फुलली माझी बाग पुन्हा

Submitted by अवल on 20 March, 2012 - 00:10

चैत्राची चाहूल लागली अन माझी बाग पुन्हा फुलू लागलीय Happy

मधुमालती दुसर्‍यांदा बहरात आलीय. पण या वेळेस अगदी चहू बाजूंनी Happy
DSC_0086.JPGDSC_0082.JPGDSC_0081.JPG

सकाळी फुललेल्या या कुंदाच्या चांदण्या
DSC_0087.JPG

या हंगामातले हे लिलीचे पहिले फूल
DSC_0085.JPG

ही हिरवीगार झिपरी
DSC_0089.JPG

अन हा चकचकीत पाम
DSC_0088.JPG

अन हा गर्द हिरवा शेफ्लेरा (योग्य नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद शांकली Happy मराठी नाव काय याचे ? )
DSC_0091.JPG

नुकतेच रुजू लागलेले कृष्णकमळ. ही येउ घातलेली कळी तर नव्हे ?
DSC_0096.JPG

हा गुलाब
DSC_0093.JPG

पण माझ्या लाडक्या तू कधी फुलणार ? हा मोगरा माझ्या दारी गेल्या वर्षीपासून वाढतोय, पण अजून फक्त लाडच करून घेतोय.
DSC_0092.JPG

अन ही माझी सर्वात लाडकी रातराणी ! पहा कशी लगडलीय कळ्यांनी ! रोज रात्री उशीरापर्यंत हीच माझी सोबत करते पुस्तकं वाचताना Happy
DSC_0090.JPG
वरच्या झिपरीच्या अन पामच्या फोटोतही सापडेल ती तुम्हाला.

अन मग माझ्या मनातला मोर असा हातावर उतरला Wink
DSC_0076.JPG

गुलमोहर: 

अन ही माझी सर्वात लाडकी रातराणी ! पहा कशी लगडलीय कळ्यांनी ! रोज रात्री उशीरापर्यंत हीच माझी सोबत करते पुस्तकं वाचताना >>>>>> अवल, जळून अगदी कोळसा झाला माझा Happy
मला पण खूपच आवडते ग, पण काय करु? लावायला जागाच नाही Sad
तुझी कुंडीतली रातराणी पाहुन मी पण लावण्याचा विचार करते आहे. तिच्यासाठी काही स्पेशल काळजी घ्यावी लागते का? म्हणजे मी बागकामात अगदीच दिव्य आहे म्हणुन विचारतेय Proud

हिमांशू मस्त रे Happy मोगर्‍याचा वास घमघमला बघ Happy
विनार्च येतेस का घरी ? दोघी मिळुन वाचू Happy अगं नाही कुंडील छान आली रातराणी, फार वेगळे काही नाही केले Happy बघ लावून येईल तुझ्याकडे पण. प्रेम आहे ना आपले तिच्यावर , मग नक्की उमलेल ती Happy
धन्स सगळ्यांना Happy

मस्त बाग अवल Happy
पाम्स वाढून बर्‍यापैकी मोठा होतो ना? घरात लावण्यासाठीचा पाम्स वेगळा आहे का?

अननस कुंडीत लावायला काही प्रॉब्लेम येत नाही... फार पाणी नसले तरी चालते... पण कुंडी मोठी पाहिजे आणि प्रचंड संयम पाहिजे.. लावल्यापासून जवळ जवळ वर्षानी फळ धरलय... तेव्हढा कालावधी लागतोच... अननसाचा वरचा भाग असतो तो डायरेक्ट कुंडीत पुरायचा आणि फक्त दर दोन दिवसांनी पाणी घालत रहायचं.. साधारण ३ त३ ४ महिन्यांनी कोंब फुटलेला दिसायला लागतो..

@माधुरी१०१ .. लाल रंगाची लिली आहे.. वेगळ्या प्रकारची.. यंदा एकदम ७ फुलं आलीयेत.. आणि पुढची कळी पण आली आहे.. नेहमी एका पाठोपाठ एक अशी येतात..

घरातल्या बागेतील फुलं पाहून मस्त वाटलं. आमच्या लहानपणी तळमजला असल्यामुळे आम्ही भरपूर
फुलझाडं लावली होती. त्या आठवणी जाग्या झाल्या! सोनटक्का,लिली,गुलाब, मोगरा, जास्वंद, तगर,
कण्हेरी वगैरे! खूप फुलं यायची..सोनटक्का, गुलाब, मोगरा आणि लिलीची फुलं माळून शाळेत जायचो!
आईच्या शब्दात डोक्याचा फ्लॉवरपॉट करायचो!!:स्मित:
लिलीच्या फुलांना चॉकलेटसारखा सुवास यायचा. तगरीच्या कळ्यांचे नाजुक गजरे करायचो!
अवल, हिमकुल्स खूप छान वाटलं..मधुमालतीचा मंद सुगंध नाकात दरवळला!

Pages