Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चमन ह्या पळण्याच्या नुकत्याच
चमन
ह्या पळण्याच्या नुकत्याच लागलेल्या व्यसनापायी खुप चांगल्या सवयी पण लागल्या. सतत डोक्यात गोल असतोच त्यामुळे डायट कडे लक्ष ठेवून राहायला लागतं. मला तर खुपच मजा येतेय पळणं सुरु करुन आता फक्त काही इंजुरी न करुन घेता जितके वर्ष जमेल तितकं पळायच आहे.
उद्या १०+ मैलाचा पल्ला गाठायचा आहे. हायड्रेशन बेल्ट घेतलाय, आता ऑन द गो करता क्लिफ बार घेण्याचा विचार आहे. त्यात खुप साखर असते म्हणून खरं नको वाटतात पण बाकी काही पळताना बरोबर न्यायला सोपं नाहीये. साखर जास्त असली की फास्ट बर्न मिळतो असं ऐकून आहे. म्हणजे थोडा वेळ एनर्जी येते पण टिकून राहत नाही. एखादा व्हिट बेगल न्यावा हम्मस लावून असा विचार आहे.
गुड लक बुवा!
गुड लक बुवा!
धन्यवाद मेधा आता पळून आलो,
धन्यवाद मेधा
आता पळून आलो, पळताना काही वाटलं नाही पण आता तंगड्या गळ्यात घेऊन हातांनी रेटत सरपटत जावंसं वाटतय.
वा वा बुवा!! बेस्ट लक ('गूड
वा वा बुवा!! बेस्ट लक ('गूड लक' म्हंटलं की आता 'लिआम नीस्सन' धरून हाणणार असंच वाटतं)
नक्की कळवा तुमच्या परफॉरर्मन्स बद्दल. आज जरा त्यामानाने बरंच थंड आहे बाहेर.
स्वाती >> डाएट असं काही खास नाही. आधीच्या प्रतिसादात सांगितलेल्याच गोष्टी पाळतो.
१) दिवसभर भरपूर पाणी पिणे
२) संत्री, मोसंबी वरचेवर खात रहाणे.
३) लिंबू पाण्यापासून लेमन मार्गारिटापर्यंत सगळे द्रव पदार्थ सरबत म्हणून प्यायचे (पण अल्कोहोल लिक्विड फॉर्म मध्ये घेतलं तरी ते शरीराला डीहायड्रेटंच करतं हे लक्षात ठेवायचं )
४) पळण्याच्या आधी (१), पळतांना (प्रत्येक २०-३० मिनिटांनी एक छोटा काप) आणि पळाल्यानंतर (२+) अशी केळी खायची. त्यामुळे पळतांना शरीरातलं घटणारं पोटॅशिअम भरून निघतं.
५) पळतांना गेटोरेड ही भरपूर प्यायचं पण पोटात डुचमळेल एवढं नाही. गेटोरेड पितांना ते तोंडाचा चंबू करून तोंडात भरून घ्यावं आणि छोटे छोटे सिप-सिप घश्याखाली पाठवावे.
६) गेटोरेड नसेल तर एक एक सिप पाणीही पिऊ शकता पळतांना, पण पाण्यापेक्षाही नारळपाणी केव्हाही चांगलं. (ह्यासाठी शहाळी हातात घेऊन पळायची गरज नाही )
७) लांब पल्ल्याची दौड असल्यास ती शक्यतो सकाळी तुलनेने थंड वातवरणात धावावी आणि आदल्या रात्री पास्ता, राईस वैगैरे हाय्-कार्ब्ज आहार घ्यावा.
८) बाकी स्पिरुलिना, क्लोरेला, बार्ली ग्रास अशी ग्रीन्स स्टॅमिना आणि फ्लेक्सिबिलीटी वाढवतात असं बरंच वाचून आहे पण ते आपल्या खिश्याला किती सहन होतंय ते बघायला पाहिजे आणि त्यांची कदाचित अॅलर्जिक रिअॅक्शन पण येऊ शकते.
९) काही जेल आणि न्यूट्रीशन बार ही असतात पण मला त्यांचा अनुभव नाही.
१०) chamomile tea सारखे काही हर्बल आणि ग्रीन टी काही काळ घेतल्यास मेंदू रक्ताभिसरण आणि शरीराचे तापमान छान कंट्रोल करतो आणि तुम्ही पळतानांचा मानसिक थकवा बर्याच टक्क्यांनी कमी करू शकता.
बाकी आहारात काही खास असं नाही.. प्राणायाम करण्याने तुम्हाला दमसास टिकवून ठेवायला बरीच मदत होतेय असं दिसून येईल.
हो रे. आज जरा थंड होते बाहेर,
हो रे. आज जरा थंड होते बाहेर, लांब बाह्यांचा शर्ट आणि ट्रॅक पँट्स घालून गेलो. तो बेल्ट कमरेला लावून पळायचा पिलान पुर्णतः फसला. बाटली पाणी भरल्यावर खुपच जड झाली आणि बाटलीच्या पाऊच शेजारी अगदी छोटा खिसा आहे तिथे माझा एंड्युरन्स बार अगदी दामटून बसवावा लागला. त्याउपर पळताना बार (पुडी नव्हे) खाता येत नाही हे आधी लक्षात यायला हवं होतं. आता जेलच घेइन पुढच्या वेळी. आज जरा थांबलो/चाललो ३-४ वेळा डावा गुडघा त्रास देत होता म्हणून.
मजा आली पण पळताना. स्वतःला सारखी आठवण करुन देत होतो की टाईम वगैरे पेक्षा जी मजा येते पळताना ती अनुभवायची आहे. साधारण २.१५ तास लागले ११ मैलाला.
बुवा ग्रेट! ब्रावो!! ११ मैल
बुवा ग्रेट! ब्रावो!! ११ मैल सहीच..... आता मस्त टार्गेट अचिवमेंट चं समाधान एंजॉय करा !!!
बुवा पाणी नको..गेटोरेड घ्या बाट्ल्यात भरून!!!
तुम्ही कोणता बेल्ट घेतला आहे? माझा हा आहे नॅथनचा
http://www.amazon.com/Nathan-10-Ounce-Nutrition-Flasks-Medium/dp/B000KBD...
मलाही काही फार आवडलं नाही बेल्ट घालून पळायला पण अंतर वाढवायचं असेल तर उपाय नाही.
अजून एक बेल्ट वारल्यानंतर बहूतेक पळतानांच्या पोस्चर मध्ये फरक पडत असावा मला त्यानंतर पुढचे २ दिवस थोडा लोअर बॅक पेन जाणवत होता. तुमचाही अनुभव सांगा.
आणि मी त्या वेगवेगळ्या जेलच्या चवीबद्दल फार काही चांगले ऐकले नाहीये तर मलाही सांगा तुमचा अनुभव.
तुम्ही कुठे पळता. मी प्रिंस्टन युनिवर्सिटीच्या मागे विंडमिल रिवरला लागून ३० मैलांचा एक अप्र्तिम ट्रॅक आहे डेलावेअर रॅरिटन कॅनालवर तिथे पळतो
http://www.state.nj.us/dep/parksandforests/parks/drcanal.html
अरे वा बुवा ग्रेटच. चमन,
अरे वा बुवा ग्रेटच.
चमन, बुवा तुमच्या पोस्ट्स वाचून खूप छान वाटते. लिहीत रहा.
Aare bhaari aahe ha belt.
Aare bhaari aahe ha belt. Majha agdhich chindhi aahe. Main mhanje useless aahe.
Mi rastyawerech palto. Google maps warun aadhi route plan karun gheto. Tumcha track wagaire mhanje bhannat wattoy. Rastyawer palaycha mhanla ki gaadyan kade wagaire laksha dyawa laagta tyaat rastychya kadela utaar hi asto tya mule ek paay short padto asa mhantat.
Aamachya ithe baraach bhaag reservation asalyamule khup sunder aahe. Palayla majaa yete.
Aila tya gel chi Chav bhangar asel ter awghad aahe. Tasa mala bin paani aani khanyachi saway aahe sadhya pan marathon madhye jago jagi astaat stations tya mule chinta naahi.
Baaki, 15 April la long branch la trial 10k aahe, mi jaycha wichaar kartoy, tu yenaar Ka?
Roni, shoes ghaal aani ho tu pan suru, Nitinlahi halaw. :fidee:
बुवा, ११ मैल भारीच झाले की.
बुवा, ११ मैल भारीच झाले की.
Baaki, 15 April la long
Baaki, 15 April la long branch la trial 10k aahe, mi jaycha wichaar kartoy, tu yenaar Ka? >>>>> त्यापेक्षा मे मधली ओशन कौंटीची हाफ मॅराथॉन करुया का?
६ मे २०१२
http://www.njmarathon.org/events/nynjchallenge.aspx
चमन, फार छान माहिती. ४
चमन, फार छान माहिती. ४ दिवसांपासुन मी पण पळायला सुरुवात केलीय. पण sinus मुळे फार त्रास होतोय. नाक लगेच भरुन जात. तरी सुद्धा २० मिनिट पळतोय. बघुया किती जमतयं.
चमन्भाऊ, असं काय करुन
चमन्भाऊ, असं काय करुन र्हायले! अरे मी ६ मे च्या यन जे च्या हाफ मॅरॅथॉन करता केव्हाच रेजिस्ट्रेशन केलय. १५ एप्रिलची १०के ही लाँग ब्रँच वाल्यांनीच अरेंज केलेली ट्रायल रन आहे म्हणून विचारत होतो की येतोस का. कुठे दुसरीकडे पळण्यापेक्षा आपली हाफ जिथे आहे त्याच ट्रॅक वर पळायला मिळेल. जरा अंदाज येइल ट्रॅकचा.
कालच्या पळाण्यानंतर आज पहिल्यांदा लोवर बॅक पेन जाणावतोय. माझ्या अंदाजाप्रमाणे लांबचा पल्ला असल्यामुळे मी ९० टक्के वेळ मिडफूट स्ट्राईक वापरला (आपोआप वापरला जातो). मिडफूट स्ट्राईक आणि पाय जमिनीला टेकताना बॉडीच्या बरोबर खाली टेकवत असल्यमुळे इंपॅक्ट बरोबर शरिराच्या सेंटर ऑफ ग्रॅविटीला बसत होता (लोवर बॅकच्या आसपास). इतके माईल्स पहिल्यांदाच पळाल्यामुळे आज थोडं जाणवतय. बाटली कॅरी करणं फारच इरिटेटिंग होतं, मी अर्ध्या रसत्यात पाणी फेकून दिले.
तुम्हा लोकांचे पाय कुठे आहेत?
तुम्हा लोकांचे पाय कुठे आहेत? १० मैल काय १५ काय.. मला अर्धा मैलही पळता येत नाही. बर्याच वेळा सुरुवात करुन पाहिली पण कधी गोडी लागली नाही. २ वेळा ५के मध्ये भाग घेतला पण दोन्ही वेळा तयारी केली नाही रडत खडत थोडे जॉगिंग/थोडे चालत पुर्ण केल्या. नक्की काय कमी पडते ते कळत नाही. रॅकेटबॉल/टेनिस जास्त वेळ खेळू शकतो पण पळणे जमले नाही कधीच.
परत एकदा प्रयत्न करुन बघायला हवा. चमन/बुवा, तुम्ही दोघांनी फार छान लिहिलंय.
तुम्हा लोकांचे पाय कुठे
तुम्हा लोकांचे पाय कुठे आहेत?>>>> माझे सध्या गळ्यात आहेत. नात्या, तू प पू चमनबाबा मॅरॅथॉनकारांनी पहिल्यापानावर लिहीलेली "साडे चौदाव्या मिनीटांनंतर काय?" पोस्ट नाही वाचलीस का?
वा वा मस्त चर्चा आणि माहिती..
वा वा मस्त चर्चा आणि माहिती.. इतके दिवस इथे येऊन प्रतिसाद देता आला नाही. चमन, भारीच लिहीतो आहेस.
भारतात कोणी पळापळी केली असल्यास माहिती लिहा कृपया. इथे सध्या इतका उन्हाळा, गर्दी आणि धूळ आहे की कुठे आणि कधी पळायचं तेच कळत नाही. अटलांटाच्या ग्रीन वेची फार आठवण येते ह्या सगळ्या पोस्टी वाचून.
चमन साडे चौदा मिनीटांनंतरची पोस्ट भारी ! मी पहिल्या दुसर्या लाँग रनच्या वेळी केलेला प्रयोग नंतर नेहमी आणि दोन्ही लाँग रन्सच्या वेळेला केला होता आणि तो खूपच उपयोगी पडला. तो म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहायची ! आपल्याला ज्या गोष्टी झालेल्या फारफार आवडतील असे सीन्स खरच घडले तर ते नक्की कसे असतील हे इमॅजीन करायचे.
उदा. मी फेडररला किरकोळीत हरवून विंबल्डन जिंकलोय.. मग प्रेसेंटेशन, त्यातलं भाषण, पत्रकार परिषद, महिला विजेती मारिया शारापोव्हा, दोघांचा फॉर्मल कपड्यांमधला फोटो सगळ्या पेपरांमध्ये, तिच्या बरोबर पार्टीत बॉलडान्स वगैरे वगैरे वगैरे. किंवा मग ऑलिंपीक मॅरॅथॉनमध्ये गोल्डमेडल जिंकलय, मग गळ्यात मेडल आणि वाजणारं राष्ट्रगीत, मुकुंद आपल्या रेसबद्दल मायबोलीवर लेख लिहीतोय वगैरे वगैरे... किंवा मग मला डोक्यात जाणार्या लोकांच्या मी कानाखली मारतोय (इथे आपोआप वेग वाढतो..;) )
ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न दुखणी खुपणी पळवून लावून अगदी १०० % काम करतात..
डाएट वगैरे बद्दल वर लिहिलेलं आहेच. लाँग रन किंवा रेसच्या आदल्या दिवशी सतत पाणी पित राहून बॉडी हायड्रेटेड ठेवणे, हाय कार्ब म्हणजे पास्ता वगैरे खाणे आणि रेसच्या आधी केळी, बेगल खाणे खूपच उपयोगी पडतं ! मी रेस दरम्यान कधी गेटरेड प्यायलो नाही...कारण नंतर नंतर ते अति गोड लागायला लागतं. प्यायलच तर ते पाण्यात डायलूट करून प्यायचो.
वर उल्लेख दिसला नाही म्हणून लिहितो... मोठी रेस असेल तर कपडेही फार महत्त्वाचा घटक ठरतो ! व्यवस्थित बसणारे (आणि आधी वापरून पाहिलेले) कपडे, मोजे वापरले नाहीत तर हाफ मॅरॅथॉन संपेपर्यंत ते अंगाला/पायला टोचून रेस संपेपर्यंत रक्त यायला लागतं.. माझ्या मित्राला टोचणार्या टीशर्टचा खूप त्रास झाला होता. शक्य असेल तर रेस संपल्या संपल्या ओले मोजे बदलणं ही फार उपयोगी पडतं... ह्या सगळ्या संबंधी एक लिंक आहे.. सापड्ली तर टाकतो..
बाकी मिळतील तश्या लिंक टाकतो इथे...
फेडररला किरकोळीत हरवून
फेडररला किरकोळीत हरवून विंबल्डन जिंकलोय >>>> अरे ती 'whistle blower' साठी काही स्मायली आहे का? म्हणजे आनंदाने शिट्ट्या वाजवणारी नाही तर... 'अरे ईकडे या...ईकडे या, हे बघा ह्याला काय झालं' अश्या अर्थाची 'whistle blower' स्मायली?
लालू, फचिन, पन्ना, मुकुंद....(आणि फेडरर गोटातले सगळे) ..ईकडे या बघा पराग काय म्हणतोय...
पराग शेवटी तू मान्य केलेसच की स्वप्नातही तुला worthy opponenet फेडररच वाटतो नदाल किंवा जोको (सशल सॉरी ) नाही. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे'
असूदे काही हरकत नाही तू खुल्या दिलाने मान्य केलेस ह्यातंच सगळे आले
बुवा, तुम्ही हायड्रेशन पॅक
बुवा, तुम्ही हायड्रेशन पॅक वापरून पाहिला आहे का? कदाचित त्याने लोअर बॅक पेन टळू शकेल (?).
एका मित्राने दिवसभर स्किईंग करताना वापरला, फार उपयोगी होता.
शुम्पी, धन्यवाद. बघतो
शुम्पी, धन्यवाद. बघतो आता.
चमना, रेजिस्टर केलेस का? की अजून तळ्यात मळ्यात चाललय?
बुवा, केलंय मी रजिस्टर ६ मे
बुवा, केलंय मी रजिस्टर ६ मे साठी. मजा येणार!!!
१५ एप्रिलची १०के ही लाँग ब्रँच वाल्यांनीच अरेंज केलेली ट्रायल रन आहे म्हणून विचारत होतो की येतोस का. >> बुवा मला येण्याची ईच्छा आहे पण मी येणार नाही. कारणं २
१) अजूनही काही अॅक्टिविटीज चालू असल्याने मला त्यादिवशी जमण्यासारखं नाही.
२) मॅराथॉनचा ट्रॅक माहित होऊन सर्व साधारण कल्पना येईल हे खरं पण खरं सांगायचं तर अनोळखी जागेवर धावतांना आता पुढच्या मिनिटाला त्या जागेचं काय रूप दिसणार आहे आणि काय नयनरम्य देखावा नजरेला पडणार आहे ही ऊत्सुकता मला गुंतवून ठेवते आणि मग पळण्यातला मानसिक थकवा कमी होतो. ट्रॅकचे चढ ऊतार माहिती नसण्याचा धोका आहे पण ती माझी 'नोन रिस्क' झाली.
त्यपेक्शा तुम्हीच येता का इथे? मी वर सांगितलेल्या ट्रॅकवर पळायला?
सही आहे. ती मजा वेगळी असते.
सही आहे. ती मजा वेगळी असते. तुला जमेल तेव्हा पत्ता कळव तुझ्या ट्रॅकचा. मला बघतो कसं जमतय तसं.
२९ एप्रिलला लिंकन टनल ५ के आहे. कोणी जातय का? मी कदाचित जाईन.
बाकी, नवीन काही निरिक्षणं लिहू म्हणतो.
आधी लिहीलय त्यात एकिलिस टेंडननी त्रास दिला, आता रविवारच्या लांब पल्ल्यानंतर डावा गुडघा बाहेरच्या बाजूनी दुखायला लागला. इल्लियो/इल्लो(?) टिबियल बँड टाईट असल्यामुळे असं दुखू शकतं हे वाचनातून कळलं. आपल्या मांडीचे हाड आणि गुडघ्याखालच्या पायाचे हाड बाहेरच्या बाजूनी जिथे जुळते (त्याला गर्डीज ट्युबर्कल म्हणतात) तिथे दुखायला लागतं. ह्यादुखण्याचे कारण परत ओवरयुज हे तर आहेच पण त्याच बरोबरीने अनइवन रस्त्यावर पळाल्यामुळे सुद्धा हे होऊ शकते. माझ्या बाबतीत ते अनइवन रस्त्याचे कारण लागू असायची दाट शक्यता आहे.
पळायला व्यवस्थित सुरवात करुन २ अडीच महिने झाले तरी अजून बॉडी कोप अपच करतेय येवढ्या रनिंग वॉल्यूमशी. रेस्ट हाच उपाय असल्यामुळे २ दिवस आजिबात पळालो नाही आणि आज फक्त ३ मैल पुर्ण केले. आज तरी काही दुखापत जाणवली नाही.
सुरवातीला वजन खुप झपाट्यानी कमी झालं कारण आजिबातच पळायची सवय नव्हती शरिराला. आता जरा गेम बदलला आहे. ट्रेनिंग वॉल्यूम (ओवरॉल विकली माईल्स) जो पर्यंत आता वाढणार नाहीत तो पर्यंत कदाचित वजनात आजिबात फरक पडणार नाही. रेस करता पळताना खरं तर वजन हा पण साईड गोल ठेवून चालत नाही असही लक्षात येतय. जरा कुठे वजन कमी व्हावं म्हणून कमी कॅलर्या घेतल्या की पळताना जाणवतं लगेच! लवकर थकवा येतो. किती वेळ, किती लांब, काय पेस वापरुन पळायचं आहे हे डोक्यात ठेवून कॅलरीज घेतल्या पाहिजेत. एकदा ट्रेनिंग वॉल्युम वाढला की वजन आपोआप कमी होईल.
>>>रेस करता पळताना खरं तर वजन
>>>रेस करता पळताना खरं तर वजन हा पण साईड गोल ठेवून चालत नाही असही लक्षात येतय.
बुवा, पण कमी वजनाचा देह घेऊन धावण्याचे बरेच फायदे देखिल आहेत हे अमान्य करता येणार नाही, नाही का? उदा: साध्यांवरचा ताण कमी होणं, ह्रदयावर कमी ताण येणं...?
सॉरी, मी आणखिन स्पष्ट लिहायला
सॉरी, मी आणखिन स्पष्ट लिहायला हवं होतं. आक्का, अर्थातच फायदे आहेत. मी ही तेच फायदे डोळ्यापुढे ठेवून सुरवात केली होती. वाटलं की देह २० पाऊंड हलका असेल तर जोरात पळता येइल आणि तो गोल मी गाठेन सुद्धा.
आता सध्या अशी स्टेज आहे की ज्यात माझं वजन अशा लेवल ला आलय की मी ज्या कॅलरीज घेतो त्या सगळ्या खर्च होतात पण आणखिन एक्स्ट्रा कॅलर्या, बॉडी फॅट मधून घेऊन माझं वजन कमी होत नाहीये. ह्याचं कारण मला एका विशिष्ट स्पीड ला आणि विशिष्ट अंतर धावायला ठराविक कॅलर्या लागतात. त्या नसल्या तर पळताना थकवा जाणवतो. हा एक पासिंग फेज आहे येवढच. वर लिहील्या प्रमाणे एकदा माझा ट्रेनिंग आणखिन वॉल्युम आणि माझ्या बॉडीची एफिशियन्सी आणखिन वाढली की परत वजन कमी व्हायला सुरवात होईल.
बुवा एक सुचवू का? ज्या दिवशी
बुवा एक सुचवू का?
ज्या दिवशी तुम्ही बराच लांबचा पल्ला पळाल त्यानंतर पाय गळ्यात टाकायची जी वेळ येते ना, त्यासाठे विपरीत करणी करून पहा. खाली जमिनीवर(कार्पेटवर) झोपायचं आणि पाय वर भिंतीवर. पार्श्वभाग हा शक्य तितका बेसबोर्डला चिकटून पाहिजे. असे साधारण पणे १० मिनिटे आराम करा. हे आसन जे लोक पायांचा खूप वापर करतात दिवसभर उभ्यानेच काम करतात (नर्सेस वगैरे), ज्यांना व्हेरिकोज वेन्स चा त्रास आहे त्यांना खूप फायदेशीर आहे.
IT band (इलियो-टिबियल) साठी गोमुखासन/अग्निस्तंभासन्/एकपादराजकपोतासन यांचा फारच फायदा होतो. ज्या दिवशी तुम्ही पळत नाही त्या दिवशी हे सगळे प्रकार करून पहा.
आसने इथे शोधा
http://www.yogajournal.com/poses/finder/browse_index
भारी, करणी नक्की करुन बघणार!
भारी, करणी नक्की करुन बघणार! मी सध्या हॅमस्ट्रिंग कर्ल्स, टो अप्स हे नित्यनियमानी करतो. काल पासून इलियो टिबियल स्ट्रेच पण सुरु केला आहे. तू दिलेली आसनं मात्र मला आधी विडियो किंवा चित्रं शोधावी लागतील. धन्यवाद!
बुवा, कळलं तुम्हाला काय
बुवा, कळलं तुम्हाला काय म्हणायचंय ते.
शूम्पे, अशी धावण्याआधी आणि नंतर फायदेशीर ठरणारी योगासनं लिही कृपया.
आणखी एक... बॅलेरिना ज्या छोट्या ठोकळ्यावर स्ट्रेचिंग करते ते बाजारात मिळतं. अत्यंत सुंदर स्ट्रेचिंग होतं. इथे बघा : http://www.amazon.com/Medi-Dyne-ProStretch-Unilateral-Stretching-System/...
धन्यवा शुम्पी मृ, हे आहे
धन्यवा शुम्पी
मृ, हे आहे आमच्या जिम मध्ये. अधून मधून वापरतो. तू सुरवात केली की नाही पळायला?
बुवा माझ्यामते वजनाकडे
बुवा माझ्यामते वजनाकडे दुर्लक्ष करण्याची ही फेज आहे weight loss plateau. दुर्लक्ष म्हणजे मला म्हणायचंय इग्नोर नाही पण ते कमी होतंय का ह्याबद्दल कॉशस रहाणं नको. तुम्ही वजन कमी करण्यासाठीही प्रयत्न करणार आणि धावतांना लांबचा पल्ला गाठण्यासाठीही, तर शरीर तुम्ही धावतानाच्या प्रयत्नांतून तुमचे आधीचे प्रयत्न वजा करून रिझल्ट्स देणार.
थोडक्यात समीकरण असं...थोडं कीचकट आहे पण दोनदा वाचलं की समजेल
W --> Weight
C/c --> Calorie Intake
P/p --> Performance
I/i --> Improvement
R --> Regression
F --> Fitness
W0+0 -> P+0 --> F0
W1+c -> P+i --> F1
W2+C -> P+I --> F2
C > c
I > i
Wx+C-Rx --> Py+I-Ry
I/C > i/c
W2 < W1 < W0
F2 > F1 > F0
शूम्पी खूप धन्यवाद.
आसनं करतो ठीक आहे पण नेमकं कुठलं आसन केल्याने काय फायदा होतो, ईथेच थोडं ज्ञान कमी पडतंय. दरदरवेळी योगागुरूला पीडायचंही जीवावर येतं. नेटवरून माहिती मिळते पण असं नेमकं कळंत नाही. माहिती देत रहा.
बुवा ५ किमी(च) का? आपण १-२ मोठी अंतरं प्लान करूयात ना ...६ मेच्या आधी. तुम्हाला संपर्कातून मेल पाठवली आहे.
पराग >> आनंदाच्या भरात तुझ्या प्रतिसादाबद्दल लिहायचंच राहिलं . मस्त लिहिलंस. सगळ्या नवशिक्या पळणार्यांची कहाणी थोडीफार सारखीच. काहीही विचार करा पण स्वप्नरंजन करून मनाला गुंतवणे महत्त्वाचे. वेदनेचा विचार करायला त्याला वेळ नको.
गेटोरेडबद्दल माझे मत चांगले आहे रे. लो शुगर असणारेही गेटोरेड मिळतात.
आलं लक्षात चमन. मेक सेन्स.
आलं लक्षात चमन. मेक सेन्स. सध्या तेच अनुभवतोय म्हणून वजनाच्या काट्याकडे आता दुर्लक्ष करतो. पुर्वी सारखं डायटही राहिलेले नाही त्यामुळे दुर्लक्ष करुन सुद्धा वजन हाताबाहेर जाण्याचे शक्यता आता नाहीचे. मी रिप्लाय केलाय मेलला. गुडघा दुखापतीमुळे परत थोडं कमी केलय मायलेज. यायला जमलं तर ५-६ पेक्षा ८ पर्यंत जायची तयारी आहे, जास्तही जाऊ शकेन पण थोडी धाकधूक आहे गुडघ्याबद्दल.
पराग, श्री, नात्या, मृण्मयी,
पराग, श्री, नात्या, मृण्मयी, अजय, केदार, स्वाती, प्रित, हेम, झकास आणि पळण्याची ईच्छा सणारे सगळेच
चालू केलंत का तुम्ही पळणं? (आम्ही पळतो पण तू पोष्टी आवर अश्या विनंतीची वेळ येणार दिसतंय )
नात्या... तुला कंपनी हवी आहे का? आमच्या कम्युनिटिमध्ये जॉगिंग ट्रेल आहे.
प्रगती, अडचणी, चांगली माहिती, शंकांबद्दल लिहित जावा राव ईथे.
बुवा,
कस्काय?
नाही ना रे अजून.. फारच
नाही ना रे अजून..
फारच इनर्शिया आहे इथे.. आणि उन्हाळाही..
Pages