पास्ता प्रकार, पास्ता सॉस इ...तंत्र, मंत्र आणि पाककृती कल्पना

Submitted by लाजो on 19 March, 2012 - 04:57

खरतर इटालियन असलेला हा पास्ता हल्ली आपल्या भारतीयांच्या घरात देखिल नेहमी बनवला जातो आणि आवडीने खल्ला जातो Happy

या पास्त्याचे विविध प्रकार इथे परदेशात आणि आता देशात देखिल सहज उपलब्ध आहेत. यात स्पगेटी, एल्बो, पेन्ने, बोपास्ता, फेटुचिनी, शेल्स इ आणि लझानिया, कॅनेलोनी करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पास्ता शीट्स आणि ट्युब्ज असे प्रकार असतात. कुठल्या प्रकारचा पास्ता कधी वापरावा? तो शिजवण्याचे तंत्र, मंत्र इ बाबत चर्चा इथे करुयात.

पास्ता सॉस चे देखिल असंख्य प्रकार आहेत. टॉमेटो बेस्ड पास्ता, चिझी पास्ता, बेक्ड पास्ता, लझानिया, कॅनेलोनी, मॅकचिझ इ इ. हे सॉस बनव्ण्याच्या तुमच्या कल्पना, तंत्र, मंत्र आणि पाककृती (योजाटा आणि इथे लिंका Happy ) इथे लिहुयात.

तसेच पास्ता डिश केली तर त्याबरोबर कॉम्बीनेशन म्हणुन गार्लिक ब्रेड, की सॅलड की अजुन काही साईड डिश इ इ ची चर्चा आणि कल्पना देखिल लिहा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी करते ती पास्त्याची कृती:
मी विकतचे पास्ता (मॅकरोनी) चे पाकिट आणते.
१) एका वेळी एका व्यक्तीला पोटभर होण्यासाठी १ कप भरून कच्चा पास्ता घेणे.
२) ते मीठ + तेल घातलेल्या पाण्यात १५ मिनिटे झाकण न घालता उकळते (बारीक गॅसवर). अधून मधून ढवळणे.
३) पास्ता शिजेस्तोवर कांदा + टोमॅटो बारीक चिरून घेणे
४) चाळणीत शिजलेला पास्ता निथळून घेणे
५) कढईत (पॅन मध्ये) तेलावर हळद + लसणीची पेस्ट + कांदा + टोमॅटो परतून घेणे
६) नंतर यात चवीनुसार पास्ता सॉस (हा ही मी रेडीमेडच आणते) टाकून ढवळणे
७) शिजवलेला पास्ता + मीठ घालून परतणे
८) शेवटी किसलेले चीझ

यम्मी! माझा आवडता प्रकार Happy

निंबुडा, पास्ता उकडताना त्यात मीठ घालावे पण तेल नाही... कारण 'तेल घातल्यास पास्ता ड्रेन केल्यावर त्यावर तेलाचे आवरण रहाते आणि मग पास्ता सॉस त्याला नीट चिकटत/लागत नाही' असे जेमी ऑलिव्हरच्या एका शो मधे बघितले होते. तेव्हापासुन मी उकडताना तेल घालत नाही Happy

माधव, कोल्ड पास्ता सॅलड इकडे जर्मनीत असे करतातः
पास्ता सालाड
२५० gram शिजवलेला पस्ता.
अर्धा वाटी शिजवलेले मटार (or canned green peas)
१ रन्गित कॅप्सिकम , बारीक तुकडे करुन.
मीठ, मिरपुड
१ मोठा चमचा केचप, २ मोठे चमचे मेयॉनीज
हे सर्व नीट mix करणे आणि फ्रिज मध्ये १ तास ठेवणे.
यात german लोक ham चे तुकडे पण घालतात.

माझ्या मते पाणी उकळत ठेवून त्यात ऑऑ जरुर घालावे. पास्ता शिजल्यावर एकमेकांना न चिकटता वेगळा रहातो.
पास्ता हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आठवड्यातून एकदा तरी खावाच लागतो नाहीतर चुकल्यासारखं वाटू लागतं.
मागे मृ ने ही एक पास्ता बीबी सुरु केला होता.

पास्ता उकडताना त्यात मीठ घालावे पण तेल नाही... >>>
अगं, पण ते एकमेकांना चिकटू नये म्हणून घालायचे असे मी ऐकले होते.

मी करत असलेले पास्ता सॉस :

१. अल्फ्रेडो सॉस : ऑऑ वर बारीक चिरलेला लसूण, थोडा हिंग, कापलेला कांदा परतून घ्यायचा. त्यात दूध घालून मग पास्ता घालायचा. मग चीज (कोणतंही चालेल. मी अगदी अमूल्/ब्रिटानिया स्लाईस चीजही घालते.) आणि (असेल तर) थोडं फ्रेश क्रीम घालायचं. बच्चे कंपनी खुश. यात गाजर, ब्रोकली, मशरूम्स घालायचे असतील तर कांद्यानंतर घालून शिजू द्यावेत. फ्रेश हर्ब्ज - बेसिल, ओरेगानो, पार्सली इ. घालावे. नाहीतर ड्राय हर्ब्ज घालाव्यात.

२. पेस्तो सॉसची सोप्पी कृती : फ्रेश (इथे मात्र फ्रेशच हवी) बेसिल*. स्वच्छ धुऊन, जाड देठ काढून टाकून घ्यावी. ही बेसिल, थोडे आक्रोड, ऑऑ, लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार आणि मीठ, मिक्सरच्या चटणीच्या भांड्यात बारीक करून घ्यावे.

कांद्यावर घालून मग त्यात पास्ता घालावा.

*दादरच्या प्लाझा मार्केटात एक जण होलसेलवर विकतो. दहा रूपयात भरपूर प्रमाणात मिळते. तीच बाहेर दुकानांत घेतली तर निदान ६-७ पाकिटं विकत घेतल्यावर होईल इतकी असते.

३. टोमॅटो बेस्ड सॉस करता : ताजे टोमॅटो बारीक चिरून, ताजी बेसिल बारीक चिरून कांद्यावर घालून शिजू द्यावी आणि मग त्यात पास्ता घालावा.

माझी टोमॅटो बेस्ड पास्ता रेस्पी.. इम्प्रॉव्ह आहे पण सोप्पी आहे.

ऑऑ वर आलं लसूण पेस्ट/ क्रश्ड आणि ड्राय हर्ब्ज घालून कांदा टॉमेटो परतून घेते. मग थोडा शेपू. याचा फ्लेवर भारी येतो अगदी शेपूप्रेमी नसाल तरी. मग सुक्या लाल मिरच्या/ लाल तिखट. जेवढं तिखट हवं त्याच्या अर्ध्या. मग पाहिजे त्या भाज्या (भोपळी मिरची मस्ट, बेबीकॉर्न, गाजराचे तुकडे, अगदी बारीक चिरलेला पालक, मक्याचे दाणे, तोंडल्याच्या चकत्या, भिजवलेली कडधान्ये इत्यादी) त्यात ढकलून खमंग परतते. नंतर मिक्सरातून टॉमेटो + हिरवी मिरची (प्युरीसदृश पण कच्चे) असं काढून ते या भांज्यांवर घालते. परत थोडं परतणे आणि गरजेप्रमाणे पाणी, मीठ घालणे. एक उकळी, एक वाफ काढणे.

दरम्यान एकीकडे मीठ घालून पाणी उकळणे. गॅस लहान. मग पास्ता त्यात घालणे. शिजला की निथळायला काढणे.

प्लेटमधे शिजलेला पास्ता आणि वरून हे कालवण. बाजूला गा ब्रेड.

सध्या माझ्याकडे ड्राय बेसिल आहे. पण मैत्रिणीने बेसिलच्या बिया दिल्यात त्या लावल्या की लवकरच फ्रेश बेसिल घरच्याघरी. Happy

व्हाईट सॉस बनवायची माझी क्रुती अशी आहे: दोन चमचे कणीक तुपावर भाजून घेणे त्यात जेव्हढे जाडसर हवे असेल तव्हेढे दूध घालणे. त्यातच हर्ब्ज, मीरपूड, कडिपाला आणि हि.मिरचीची पेस्ट घालणे. हवे तेव्हढे जाडसर शिजून झाले की हा सॉस शिजलेल्या पास्तात घालून फस्त ...:)

लाजो +१. पास्ता उकड्ताना पाण्यात मीठ घालावे. खडे मीठ असेल तर उत्तम . पास्ता शिजल्यावर चाळ्णीत उपसून गार पाणी सोडावे नंतर त्यावर ऑऑ घालावे. इति ईटालियन मैत्रिण.

कणीत बटरवर थोडी परतायची, त्यातच मिल्क पावडर घालून परतायची, त्यात जायफळ व मिरपूड मिसळून (सगळे कोरडेच) हवाबंद डब्यात फ्रिजमधे ठेवायचे. हवा त्यावेळी यातले दोन चमचे मिश्रण घेऊन त्यात एक कप कोमट दूघ किंवा स्टॉक घालून ब्लेंड करायचे आणि गरम करायचे. हे माझे व्हाइट सॉस रेडी मिक्स. यात जायफळ मिरीचा वास मस्त मुरतो.

माधवः पिझा हट मध्ये पास्ता मिंट सलाड चांगले बनते.
माझा फेवरैट अराबिआटा सॉस, मॅक अँड चीज, स्पॅघेटी बोलोनीज. स्पॅ विथ मीट बॉल्स ( खिमा नाहीतर सॉसेजेस घालून.

एकदा पार्मेजिआनो रेजिआनो चीज आणले ते पारच फेल गेले. अति उग्र वास. तेव्हा पासून अमूल चीज झिंदाबाद.

नॉर चिकन सूप घट्ट सर बनवून जरा क्रीम घालून एन हान्स केले तर ते ही मस्त सॉस बनते.
मशरूम्स, चिकन कांदा लसूण परतून त्यात पास्ता घालून वरून हे सूप/ सॉस घालायचे व मिक्स करायचे.

दिनेशदा ही सॉसची रेसीपी मागे तुम्ही लिहिली होती . मी माहेरी जाताना मागे असा सॉस (पावडर) करून ठेवला होता . नवरा जाम खूश झालेला त्यामुळे Happy इट रॉक्स Happy धन्स दिनेशदा Happy

केसांना लावण्यासाठी मागे मेडिकल मधून ऑऑ ची बाटली आणली होती. तेच तेल खाण्यासाठी वापरतात का? की वेगळं असतं? Uhoh

निंबुडे, त्यावर काय लिहीलय? ते प्युअर ऑऑ आहे का की त्यात काही अजुन आहे.. केसांसाठी लिहीलय्स म्हनून विचारते...
ऑऑ हे वर्जीन, एक्स्ट्रा वर्जीन, प्युअर इ प्रकारात मिळतं.

निंबुडे, त्यावर काय लिहीलय? >>>
अगं, माझ्याकडे आत्ता नाहीये. मागे २ वर्षांपूवी केसांसाठी घेतलं होतं. काल एका दुकानदाराला विचारलं तर म्हणे तेच खाण्यात पण वापरतात. पण तरी शंका वाटतेय.

ही माझ्या लेकीची आवडती रेसिपी
पाणि उकळत ठेवून त्यात मीठ घाला, उकळी आली की पास्ता घाला आणि परत उकळी आणा
एकीकडे २ चमचे ऑऑ + १ चमचा butter गरम करा. १ चमचा बारीक चिरलेला लसूण १ मिनीट परतवा, मग बारीक चिरलेला कान्दा परता. २ वाट्या बारीक चिरलेला पालक घालून झाकण ठेवून शिजू द्यावा. २ मिनीट शिजल्यावर १/२ कप स्वीट कॉर्न घाला आणखी शिजू द्या. तोपर्यन्त पास्ता शिजलेला असेल.
आता पालकावर २ चमचे मैदा घालून २ मिनीटे परतवा. गोळा भाजीसारखे दिसेल. आता त्यात २ कप कोमट दुध घाला, १ वेळी १ कपच घाला. सारखे ढवळत रहा. चवीप्रमाणे मीठ मीरपूड घाला आणि शिजु द्या.
आता पास्त्यामधले पाणि काढून तो सॉसमधे मिसळा आणि १ मिनीट शिजु द्या. सॉस घट्ट वाटला तर पास्त्याचे पाणि २-३ चमचे घाला.
झकास पास्ता तयार, चीज कीसून घातले तर आणखी बहार
याच सॉस मधे बारीक चिरलेली पिवळी आणि लाल सिमला मिरची आणि झुकीनी पण छान लागते, ती कान्द्याबरोबर परतून घ्या.

<< मेडिकल मधून ऑऑ ची बाटली आणली होती. तेच तेल खाण्यासाठी वापरतात का? >>

एकदा वापरुन बघच. एका दिवसात रीझल्टस् कळतील. तूला कळले की इकडेपण सांग हां सगळ्यांना.

हे सगळे पास्ता सॉसचे प्रकार झाले. बेसिक पास्ता बनवण्यसाठी लाजोने दिलीय त्याशिवाय अजुनही भरपुर प्रकार आहेत तेही लिहा ना....

पास्ता!!! माझा व माझ्या लेकीचा आवडता प्रकार. आठवड्यातुन कमीत्कमी एकदा तरी लेकीला डब्यात लागतोच. शाळेतही हीट आहे. वर ही आवर्जुन सांगते 'होममेड आहे, पॅकॅटचा नाही' Happy

तर माझी रेसिपी बाकी सगळ्यांसारखीच सोपी.
१ चमचा ऑऑ+बटर. त्यात बारीक चिरलेला लसुण घालणे. मग त्यावर मैदा घालून (आता कणिक ट्राय करणार आहे पुढच्या वेळी) परतणे. मग त्यावर दुध घालुन थोडा वेळ शिजू दिलं की व्हाईट सॉस तयार. त्यात बारिक चिरलेलं बेसिल,मिरपूड, चिली फेक्स घालाव्यात.
मशरुम्स टाकायचे असतील तर ते आधी थोडे परतुन घेतलेले असावेत. मी आवडत्या भाज्या सरळ मावे मधे थोड्या शिजवुन घेते म्हणजे त्या फार शिजत नाहित. मग सॉस मधे मशरुम्स, कॉर्न, गाजर, ब्रोकोली ई. घालून, शिजवलेला पास्ता घातला की पास्ता रेडी. Happy

टॉमेटो बेस्ड करायचा असेल तर पास्त्या सोबतच एक टॉमेटो त्या पाण्यात टाकते म्हणजे त्याचं साल छान निघुन येतं. मग मैदा आणि दुधाऐवजी बारिक चिरलेला टॉमेटो घालायचा. बाकी सगळं सेम.

माझ्याकडे बेसिलचं रोप आहे. त्याला छान मंजिर्‍यापण आल्या आहेत. कुणाला हव्या असतिल तर माझ्याकडे या. Proud

निंबुडा, बेसिल हे एक तुळशीच्या जातीचं हर्ब आहे. ह्याची पानं पास्त्यामधे टाकतात. हे दुकानामधे ड्राय स्वरुपात पण मिळतं पण ताज्या बेसिलची चव पास्त्यामधे फार छान लागते.
हे माझ्याकडचं बेसिलचं रोप.
ह्यालाही तुळशीसारख्या मंजिर्‍या येतात.

DSCN1003.JPG

Pages