Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिला तोच तो एकच एक नाईट ड्रेस
तिला तोच तो एकच एक नाईट ड्रेस घालून कंटाळा नाही येत का
सकाळी आंघोळ करतानाच लखनवीही धुवुन वाळत घातले आणि रात्री परत चढवते अंगावर..
अवनी, बरोबर.... म्हणुन्नच दाखवले असणर..
आणि महागडे हनिमुन पॅकेज घ्यायच्याआधी घरच्यांनी एकमेकांशी बोलायचे तरी होते. आता उरलेल्या दोघांचे पैसे फुकट की पोरांसकट स्वतःच हनिमुनवर जाणारेत ते????
सहा महिन्यानंतर राधाला सकाळी
सहा महिन्यानंतर राधाला सकाळी सुक्या ओकार्या काढताना पहायला लागणार आणि बारश्याच्या प्रसंगाने मालिका संपणार.>>>>>>>>
मानवकडून घनाचा कान पिळून घेतला ना? राधाचा भाऊ आहे तो आता>>>
बरं आहे! रोज मालिका नाही बघितली तरी इथे सगळी माहिती मिळून जाते
मालिका एकदम बोरिंग होत
मालिका एकदम बोरिंग होत चालालीय आता. पहील्याच दिवशी राधा सुप्रिया काकुकडे उर्मटपणे डबा मागते ते जरा अतिच झाल! आतापर्यंत काळे कुटुंब पुण्यात राहात आहे अस वाटत होत. पण कालच्या एपीसोड्मध्ये एकदम मुंबईच्या रस्त्यावरुन घोड्यावरुन वरात, बँडस्टँड वैगेर उल्लेख ऐकुन जरा बर वाटल पण जर मुंबईतल घर दाखवलय तर एकूणच वाडा टाईप घर, एकत्र कुटुंब, घरच्या मंडळींच राधा-घना च्या आयुष्याला आणि एकुणच सगळ्याच गोष्टींना एवढ अतिमहत्व देण आणि घनाचा एवढा आळाशी स्वभाव, (विशेषतः सॅअफ्ट्वेअर ईंजीनीयर दाखउनसुद्ध) जरा अतिशयोक्तीच दाखवलीय सतिश राजवाडेने. होप लवकरच मालीका मुळ ट्रॅकवर आली म्हणजे झाल...
<< काल घनाच्या तोंडचे
<< काल घनाच्या तोंडचे सॉफ्टवेअर इंजिनीयर, हाय आय क्यू, यूएस ऑफ ए ला जाईनच हे शब्द ऐकून हसू आलं. >> १००००० +
तो घना अजीबात सॉ. ई. वाटत नाहीये. काल काय म्हणाला म्हणे 'फ्रीलान्सर' आहे !!!! पुर्ण पणे गंडलेले आहे हे. इथे घरोघरी सॉ. ई. आहेत , बहुतेकांना या व्यवसायातले डीटेल्स माहित आहे आणि इथे लेखकाला , डायरेक्टरला कोणालाच असे बिन्बुडाचे संवाद टाकताना काहीच कसे वाटत नाही!!
घनाला परी, गंगा,यमुना व कुहु
घनाला परी, गंगा,यमुना व कुहु ग्रूप जॉईन करायला हरकत नाही. तो काही कमवत असेल असे वाटत नाही.
पीसीवर असतो तेव्हाही गेम्सच खेळताना दिसतो.
सहा महिन्यानंतर राधाला सकाळी
सहा महिन्यानंतर राधाला सकाळी सुक्या ओकार्या काढताना पहायला लागणार आणि बारश्याच्या प्रसंगाने मालिका संपणार>>>>>> +१
तो घना अजीबात सॉ. ई. वाटत नाहीये. >>>>> अगदी अगदी
राधाला खोटेपणा जमत नाही हे
राधाला खोटेपणा जमत नाही हे दाहवलेय. आता ती हे खोटे लग्न घरच्यांपासुन किती वेळ लपवते ते पाहायचे.
राधाचं डबा मागणं मला आवडलं
राधाचं डबा मागणं मला आवडलं नाही. बाकी सगळ्या गोष्टीत 'हम करे सो कायदा' अॅटीट्युड आहे ना, स्वातंत्र्य हवंय ना, मग स्वतःचा डबा स्वतः का बनवू नये? नाहीतर डब्बा सर्व्हिस लावावी.
ज्या घरात मुलगा आणि सुनेने हनिमूनला कुठे जाय्चं त्याचे बेत बाकीचे करतात आणि चिठ्ठ्या टाकून निकाल लावला जातो त्या घरात काय स्वातंत्र्य मिळणार? त्या प्रसंगी राधा 'तू ठरव ना, मला आवडेल तू ठरवशील ते' असं घनाला म्हणते तो संवाद तिच्या व्यक्तिरेखेला धरून रिअलीस्टीक वाटला. बाकी घरातले लोक त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये जो इन्टरेस्ट घेताहेत तो उबग आणणारा आहे. घनाच्या आईला आता थोडं बाकी कामात लक्ष घाला असं सांगावंसं वाटतं. तसंच लग्न झाल्यावर राधा हिंदी-मराठी सिरियलमधल्या सुनांसारखी लगेच साडी नेसायला लागली हेही खटकलं.
आजवर पाहिलेल्या हिंदी सिनेमांना स्मरून ह्या मालिकेचा एक पॉसिबल शेवट - संयुक्त कुटुंबात जमवून न घेता आल्याने आणि घुसमट झाल्याने सौ राधा घनश्याम काळे ह्यांचं माहेरी प्रयाण. आत्या, सासूबाई, वडिल ह्यांचे शिष्टाईचे प्रयत्न असफल. माहेरी काही काळ व्यतीत केल्यावर राधाला घनाची आणि घनाच्या घरच्यांची आठवण. सासरी रहाण्यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे ही जाणीव. राधाचं सासरी जाणं.
घना हा अजिबात सॉफ्टवेअर इंजिनियर वाटत नाही. त्याला सॉ.इं. दाखवल्याबद्दल राजवाडे आणि कंपनीचा त्रिवार निषेध!!!
लग्न झाल्यावर राधा
लग्न झाल्यावर राधा हिंदी-मराठी सिरियलमधल्या सुनांसारखी लगेच साडी नेसायला लागली हेही खटकलं.>>
घना हा अजिबात सॉफ्टवेअर इंजिनियर वाटत नाही. >> १००% अनुमोदन.
आणि हनीमू न चा निर्णय असे घरातले मोठे घेतात? आणि रिझर्वेशनं बरी मिळतात 'उद्या निघा' म्हणायला?
राधा घोरते हे मात्र आवडलं जरा काहीतरी वेगळं!
विनय आपटेचे डायलॉग मस्त...
विनय आपटेचे डायलॉग मस्त... आत्याबाई गेल्या वाटतं इंदूरला परत...:)
स्वप्नाच्या पोस्टला
स्वप्नाच्या पोस्टला १०००००००००००% अनुमोदन.
राजवाडे आपल्या नेहमीच्या
राजवाडे आपल्या नेहमीच्या मार्गाला लागलेत. मागचे १-२ एपिसोड्स अगदीच ओढून ताणून. कैच्याकै.
मला पण मुक्ताचा अभिनय आणि
मला पण मुक्ताचा अभिनय आणि तिचं कॅरॅक्टर नुसतच इरिटेटिंग वाटतय, तत्त्व्निष्ठ वगैरे अजिबात नाही वाटत ती, नुसतीच अगाउ, शो ऑफ कॅटॅगरीतली !
स्वप्नीलच कॅरॅक्टर त्या मानानी प्रामाणिक आहे, अजुन तरी जसा दाकह्वलाय तसाच वागताना दिसतोय.
माझं प्रेडिक्शन : ससुराल गेन्दा फुल च्या मार्गानेच जाणार.
आजीबाई जिंदाबाद! काल त्यांनी
आजीबाई जिंदाबाद! काल त्यांनी सपष्टपणे सांगितलं 'तुम्हाला बाबापुता करून इथपर्यंत आणून सोडलं. आता तुमचा संसार पुढे तुम्ही बघा. नाही जायचं हनिमूनला तर नका जाऊ'. ज्यात त्यात नाक खुपसणार्या देवकीमातेचा चेहेरा प्रचंड प्रेक्षणीय झाला होता. सून आणि मुलगा हनिमूनला जात नाहियेत ही बाब त्यांनी माईकडे नेण्याचं कारणच काय? वर ते जात नाहियेत म्हटल्यावर जगबुडी आल्यासारखा चेहेरा. देवकी, वसुदेवांना नातवाचं तोंड वर्षभरातच पहायची घाई झाली आहे का? कैच्या कै.
काल घना अमेरिकेला जाण्याबाबत "२-४ ठिकाणी अर्ज केले आहेत. ३-४ महिन्यात जमेलच कुठेतरी" असं म्हणाला तेव्हा प्रचंड हसू आलं. ही सिरियल २०१२ मध्ये घडतेय का २००० च्या आधी? आणि हा आळसोबा अमेरिकेला जाऊन तिथे स्वतःचं स्वतः कसं निभावणार आहे म्हणे?
अमेरिकेला जायला व्हिझा
अमेरिकेला जायला व्हिझा लागतो, हे तरी माहित आहे का घनाला?
स्वप्ना, अपडेटबद्दल धन्यवाद!!
स्वप्ना, अपडेटबद्दल धन्यवाद!!
डेलिया, अग्गं नोकरी मिळाल्यावर एम्प्लॉयर घनाच्या व्हिश्याचं काम करेल की
स्वप्नील जोशी एक तर खूपच
स्वप्नील जोशी एक तर खूपच चांगला अभिनेता आहे किंवा तो खरंच मुक्ताच्या प्रेमात पडलाय ;). तिच्याकडे बघतानाची त्याची एक्सप्रेशन्स अफलातून असतात :).
राधाने घातलेला ओल्ड नेव्ही चा
राधाने घातलेला ओल्ड नेव्ही चा गुलाबी टी शर्ट गुंतता मधे पसु ने घातलेला होता बहुतेक
>>>
पसु कोण??
अंजली अगदी अगदी!! काल मुक्ता
अंजली
अगदी अगदी!!
काल मुक्ता जरा थबकली- बावरली, स्वप्नील 'हो प्रेम आहे' म्हणाल्यावर!!
निंबुडा... पसु म्हणजे पल्लवी
निंबुडा... पसु म्हणजे पल्लवी सुभाष गं
तो खरंच मुक्ताच्या प्रेमात
तो खरंच मुक्ताच्या प्रेमात पडलाय . तिच्याकडे बघतानाची त्याची एक्सप्रेशन्स अफलातून असतात >>>> +१
स्वप्निल 'राधा' हे नाव पण किती प्रेमानं घेतो..मला जाम आवडतं
नाहीतर राधा अगदी कोरडेपणानं त्याला घनश्याम म्हणत असते.
एक खटकतंय की राधानी अजिबात पप्पांना फोन केला नाहीये का लग्न झाल्यापासून... ते चार दिवस माहेरी जातात राहायला तसं ही काही दाखवत नाहीये.
ghanaa ! too lahanpaNi
ghanaa ! too lahanpaNi dokyawar padala hotas ka re ?
ha ha pu waa
hayala ....hee deonagari kuthe lupta zaalee .....?
चु ची दु घना नाही ....घनश्याम
चु ची दु
घना नाही ....घनश्याम
मुर्खपणा कसा करु नये याचे
मुर्खपणा कसा करु नये याचे मुर्तिमंत उदा. म्हणजे कुहु........ मुर्ख इतकी असु शकते ....?
कालच्या भागात दोघी जावांचे
कालच्या भागात दोघी जावांचे 'अगं ए' चे टायमिंग मस्त होते.
स्वप्नील जोशी एक तर खूपच
स्वप्नील जोशी एक तर खूपच चांगला अभिनेता आहे किंवा तो खरंच मुक्ताच्या प्रेमात पडलाय डोळा मारा. तिच्याकडे बघतानाची त्याची एक्सप्रेशन्स अफलातून असतात स्मित.
<<
अगदी बरोबर, अंजली, अफलातून केमिस्ट्री आहे त्याची मुक्ता बरोबर :).
'ए आई ग' हाक पण कित्ती सहज मारतो
फार सहज, सुरेख अभिनय.. बोले तो कॉमेडी सर्कस के बाद अब इस रोल मे भी आपुन पक्का फॅन होगेयेला स्वप्नील का !
एल्दुगो जाम बोअर होत चाललीये
एल्दुगो जाम बोअर होत चाललीये दिवसेंदिवस... प्रचंड तोच-तोच पणा आलाय... राधा-घनातर डोक्यात जातायत त्यांच्या अॅटिट्युडमुळे.
एल्दुगो जाम बोअर होत चाललीये
एल्दुगो जाम बोअर होत चाललीये दिवसेंदिवस... प्रचंड तोच-तोच पणा आलाय... राधा-घनातर डोक्यात जातायत त्यांच्या अॅटिट्युडमुळे. >>> सानी, प्रचंड अनुमोदन. काल मी बर्याच आठवड्यांनी पाहिलं. राधा-घना आणि कुहु इतके इरिटेटिंग आहेत. मुक्ता आवडायची ती आता नावडायला लागली आहे. राजवाडे आपल्या नेहमीच्या रस्त्यावरुन चालले आहेत.
नवीन लेखन मधे 'लग्नाची गोष्ट
नवीन लेखन मधे 'लग्नाची गोष्ट ' आता चौथ्या पानावर जायला लागली.
राजवाडे काका,
आता तरी जागे व्हा...
ए मस्तं चाललय. जा त्या
ए मस्तं चाललय. जा त्या रोलीसिमरकाकोणसतीसावित्री पहा जा.
भेंडीच्या भाजीत लसूण ?
Pages