पास्ता प्रकार, पास्ता सॉस इ...तंत्र, मंत्र आणि पाककृती कल्पना

Submitted by लाजो on 19 March, 2012 - 04:57

खरतर इटालियन असलेला हा पास्ता हल्ली आपल्या भारतीयांच्या घरात देखिल नेहमी बनवला जातो आणि आवडीने खल्ला जातो Happy

या पास्त्याचे विविध प्रकार इथे परदेशात आणि आता देशात देखिल सहज उपलब्ध आहेत. यात स्पगेटी, एल्बो, पेन्ने, बोपास्ता, फेटुचिनी, शेल्स इ आणि लझानिया, कॅनेलोनी करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पास्ता शीट्स आणि ट्युब्ज असे प्रकार असतात. कुठल्या प्रकारचा पास्ता कधी वापरावा? तो शिजवण्याचे तंत्र, मंत्र इ बाबत चर्चा इथे करुयात.

पास्ता सॉस चे देखिल असंख्य प्रकार आहेत. टॉमेटो बेस्ड पास्ता, चिझी पास्ता, बेक्ड पास्ता, लझानिया, कॅनेलोनी, मॅकचिझ इ इ. हे सॉस बनव्ण्याच्या तुमच्या कल्पना, तंत्र, मंत्र आणि पाककृती (योजाटा आणि इथे लिंका Happy ) इथे लिहुयात.

तसेच पास्ता डिश केली तर त्याबरोबर कॉम्बीनेशन म्हणुन गार्लिक ब्रेड, की सॅलड की अजुन काही साईड डिश इ इ ची चर्चा आणि कल्पना देखिल लिहा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे पाहिलं नाहिये कुठे. >>
नर्सरी मध्ये मिळते का ते पहायला हवे.

हल्ली हल्लीच पास्ता चा एक नवीन प्रकार मनाचेच ट्राय केला. नॉर चे सूपी नूडल्स मिळतात. त्यातले टोमॅटो फ्लेवर चे नूडल्स चे पाकिट पडले होते घरात. मग एकिकडे पास्ता शिजवून पास्ता सॉस, मेयॉनीज, बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो, मीठ, तिखट, हळद घालून तेलावर परतला. दुसरीकडे पाकिटावर नमूद केलेय त्यापेक्षा दिडपट पाणी घेऊन सूपी नूडल्स उकळले. शेवटी दोन्ही पदार्थ एकत्र करून थोडाच वेळ (१ मिनिटभर) उकळले. हा हायब्रीड प्रकार एकदम सह्हि लागला. Happy

आई गं अमृता, आता तू भेटशील कधी आणि देशील कधी आणि कधी ते रोपटं वाढायचं गं? Happy त्यापुढे पास्ता Lol साध्या पोष्टाने पाठवतेस का जमत असेल तर? Happy

मी deepac73 ह्यांच्या क्रुतीने पास्ता केला. मैदा न वापरता कणीक वापरली आणि पिझ्झा हर्ब्ज १ चमचा वापरलं. अप्रतीम चव होती.खूप खूप धन्यवाद. ह्याच पद्धतीने पास्ता बनवेन आता.( आत्तापर्यंत ३-४ वेळा तरी बनवला असेन)

ही माझी टॉमॅटो बेस्ड पास्ता सॉस ची कृति (यात मी चीज अजिबात घालत नाही.)

स्टेप १ : हे मिक्सर मधून काढ्यायचे इन्ग्रेडियंट्स:
pasta01.jpg
(मी छोटी गोल लाल मिर्ची वापरलीये पण नॉर्मल लाल मिर्ची चालेल.)
कृति:
फ्रेश बेसिल + ३ छोटे टोमॅटो+ १ लाल सिमला मिर्ची+जिरे +मि र्ची हे तेलावर थोडं परतायचं (जास्तं वेळ नाही परतायचं) टोमॅटॉ सॉफ्ट झाले कि गॅस बन्द करून कोमट झाल्यावर मिक्सर वर भरड वाटायचं, स्टेप ३ मधे येणार्‍या कृति साठी लागेल, अत्ता बाजुला ठेवा :).

स्टेप २: हे तेलावर परतून घ्यायचे इन्ग्रेडियंट्सः

pasta02.jpgs.JPG
(मी फ्रोजन कॉर्न दाणे वापरलेत, फ्रेश पण वापरु शकता, ड्राय सिझनिंग साठी मी Trader joe's 21 seasoning salute वापरलय, त्या ऐवजी इतर कुठले इटालियन हर्ब्स पण चालतील.)
कृति:
टिस्पुन बटर + १ टेबलस्पुन तेल गरम झाल्यावर त्यात १ गड्डा बारीक चिरलेला लसुण + ड्राय हर्ब्स चवीनुसार घालायचे.
नंतर १ मिडियम साइझ कान्दा एकदम बारीक चिरून घालायचा, अजुन परतायचे, थोड्या वेळानी १ यल्लो स्क्वॅश पील करून बारीक चिरलेली घालायची, मऊ होई पर्यंत परतायचे.

स्टेप ३ :
अता स्टेप १ मधे मिक्सर मधून वाटलेला सॉस यात मिक्स करा, उकळी आली कि थोडं ऑलिव्ह ऑइल + पाणी घाला, झाला फायनल सॉस तयार !
या सॉस ची खासियत, विकतचा सॉस अति आंबट लागतो तसा हा मात्र लाल सिमला मिर्ची आणि भाज्यांच्या चवीमुळे खूप आंबट लागत नाही..
pasta12.jpg

आवडता पास्ता बॉइल करून घेतलात कि सॉस आणि पास्ता मिक्स करा. मी ट्रेडर जो चा हा पास्ता वापरला .
p11.jpg
रेडी टु इट :).
pasta11.jpg

बरोबर आवडती वाइन, फ्रेश गार्लिक ब्रेड इ. काँबिनेशन = डिनर कंप्लिट :).
ही माझी फेवरेट वाइन :).
wine_0.jpg

मस्तं फोटो डीजे. मी भोपळी मिरची घालून पाहिन पुढच्या वेळी. कांदा मी पास्त्यात कधीच घालत नाही. एकदा ट्राय करायचय. Happy

ही माझी लाल, पिवळ्या भोपळी मिरच्यांसोबतची रेसिपी.

http://www.maayboli.com/node/3892

ह्यात आता मी व्हाईट सॉस करुन घालते. तेव्हा तो माहित नव्हता. Happy

मी लाजोच्या methodनी होममेड पास्ता करून पाहिला. पण माझा पास्ता नुसत्या मीठाच्या पाण्यात घालुन शिजत नाहिये. त्यामुळे मी शेवटी सरळ कूकरमधून काढला... पण मला काय गोंधळ होतोय समजत नाहिये...कुणाला असा प्रोब्लेम आला आहे का? काय चुकत असेल?

२० मुलांसाठी पास्ता बनवायचा असेल तर प्रमाण कसं ठरवायचं..
८-१० वयोगट
भारतात मिळतो तो डेल मॉन्टे (पेने) पास्ता ची किती पाकिटं लागतील ?

स्मिता, कमीत कमी ६ ते ८ पाकिटे लागतील. साधारण एका पाकिटात ( मोठ्या ) ३ लहान मुलांसाठीचा पास्ता होतो. त्याप्रमाणे पाकिटे घे. जास्त उरला तरी मोठी माणसे खाऊ शकतात किंवा दुसर्‍यांदा सर्व्ह करता येतो.

डेल मॉन्टे (पेने) पास्ता चं एक पाकिट ५०० ग्रॅम्स च असतं गं...त्यात ६-८ लोकांचा पास्ता होउ शकेल असं वाटतय मला..पण खात्री नाही
रश्मी तु कोणत्या कंपनीच्या पास्ता पाकिटाचं प्रमाण सांगते आहेस....ते पाकिटं किती ग्रॅम्स चं अस्तं त्याप्रमाणे मी ठरवु शकेन..

पास्ता बरोबर अजून काय असणार आणि लिमिटेड का अनलिमिटेड पास्ता, भाज्या आणि sauce किती पडणार ह्यावर पण किती पास्ता पाकिटे लागतील ते ठरेल. 500 गमस मध्ये 5 ते 6 च लोकं बसतील , पास्ता खाणारे. 100gms uncooked पास्ता per person, माझा अंदाज.

पास्ता सोबत गार्लीक ब्रेड आणि काहीतरी गोड असेलच...
सगळ्या ८-१० वयाच्या मुली आहेत खाणार्या...सो त्याप्रमाणे ठरवीन...
भाज्या जास्त नाही टाकणार..कांदा, कॉर्न न कॅपसिकम ईतकच...

Pages