तुझी पहाट दंवाची माया

Submitted by Kiran.. on 26 March, 2012 - 09:27

ग्रेस ...

सूर्याची किरणे नव्हती, मेघांची दाटी फसवी
तुझ्या आर्त हाकेला येई, ही शीळ कुणाची भगवी

तुझी पहाट दंवाची माया, आणि संध्यामधुरा होते
आवळते धुक्याची छाया, मग बेल चर्चची घुमते

मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी

ती होती निळाईछाया, तुझी शाश्वत सोबती होती
ही जाणीव झाली तेव्हां, तुझी कळी उमलली होती

- Kiran
ग्रेसजींना श्रद्धांजली.

गुलमोहर: 

या दु:खद आर्त प्रसंगी कवितेला व्वा व्वा तरी कसे म्हणू ! पण तुमची आर्तता काळजात रुतून बसली.
मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी

या ओळी तर मन धुवाँधार!

!!

नि:शब्द, सुन्न!!!

मी रडलो जेव्हां तुजला, नाहीच मिळाले पाणी
मग रित्या ओंजळींनी त्या, झ-यात म्हटली गाणी

_/\_ !

जियो रे किरण्या.....
तुझे आजपर्यंतचे सर्व उपद्व्याप एका बाजुला आणि ही कविता एका बाजुला !

मुजरा सरकार !!

तुझे आजपर्यंतचे सर्व उपद्व्याप एका बाजुला आणि ही कविता एका बाजुला !>>>>>>>>>>> अगदी अगदी...

खुप सुंदर लिहीलीय...

वाह किरण, अप्रतिम ! कसला versatile आहेस रे. मधेच 'कैच्याकै' लिहिशील, मधेच कुणाला चिमटे काढशील, मधेच ' चैत्रातलं आभाळ' सारखं ललित, शिवाय काही विनोदी कविता.

ही श्रद्धांजली तर सुंदरच !

किरण,
काय आवडलं, विचारशील, तर त्या शब्दांतून आशय मोकळा करून मांडावा लागेल, पण त्या शब्दांतच तो इतका गूढ आणि सुंदरतेने गुंफला गेलाय की वेगळा करणे अशक्य, हॅट्स ऑफ मित्रा!!
_/\_

हृदय फाटून जाईल इतकं दु:ख असतं आयुष्यात,ज्ञानेश्वर म्हणतात, विश्वाचे आर्त..ग्रेस वेगळ्या तर्‍हेचे तर्‍हेवाईक, पण याच दु:खाचे पाईक...महाराष्ट्रशारदेचं दिवास्वप्न.तुम्हीही त्याच आर्तभावनेने लिहिलंय..सुंदर. तुमचा धागा घेऊन,

कापर्‍या धुरासम काही तू गुणगुणलास स्वत;शी
घुसमटते वादळ दाटे श्वासांच्या संथ लयीशी

सर्वत्रातून सर्वस्वी घनगहन सांज ढळताना
तव हात असू दे हाती तनू तमात विरघळताना..

Pages