मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अशोक, तो मधुबालाचा नाच चार जणांनी, भांग पिऊन केलाय.
अशक्य आहे तो. शरीराचे हलू शकतील ते सगळे भाग हलवत केलेल्या क्रियेला, नाच म्हणायची फॅशन आहे.. चेहर्‍याचे स्नायू मात्र हलत नाहीत कुणाच्या.

मैने इक दिन जरासी जो की मस्करी
>>> दिनेशदा, या मस्करी शब्दाची मला खूपच मजा वाटते. तो मला जामच मराठी शब्द वाटतो आणि या गाण्यात खटकतो. नाहीतरी शांतारामबापूंचे हिंदी चित्रपटही मराठी पाकातून काढलेले असायचे. मै ला 'मयी' म्हणणे, हिंदी वाक्यं सेम टू सेम मराठी ढंगात म्हणणे इ. म्हणजे त्यात काही वाईट आहे असं नाही पण मजा वाटायची.

मस्करी हा शब्द हिंदीत आहे तसाच ''तंगडी' हा शब्द पण आहे. खरंच!

मस्करी शब्दाची मला खूपच मजा वाटते. तो मला जामच मराठी शब्द वाटतो >>>

आखाती देशात आल्यावर समजलं की मस्करी हा मूळ अरबी शब्द आहे... "मस्कारा" म्हणतात हे लोक चेष्टेला. हिंदी-मराठीत मस्करी Happy

मसखरी असा हिन्दी शब्द. मसखरा = विदूशक, चेष्टेखोर.
मै ला मई म्हनणे हैद्राबादी हिन्दीत सर्रास दिसते. मराठी लोकाना दोष कशासाठी ?

कमीना होगा बाहों में>> अक्षयकुमार असल्यामुळे हे ही परफेक्ट चालेल Rofl
वीर धनुर्धर पारशी>> अल्टीमेट Rofl
डुलकी लागे>> तो ही सिनेमा डुलकी लागण्याइतकाच बोअर आहे Rofl

@ दिनेशदा
सही जवाब...:)
'वीर धनुर्धर परशी' वाल्या आमच्या काकू गिरगावच्या पारशी अग्यारी जवळ ५ मिनीटावर रहायच्या... Lol

ससा डीटर्जंट अ‍ॅड मी अशी ऐकली होती
ससा डिटर्जंट टिकीया लाओ
देर तक चले, बहु कम जले, Lol
ते बहुत कम गले असे आहे..

परीणीता मधल एक गाणे आहे. त्या अगोदर एक नेपाळी भाषेत काही तरी आहे. ते मला '...मळमळ तय... मला तर आलीये ओकारी' अस वाटत होत. नक्की काय आहे ते?

Proud

आतापर्यन्त या गाण्याचा उल्लेख आलाय की नाही हे माहित नाही पण हे गाणे २ गायिकांनी वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केले आहे आणि दुसर्‍या वेळी त्याचे शब्द बदलले आहेत.
तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशे झळकती यातील शेवटचे कडवे -
शूर्पकर्णका उठ गजमुखा उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगाचा तूच नियंता विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर ब्रह्मा श्रीपती असं मूळ गाण्यात आहे - आशा भोसले मला वाटतंय.

मग बहुतेक रंजना जोगळेकर किंवा उत्तरा केळकर यानी केलेल्या ध्वनीमुद्रणात
तुझ्या दर्शना अधीर देवा स्वरब्रह्माचे पती असं अगदी स्पष्ट ऐकू येतं.

खरं काय आहे हे कुणाला माहित आहे का??

>>>परीणीता मधल एक गाण आहे. त्या अगोदर एक नेपाळी भाषेत काही तरी आहे. ते मला '...मळमळ तय... मला तर आलीये ओकारी' अस वाटत होत. नक्की काय आहे त>>>>>>>
हो मला पण सुरुवातीला हे असच विचित्र ऐकू यायचं. मग थोडे शब्द एका मैत्रिणीकडून समजले पण अजूनही काही घोळ आहेतच. Happy
ते कोडं आता पर्यंत असं सोडवलं आहे - कस्तो मझा है लै लै मा, रमै लो उगादी ओकारी. Biggrin

कस्तो मजा है रेलैमा : रेल्वेतून जाण्यात किती मजा आहे.
रमैलो उपाली ओराली : याचा अर्थ गूगलून साभार "Its fun when train goes uphill n downhill"

धनश्री, तुझ्या कांतीसम रक्तपताका हे मूळ गाणे सुमन कल्याणपूर यांनी गायलय आणि हर ब्रह्मा श्रीपती असंच आहे.

रंजना जोगळेकर किंवा उत्तरा केळकर यांचे गाणे मी ऐकले नाहिये पण 'स्वरब्रह्माचे पती' याचा काहीच अर्थ निघत नाही.

मला ते गाण " निसर्ग राजा आई काय सांगते " असे वाटायचे
आणि दुसरे " छबी दार छबी मी दोर्‍यात उभी" असे.. मी विचार कारायचे की दोर्‍यात कशी ऊभी राहिल ही.

रावन सिनेमातले "ओ मेरी छम्मकछ्ल्लो" या गाण्यात एक ओळ आहे "तेरी पिक्चर का मै हीरो" यानंतर तो अ‍ॅकॉन का कोण गायक आहे तो नक्की काय गातो काही केल्या समजत नाही. मला आपलं ते असं ऐकू येतं "तेरी पिक्चर का मै हीरो, ये पिक्चर मुझको दे दो" Uhoh

दिल आश्ना है मधलं एक गाणं आहे.
'दिल आश्ना है जिगर आश्ना है हम पे ये तुम्हारी नजर आश्ना है'. ते नजर मला फिगर ऐकू यायच .म्हणजे फिगर बघून फिदा झाला असं . नक्कीकाय आहे ते?

गडी अंगान उभा नी आडवा
त्याच्या रुपात गावरान गोडवा

अस वाटायचं की

त्याच्या रुपात गावरा न गोडवा, तर ही "गारवा"च्या ऐवजी "गावरा" का म्हणतेय.

Pages