पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' ह्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे 'मसालेदार' चारोळ्या रचण्याची!
ही स्पर्धा अतिशय सोपी आहे. आम्ही तुम्हांला चारोळ्या रचण्यासाठी एखादं छायाचित्र, किंवा एखादा विषय देऊ.
तुम्ही झक्कास चारोळ्या रचायच्या, आणि इथे लिहायच्या..
स्पर्धेचे नियमही खूप सोपे..
१. दिलेल्या छायाचित्रावर किंवा विषयावर तुम्ही चारोळी रचायची आहे.
२. चारोळी अर्थातच मराठीत असावी.
३. एक स्पर्धक एकापेक्षा अधिक चारोळ्या स्पर्धेसाठी इथे लिहू शकतो.
४. तुमच्या प्रवेशिका तुम्ही त्या त्या स्पर्धेच्या धाग्यावर टाकायच्या आहेत. कृपया स्वतंत्र धागा सुरू करू नये.
५. चारोळ्या तुम्ही स्वतः रचलेल्याच असाव्यात. इतरत्र टाकलेल्या, पूर्वप्रकाशित, आक्षेपार्ह मजकूर असलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. शिवाय त्या लगेच अप्रकाशित केल्या जातील.
६. प्रत्येक स्पर्धेसाठी एक विजेता निवडला जाईल.
७. बक्षीस हे कल्पकता, चारोळीची रचना तसेच चारोळीतून पदार्थ आणि त्यातील मसाले यांची कशी सांगड घातली आहे, ह्यावर अवलंबून असेल.
६. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहतील मायबोलीचे मा. वेबमास्तर आणि मा. प्रशासक.
चारोळ्या रचण्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं छायाचित्र...
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
एखाद्या पदार्थाचं छायाचित्र, दुरून येणारा मसाल्याचा वास जसा भूक वाढवतो, तसंच हे मिसळीचं छायाचित्र पाहून चारोळया रचण्यासाठी सज्ज व्हा... !
मिसळीचं छायाचित्र मिनोती यांच्या सौजन्याने, © मिनोती.
अजून एक माझीपण हे जरा प्रांत
अजून एक माझीपण हे जरा प्रांत वगैरेचा मोह प्रयत्नपूर्वक टाळून चारोळी करण्याचा प्रयत्न केलाय
घरची मोड आलेली पौष्टिक मटकी वाडगाभर
बारीक कांदा नि लिंबू,फरसाण फ॑क्कडसं मापभर
ओता कांदालसूण मसाल्याचा झण्झण्णीत कट
ते पौष्टिक वगैरे विसरून संपवा बरं पटापट
मालवण्यांची असते ही सदाची
मालवण्यांची असते ही सदाची मिजास
'बांगड्याच्या तिकल्याची कशाक नाय सर'
मिसळ पुणेरी चाखलीच जर कधी नाही
कंबख्त क्या जाने, होता है क्या होना तर्र.
झक्कास!! सगळेच लय भारी मस्त
झक्कास!! सगळेच लय भारी
मस्त मज्जा येतेय चारोळ्या वाचायला... धम्माल!!
तोषा, गटगची तारीख ठरवून टाक रे
सगळ बेश्ट जमलय, थोडं आबंट
सगळ बेश्ट जमलय, थोडं आबंट तिखट मिसळ
जिन्नस सारे एकजीव, एकदा चमच्याने घुसळ
मसालेदार गप्पा, कुणाच काढू नको कुसळ
चव येऊ दे रंगात, हशा, टाळ्यासह उसळ
ऋयाम....मस्त!
ऋयाम....मस्त!
मसाला मिसळ संगट दोन
मसाला मिसळ संगट दोन पाव
कोथमीर कांदा लिंब अन त्यावर श्याव
सनसनीत झनझनीत तर्रीचा कट
झक्कास जमला ह्यो चित्रपट......
झणझणीत मिसळ आणि कांदा
झणझणीत मिसळ
आणि कांदा कोथींबिरीची साथ
वरून लिंबु रसाळ
बनवी बेत लज्जतदार
सगळ्या चारोळ्यात माझीच चारोळी
सगळ्या चारोळ्यात
माझीच चारोळी बेश्ट
चला बाजु व्हा सगळे
घेऊद्या त्या मिसळीची टेश्ट!
म्हराटी मानसाचा आग्रहः
म्हराटी मानसाचा आग्रहः
उसळीच्या रश्याच्या रंग लई न्यारा
त्यावर करा कांदा नी श्यावगाटीचा मारा!
लिंबू-कोतमीरशिवाय तिला खायाचं न्हाय
आन मिसळ खाल्याबिगर कुनी जायाचं न्हाय!
तिकिटं फक्त मुंबई किंवा
तिकिटं फक्त मुंबई किंवा पुण्यापुरतेच मर्यादीत का ?
>>>
मुंबई किंवा पुण्याबाहेरच्या खेळांची तिकिटं देणं हे सध्यातरी निर्मात्यांना (आणि म्हणून माध्यम प्रायोजकांना) शक्य नाही. क्षमस्व. स्पर्धांतले विजेते पुण्या-मुंबईच्या बाहेरचे असतील, तर आपल्या नातलग वा मित्रांना ती तिकिटं ते देऊ शकतात.
स्पर्धा अर्थातच जगभरातल्या सार्या मायबोलीकरांसाठी आहेत. मुंबईपुण्याबाहेरचे असाल, तरी कृपया स्पर्धांचा आनंद घ्या. चित्रपट केव्हा ना केव्हा बघालच, पण त्याआधी नातलग आणि मित्रांना चित्रपटाबाबत सांगा.
सर्वांच्या चारोळ्या मस्त खुसखुशीत आहेत. अजून येऊ द्या.
(No subject)
भाऊ
भाऊ
सौ सुनार की,एक लुहार
सौ सुनार की,एक लुहार की.
सगळ्या चारोळ्यांपेक्षा झणझणीत भाउंचं व्यंगचित्र झालं आहे.
भाऊ ....
भाऊ ....
सर्व रंगांना आणि मसाल्यांना
सर्व रंगांना आणि मसाल्यांना सामावणारी
डोळ्याना पाणी आणणारी लाल तर्री
खरच मजा आणेल
खाऊन बघाच एकदा तरी
क्या बात है........!!!!!
क्या बात है........!!!!!
मस्तच ! भाउ ऋयामा - येक
मस्तच !
भाउ
ऋयामा - येक नंबर भावा !
मा_प्रायोजक, परवाची मिसळ झाली
मा_प्रायोजक,
परवाची मिसळ झाली की हो शिळी
पब्लिकची ही आता झाली गुपचिळी
चरोळीच्या वारूला खुमखुमी हवी
मसाला मारके प्लेट येऊ द्या की नवी.....
गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खुप सार्या शुभेच्छा!!!
भाऊ मस्तच.
भाऊ मस्तच.
मुरली आता स्वभावाची
मुरली आता स्वभावाची सर-मिसळ
घालूया कांदा, ताजा मसाला आणि लिंबू
सत्तरी उलटली म्हणून काय झालं?
चल कोपर्यावर मिसळ खात थांबू
(संध्याकाळी पाय मोकळे करायला निघालेल्या वृद्ध जोडप्याची चारोळी)
सिनेमाची दोन तिकिटे भाउंनाच
सिनेमाची दोन तिकिटे भाउंनाच
बाकी लाजो आणि टोकुरिका फारच सुटलेत
स्वतः मिसळ ओरपण्यात मग्न आहेत
स्वतः मिसळ ओरपण्यात मग्न आहेत काय माप्रा?
आम्हाला इथे मिसळ खाऊन खाऊन कंटाळा आला हो माप्रा
.... काही थंड, गोड, प्रवाही उतारा द्या हो माप्रा
णिशेद म्हणून अज्जिबात यमक जुळवणार नाही मी ....
मृण्मयी, तुझ्या चारोळीतल
मृण्मयी, तुझ्या चारोळीतल अनुभव प्रत्यक्ष घेतला आहे! पण आता नागपुरकरांना मिसळ आवडु लागली आहे.
भुंग्या
भुंग्या
णिशेद म्हणून अज्जिबात यमक
णिशेद म्हणून अज्जिबात यमक जुळवणार नाही मी .. >>>
भाऊ, सहीच
मामी
मामी
व्यंचि माझं टपकलंच नसत्या
व्यंचि माझं टपकलंच नसत्या वेळीं
पडावी जशी गांधीलमाशी मिसळीं
शी: शी: ऐकून चारोळीची आरोळी
उठला ना शूळ मा.प्रा.च्याच कपाळीं .
[ वि.सू.- ही चारोळी स्पर्धेसाठी एंट्री म्हणून टाकलेली नाही !]
पडद्यामागचा सीन : "अरे एSSS,
पडद्यामागचा सीन :
"अरे एSSS, चला आटपा. बास झालं ते प्लेटीच्या प्लेटी मिसळी खाणं"
"ज्यास्त मिसळी खाऊ नेत. लै तिक्कट असतंय ते. दुसर्या दिवशी बोलतंय."
"आवरा आवरा. भायेर त्या लाजो न मामी बोंबाबोंम करून र्ह्यायल्यात."
"का बरं येवढ्या ओरडतायत? आपल्यापैकी कोणी गणेशोत्सवाच्या वेळी त्यांना टशन दिलेली काय?"
"अरे ते पाककृती विभागात प्रचि शोधायला गेलेले आले की नाही परत? कोण्णाला म्हणून तिथे पाठवायची सोय राहिली नाही. गेले की रेंगाळतातच ...."
"आता हा उपक्रम झाला ना की बै आपण सगळे हा बाफ मनापासून वाचून काढूयात!"
(No subject)
मामी मी अगदी उत्सुकतेनं
मामी मी अगदी उत्सुकतेनं तुमच्या पोस्ट्मधली लिंक उघडली आणि प्रचंड हसले
Pages