे !!!! मला घेउन ये
काय मस्त आहे !!!!
मला घेउन ये
आजच डब्याला आणलेली
आजच डब्याला आणलेली
माझ्याकडे पण असेच काहीतरी
माझ्याकडे पण असेच काहीतरी असते रोज. मी तर लाटायचे पण कष्ट घेत नाही.
ते सैलसर भिजवून, धिरड्याप्रमाणेच ओतून करतो.
चांगली वाटते ही रेसिपी. नक्की
चांगली वाटते ही रेसिपी. नक्की करुन पाहणार. पण हे परोठे प्रवासात २ दिवस टिकतील का? मेथीचे टिकतात, तर हेही टिकु शकतील असे वाटते. कुणाला माहित असेल तर नक्की सांगा.
प्रवासात २ दिवस टिकतील का?>>
प्रवासात २ दिवस टिकतील का?>> २ दिवस नाही पण १८ १९ तासाच्या प्रवासात टिकतिल फक्त पिठ मळ्ताना पाणी नाही वापरायचे मग काकडी, कांदा वापरला तर चालेल
रेसिपी आवडण्यात आली
रेसिपी आवडण्यात आली आहे.....आणि कोबी मुलांच्या पोटात घालायची आयडिया चांगली आहे...बिन मिरचीची केली तर मुलं खातील...