फुलली माझी बाग पुन्हा

Submitted by अवल on 20 March, 2012 - 00:10

चैत्राची चाहूल लागली अन माझी बाग पुन्हा फुलू लागलीय Happy

मधुमालती दुसर्‍यांदा बहरात आलीय. पण या वेळेस अगदी चहू बाजूंनी Happy
DSC_0086.JPGDSC_0082.JPGDSC_0081.JPG

सकाळी फुललेल्या या कुंदाच्या चांदण्या
DSC_0087.JPG

या हंगामातले हे लिलीचे पहिले फूल
DSC_0085.JPG

ही हिरवीगार झिपरी
DSC_0089.JPG

अन हा चकचकीत पाम
DSC_0088.JPG

अन हा गर्द हिरवा शेफ्लेरा (योग्य नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद शांकली Happy मराठी नाव काय याचे ? )
DSC_0091.JPG

नुकतेच रुजू लागलेले कृष्णकमळ. ही येउ घातलेली कळी तर नव्हे ?
DSC_0096.JPG

हा गुलाब
DSC_0093.JPG

पण माझ्या लाडक्या तू कधी फुलणार ? हा मोगरा माझ्या दारी गेल्या वर्षीपासून वाढतोय, पण अजून फक्त लाडच करून घेतोय.
DSC_0092.JPG

अन ही माझी सर्वात लाडकी रातराणी ! पहा कशी लगडलीय कळ्यांनी ! रोज रात्री उशीरापर्यंत हीच माझी सोबत करते पुस्तकं वाचताना Happy
DSC_0090.JPG
वरच्या झिपरीच्या अन पामच्या फोटोतही सापडेल ती तुम्हाला.

अन मग माझ्या मनातला मोर असा हातावर उतरला Wink
DSC_0076.JPG

गुलमोहर: 

मस्त फुलबाग Happy

पण माझ्या लाडक्या तू कधी फुलणार ? हा मोगरा माझ्या दारी गेल्या वर्षीपासून वाढतोय, पण अजून फक्त लाडच करून घेतोय.>>>>माझ्याकडे पूर्ण बहरलाय मोगरा. :टुकटुकः Happy

पण अजून फक्त लाडच करून घेतोय.>> थोडेच दिवस थांब आता बहरेलच येत्या एक दोन महिन्यात

बाकी बाग छान फुललीये

मस्त गं अवल! तुझा 'मळा' दाखवला होता तु... खुप सुंदर!
जिप्स्या... मोगर्याला फुलं यायला लागली तुझ्याकडे? Uhoh Sad
माझ्या पण मोगर्‍याला अजुन नाहीत फुलं! हो. अनंताला कधी नव्हे ते भरपुर कळ्या लागल्यात.

जिप्स्या... मोगर्याला फुलं यायला लागली तुझ्याकडे?>>>>येस्स्स Happy भरपूर कळ्या आल्या आहेत त्यातील काहिंनी कालपासुनच फुलायला सुरुवात केलीय. Happy

य्ये जिप्स्या! माझ्या मोगर्‍याला का नाही लागत कळ्या? त्याची आता छाटणी करुन काही उपयोग होईल का? कि माती जरा भुसभुशीत करु?

सुरेख !
रोज रात्री उशीरापर्यंत हीच माझी सोबत करते पुस्तकं वाचताना > मस्त मस्त !

आरती, कित्ती छान बाग आहे तुझी!
मला एन्वी फिलिंग आलंय (इक्कूसंच हं) Happy
(मी एक एक करून नवीन झाडं जमवत आहे, हळू हळू कारण मला त्यांना मेन्टॅन करता येईल का हे बघायचय मग पसारा वाढवेन जरा :), तुझी बाग पाहून तर अज्जून हुरूप आलाय!! )

वॉव सुंदर बाग... ह्या बागेत मस्त 'केन' ची खुर्ची टाकुन, कॉफी पीत, हातात आवडीच पुस्तक घेऊन बसायला कित्ती छान वाटेल. Happy

जिप्सी ssssssssssssssss, हिमस्कूल sssssssssssssssss
माझ्या मोगर्‍याला जळवायला जरा फोटो टाका ना Wink मग माझाही फुलेल Happy
धन्यवाद सर्वांना Happy
जयू, काही नाही गं फक्त पाणी, प्रेम, अन थोडी निगा Happy
जागू आमची आपली छोट्टीशी बाग Happy तुझ्याकडे यायचय एकदा Happy
बागेश्री Happy अगं मीही अगदी चार कुंड्यांनी सुरूवात केली. फक्त हवी ती आणि तीच झाडं आणली इतकच Happy
मानस Happy असे रहायला मिळाले तर कित्ती छान . मग तिथे माझे नातलग - हरणं, वाघ येतील नाही ?
माधुरी, मी तेच करते. नवर्‍याच्या कधीची मागे लागलेय, एक मस्त झोपाळा आणू म्हणून ! पण बहुदा मी सारखी तिथेच बसेन म्हणून टाळतोय बहुदा Wink

हिम्सकूल तुमचीपण बाग मस्त.
मधुमालती,रातराणी(यांची रोपे लागतात की फांदि लावून रोप करायचे ?), अननस कुंडीत फुलवण्याचा मीपण प्रयत्न करणार.

हिमकुल्स अहाहा मस्तय बाग.. अबोली, लाल चाफा (?), मोगरा मस्त मस्त
तुमच्या कष्टाला फळ (सॉरी फुलं) आली Happy
बरीच मेहनत लागत असेन ना ? ग्रेट

Pages