शंभूराजे

Submitted by अनिल तापकीर on 22 March, 2012 - 01:49

धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर
आज धर्मवीर शंभूराजांची पुण्यतिथी आहे. म्हणून काही महिन्यापूर्वी टाकलेली कविता पुन्हा टाकली आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्वच कडव्यांशी प्रामाणिकपणे सहमत व्हावेसे वाटत आहे

आदरयुक्त भावना पोचल्या

(कविता म्हणून मात्र तितकीशी भावली नाही. बरेचसे वर्णन आहे. अभिमानगीत, स्फुर्ती गीत म्हणता यावे) Happy

छान कविता.
>>मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता<<
संभाजीराजास मानाचा मुजरा.....

धन्यवाद भिडे साहेब , मला साहित्याबद्दल जास्त काही समजत नाही. जे सुचते ते उतरवतो. मी जे लिहिलंय ते कविता म्हणण्यापेक्षा स्फुर्तीगीत च योग्य वाटतंय